मोदी सरकार- एन डी ए २०१४ : जागता पहारा! - भाग १

Submitted by साती on 22 May, 2014 - 00:20

येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.

या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल

याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.

-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.

१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.

२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड

अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री

३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार

४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.

१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार

१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भुतान वीज देईलच. इतकी वीज निरमाण करुन भुतान त्याचे करणार तरी काय ? त्यामुळे ते.वीज विकतीलच

भुतांनी नाय दिली तर आपण मांत्रिकाला बोलवू हां. Wink

अहो दुकानभाऊ असंहोणार नाही.
आंतराष्ट्रीय करार होतात त्यात इफ/ इफ नॉट असे क्लॉज असतात.
ते मोडल्यास लवादाकडे जाता येते.

भ्रमा, म्हणूनच मी विचारलं की भारताची एकंदर विजेची गरज आणि तुटवडा किती? ती फक्त १०००० MW आहे का? जर तेवढीच असेल तर भारत विजेच्या बाबतीत स्वयंपुर्ण होईल आणि बाहेरुन घ्यायची गरज नाही आणि भारताचा एकही कोपरा विजेशिवाय अंधारात राहणार नाही. आणि ती गरज ह्यापेक्षा कितीतरी जास्त असेल तर देशांतर्गत विजनिर्मिती वाढवावी लागेल आणि पुरेशी विज निर्मिती देशांतर्गत होऊन भारत स्वयंपुर्ण होईपर्यंत बाहेरुन घ्यावीच लागेल. आणि विकसनशील असल्यामुळे आपल्याला विजेची वाढती गरज आहेच. दुसर्‍या देशात एखादा कच्चा माल मुबलक उपलब्ध असेल तर भारत तिथे कोलॅबोरेशन करुन फिनिश्ड प्रॉडक्ट भारतात आणू शकतो. तशी अ‍ॅग्रीमेंट्स असू शकतात.

आंतराष्ट्रीय करार होतात त्यात इफ/ इफ नॉट असे क्लॉज असतात.
ते मोडल्यास लवादाकडे जाता येते. >>> करेक्ट साती. इन्कोटर्म्स सगळीकडे पाळल्या नाही गेल्या तर बहुतेक करुन दोन्ही पार्टीमध्ये काही प्रोव्हिजन्स असू शकतात की ज्यामध्ये लवादाकडे जायच्या आधी प्रकरण भरपाई करुन मिटवता येते. ही भरपाई बँक गॅरेंटी, परफॉर्मन्स बाँड, स्टँडबाय लेटर ऑफ क्रेडिटमधून वसूली वगैरे प्रकारे असू शकते. जर भरपाई करण्यास नकार दिला गेला तर मात्र लवादाकडे जाते. जर डिफॉल्टर पार्टी प्रूव्ह झाली तर ती ब्लॅकलिस्ट मध्ये जायची शक्यता असते.

See,10000 MW is just a start. And it is planned till 2020. Secondly, the government is trying to push the clean energy projects. Hydropower projects in Bhutan are for that only.

It's good for Bhutan as well. The country is not having other major sources for development. These kind of projects will provide boost.

भ्रमर,

>> आपल्याकडेच जर १०००० मेवॅ वीज निर्माण होणार असेल तर भूतान कडुन का घ्यायची??
>> यामागे काही वेगळं गणित असतं कां??

माझं आकलन सांगतो.

वीज तयार झाली की लगेच वापरावी लागते. इतर माल जसा बाजारात येण्यापूर्वी साठवता येतो तशी वीज साठवून ठेवता येत नाही. मागणीपेक्षा कमी उत्पादन झालं तर विद्युज्जालावर ताण येऊन ते बंद पडण्याचा धोका असतो. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त विद्युतोत्पादन केलं जातं. उरलेली वीज (कमी वा जास्त) चक्क फुकट जाते. तर ही फुकट जाणारी वीज वाचवायचा प्रयत्न करणे साहजिक आहे.

विजेच्या मागणीत मिनिटामिनिटाला सतत चढ-उतार होत असतात. हे चढ-उतार मूळ मागणी (बेस लोड) अधिक दाटीची मागणी (पीक लोड) अशा प्रकारे दर्शवतात. म्हणून दोन प्रकारची विद्युतोत्पादन केंद्रे असतात. पहिल्या प्रकारास अचलभार केंद्र (बेस लोड प्लांट) म्हणतात, तर दुसऱ्यास चलभार केंद्र (पीक पॉवर प्लांट) म्हणतात. अचलभार केंद्राची उदाहरणे : कोळसा, आण्विक. चलभार केंद्राची उदाहरणे : वायूज्वलन (गॅस फायर्ड), सौरऊर्जा, जलविद्युत.

तर भारतात चलभारकेंद्रांची वानवा आहे. म्हणून भूतानकडून चलभाराची वीज विकत घ्यावी लागते.

तसंही पाहता जलविद्युतकेंद्रे चालवायला इंधनाची गरज नसते. केवळ देखभालीचा खर्च येतो. मात्र पाण्याचा स्रोत उंचावर असावा लागतो. भूतानात असे अनेक स्रोत उपलब्ध आहेत, जे सखल भारतात मिळणार नाहीत.

हा करार कसा आहे त्याचा तपशील ठाऊक नाही. बहुतेक जलविद्युतकेंद्र भारत उभारून देईल. जी वीज उत्पन्न होईल ती भारत सरळ वापरेल. जितके मेगावॉट तयार होतील तितके पैसे भूतानला मिळतील. अन्यथा जितके घनमीटर पाणी वापरलं तितके पैसे आपण भूतानला देऊ. या दोन पैकी काहीतरी कलम असेल.

आ.न.,
-गा.पै.

अब्ब्ब्ब
गापैं चे मराठी शब्द झेपेनासे होत चालले आहेत. मराठीतून विज्ञान शिकलं की मुलांचं काय होत असेल ?

मराठीतून विज्ञान शिकलं की मुलांचं काय होत असेल ?

घाबरु नका. मराठीतुन विज्ञान शिकवणे आता इतिहासजमा झालेय. मराठी शाळातुनही इंग्रजीतुनच शिकवतात. आणि जरी मराठीतुन शिकवले तरी गापैसारखे शुद्ध मराठी नाही वापरत. सर्वसाधारण मुलाला कळेल असेच वापरतात.

उदयन सिरीयसली! गापै चान्गली माहिती देतायत तर देऊ दे की. उद्या अशीच माहिती कुणी कॉन्ग्रेसवाल्यानी दिली तरी मला आवडेल. व्यक्ती विरोधापेक्षा वैचारीक विरोध बरा.:स्मित:

भ्रमर,

विज निर्मीती प्रकल्प हा एक किचकट विषय आहे. ईथे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो.

आपल्याकडेच जर १०००० मेवॅ वीज निर्माण होणार असेल तर भूतान कडुन का घ्यायची??
आजच्या घडीला भारतात २५०,००० मेवॅ ईतक्या क्षमतेच्या वीज निर्मीती केंद्राच्या उभारणीच काम चालु आहे.
ह्या व्यतीरीक्त भारताला अजुन २५०,००० मेवॅ वीजेची गरज आहे. जर भारतातील प्रत्येक घराला वीज पुरवठा
पाहीजे असेल तर वर निर्देशीत आकड्याच्या तिन पट निर्मीती करण गरजेच आहे.

ज्या वीज निर्मिती केंद्राची उभारणी चालु आहे त्यातील बरेच प्रकल्प कोळश्यावर चालणारे, काही जैविक उर्जेवर चालणारे, काही उसाच्या चिपाडापासुन चालणारे आहेत. भारत अश्या जैवीक उर्जेवर चालणार्या प्रकल्पाच्या
उभारणीत जगाच्या काहीसा पुढे आहे, पण त्याच श्रेय भारत सरकारला जाणार नाही. ह्याच कारण सर्व जैवीक उर्जेवर चालणारे प्रकल्प खासगी कंपन्याकडुन / उपक्रमातुन चालत आहेत. अश्या खासगी कंपन्यामध्ये महाराष्ट्रातल्या / उ. प्रदेशच्या साखर कारखान्याचा मोठा सहभाग आहे. तरीही चालु असलेल्या प्रकल्पामध्ये फार मोठा भाग कोळश्यावर चालणार्या प्रकल्पाचा आहे.

कोळश्याच्या घोट्याळ्या नंतर अश्या प्रकल्पाची काय अवस्था झाली असेल याची कल्पना तुम्हाला आहे का ?
प्रत्येक मेवॅ वीज निर्मीतीमागे ४-५ कोटी ईतका निवेश (Investment) लागतो. २.५ लाख मेवॅ मधील जवळ जवळ २ लाख मेवॅ ईतक्या प्रकल्पाचे भविष्य अंधारात आहे. कारण हया प्रकल्पाला लागणार कोळसाच
वितरणा आभावी तसाच पडुन आहे. कोळसा घोटाळ्यानंतर !!

ह्या प्रकरणाचा दुसरा भाग म्हणजे चालु असलेले वीज निर्मीतीचे कारखाने आपल्या निर्धारीत उत्पादन क्षमतेनुसार चालवणे. भारतातील कारखाने आपल्या क्षमतेच्या आर्ध्यापेक्षा कमी क्षमते वर चालवले जातात.

तिसरा भाग, विज निर्मीतीला लागणारी TECHNOLOGY ; भारतात बाष्प जनित्र क्षेत्रात सरकारी कंपनी
BHEL जनित्र निर्मीतीच काम करते. पण ह्या क्षेत्रात जगभरात आज ईतकी प्रगती झाली आहे, त्या मानाने
भारत अजुन बराच मागे आहे. ह्या क्षेत्रातील सर्व प्रगती खसगी कंपनीच्या तर्फेच होत असते. अश्या कंपन्यामध्ये जर्मन कंपन्याच नाव सर्वात वर आहे.

एक चांगला फायदा असाकी अश्या कंपन्या भारतातही आहेत, आणि त्या काही प्रकल्पाला हातभार लावत आहेत, पण सरकारी प्रकल्प हे BHEL च करत असते.

अपुर्ण ,.............

रश्मी माहीती मांडणे वेगळे आणि पक्षाचे कसे बरोबर हे सांगणे वेगळे
यांच्या 2013 12 च्या पोस्टी वाचल्यावर कळेल

जी वीज उत्पन्न होईल ती भारत सरळ वापरेल. जितके मेगावॉट तयार होतील तितके पैसे भूतानला मिळतील. अन्यथा जितके घनमीटर पाणी वापरलं तितके पैसे आपण भूतानला देऊ.
----- गा पै छान माहिती दिली आहे.
किती पाणि वापरले आणि किती विज तयार झाली हे विज खरेदी करणार्‍याला खुप महत्वाचे नाही आहे. जेव्हढी विज भारताला मिळेल त्यावर आकार दिला जाणे योग्य आहे. दोन्ही देशान्ना या व अशा प्रकल्पाचा फायदा आहे. एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपन्थ.

चिन फॅक्टर कुठे येत नाही यावर विश्वास बसत नाही. भुतानला चिनच्या प्रभाव क्षेत्रापासुन दुर ठेवणे आणि भुतानी लोकान्चा विश्वास सम्पादन करणे हा पण उद्देश असेलच.

मजा आहे
भारतात वीज प्रकल्पांना विरोध करायचा आणि दुसर्या देशात विशिष्ट कंपनीला प्रोजेक्ट घेऊन देण्यास मदत करायची आणि वीज खरेदी करायची....... मस्त

निहालचंद वर मोदी चे तोंड का शिवले गेले???
महिलासुरक्षावर बोलणारे भाजप्ये गेले कुठे....... वटवट करत टिव्ही वर फिरणारे सितारामाण, मीनाक्षी लेखी, इराणी कुठे गेल्या?
मोदी तर कशावर पण बोलत नाही प्रचारात तर मनमोहन यांच्यावर बोलत नाही म्हणून हिणकस ताशेरे मारणारे स्वत: ची वेळ आल्यावर कुठे लपून बसलेत???? तोंड का उघडत नाही???
इराक मधे 40 भारतीय अडकले आहेत त्या साठी काय??? नजर ठेऊन आहे म्हणे... जोक करतात का?? कुकर लावून ठेवलाय का इराक मधे लक्ष ठेवायला????

“It is one of the worst days of Indian history. The Prime Minister had said during the elections that he would bring back black money stashed in Swiss banks within 100 days of coming into power. But nothing has happened.”

ओळखा पाहू कोण??
गुजरातचे माजी मुख्यमंत्री नरेंद्रभाई मोदी!

धन्यवाद माने, सुधारित शब्दांसहित म्हण दिल्याबद्दल. नेम योग्य ठिकाणी लागेल याची खात्री बाळगा Wink

रेडिओ मिर्चीने शुभा मुद्गल ह्यांचा वर्ल्ड म्युझिक डे साठी ठेवलेला कार्यक्रम Unforeseen circumstances मुळे रद्द केला.

१०-१२ दिवसांपूर्वी हे वाचण्यात आलं होतं - मोदी विरोध के लिए शुभा मुद्गल को US में धमकी

दोन बातम्यांचा काही संबंध नसेलही. पण असेल तर कठीण आहे.

“It is one of the worst days of Indian history. The Prime Minister had said during the elections that he would bring back black money stashed in Swiss banks within 100 days of coming into power. But nothing has happened.”
------
या ठिकाणी (देशा बाहेर गेलेला तसेच देशान्तर्गत असलेला काळा पैसा) काही तरी करुन दाखवायला हवे नाही तर मतदाराना मुर्ख बनवण्याचे पातक लागेल. काळा पैसा निर्माण करण्यात आणि जमवण्यात शेकडो करोडपती/ 'सर्व पक्षीय' राजकारण्यान्ची नावे घेता येतील... कुठलाही पक्ष धुतल्या तान्दळाप्रमाणे स्वच्छ नाही.

मी १०० दिवस नाही १ वर्षे थाम्बेल पण काही तरी ठोस झालेले बघायला आवडेल. नेटवर फिरत असलेल्या अकड्यान्च्या १० % पैसा देशात परत आला तरी जनता मनापासुन धन्यवाद देइल...

Pages