चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती२, उपयुक्त सल्ले. पोस्टस वाचतेय मी तुझे. प्रयत्न करतेय पण कधी थकल्याने कधी बाईची दांडी, कधी उशीरापर्यंत ऑफीसवर्क कधी पिल्लूचा मूड याने टाईम मॅनेजमेंट अक्षरशः दिव्य वाटतेय. Sad
जेवणाची वेळ ९.३० ते १० फिक्स. कारण घरी जाऊन बनवायचं तर दोन तास आरामात जातात. वर पिल्लू आला की त्याचा वेळ मग आम्ही बसलो की त्याला हाताने खायचं असतं. मग नंतर भरवायला घेतलं की कंटाळा नी उपाशी पोटी झोप. सो पिल्लू थोडा मोठा होईपर्यंत स्ट्रिक्टली फॉलो नाही करता येणार... पण जमेल तसं आणि तितकं करतेय. गोड, हॉटेलचं, बेक्ड, तेलकट टाळतेय सध्या.

काल थोडं पनीर खाल्लं Sad

माझा सकाळचा व्यायाम चुकला आज. Sad संध्याकाळी भरून काढेन सो आजचे संध्याकाळपर्यंत ३/७. टोटल आजपर्यंतचे 21/29 Sad

उसळ नाही खाल्ली, पण गोड आणि तळलेलं सुद्धा नाही खाल्लं व्यायाम होतोय का नाही पाहू संध्याकाळी. सध्या मला झोपच पुरत नाही आहे. ह्याचा व्यायाम न होण्याशी काही संबंध आहे का?

कोणी डायेटिशुयन फॉलो करत आहे का? तुमचा प्लान शेयर करू शकाल का? मी प्रोटिन्स वाढवले, ओट्स खाल्ले तर गॅसचा त्रास होऊन पाठ कंबर दुखते.

सोमवार ४ ऑगस्टः

१. उपवास म्हणुन १.५ प्लेट साबुदाणा खिचडी Happy
२. दुपारी २ वाजता १ केळ
३. सन्ध्याकाळी कटीन्ग चहा
४. रात्रि पालकाची पातळभाजी, ३.५ पोळी, अर्धी वाटी भात

व्यायामः ४५ मिनिटे.

एकूण गुणः ६/७.

पनीरपेक्षा स्वस्त आहेच शिवाय फॅट्स कमी

कुठे मिळते?? मला वाटत नाही मला चव आवडेल म्हणुन.. सोया मिल्क प्यायलेय्..यक्क

नासलेले दूध फेकणे जीववर येते म्हणून त्याचे पनीर बनवून बुर्जी पराठे असे प्रकार केले जातात. मुलाने टाकलं ते पाव वाटी खाल्लं Sad सोया चंक्स ची कांदा टोमॅटो ग्रेव्ही बनवते अधून मधून. टोफू ट्राय नाही केलेय कधी.

टोफू मला ट्राय करायचय. करून सांगते साधना कसं लागतं/ फ्लेवर्ड सोया मिल्क ट्राय कर चॉकोलेट फ्लेवर चांगला आहे.

पण टू मच ऑफ सोया ने इस्ट्रोजेन लेवल्स वाढतात. तेव्हा मुलांनो पुरुषांनो टोफू खाताना सांभाळून.

मी ११.३० ला तीन पातळ छोटे फुलके आणि फ्लॉवरची भाजी आता १.४५ ला तीन चमचे मसाला ओट्स पाण्यातून.

कुठे मिळते??>> मी डिमार्ट मध्ये पाहिले होते./
चेतन की कायतरी ब्रॅन्डचं होतं.
टेस्ट पनीर पेक्षा कमी मलाईदार आहे.
प्रचन्ड फरक वै नाही वाटत मला.

टोफू सोया मिल्कसारखं लागत नाही. कसलाही वास येत नाही. हां, आता तुमच्या मनातच असेल की हे काहीतरीच आहे, याला वासच येतो, तर इलाज नाही Happy
चेतरन ब्रॅन्डचे मीही वापरले आहे. अगदी नक्कीच रिप्लेस करता येते पनीरला याने.
सोया चंक्सचाही खूप उपयोग होतो.

अजून एक, पराठे, ब्रेड यांना तेल/बटरशिवाय भाजा. आहारात दोन चमचे तूप असेल तर ह्या वरच्या तेलाची, बटरची मुळीच गरज नाही. दोन चमचे तूप मात्र रेकमेन्डेड आहे.

काल माझे गुण ७
५० मिनिटे व्यायाम, ब्रेकफास्ट - ७ औस दूध, अर्धे सफरचंद लंच- स्पायसी ब्लॅक बिन्स, लेट्युस, टोमॅटो, फॅट्फ्री सॉवर क्रिम घालून २ व्रॅप, दुपारी - अर्धे प्लम, दूध रात्री- २ पोळ्या, पालकची भाजी, दही घालून काकडीची कोशिंबिर, १ तुकडा ७२% डार्क चॉकलेट

केदार, किती छान धागा काढलात.. Happy तुमचा स्वानुभव वाचला होता, त्या अगोदर अगो चा अनुभव वाचला होता.. सगळं कळत असून वळवायचं कसं हे अजून जमलं नाहीये.. आता एवढे मा.बो. कर जोडीला आहेत तर मलाही प्रयत्न करायचा आहे. मलाही इथे अ‍ॅड करा प्लीज..

माझे वजन सद्ध्या ७० ते ७२ मध्ये कमी अधीक होत आहे.. उंची पाच फूट आहे.. किमान दहा ते बारा किलो कमी करायचं आहे. मुलगा आता पाच वर्षाचा होईल.. पण प्रेग्नन्सीतही मी वजन ७० चे ७४ च्या वर जाउ दिले नव्हते.. (बाळाची वाढ मात्र दुर्लक्षित होउ दिली नव्हती. फक्त माझे वजन वाढू दिले नव्हते.) त्यानंतरही जमेल तेवढा व्यायाम करतच होते.. घरी नवरा, मी आणि मुलगा असे तिघेच असतो. त्यामुळे सगळं सांभाळून आता दिड वर्षं फक्त एक ते सव्वा तास योगासनं करायला जाते. मध्यंतरी फायरफॉक्स ची ६ गिअर्स ची सायकलही घेतली. थोडे दिवस सकाळी अर्धा तास चालवायला जात होते पण बेळगावात व्यायामासाठी फार कोणी सायकल वापरत नाही त्यामुळे जरा ऑकवर्ड वाटतं आणि सद्ध्या पावसामुळे टाळलं जातं..

तेलकट आणि गोड खूप कमी.. घरी तळणं फार क्वचित.. बाहेरचं खाणं नवरा शौकिन असल्याने टाळता येत नाही.. Sad मी मुळात शाकाहारी असल्याने इतर स्वयंपाकातही माझा हात तेलावर कमीच होता.. पण नवरा सगळ्याच गोष्टी (भाज्या, झुणका, आमट्या, (तोंडी लावण्याचे पदार्थ) माझ्यापेक्षा छान बनवतो पण मग तेलाची बोंब होते. आता मला फक्त माझ्यासाठी वेगळं बनवायचं सुद्धा जमत नाही आणि त्याला माझं कमी तेलाचं कमी चमचमीत आवडत नाही मग माझा तेलाचा वापर वाढतो Sad

घरी परत व्यायाम सुरु करता येतो का प्रयत्न करते आता..:). उरतो आणि नवरा आणि मुलासाठी रोज करावाच लागतो म्हणून भाताचा इन्टेक वाढला आहे लग्नानंतर, तोही कमी करायचं बघते.. रोज इथे यायला जमेलच असं नाही पण एक दोन दिवसाआड तरी जमवतेच Happy

०४/०८ व्यायाम केला. उकडलेल पांढरे अंड, उसळ, फळ सर्व नीट झाले. गुण ७/७. आज पण सर्व केले पण लंच खुप उशीरा व थोडी शेव व घरचा गाजर हलवा खाल्ला म्हणुन गुण ६/७.

कालचे गुण २/७.
आजचे आतापर्यंत ६. आत्ता २चिक्कीचे तुकडे खाल्ले,म्हणजे ५ गुण.फळ खाल्ले की ६ गुण नक्कीच.

६ गुण नाही.अर्धे फळ आणि जेवणात १ वाटी खीर.त्यामुळे ५ गुण..

मला पण अ‍ॅड करा प्लीज.
सध्या वजन ६४. टारगेट ५८ . बी एम आय त्याप्रमाणे.
कालच फिजीओ नी जीम साठी ग्रीन सिग्नल दिलाय. आठवड्या भरात जायला लागीन. तो पर्यंत व्यायामाचे ० गुण? Sad

काल नीट डाएट नाही झालं .. सकाळी - ब्रेड जाम , दुपारी - कॉर्न पराठा (बिना तेलाचा) + सॅलड, संध्याकाळी- १ सफरचंद + कॉफी नि ८ वा. डोसा + सांबार!!
पण व्यायाम १.५ तास Happy

मी येवू का इथे?

बीएमआय २१ आहे. तो जास्तित जास्त २१.७ पर्यंत गेला आहे आत्तापर्यंत. हे वजन असंच टिकवायचं आहे. खाण्यापिण्यावर व्यवस्थित कंट्रोल केला जातो.तळण बंद, तेलकट पदार्थ अगदी वन्स इन २-३ मन्थ्स होतात. पनीर, चिकन आठवड्यातून एकदा. गोड म्हणजे फक्त दोन वेळा मिळून कॉफीत अर्धा-एक चमचा साखर. बाकी महिन्यातून एखाद्या वेळी.

रोज भरपूर डाळी/ कढधान्य. शक्यतो आलटून पालटून आणि दोन डाळी एकत्र मिक्स करुन(मुग-मसूर, मा-चना, राजमा, छोले,तुर-मसूर, आख्खे मुग-मटकी, चने, सगळ्या मिक्स डाळी, गोबीची कढी असं आलटून पलटून असतं).

दोन फुलके किंचीतसे तुप लावलेले आणि मोठी वाटी - चिकन-मटनाच्या रस्स्यासाठी असते तेवढी भाजी/डाळ. जर डाळ असेल तर सोबत तितकचं सलाड आणि भाजी असेल तर वाटीभर दही किंवा ग्लासभर ताक. याशिवाय शक्य असेल त्यावेळी भाजी-डाळ, सलाड सगळंच असा ही प्रयत्न असतो.

डी ३ सोडलं तर बाकी रिपोर्ट परफेक्ट आहेत. डी३ बॉर्डरवर आहे. .... मेन प्रश्न व्यायामाचा आहे. तेवढ्यासाठीच इथे यायचंय.

झकासरावः पनीर ३ प्रकारात बनते. एक म्हणजे फुल क्रिम असलेल्या दुधाचे, ३.५ फॅट असलेल्या दुधाचे आणि स्किम मिल्कचे (०.५ फॅट). यात क्रमशः रबरीनेस / चिवट वाढत जातो. एक लिटर दुधापासुन पनीर बनिवणारे लोक फुल्ल्क्रिमचे २०० ग्रॅम पनीर बनवतात. जर ६ फॅटचे दुध असेल तर दर १०० ग्रॅम पनीर मागे ३० ग्रॅम फॅट्स आपण खातो. गोव्यात जाणारे पनीर मॅक्सिमम नॉन फॅट असते. इकडे कुठे मिळते ते कल्पना नाही. पण बनते म्हणजे कुठेतरी विकले जात असेलच.

आज व्यायाम १ तास
ब्रेकफास्ट : उपमा
लंचः दोन पोळी, भेंडीची भाजी आणि दही
संध्याकाळी एक कप चहा
रात्री दोन फुलके, गाजर, भेंडी आणि वरण.

६.५/७
प्रोटीन सकाळी नाही खाल्ले मग रात्री भूक-भूक झाली. बाकी व्यायाम इ इ सर्व केल. रात्री प्रोटीन खाल्ले.

हा धागा मस्त आहे. नुसत वाचुन सुद्धा डाएट करायला उत्साह येतोय. <<+१११

नंदिनी, बराच सुधार झाला Lol दिवा घेशीलच Happy

केदार, पॉईट्स साठी सकाळी लिंबुपाणी आणि दिवस भरातील पाणी ही घेता येइल का? .५ तरी. त्या निमित्याने आठवणीने प्यायल जाईल.

धनश्री ,
कालच फिजीओ नी जीम साठी ग्रीन सिग्नल दिलाय. आठवड्या भरात जायला लागीन. तो पर्यंत व्यायामाचे ० गुण? अरेरे >> जर चालणे अलाऊड असेल तर तोवर चाला किंवा सायकल चालवा . किमान तुमह्च्या शरीराला व्यायामाची थोडी सवय होईल Happy

Pages