मोदी सरकार- एन डी ए २०१४ : जागता पहारा! - भाग १

Submitted by साती on 22 May, 2014 - 00:20

येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.

या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल

याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.

-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.

१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.

२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड

अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री

३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार

४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.

१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार

१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

1111

एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन अशा पेअर्स इथं फॉर्म झालेल्या असल्याने इतर फ्री इलेक्ट्रॉन सारखे आउटरमोस्ट ऑर्बिट मधे फिरताहेत असं वाटतंय. मला पण हायडोजनचा अनसॅट्युरेट अ‍ॅटम असल्याचा भास होऊ लागला असल्यानं टाइम प्लीज. चालूद्या आयोनायझेशन..

ह्या धाग्याचा क्रमांक फार वरचा आहे.

प्रशासनाच्याही हाताबाहेर गेलेल्या धाग्यांमध्ये.

बेफिकीर, तुम्ही फक्तं धाग्याबद्दल बोलता.
स्वतःची मते मांडा. Happy
माझ्यामते हा असा एकमेव पॉलिटिकल धागा आहे जिथे एवढे प्रतिसाद येऊनही बर्‍यापैकी सभ्य भाषेत चर्चा चालू आहे.
मधल्या एखद्या पानाचा अपवाद वगळता.

Proud

1122

मला एक कळत नाही, हे बाबा आमटे, मेधा पाटकरांसारखे लोक गेली कित्येक वर्षे ते नर्मदा आंदोलन की काय चालवत आहेत.>> अगदी अगदी.

>>> म्हणूनच तर लिहिले की आता मोदी अन धरणग्रस्त अशी चर्चा होऊदे. Proud

बाकी नर्मदेचे पाणी मग कश्या मुळे साबरमतीत सोडले ह्याचा तुमचा काही निर्णय झाला आहे की नाही? आणि नर्मदा इंडस्ट्रीयल एरियातून वाहत असूनही बरीच स्वच्छ कशी ह्याबद्दल तुमचा काही निर्णय झाला की नाही !

मी अहमदाबादला येऊन जाऊन असतो. इतक्या पुराव्यावर, तिथे आयटीतल्या सोयी सुविधा लै भारी असतात. नदी सुंदर दिसते, अन त्याचबरोबर रस्ते तर इच्चारू नका इतके गुळगुळीत असतात इ. बाबी आपण मान्य करू या.

>>. Lol इब्लिस नमस्कार ! आयटीज्वर अन प्रत्येक गोष्टी पर्सनल टच देऊन बोलने कमी झाले की बोलू. बाकी अहमदाबादला आयटीच्या काहीच सोयी नाहीत. (जस्ट आपलं माहिती) तिथे इन्फ्रा आहे हे मान्य नसेल तर झोपी गेलेल्या कोण उठवणार.

अहो इतका विरोध करू नये कुणाचा की चांगलं ही मान्य होऊ नये. (जस्ट आपलं मित्रत्वाचा सल्ला म्हणा)
विरोधासाठी विरोध चांगला नसतो असं आपलं मला वाटत बुवा!

मिर्ची ताई तुम्ही भारतात राहात नाही?

तुमच्या मते कॉग्रेस भ्रष्ट आहे सत्तधारी खोटारडे आहेत आणि आआप मध्ये सामर्थ्य आणि कार्यक्रम नाही. भारत बुडतो आहे. असे असेल तर अंतु बर्वा म्हणतो तसे

तुंम्ही परदेशातल्या घाटीवर उभे राहुन वेगवेगळ्या लिंका वाचुन दाखवुन काय उपयोग?

तुंम्ही परदेशातल्या घाटीवर उभे राहुन वेगवेगळ्या लिंका वाचुन दाखवुन काय उपयोग?>> फिर भी दिल है हिंदुस्तानी!! Wink

<<मिर्ची ताई तुम्ही भारतात राहात नाही?>> नाही.

<<तुंम्ही परदेशातल्या घाटीवर उभे राहुन वेगवेगळ्या लिंका वाचुन दाखवुन काय उपयोग?>>
अनिवासी असले तरी मी भारतीयच आहे युरो. देशाबाहेर राहिल्याने इथल्या परिस्थितीवर भाष्य करण्याचा अधिकार किंवा उपयोग नसेल तर मायबोलीवरचे कित्येक धागे बंद पडतील आणि आयडी गायब करावे लागतील.

<<तुमच्या मते कॉग्रेस भ्रष्ट आहे सत्तधारी खोटारडे आहेत आणि आआप मध्ये सामर्थ्य आणि कार्यक्रम नाही>>

आपचं सोडून देऊ या. तुमच्या मते काँग्रेस स्वच्छ आहे आणि सत्ताधारी सत्यप्रिय आणि न्यायी आहेत??? Uhoh

केदार,
मला पुण्याचं आयटी काय अन अम्रिकेतलं आयटी काय. याच्यातला फरक काही समजत नाही. मागे याच धाग्यावर तुम्हीच म्हटलंय की अहमदाबादेतलं इन्फ्रास्ट्रक्चर पुण्यापेक्षा छान आहे, ते मी मान्य केलं, तर त्यात आयटी ज्वर आला कुठून? उग्गं कैपण ब्वा तुमचं.
अन पर्सनल म्हणायचं तर मी इथे काय मोदी यांच्या कुणा प्रतिनिधीसोबत चर्चा करीत नाहिये. मायबोलीवरच्या ज्यांच्याशी बोलतो आहे त्यांपैकी तुम्ही एक आहात. मग ज्याप्रमाणे तुम्ही माझे नांव घेऊन लिहिता तसं मी लिहिलं तर त्यात मिर्ची लागायचं काही खास कारण?

पुन्हा एकदा, जर मी म्हणतोय, की आयटिबद्दल तुम्ही म्हटलात ते मान्य, तर

>>तिथे इन्फ्रा आहे हे मान्य नसेल तर झोपी गेलेल्या कोण उठवणार.

अहो इतका विरोध करू नये कुणाचा की चांगलं ही मान्य होऊ नये. (जस्ट आपलं मित्रत्वाचा सल्ला म्हणा)
विरोधासाठी विरोध चांगला नसतो असं आपलं मला वाटत बुवा!<<

हे काय आहे?? मान्य म्हटलं तरी जबरदस्ती उलटच बोलायचं यालाच विरोधकरता विरोध असे म्हणत नाहीत का?

रच्याकने,
तिकडे जाणे-येणे नेमके आयटी व्यवसायासाठी असते की पक्षकार्याच्या निमित्ताने? (राज्याभिषेकाच्यावेळी तुम्ही दिल्लीला जाऊन येतो असं लिहिलं होतं ते आठवलं.)

भरुच येथे पुष्कळ रासायनिक कारखाने असले तरी हे शहर नर्मदेच्या मुखावर वसले असल्याकारणाने अप्स्ट्रीम नर्मदा त्यांच्यामुळे प्रदूषित होत नाही.
मात्र, नर्मदेचे पाणी खूप वर (मुखापासून दूर्)अडवले गेल्यामुळे भरुच येथे नर्मदा वाहती राहिलेली नाही हे अलीकडील नर्मदापरिक्रमाविषयक पुस्तके वाचल्यावर जाणवते. पूर्वी नर्मदा-सागरसंगम बर्‍यापैकी आत होता आणि तिथे पाण्यात पूजासाहित्यविसर्जन होत असे. आता तिथे केवळ चिखल उरला आहे.
भरुचपासून पन्नास कि.मी. दूर पूर्वेला खंबातच्या आखातात दहेज नावाचे बंदर विकसित करण्यात आले आहे.
ऐतिहासिक काळापासून भरुच(भृगुकच्छ) हे एक उत्तम बंदर म्हणून नावाजले गेले होते.

मिर्ची ताई तुम्ही म्हणता तस आआप ला सोडुन बोलु.

कॉग्रेस भ्रष्ट आहे आणि लोकांनी मोठ्या प्रमाणावर त्यांना नाकारलेले आहे. आता राहतो तो पर्याय हा सत्तधारी पक्ष हाच आहे. या वेळी निदान जनते ने clear mandate तरी दिलेली आहे म्हणजे कोणतीही कारणे तरी देता येणार नाहीत. तेव्हा प्राप्त परीस्थितीत आलेले सरकार काय आणि कसे काम करते हे बघणे महत्वाचे आहे. सगळ्या गोष्टी केवळ नाकारुन देशाची प्रगती होणार नाही.

@यूरो

युपीए - २ च्या काळात सुरुवातीपासूनच घोटाळे उघडकीला येण्याची मालिका सुरू झाली. तेव्हां त्याला काँग्रेसद्वेष, सरकारवर गरळ ओकण्याचा कार्यक्रम अशी विशेषणं लावली गेली असती तर काँग्रेस भ्रष्ट आहे असं म्हणता आलं असतं का ? किंवा युपीए -२ ला लोकांनीच निवडून दिलेलं आहे म्हणून आता काही बोल लावायचे नाहीत असं म्हटलेलं चाललं असतं का ?

ते सरकार भ्रष्ट होतं म्हणूनच त्याला नाकारलं. नाकारण्यापर्यंत लोकांचा कौल ठीकच. पण त्याच्या जागी ज्याला कुणाला यायचं होतं त्याची १५ वर्षातली कामगिरी पाहून मगच कौल द्यावा ही अपेक्षा अवास्तव आहे का ? तसा प्रयत्न केला की मोदीद्वेष, भाजपा द्वेष, गरळ ओकणे अशी शेलकी विशेषणं लावणे म्हणजे १५ वर्षानंतरही आम्ही म्हणतो त्याच प्रचारावर विश्वास ठेवा नाहीतर तुम्ही देशद्रोही या दडपशाहीला हवा देण्यासारखंच आहे. मग याच पद्धतीने या सरकारचं ५ वर्षानंतरही मूल्यमापन करता येणार नाही. या पार्श्वभूमीवर पहिलं सरकार भ्रष्ट असलं तरी काहीही बोललेलं ऐकून घेत होतं असं वाटू लागेल. अगदी प्रधानमंत्र्याला मुका बाहुला सुद्धा म्हणता येत होतं.

उद्या गुजरातचा विकास हा कुणीतरी दूरदृष्टीने पाहीलेल्या नर्मदा धरणाच्या स्वप्नाचा परीपाक आहे आणि मोदी नुसतेच बोलत सुटलेत असं सिद्ध झालं असं समजा , म्हणून त्यांना बोलका बाहुला हे विशेषण वापरलं तर काय होईल याची फक्त कल्पनाच करून पहावी.

पाच वर्षात काय करून दाखवणार आहेत ते १५ वर्षात काय केलं या बेसवरच मतं मागूनच ना ? मग त्या १५ वर्षांचा लेखाजोखा विषयाला धरून आला तर चालवून घ्यायला हरकत काय आहे ?

विमान उडवायला येत नाही तर कशाला बसायचं>>>>>:हाहा: आम्हाला तरी कुठे उडवता येतय, पण देश-परदेश प्रवासानिमीत्त त्यात बसावेच लागले की.:फिदी:

<<<विमान उडवायला येत नाही तर कशाला बसायचं>>> फोटो काढायला विमान चालवता येणे ही प्री कंडिशन आहे का?

पूर्वी जत्रेत मोटारीत बसून तंबूत फोटो काढायचे. आठवते? तसा दिसतो मोदींचा फोटो. Happy

विमान उडवण्यासाठी त्यात बसायला कशाला हवे ? तरल अंतराळात अनेकांची विमाने संध्यासमयी तरंगू लागतातच की..

<<आता राहतो तो पर्याय हा सत्तधारी पक्ष हाच आहे. या वेळी निदान जनते ने clear mandate तरी दिलेली आहे म्हणजे कोणतीही कारणे तरी देता येणार नाहीत.>>

बरोबर. पण कोणतीही कारणे न देता सत्ताधारी पक्ष त्यांना हवं तेच करत आहे.
अनेक उदाहरणे आहेत. एक उदाहरण बघूया.
खिडकी एक्स्टेन्शन केस मध्ये सोमनाथ भारतींनी राजीनामा द्यावा किंवा सरकारने त्यांना मंत्रालयातून हाकलावं म्हणून भाजपाने मुख्यमंत्री ऑफिससमोर निदर्शने केली होती.
(प्लीज नोट - भाजपाने चक्क निदर्शने केली होती. किती अराजक आणि बेजबाबदार वागणं आहे हे!!)
आता जेव्हा भाजपा खासदार निहालचंद ह्यांना कोर्टाने समन्स पाठवलंय तर माननीय हर्षुकाका पंतप्रधान ऑफिससमोर निदर्शने करणार का?
नाही करणार. एखादी SIT स्थापन होईल आणि निहालचंदांना क्लीन चीटही मिळेल.
(पांशा: क्लीन चीट मिळवण्याचा मोदींचा अनुभव तगडा आहे!)
"बहोत हुआ नारी पे बलात्कार, अब की बार मोदी सरकार" म्हणून सत्तेत आलेल्यांनी निहालचंदांना सस्पेण्ड करायला काय हरकत आहे? आता ह्यासाठी त्यांना 'आधीच्या पॉलिसीज बदलायला २ वर्षे तरी द्या' असं म्हणू नका. मोदींनी अशा जनतेच्या हिताच्या अ‍ॅक्शन्स घेतल्या तरच त्यांच्या कणखर प्रतिमेला अर्थ आहे ना?

<<पाच वर्षात काय करून दाखवणार आहेत ते १५ वर्षात काय केलं या बेसवरच मतं मागूनच ना ? मग त्या १५ वर्षांचा लेखाजोखा विषयाला धरून आला तर चालवून घ्यायला हरकत काय आहे ?>> +१००

जे काही लिहितेय त्याचा उद्देश मोदी बॅशिंग मुळीच नाही. आणि तसं जरी असेल तरी त्याने काय फरक पडणार आहे? मायबोलीवर एक मिर्ची तडतडली म्हणून त्याचा धूर केंद्र सरकारपर्यंत थोडीच जाणार आहे?

क्षीण का होईना, जसा जमेल तसा, जे काही घडतंय ते ठीक नाही हे सांगण्याचा पिटुकला प्रयत्न आहे हा.

हे काय आहे?? मान्य म्हटलं तरी जबरदस्ती उलटच बोलायचं यालाच विरोधकरता विरोध असे म्हणत नाहीत का? >>

अरे वा इब्लिस, तुम्हाला प्लेनली मान्य आहे हे मला वाटलंच नाही कारण तुमचे वाक्य, " "मी अहमदाबादला येऊन जाऊन असतो. इतक्या पुराव्यावर, तिथे आयटीतल्या सोयी सुविधा लै भारी असतात. नदी सुंदर दिसते, अन त्याचबरोबर रस्ते तर इच्चारू नका इतके गुळगुळीत असतात इ. बाबी आपण मान्य करू या." मला खोचक वाटले जरा. सॉरीच हां.

पण तुम्हाला तिथे विकास आहे हे मान्य झाले त्याबद्दल धन्यवाद. ! त्याचसाठी होता अट्टहास !

बाकी मी पक्षकार्यासाठी फिरतो की व्यवसायासाठी हा प्रश्न गौन आहे. रादर, इथे कुणाचाही व्यवसाय अन त्याची मतं ह्यांचा ताळमेळ घालणे अयोग्य आहे असे मला वाटते.

बाकी नर्मदा आंदोलन, पुनर्वसन, विकासाचे इतर पैलू यांना सोयिस्कर बगल दिल्याबद्दल अभिनंदन. >>. बगल कुठे दिली? करा की चर्चा !

आणि काँग्रेसच्या राज्यात धरण बांधले तरी सगळं कसं आलबेल असतं नाही का? विकास कसा सार्वभौम, सर्वसमावेशक होतो की सगळे जागा आपोआप देतात, कुठलेही आंदोलन होत नाहीत, वगैरे वगैरे.

आणि जर त्यांच्या राज्यातही हे सर्व होत असेल तर मोदीला मध्ये आणणे चूक आहे.

हीरा : मुद्दा होता नर्मदेचे पाणी सुशोभिकरणासाठी मोदीने सोडले हा आरोप होता, त्याचे उत्तर मी दिले. त्याला आणखी १००० पैलू असू शकतीलच.

धाग्याचा मूळ उद्देश्य भरकटतच चालला आहे आम्ही पॉलीटीकल कंमेंट्स टाळणारे पण वाचत असतो राव. या की आता मुद्द्यावर... का मोदी सरकारचे 'जागते पहारे' झोपले.? Wink

Pages