चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आज सकाळी ओट्स , मिल्क
११:३० ला उसळ पोळी
२ ला बदामाच दुध,
४ ला १ छोटी वाटी ब्लु बेरी, ४/५ लिची, १ कप दुध
६:४५ ला ३ इड्ल्या, सांबार

आज १५ मिन व्यायाम झालाय, अजुन १/२ तास चालणार आहे कुत्र्या बरोबर

चालण झाल की ७/७ ? Happy

रिलॅप्सः-

वजन कमी झाल्यावर छान मोकळे मोकळे वाटू लागल्यावर , मस्त कॉन्फिडन्स आल्यावर माणसाला एक दुर्बुद्धी होते. (आता माझी स्टोरी सुरु होते). रिकाम्या अथवा श्रिंक झालेल्या 'वखवखलेल्या ' अ‍ॅडिपोज' टिश्यूज याची वाटच पहात असतात. आता काय साध्य झाले आहे घेऊ एखादा कप चहा, खाऊ एखादी बिर्याणी घ्या हो पेढे सेलिब्रेशन चे आहेत असे 'फुल टॉसेस 'पडू लागतात. मग एकाचा दोन कप दोनाचे ३ कप्चाहा , आज काय थंडीच आहे, काय करणार बॉसनेच चहा ऑफर केला, अरे हे हॉटेल जगप्रसिद्ध आहे बिर्याणी साठी, अरे चितळ्यांची बासुंदी आहे अर्धीच वाटी घे......

आणि अ‍ॅडिपोज टिश्यूज, 'पाताळविजयम ' या मद्राशी चित्रपटातील राक्षसासारख्या खदखदा हंसू लागतात ! ::फिदी:

हेल्लो लोक्स

आज सकाळी फिरणे ५.३० ला..\

सकाळी चहा सोबत दोन बिस्कीट..
आणि नाश्ता केला.....

माझे दोन दिवसाचे पाँइंट कमी करा....... मी दोन दिवस ना फिरय्ला गेले ना व्यायम केला ..... Sad

काल बरं नव्हतं, त्यामूळे नो व्यायाम /वॉक्/दोरीवरच्या उड्या. आजपण नाही करणार. बाकी जेवणाचे पॉइंट्स मला परमनंट दिले तरी चालतिल. Happy

सकाळ : २ बदाम,१/२ कप अगोड चहा,१ अगोड टोस्ट
ब्रे.फा. : नाचणी + उडीदाच्या डाळीचे दीड पोळे-थोडीशी चटणी, पाऊण ग्लास गाईचे दूध,१/२ कप चहा
दुपार : दीड फुलके, फळभाजी.,डाळ,सोलकढी,पाऊण वाटी खीर.
मधे एकदा १/२ कप अगोड चहा.
संध्याकाळ : ,शेवबटाटाच्या ३ पुर्‍या, १/२ कप चहा.,१ खारी,१ फळ
रात्र : १ फुलका, भाजी, वरण, भात,सोलकढी,सॅलड

३० मिनिटे चालणे...................६/७

१४/८/८ updates
four hr walk with breaks and not brisk
whole day - apple,tea, half chicken shourma ,boiled chole ,1 seekh kebab, salads w olive oil dressing, humus ,mosambi juice w/o sugar, one small slice of papaya
६/७ ???

माझा अपडेट -
ब्रेफा , लंच नि फक्त ३० मिनीट चालणं झाल.. काल संध्याकाळी आंध्रास्टाईल पार्टी होती म्हणुन १ इडली, दही वडा नि चिंचभात , पोंगल...

my updates for today.
Morning - 45 minutes walk
tea and 2 biscuits
bf - Rava takat bhijvoon tyat dhabu kisun tyachi don dhiradi
garam limbu pani
jewayala Dhabu mirachichi bhaji, 2 fulake, ek vaaTee varan.
30 min workout (20 min belly blast workout + 10 min toning walk)
tea + 2 biscuits
7 pm - 1 mosamb + garam limbu pani
jewayala bhaji + 2 fulke + ek wati waran (no fodani)

my updates for today.
Morning - 45 minutes walk
tea and 2 biscuits
bf - Rava takat bhijvoon tyat dhabu kisun tyachi don dhiradi
garam limbu pani
jewayala Dhabu mirachichi bhaji, 2 fulake, ek vaaTee varan.
30 min workout (20 min belly blast workout + 10 min toning walk)
tea + 2 biscuits
7 pm - 1 mosamb + garam limbu pani
jewayala bhaji + 2 fulke + ek wati waran (no fodani)

केदार, एक प्रश्न विचारू ? तू तुझ्या पूर्ण् दिवसाचा इनटेक लिहित नाहीस का ? एवढे कमी खाऊन तुझा दिवसभर स्टॅमिना कसा टिकेल ?

केदार, एक प्रश्न विचारू ? तू तुझ्या पूर्ण् दिवसाचा इनटेक लिहित नाहीस का ? एवढे कमी खाऊन तुझा दिवसभर स्टॅमिना कसा टिकेल ? << एक्झाक्ट्ली. मलाही हाच प्रश्न पड्ला होता

तू तुझ्या पूर्ण् दिवसाचा इनटेक लिहित नाहीस का>>> मला वाटते की केदार १ ते ४ बाबींबद्दल लिहितात. म्हणजे प्रोटीन, फळं,तेलकट/गोड खाल्ले असल्यास ,व्यायाम इ.इ.बाकी आपण इथे नवखे असल्याने अ'पासून ज्ञ; पर्यंत लिहित असतो.

सॉरी ,
मी देवकीने लिहिल्याप्रमाणे फक्त १ ते ४ बाबी बद्दल लिहित होतो , त्यामुळे गैरसमज झाला .
तुमची पध्दत जास्त चांगली आहे कारण त्यामुळे खाण्यात किंवा वेळेत चूक असेल तर तेही कळते.
आजपासून मीही या फॉर्मॅट मधे आणि गुण असे लिहित जाईन Happy

आज न कर्त्याचा वार म्हणुन सकाळी पोहे , दुपारी थालिपीठ नि रात्री मेक्सिकन राईस - होम मेड विथ लॉट्स ऑफ ब्लॅक बीन्स, व्हेजी , ग्वाकोमेल
व्यायाम - ३० मिनीट चालणं नि घरची साफसफाईत झाली असेल ती .. Happy

०८-०८-१४ -- ०३/०७ व्यायाम नाही
०९-०८-१४-- ०४/०७ व्यायाम पूर्ण, ़खाण्यावर कंट्रोल नाही.

आज दिवसभर ट्रिप्/बाहेर खाणेपिणे असल्याने ०/७ असेल असे वाटते.

आज सकाळी कोमट पाणी, लिंबु, मध
९ ला पोहे
११ ला १ पीच, ३ अंजीर, १/२ वाटी ब्लु बेरी
१:३० ला उसळ १ पोळी, काकडी
४:३० ला १ पीच, १/४ वाटी ब्लु बेरी
७ ला मेथीची भाजी, उसळ १ पोळी

४० मिनट एलिप्टीकल

मार्क ६/७, पोहे टाळायला पाहीजे होते.

केदार तुझ्या डायट्मुळे वजन कमी होइल तेव्हा होइल पण उसळींना मोड आणायला एक्स्पर्ट झाले आहे मी Happy

ओ.के. देवकी आणि केदार, माझी समजण्यात चूक झाली. Happy
केदार, अनेकदा ऋजुता चं पुस्तक किंवा पेपर मधेले लेख वाचून 'जेव्हा जे जे खाल ते लिहून ठेवा म्हणजे काय चुकीचं खाल्लं किंवा काय टाळता आलं असतं ते तुमचं तुम्हाला समजेल.'असं वाचायचे तेव्हा वाटायचं कसं शक्य आहे हे ? पण इथे आल्यापासून ते जमायला लागलंय. आणि खरं तर त्याचा फायदा होतोय.

९/८/२०१४
६.३० सकाळी - आवळा रस + पाणी
७.०० अर्धा कप दूध
ब्रेकफास्ट - दोन चमचे फोडणीचा भात + थोडा नाचणीच्या शेवयांचा उपमा.
लंच - दोन फुलके, मटकीची उसळ+ वाटीभर आमटी. चवीला इतरांच्या साठी केलेला दोडका राईस.
दुपारी - चहा + दोन बिस्केटं
संध्याकाळी - अर्धी वाटी उसळ+ जरा वेळाने दोन मुठी डाळिंबाचे दाणे
जेवण- २ फुलके, फ्लॉवर+फरसबी+टोंमॅटो+कोबी अशी मिक्स भाजी+ वाटीभर आमटी

व्यायामाचा बट्ट्याबोळ झाला.. घरात फालतु आवराआवरीची कामं नवर्‍याने अचानक काढली त्यामुळे योगा चुकलं.. संध्याकाळी लेकाच्या रडारडीत जॉगिंग चुकलं.. ० गुण. सॉलीड वाईत वाटतयं

कालचे गुण ३/७.
एकूण - २०/२८

सकाळी - आवळा रस + पाणी
अर्धा कप चहा + १ टोस्ट
ब्रेकफास्ट - १ छोटा केक + दूध + भुईमुगाच्या वाटीभर शेंगा
लंच - दीड फुलके, उसळ+ वाटीभर आमटी ,साधा भात,सोलकढी, नारळीभात (चापला)
दुपारी - चहा + १ टोस्ट

जेवण-१ छोटी चपाती, बटाटा भाजी, आमटी-भात,सोलकढी,नारळीभात

नाही चालले ........१/७

>>मला पण यायचय.. पण मोबाइल वरुन ऑनलाईन असल्यामुले अपडेट्स देणे अवघड आहे. >>
मी_चिऊ,
तुमचे अपडेट डायरीत लिहा. इथे आठवड्याचे गुण एकत्र करुन एकदाच अपडेट द्या. आहार आणि व्यायाम पाळणे महत्वाचे. इथे अपडेट देण्याचा उद्देश सातत्य राखणे आणि एकमेकांना सपोर्ट करणे.

१ १/२ तास चालणे. फळे खाल्ली, प्रथिने खाल्ली (अख्खे मसूर). व्हिगन पिझ्झा अर्धी स्लाईस खाल्ला म्हणून १ गुण कमी. ६/७

६.३० सकाळी - कोरफड रस + पाणी
७.०० अर्धा कप क्रीम काढलेले दूध
८.३० दोन पातळ डोसे + मिरचीचा खर्डा
११.०० पॉवेर वॉक नंतर दुधी + मेथी घालून केलेला एक पराठा
१२.३० पुन्हा एक पराठा+ थोडी भाजी + आमटी एक वाटी
५.०० उपमा एक प्लेट + चहा
९.०० दीड वाटी भरपूर भाज्या घालून पुलाव.

दुपारनंतर ताप भरल्याने पुन्हा व्यायाम जमला नाही. तोंडाची चव गेल्याने एक कपकेक खाल्ला. Sad
गुण - ३/४ व्यायामाचे + २/३ आहाराचे एकूण ५/७
आत्तापर्यंतचे - २३/२८+ ५/७=२८/३५
आज काय काय जमेल माहीत नाही.. ताप असताना व्यायाम शक्य नाही.. Sad

८ ला गरम पाणी, लिंबु, मध
९:३० ला २ एग व्हाईट च ऑम्लेट, १ पोळी
११:३० ला पीच, चहा
१:३० ला १/२ पोळी, मटकीची उसळ, १ टोमॅटो, कांदा, १ १/२ वाटी नारळी भात
४ ला परत १/२ वाटी नारळी भात
९:३० ला उसळ, १ पोळी

नारळी भाताने घात केला. ५/७ मार्क्स

नऊ तारखेला व्यायाम + आहार नियंत्रणात होता. गुण - ६/७
काल मात्र रक्षाबंधनाने अदितीसारखाच माझाही घात केला, नो व्यायाम, नारळीभात, जिलेबी , रसमलाई
कालचे गुण - ०/७

आज - सुर्यनमस्कार झाले, पुढचे नंतर अपडेट करेन

केदारदा, मलाही अ‍ॅड कर.
२ दिवस नो तेलकट , चहा दिवसातुन एकदाच अर्धा कप, २० मिनीटे घरातल्या घरात व्यायाम.
काल फक्त २ करंज्या खाल्या ओल्या नारळाच्या..
रोज ऑफिसमध्ये गरम पाणी पितेय, ऑफिसला आधी पण चालतच जात होते, त्याचा वेग वाढवलाय..

माझे अपडेटस:

१. ९/८ शनिवारः ५/७ - खाणे चुकले.
२. १०/ रविवारः २/७ - राखी अन ट्रीप Lol सर्व काही पाण्यात. तरीपण फळे अन उसळ खाल्ली.
३. ११/८ सोमवारः ३/७ - व्यायाम हुकला. पण, फळे अन उसळी आहारात...

Pages