येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.
या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल
याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.
-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.
१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.
२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड
अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री
३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार
४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.
१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार
१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.
टोमणेगिरी बास करून काही चर्चा
टोमणेगिरी बास करून काही चर्चा करायची का? दोन्ही पार्टींना विचारतेय. अन्यथा मग हा वाहता धागा करा आणि दिवसभर किटीपार्टी खेळत बसलात तरी चालेल.
हा बाफ मोदी सरकारच्या
हा बाफ मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आहे की
मोदी व्हर्सेस कांग्रेस असा सामना आहे
डबल पोस्ट
डबल पोस्ट
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल
दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे
सरकार काय करते याकरिता वॉचडॉग
म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून
यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर
करू नये.
हे विसरलेले दिसतात काही
हा बाफ मोदी सरकारच्या
हा बाफ मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आहे की
मोदी व्हर्सेस कांग्रेस असा सामना आहे>>
हा धागा मोदींवर चिखल फेकी साठी आहे, थोडा वेळ भाजपावर चिखलफेकीसाठी किंवा गुजरात दंगलींसाठी दिला तरी चालेल, फक्त काँग्रेसने केलेल्या (लक्षावधी कोट रुपयांच्या) घोटाळ्यांबद्दल काहीही लिहिलेलं खपउन घेतले जाणार नाही ह्याची सबंधितांनी नोंद घ्यावी,
आणि हो १९८४ च्या दंगलींचे नाव
आणि हो १९८४ च्या दंगलींचे नाव काढायचे नाही, कारण हा धागा मोदीबॅशींग साठी आहे.............समजले?
तुझको मिर्ची लगी तो मै क्या
तुझको मिर्ची लगी तो मै क्या करु .. मै तो रस्ते से जा रहा था... मै तो भेलपुरी खा रहा था..
आणि हो, बोफोर्स तोफांनी
आणि हो, बोफोर्स तोफांनी (म्हणजे आपल्या सैन्याने पण हां) चांगली कामगिरी केली म्हणून त्या खरेदी करताना झालेल्या भ्रष्टाचाराकडे पण साफ दुर्लक्ष करायचं, समजलं?
तुझको मिर्ची लगी तो मै क्या
तुझको मिर्ची लगी तो मै क्या करु .. मै तो रस्ते से जा रहा था... मै तो भेलपुरी(पिझ्झा) खा रहा था (जनतेच्या पैशाने, इटलीमध्ये)..
मोदी वाईट. ते बहुमताने निवडून
मोदी वाईट. ते बहुमताने निवडून आले म्हणजे लोकशाही वाईट. देशातले लोकांनी त्यांना भरभरून मतं दिली म्हणजे देशातले बहुतेक लोक पण वाईट. समजलं?
६० वर्ष काँग्रेस ला निवडुन
६० वर्ष काँग्रेस ला निवडुन तीच जनता निवडुन देत होती....मग ती कशी वाईट ?

आता म्हणु नका पर्याय नव्हता म्हणुन
६० वर्ष काँग्रेस ला निवडुन
६० वर्ष काँग्रेस ला निवडुन तीच जनता निवडुन देत होती....मग ती कशी वाईट ?>>
जोपर्यंत वाइट नव्हते तोपर्यंत निवडून आलेत ना! शेवटची काही वर्ष वाईट झाल्यावर नाही दिल निवडुन. आता मोदीनेही काही करुन दाखवल नाही तर मोदीही ५ वर्षांनी घरीच बसणार, ह्यात काही शंका आहे का? (तो पर्यंत काँग्रेस ने गांधी घराण्याच्या कुबड्या सोडुन देउन चालण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही, 'आप' ने पण मजबुत होण्यासाठी प्रयत्न करावेत)
जनतेच्या पैशाने इटलीमध्ये
जनतेच्या पैशाने इटलीमध्ये भेलपुरी खाण्याची हिंमत कशी झाली?? जनतेच्या पैशाने भुतानमध्ये घरगुती गुज्जु जेवण जेवायचं असतं. त्यासाठी १ आठवडा आधीपासून खानसाम्याने तिथे जाऊन तयारी करायची असते. काय ब्वॉ हे लोक, सो लो बजेट! श्या!
THIMPHU: A chef from Gujarat Bhawan in New Delhi has specially travelled to Bhutan to cook dishes for visiting Prime Minister Narendra Modi who is known to mostly eat home-cooked food.
The cook has been in Bhutan since almost a week as Modi is known for not having food outside, including hotel food.
Modi, who arrived here today for a two-day visit, is staying at hotel Taj Tashi. About 50 rooms have been reserved for the accompanying delegates.
वावा....समर्पक उदाहरण...
वावा....समर्पक उदाहरण...
आपले हार्दिक अभिनंदन मिर्ची 

आता स्पष्टीकरण येईल बघा.. इतर सरकार काय करत होती याचे तुलनात्मक विश्लेषन चालु होईल
जनरल टर्म.... अहो सचिन्/ग्रेट
जनरल टर्म....
अहो सचिन्/ग्रेट थिंकर पुरे की आता......का....परत ओवाळुन टाकलयं !
हा जागता पहारा? कमाल वाटली
हा जागता पहारा? कमाल वाटली मिर्ची ताई.
अधिकृत दौर्यात नेलेला कुक आणि सौऱक्षण व्यवहारात घेतलेले पैसे एकच मोजमापात?
कदचित बोफोर्स च्या व्यवहारच्या काळात मोबाइल फोन नव्हते त्यामुळे त्यानी एस एम एस मागवले नसतिल नाही तर विचारता तरी आले असते किती दलाली घेवु? . पंप्र नी मात्र एस एम एस मागवुन विचारायला हव होत कुक न्यावा "हो किंवा नाही". हे काम निखील वागळेंच्या कार्यक्रमात पण करून घेता आले असते.
मिर्चीताईंना बोल्ड शब्द करता
मिर्चीताईंना बोल्ड शब्द करता येतात हे यावरुन समजलं. परदेश दौर्यांवरचा त्यांचा अभ्यास शून्य आहे हे पण समजलं. त्यातलं त्यांना काहीही कळत नाही हे ही समजलं. सॉलिड विनोद चालू आहेत. मस्त.
युरो मी बोफोर्सबद्दल नाही
युरो
मी बोफोर्सबद्दल नाही लिहिलंय.
<<तुझको मिर्ची लगी तो मै क्या करु .. मै तो रस्ते से जा रहा था... मै तो भेलपुरी(पिझ्झा) खा रहा था (जनतेच्या पैशाने, इटलीमध्ये)..>>
ह्या वाक्याबद्दल लिहिलंय
घोटाळे तर ह्यांनी सुद्धा भरपूर केलेत. सत्ता कमी काळ मिळाली म्हणून काँग्रेसपेक्षा थोडे कमी असतील. आता करतीलच भरपाई. १९० कोटी झाडं खिशातच जाणार आहेत की.
आप ला पर्याय नाही ! भागो....
कुक् कुक् कुक् कुक् कुक् कुक्
कुक् कुक् कुक् कुक् कुक् कुक् कुक्
या ह्गल्यापादल्या एस एम एस
या ह्गल्यापादल्या एस एम एस पाठवून लोकांना विचारण्याच्या आचरटपणामुळे मोबाइल कंपन्यांचा किती फायदा झाला हे तपासायला हवं.
त्यात किती लोकांकडे रिलायन्सचे मोबाइल होते हे पण बघायला हवं.
मग आपण केजरीवाल आणि अंबानींचा संबंध लावायला मोकळे
अधिकृत दौरा तर फुटबॉल मॅचेस
अधिकृत दौरा तर फुटबॉल मॅचेस बघण्याच देखील होतो यांच्य अराज्यात
सॉलिड विनोद आहे
फुटबॉल दौरा ही पहिली वेळ
फुटबॉल दौरा ही पहिली वेळ नाही.
इथे वाचा. Goa ministers holiday regularly on taxpayers' money: CAG report
The CAG report reveals that during the period 2007-2012, the department has participated in 38 International Trade Marts (ITMs) and organised 15 road shows worldwide. The expenditure incurred during this period by the department was Rs 19 crore. Audit suggests no MoUs were signed during any of these roadshows or ITMs.
विचारवंत, आता CNN-IBN वाले पण टॅक्सपेअर्सचा पैसा आहे म्हणतायत. पुन्हा करमणूक झाली असेल ना तुमची?
विचारवंत हे नीती सेंट्रलचे
विचारवंत हे नीती सेंट्रलचे कर्मचारी असावेत ,चर्चेचा रोख दुसरीकडे वळवण्याचे त्यांचे कसब जबरदस्त आहे.
किती मिलतात हो ?एकावर किती शून्य?
डोक्याला हात लावायची वेळ आली
डोक्याला हात लावायची वेळ आली इथल्या काही पोस्ट्स वाचून.
सुरक्षितता, हेरगिरी, आंतरराष्ट्रीय संबंध वगैरेंचा जरातरी विचार करा. किमान तेवढा अभ्यास करा. याअधी परदेश दौर्यावर गेल्यानंतर घातपाताच्य घटना घडल्याच्या अनेक दंतकथा आजही सांगितल्या जातात. विदेश दौर्यावर जाताना स्वतःची सुरक्षा आणी इतर नोकचाकर घेऊन जाणे प्रोटोकॉलमध्ये बसतं. डीलेगेट्ससाठी रूम्स बूक केल्या त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? त्यमध्ये मोदींनी काही फार वेगळे केलेले नाही.
मिर्चीबाई, उद्या केजरीवाल पंतप्रधान झाले तरी त्यांच्या परदेश दौर्यासाठी हेच्च केले जाईल.
मला आता असं वाटायला लागलंय की लोकांना गेले ६०-६५ वर्षं भारत काय करत होता ते माहितच नाही, आणि आता कुठे जागे झालेत आणी अचानक "ये क्या हो रहा है" मोडमध्ये वचावचा चालू आहे. करा रे, जरातरी भारतीय राजकारणाचा प्राथमिक अभ्यास करा आणी मग लिहा.
नंदिनी, अनुमोदन.
नंदिनी, अनुमोदन.
मला आता असं वाटायला लागलंय की
मला आता असं वाटायला लागलंय की लोकांना गेले ६०-६५ वर्षं भारत काय करत होता ते माहितच नाही >> अरे वा!! शाब्बास नंदीनी ताई. लवकरच लक्षात आले की तुमच्या. मग नविन धागा करा सुरू , गेली ६०-६५ वर्षं भारत काय करत होता त्याच्या शिकवणीचा.
रच्याकने , जुनी सरकारे जी करत होती तेच मोदी करणार असेल तर वेगळे सरकार म्हणुन गाजावाजा कशासाठी म्हणायचा ? ( हे मोदींनी स्विस बँकेतल्या खातेदारांची नावे उघड न करण्याच्या निर्णयाच्या रेफरेन्स ने वाचावे )
नंदीनी यांना अनुमोदन. गेल्या
नंदीनी यांना अनुमोदन.
गेल्या पासष्ट वर्षात काय झाले याचे धडे इन डिटेल फक्त आपण शिकवू शकाल... मला या शिकवणीची खरच गरज आहे...
जुन्या बाटलीस नवीन लेबल, आत
जुन्या बाटलीस नवीन लेबल, आत जुनीच दारु
आधी होता मौनीमोहन , आता मोदींचा नरु!!
गेली ६०-६५ वर्षं भारत काय करत
गेली ६०-६५ वर्षं भारत काय करत होता त्याच्या शिकवणीचा.>> खरंच गरज आहे. किती लोकं तयार आहेत ते बघू आणि नवीन धागा काढू. पण शिकवणीमधेय होमवर्क अक्रावा लागेल. आयता डेटा आणी आयती घाऊक मते कुठे मिळणार नाहीत चालेल का?
तेवढे होईपर्यंत गेल्या वर्षी एक लेखनस्पर्धा झाली होती त्यामधेय अशा अनेक घडामोडींचा आढावा अनेक मायबोलीकरांनी घेतला होता. त्यावर एक नजर टाकाल का? तेवढे वाचन झाले की मग पुढील शिकवणी चालू केली जाईल.
आणि कृपया लिहिताना "नंदिनी"
आणि कृपया लिहिताना "नंदिनी" असे लिहा. ताईमाईअक्काची गरज नाही.
Pages