आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की
आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .
आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .
आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .
कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .
गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .
हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ?
त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?
लोकहो ,
आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया
खाली आणखी काही पॉईंट अॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया
आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.
कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू
रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .
१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही
२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे
जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण
त्यामुळे आता रोजचे गुण १०.
म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अॅड करत जाईन .
काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल
आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा .
31 August, 2014 - 12:59
१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०
१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल
४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस
काजू तर अजिबातच नको. >>>
काजू तर अजिबातच नको. >>> नक्की का? Rujuta Diwekar + cashews google करुन बघा.
काजू प्रमाणात खाल्ले तर फायदे आहेत असे वाटते.
मी पण तुमच्या बरोबर. आज सकाळीच हा बाफ वाचला. वरती केदारनी सान्गीतल्या प्रमाणे taking it one day at a time आणि सद्ध्याच target 30 mins daily exercise आणि easy on sweets + fried stuff.
आज सकाळी ३० मी पोहुन oats+nuts+berries चा ब्रेफा ने सुरुवात केलेली आहे.
अवांतर : उदयन.., तुमचं
अवांतर :
उदयन..,
तुमचं संकेतस्थळ भारी आहे. पण हिंदी तऱ्हेचं मराठी तितकसं अचूक उमटत नाही. 'बोंबला तिच्यायला' हे एकमेव शब्द नैसर्गिक मराठीत ऐकू येतात. बाकी सर्व कृत्रिम वाटतं. पण तरी तुम्हाला धन्यवाद.
आ.न.,
-गा.पै.
बी एस प्रत्येक डाएटिशियन चा
बी एस प्रत्येक डाएटिशियन चा फॉर्मॅट वेगळा असू शकतो. (असतोच रादर)
माझी डा. पुर्णपणे नॅचरल फूड मधून वजन कमी करायला मार्गदर्शन करते. ओट/कॉर्नफ्लेक्स्/असलं काहीही नाही.
केदार लई भारी विषयावर धागा
केदार लई भारी विषयावर धागा काढला आहेस. धन्यवाद ! कृपया मला पण whats app ला add करतो का ?
अनावश्यक चरबी जाऊन muscle gain झाली. करायला फार अवघड नाही पण patience मात्र हवाच. हा माझा स्वानुभव आहे.
)
गिनिपिग at work 
माझ cycling सुरु आहे आणि मला त्याचा खूप फायदा झालाय. तस sports मध्ये active असल्याने मला वजन्वाढीने कधीच भेडसावल नाही. long distance slow cycling किंवा running / walking हे Endurance / cardio exercise प्रकारातले आहेत.Endurance/Cardio exercise चा मला फायदा असा झाला कि वजन साधारण कायम राहून पोट आत गेल
ह्या ग्रुप मधले लोक वेगवेगळ्या वयोगटातले आहेत तेव्हा झेपेल तसे व्यायाम करणार हे तर निश्चित. तसच खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असं स्वाभाविक आहे. आपल्या सगळ्यांचा आळस हा 'common issue' आहे. आता त्याच शत्रूचा उपयोग करून नियमित व्यायाम हा 'common इंटरेस्ट' होऊन आपण सगळे एकत्र आलोय. मला स्वताला सकाळी उठायचं फार जीवावर येत. तरीदेखील मी वेळात वेळ काढून तळजाई वर किंवा वेताळ टेकडी वर ५-६ किमी धावतो किंवा चालतो. बाकी विकेंड ला आमची सायकल रेड तर हटकून असतेच.कधी व्यायाम अनियमित होतो पण मग काही गोष्टी मी आवर्जून करतो त्या खालील प्रमाणे:
१. ज्या दिवशी व्यायाम होत नाही त्या दिवशी अर्धी एक पोळी कमी खातो किंवा नाश्ता कमी करतो
२. ज्वारीच्या लाह्यांच पीठ दुधातून खातो. पचायला छान हलक आणि पोट पण भरणार हा पदार्थ आहे
३. एखादा दिवस Office ला सायकल ने जातोच
४. मला चहाच फार व्यसन आहे म्हणून टपरीवर ५-६ वेळा गेलो तरी दर वेळी अर्धा कपच घेतो. (पण आता मला हे पण कमी करायचं आहे. कठीण आहे खूप पण बघू
५. संध्याकाळी काही खाल्लं किव्वा नुसता अर्धा कप चहा जरी प्यायलो तरी ३०००-५००० पावलांची फेरी न चुकता मारतोच. दिवसाला आपण १०००० स्टेप्स घेण अपेक्षित आहे म्हणे.
*६. गेला महिनाभर मी रात्रीच जेवण बंद केल आहे. संध्याकाळी बर्यापैकी नाश्ता करतो आणि रात्री फक्त सूप पितो. वरील पर्याय मी तुम्हा कोणालाही recommend करणार नाही कारण माझा हा प्रयोग अजून सुरु आहे त्यामुळे results येईस्तोवर थांबा
पण तुम्हा सर्व्वान्चा उत्साह आवडला. चला तर मग व्यायामाला सुरुवात करुया !!
अजुन ग्रूप बनवला गेला नाहीये
अजुन ग्रूप बनवला गेला नाहीये वॉट्सअप चा

ज्यांना ज्यांना अॅड होईचंय त्यांनी केदारला ईमेल नंबर करा
मी मारीची ४ बिस्किट्स (मोनॅको मिळाली नाहीत) आणि चहा खाल्ला प्यायले.
थँक्स गॉड मला पार्ले जी वगैरे आवडत नाही
लक्षात असू दे झोप आणि भूक
लक्षात असू दे झोप आणि भूक जितकी वाढवू तितकी वाढते आणि जितकी कमी असेल तितकी पुरते.
द्क्षुतै, हेडरमधे
द्क्षुतै, हेडरमधे टाकण्यासार्खं वाक्य
एक काम करा मला ईमेल करा
एक काम करा मला ईमेल करा सगळ्यांनी आपापले नंबर्स मी व्हॉट्सप चा गृप तयार करते
सध्या, वजन ८१ किलो (BMI -
सध्या, वजन ८१ किलो (BMI - 25.6) ऊंची १७८ सेमी
१ ले टारगेट- वजन ७५ किलो (BMI - 23.7) २ रे टारगेट - वजन ६८ किलो (BMI - 21.5)
BMI इकडे मोजा - http://www.bmi-calculator.info/
मी गृप केलाय व्हॉट्सप चा. मला
मी गृप केलाय व्हॉट्सप चा. मला ईमेल करा मी एकेकाला अॅड करते. सध्या माझ्याकडे रिया, चिनूक्स आणि दिप्स चा नंबर आहे मी अॅड केलय त्यांना,
दक्षुतै, थांब मला आत्ताच अॅड
दक्षुतै, थांब मला आत्ताच अॅड नकोस करु प्लिज
मला रिमूव्ह कर
माझा नं ८३९०३७६००७ कुणीही
माझा नं ८३९०३७६००७
कुणीही ग्रुप केला तर मला अॅड करा
दक्षिणा तुम्हाल सम्पर्कातुन
दक्षिणा तुम्हाल सम्पर्कातुन नम्बर पाठवलाय
दक्षिणा, वरतीच विचारलेली
दक्षिणा, वरतीच विचारलेली माझी शंका आहे. पनीर तर दररोज आहारात असावे ह्या कॅटॅगिरीत मोडते ना त्यातील कॅल्शिअम आणि प्रोटीन्ससाठी. अर्थात बटर पनीर, मसाला पनीर , पालक पनीर असले पदार्थ खायचेच नाहीत, जेवणातल्याच इतर पदार्थांमधे वापरले जावे.
मारी बिस्कीट चालतात, पण मैदा तर पुर्ण वर्ज करायला हवाय ना आहारातून?
जेवणातील तेलाचे प्रमाण करून त्याऐवजी तेलबियांचा आहारात समावेश केला तर? जसे की सुर्यफुल बी, शेंगदाणे असे.
नलिनी , दक्षिणा, वरतीच
नलिनी ,
दक्षिणा, वरतीच विचारलेली माझी शंका आहे. पनीर तर दररोज आहारात असावे ह्या कॅटॅगिरीत मोडते ना त्यातील कॅल्शिअम आणि प्रोटीन्ससाठी. अर्थात बटर पनीर, मसाला पनीर , पालक पनीर असले पदार्थ खायचेच नाहीत, जेवणातल्याच इतर पदार्थांमधे वापरले जावे.
>> पनीर थोड्या प्रमाणात वापरल तर चालत त्यातल्या कॅल्शिअम साठी . तुम्ही लिहिलेलाच प्रॉब्लेम होतो की ते नुसते खाल्ले जात नाही.
प्रोटीन्स साठी मात्र डाळी , उसळी , सोया जास्त चांगले
मारी बिस्कीट चालतात, पण मैदा तर पुर्ण वर्ज करायला हवाय ना आहारातून?
>> बरोबर मैदा पूर्णच वर्ज्य करायला हवा . पण तसा तो जमत नाही म्हणून त्यातल्या त्यात कमी कॅलरी असलेल्या मारी चालवायच्या
जेवणातील तेलाचे प्रमाण करून त्याऐवजी तेलबियांचा आहारात समावेश केला तर? जसे की सुर्यफुल बी, शेंगदाणे असे. >> शेंगदाणे , खोबरे ई , तेल असणारे पदार्थ तसेही जास्त खाल्ले तर वाईट अस म्हणतात
केदार मलासुद्धा अॅड कर २०
केदार मलासुद्धा अॅड कर
२० किलो कमी करायचय
साखरेचा चहा, गोड आणि तेलकट
साखरेचा चहा, गोड आणि तेलकट पदार्थ जवळ जवळ बंद करुन गेल्या तीन महिन्यात प्रत्येक महिन्याला दोन या प्रमाणे ५- ६ किलो वजन कमी केले आहे. ऑफिसमध्ये मिळणारी स्वीट्स आणि नमकीन ऑलमोस्ट बंद केली आहेत. आमच्या कडे हे प्रमाण प्रचंड आहे अस आता खात नाही म्हणुन जाणवत आहे. बाकी आपल्या भाज्या, कोशिंबीरी, दूध, दही, भात , पोळ्या सगळ नॉर्मल खाते. व्यायाम करायला जमत नाही. पण स्टेशन ते घर आणि ऑफिस चालत जाते.
मला आतून हलक आणि छान वाटत आहे.
मला पन घ्या ह्या वजन घटाव
मला पन घ्या ह्या वजन घटाव मोहीमेत
बघुयात हु इस दी बिगेस्ट लूसर. केदार सोडुन 
दक्षिणा, माझा पण नंबर पाठवते,
दक्षिणा, माझा पण नंबर पाठवते, प्लीज अॅड कर.
मी एक 'motivational' मेंबर होऊ शकते या ग्रूपमधे. मी स्वतः व्यायाम फ्रीक आहे आणि 'दर २ तासांनी प्रमाणात खाणे' हि योजना यशस्वीपणे राबवतीये....:)
माझेही २ शब्द...
जर भात मनापासुन आवडत असेल आणि तो बंद करावा लागेल याच भितीने किंवा धक्क्याने एकंदरीतच डाएट विषयी उदासिनता येत असेल तर एक खुशखबर आहे...रोज एक टे.स्पू. भात खाल्ला तर चालतो, अगदी रात्रिसुद्धा. भातखाउ मंडळींना त्यामुळे पोट भरल्याचे समाधान तर मिळतेच आणि शांत झोपही लागते. अर्थात 'प्रमाणात' हि ईथे गुरूकिल्ली आहे. ( अर्थात काही मेडीकल कंडीशन्स असणार्यांनी डॉ चा सल्ला घ्यावाच).
शाकाहारी मंडळींसाठी पनिर हा प्रोटिन्स आणि कॅल्शियम चा उत्तम स्रोत आहे. परत एकदा 'प्रमाणात'.
कॉफी/चहा बिनसाखरेचा घेण्यास सुरुवात केली तर ट्रिमेंडस फरक पडतो. सुरुवातीला चव आवडत नाही पण मग सवय होतेच. त्याचे रिजल्ट्स मिळू लागले तर आवडूही लागतो.
दिवसातून ६ वेळा थोडे थोडे खावे.
जवस (फ्लेक्ससिड्स) ची पुड करुन ठेवावी. आणि ६ पैकी एक जेवण म्हणजे १ ग्लासभर स्किम्ड दुधात २ चमचे घालून प्यावे. अॅण्टिऑक्सिडेंट्स चा आणि फायबर्स चा उत्तम सोर्स!!
क़मितकमी ३ जेवणांबरोबर सॅलॅड खावे.
काहिही झाले तरी डेली व्यायाम चुकवू नका. केदारचा सल्ला एकदम सही!! दिवसा नाहि जमला.. रात्रि करा, पण करा. ४५-६० मिन चालणे आणि शक्य असल्यास अजुन ४५ मिन क्रॉस ट्रेनर किंवा सायकलींग.
आणि लोकांनी 'किती खराब दिसतोयेस / दिसतियेस, आजारी होतास / होतीस का' असं विचारायला सुरुवात केली म्हणजेच तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात असे समजा. आण्खिन ८ दिवसांनी हेच लोक तुम्हाला सल्ले विचारायला लागतिल.
ऑल द बेस्ट...!!!
काल व्यायाम केलाच नाही
काल व्यायाम केलाच नाही
जेवणात सॅलॅड पण खाल्ले नाही. आज सकाळी ७ वाजता अर्धा कप दूध न अर्धा पराठा नाश्त्याला आणि ८.३० ला ऑफिसमधे नटबार खाल्ला. १२ वाजता जेवण करणारे पण त्या आधी भूक लागल्यास फळ खाइन एखादे.
पेरू , उद्या अस होऊ देऊ नका .
पेरू , उद्या अस होऊ देऊ नका . नाहीतर कडक शब्दात समज देण्यात येईल
अगदी वेळ मिळेल तेव्हा ३०-४० मिनिटे चाला तरी .
आजच एक तास चालण कंप्लीट .
आजच एक तास चालण कंप्लीट .
Please excuse me in writing
Please excuse me in writing in English
as Its difficult and time consuming to write in Marathi, specially in office
I started my weight loss process in February,
Was weighing 71 KGs, My goal is to come to 55, which is good for my height.
My today weight is 62.3 KGs, so far lost 9 KGS in 5 months
Which I think is good progress isn't it?
Currently i am stuck at 62, from last 4 weeks weighing scale not moving down,
Does it happen that you get stuck at some point after you reduce weight
Please suggest something, how do I trigger this again >>
शार , कुठलीच गोष्ट परफेक्टली होत नाही , वजन कमी करायच असल्यावरही तेच .
काळजी करू नका अस स्ट्क होण कॉमन आहे .
माझाही १८ किलो कमी झाल्यावर असच झाल होत , इतक की आता बास कराव .
पण पेशन्स ठेवा . जर तुम्ही डाएट अन व्यायाम नीट चालू ठेवला तर परत कमी नक्की होईल . फक्त शक्य असेल तर व्यायाम वाढवा अन प्रोटीन इनटेक कडे लक्ष द्या .
आत्ताच ५० मिनीट ईलिप्टिकल वर
आत्ताच ५० मिनीट ईलिप्टिकल वर काढलेत
५००/६०० कॅलरीज होतात. रात्री १/२ तास कुत्र्याबरोबर चालणार . सकाळी ओट्मिल स्किम्ड मिल्क मधे, नंतर वाडग भर कलिंगड, दुपारी भाजी पोळी आणि दही, ४ ला परत कलिंगड. संध्याकाळी भाज्या ग्रील करुन टोमॅटोच सुप बरोबर खाणार. सुरुवात कशी वाटतेय ?:)
मी स्वतः व्यायाम फ्रीक आहे आणि 'दर २ तासांनी प्रमाणात खाणे' हि योजना यशस्वीपणे राबवतीये.. >> स्वरा ग्रेट आहेस..
सुरुवात कशी वाटतेय ?स्मित >>
सुरुवात कशी वाटतेय ?स्मित >> छान . फक्त तुमच्या खाण्यात प्रोटीन्स नाहीयेत . डाळी , उसळी , सोया (मांसाहारी असल्यास अंड) अॅड करा .
दक्षिणा, सम्पर्कातुन नम्बर
दक्षिणा, सम्पर्कातुन नम्बर पाठवलाय. प्लीज अॅड कर.
मला फक्त ३ किलो कमी करायचे
मला फक्त ३ किलो कमी करायचे आहेत. पण मेरी लाईफ है ना (क्वीन सिनेमातील) गुप्ता अंकल की तरह हो गयी है. आठवड्यातून ३ दिवस योगा करते. कुठलाही स्नाक्स, तळलेल खात नाही. फिरभी वजन बढ गया
इससे अच्छा तो खा ही लेती.
Please excuse me in writing
Please excuse me in writing in English
as Its difficult and time consuming to write in Marathi, specially in office
I started my weight loss process in February,
Was weighing 71 KGs, My goal is to come to 55, which is good for my height.
My today weight is 62.3 KGs, so far lost 9 KGS in 5 months
Which I think is good progress isn't it?
Currently i am stuck at 62, from last 4 weeks weighing scale not moving down,
Does it happen that you get stuck at some point after you reduce weight
Please suggest something, how do I trigger this again >>
प्लॅटु ब्रेक करण्यासाठी व्यायामाचा प्रकार बदलुन पहावा. नक्की फायदा होतो. चालण्याचा व्यायाम करत असाल तर सायकलिंग, डान्स, स्विमिंग, किक बॉक्सिंग (यापैकी एक) करावे.
यातले अगदी काहीच शक्य नसेल तर चालण्यात बदल करावा. रोज एका वेळी ५० मिनिटे चालता असे गृहित धरले तर त्याऐवजी दोनदा ४० मिनिटे चाला. नेहमी पेक्षा वेग किंवा अंतर वाढवा.
केदार, तुमचे अभिनंदन ! वजन कमी करण्यासारखे कठिण काम नाही. तुम्ही जमवलेत ! ग्रेट आहात !
मला अॅड करा... आणि माझे कान
मला अॅड करा... आणि माझे कान उपटण्याचा सर्व सभासदांना पूर्ण हक्क आहे. अतिशय आळशी आणि खादाड गोडप्रेमी सदस्य>>> मी पण.
आजच मी व्यायाम सुरू केला आणि इथे हा धागा.... वा! मला पण घ्या ग्रुपमधे.
दक्षिणा, तुला संपर्कातून नंबर पाठवते.
आज १२ सु. न. घातले आणि १
आज १२ सु. न. घातले
आणि १ कड्बू खाल्ला
Pages