येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.
या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल
याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.
-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.
१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.
२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड
अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री
३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार
४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.
१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार
१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.
त्यात उत्तर काय असणार?
त्यात उत्तर काय असणार? केजरीवालांनी स्वतः माफी मागितलेली आहे त्याबद्दल. त्यांना जर पुन्हा संधी मिळाली आणि त्यांनी चांगली आणि लंबी इनिंग खेळली तर त्याला माझी काही हरकत नाही. नवी संधी साधण्याच्या नादात असलेली संधी कशी निघून जाते ह्याचे उदाहरण आहे ते.
बाकी Politics is not about policy हेच खरे. गुजरात सरकारकडून चुकीची माहिती प्रसारित होणे हे चुकीचेच आहे. असंदिग्धपणे. अश्लाघ्य आहे. परंतु ह्या बाबतीत जनतेच्या मतावर निवडून आलेला कुठलाही पक्ष कधीच खरे सांगणार नाही हे लक्षात ठेवा. अगदी केजरीवालसुद्धा. 'आमच्याकडून हे थांबत नाही' असा जवाब लोकशाहीतील कुठलाही सत्ताधारी जनतेला देऊ शकत नाही. Policy पेक्षा electability जास्त महत्वाची असते कारण कुठलाही पक्ष हा स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नशील असतो. दिल्ली निवडणूकांमध्येदेखील केजरीवालांचा पक्ष लोकांना electable वाटला. मोदींनी आता त्यांचा पक्ष electable बनवला. तुमची जी ही धडपड चालू आहे, ती त्यांचा पक्ष non-electable कसा आणि तुम्ही सपोर्ट करत असलेला पक्ष electable कसा ही सांगण्यासाठीच जास्त आहे. त्यात काही वावगे नाही, किंवा मला तरी वाटत नाही. खेळाचा नियम आहे तो. परंतु केजरीवालांचे सरकार आल्यावर ह्यात काही बदल होईल असे सांगणारा कुठलाही दिशादर्शक नाही. तुम्ही खूप पोटतिडकीने बोलत आहात, परंतु त्यात मोदी खोटे बोलले ह्यावरच इतका झोत आहे, की पोलिटिकली मोटिव्हेटेड अजून कोणीतरी ह्याहून फार जास्त काही वाटत नाही.
हजारी धाग्याबद्दल
हजारी धाग्याबद्दल अभिनंदन!
आता भाग-२ काढा.
गुजराथ मधे मी नेहमी जातो
गुजराथ मधे मी नेहमी जातो तिथली दोन निरीक्षणे.
१. अहमदाबाद मधील साबरमती नदी नजर जाईपर्यंत नजर लागण्या इतकी स्वच्छ आहे. नदीच्या काठावर मी येवढी स्वच्छता भारतातील कुठल्याही शहरात तरी कुठेही पाहिली नाही.
२. नर्मदेचे पाणी कच्छ्ला मिळाल्यामुळे त्या संपूर्ण परिसराचा अक्षरशः कायापालट झाला आहे. हे गेल्या काही वर्षात झाले आहे असे तिथली लोक सांगतात.
सामन्य जनता जरी इतर सर्व भारताप्रमाणेच आर्थिक परिस्थिती असली तरी राज्य सरकारवार नाराज नाही, आणि हे निकालावरून दिसलेच. गुजराथ मधील मत हे नकारत्मक नाही हे लक्षात घ्यायला ह्वे
माझ्या आजोबांपासून काँग्रेसची परंपरा आहे पण यावेळेस पहिल्यांदाच इतर अनेक मतदारांप्रमाणे भाजपला मतदान केले आहे. मोदींमुळे.
हा माणूस नुसता बोलत नाही , करून दाखवतो अशी माझी खात्री आहे. जनतेने दिलेल्या नि:संशय निर्णायक कौलामुळे त्यांची आश्वासने प्र्यत्यक्षात येतील असे मला वाटते. त्यांना वेळ देण्याची माझी तयारी आहे.
विचारवंत, त्याच्या खालची
विचारवंत, त्याच्या खालची लिन्क दिसली का??
आणि जरा कमी खिदळा ओ, तुमच्यामुळे मी पण बिघडले. ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या...
<<काँग्रेस आणि भाजप दोनीही भ्रष्ट आहेत आणि तिसरा पर्याय फक्त आआप आहे असे तुमचे म्हणणे असेल तर आआप चा इकॉनॉमिक अजेंडा तरी सांगा.>>
युरो, सॉरी तुम्ही हा प्रश्न आधी पण विचारला होता. तुम्ही ह्यातील तज्ञ असावे असा अंदाज आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर मी फार सविस्तर नाही सांगू शकणार. माझं ते क्षेत्र नाही. पण मला एक सामान्य नागरिक म्हणून एवढं नक्की लक्षात आलंय आणि सध्या मला एवढं पुरेसं आहे.
मिर्ची, मी केजरीवालांना काही
मिर्ची, मी केजरीवालांना काही प्रश्न विचारले होते (दिल्ली निवडणुकीच्या सुमारास) त्यांची उत्तरे त्यांनी दिलीच नाहीत. पळपुटा कुठला. ती तुम्ही देणार का? द्या मग बोलू
आम आदमी पार्टीच्या केजरीवालांना काही प्रश्न
(१) भ्रष्टाचाराविरोधात तथाकथित लढाई लढणार्या अरविंद केजरीवाल व त्यांच्या पत्नीची दिल्लीतून एकदाही बदली झाली नाही. पण अशोक खेमका व दुर्गा शक्ती यांच्या सारखी त्यांच्यावर एकदाही कारवाई झालेली नाही असे का?
(२) प्रशांत भूषण यांच्या टिप्पण्यांच्या संदर्भात आपची काश्मीर, भारतीय सेना, व तथाकथित हिंदू दहशतवाद यांच्या विषयी काय मते आहेत?
(३) आम आदमी पक्षाची रामजन्मभूमी या प्रश्नावर काय भूमिका आहे?
(४) बाटला हाऊस एनकाउंटरमधे हुतात्मा झालेल्या पोलीस अधिकारी मोहनचंद शर्मा यांच्या हौतात्म्याविषयी आपचे काय मत आहे?
(५) आप केंद्रात सत्तेवर आल्यावर शीखविरोधी दंगलींतल्या आरोपींचे काय करणार?
(६) बिनायक सेन हा कोर्टाने शिक्षा सुनावलेला माओवादी नेता आप मधे कसा?
(७) भारतात इस्लामी सत्ता यावी म्हणून जाहीरपणे बोंबलणारा आणि ज्याच्या विरोधात डझनावारी वॉरंट्स आहेत अशा इमाम बुखारी या इसमासोबत केजरीवाल अनेक वेळा दिसलेले आहेत. यावर त्यांचे काय म्हणणे आहे? त्या दोघांतल्या संबंधांबाबत केजरीवाल यांच्याकडे काय स्पष्टीकरण आहे?
(८) भ्रष्टाचाराचे आरोप असलेले पवन बन्सल आणि नवीन जिंदाल यांच्या विरोधात केजरीवाल काहीच कसे बोलत नाहीत?
(९) उपोषणादि कार्यक्रमात आधी भारतमातेचे चित्र लावणार्या आपने नंतरच्या आपल्या कार्यक्रमांतून ते चित्र अचानक का गायब केले?
(१०) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टीच्या एका उपोषणाच्या कार्यक्रमात अन्न वाढण्याच्या प्रकाराबद्दल केजरीवाल यांना विचारले असता मीडियाला बाईट देताना म्हणाले "आम्हाला जातीयवादी (communal) लोकांकडून समर्थन नको". मग याच आम आदमी पार्टीचे लोक उत्तराखंड कधे बाबा रामदेवांच्या लोकांनी चालवलेल्या रिलीफ कँपमधे (जे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी होते) ते जेवण हादडताना दिसले होते, त्याचे काय? फुकटचे गिळताना रामदेव बाबा सेक्युलर झाले का?
(११) हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या विरोधातल्या अनेक गंभीर आरोपांबद्दल केजरीवाल शांत का?
(१२) बाटला हाऊस एनकाउंटर हा फेक होता आणि इशरत जहां अगदी गोड गोजिरी लाज लाजिरी अशी भोळीभाबडी मुलगी होती आणि तो एनकाउंटरही फेक होता असे एका पत्रात केजरीवाल यांनी मुसलमान संघटनांना लिहीण्याचे काय कारण?
(१३) दहशतवाद विरोधी एनकाउंटरांची यादी देताना केजरीवाल यांना नेहमी गुजरात कसे आठवते? आणि तेही हे सत्य असताना की काँग्रेसशासित महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश तसेच पूर्वोत्तर राज्ये आणि उत्तर प्रदेश यांत हा आकडा/यादी कितीतरी मोठी आहे.
(१४) उत्तर प्रदेशातल्या दंगलींबाबत बोलताना केजरीवाल यांनी मोदी आणि अमित शहा यांचा ठळक उल्लेख करुन समाजवादी पक्षाचा अगदी जाता जाता पुसटसा उल्लेख का केला? या दोघांचा आणि उत्तर प्रदेशातल्या दंगलींचा काय संबंध? आणि तेही हे सत्य असताना की २ काँग्रेसचे माजी खासदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आणि काही बसपा आणि सपा खासदारांवर दंगली भडकावल्यचा आरोप आहे. काँग्रेसविषयी इतका सॉफ्ट कॉर्नर का?
(१५) भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मयंक गांधी आणि दमानिया या आम आदमी पार्टीच्या सदस्यांची चौ़कशी करायला केजरीवाल यांनी अंतर्गत लोकपाल नियुक्त करणे आणि सीबीआयने काँग्रेसची चौ़कशी करणे यात विनोदाचा भाग वगळला तर फरक काय?
(१६) माहिती अधिकाराचा डंका पिटणार्या आम आदमी पार्टीच्या Core Reforms team मधल्या सदस्यांवरच भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन अनेक माहिती अधिकारात अनेक अर्ज दाखल झाले आहेत. त्या अर्जांना आप उत्तर द्यायला टाळाटाळ का करत आहे?
नंदिनी, सगळ्या मंत्र्यानी
नंदिनी, सगळ्या मंत्र्यानी आपपल्या संपतीचे विवरण जाहिर करावे हा मोदी यांचा सरकार स्थपाण केल्यानंतरचा निर्णय आहे आणि त्या अनुशंगानेच चर्चा चालली आहे.
इब्लिस, धागा दोन हजाराचा झाला की नवा धागा सुरू करावा असा इथे साधारण नियम आहे.
त्यामुळे अजून काही दिवस / महिने थांबावे लागेल.
तसेही किती प्रतिसाद येतात यापेक्शा काय प्रतिसाद येतात हे माझ्यासाठी महत्वाचे आहे.
विचारवंत यांनी मोदींना
विचारवंत यांनी मोदींना सडाफटींग म्हण्टले आहे .आता विचारवंतानी सांगावे कि दिड कोटींचा मालक सडाफटींग असतो काय?
http://www.livemint.com/Politics/RnMAMPAl6FWtLU5JAY1kQP/Narendra-Modi-as...
<<भारतमाता माता नहीं डायन हय
<<भारतमाता माता नहीं डायन हय असे यांचे सदस्य म्हणतात >>
लिन्क द्याच तुम्ही असं कोण आणि कुठे म्हणालं ह्याची.
"आख्खि पोस्ट It is said आणि It is romoured यावर आधारित आहे" हे तुम्ही म्हणालात. आता वरचं वाक्य पुराव्याने सिद्ध करा. ओपन चॅलेंज.
तुम्ही पळून जाणार ह्याची खात्री आहे.
<<मुसलमानांनी कम्युनल झाले पाहीजे असे यांच्या शाजिया इल्मी म्हणतात>>
कधी माहितीये का? जेव्हा ती हिंदू नेत्याचा प्रचार करत होती ! ग्रो अप...
आप आणि केजरीवालच्या प्रश्नांना पास. तुमची जमीन मोदी-तणाने नापीक झाली आहे त्यात कुठलंही बी रूजणार नाही सध्या. आधी नांगरणी करू या.
नो पर्सनल ऑफेन्स.
दिल्लीतील जनतेला स्वस्त
दिल्लीतील जनतेला स्वस्त विजेचे आश्वासन दिले, सरकार स्थापन झाल्यावर तसा निर्णय घेतला, पण अर्थसंकल्पात तशी तरतुद केली नाही आणि मग पळ काढला. वाह रे केजरीवाल.
माफ करा, ते डायन वाले वाक्य
माफ करा, ते डायन वाले वाक्य आझम खान याचे होते. काय आहे ना चूक झाली तर कबुल करण्याचा मोठेपणा असतो. आप सारखे नाही.
धिरज काटकर | 13 June, 2014 -
धिरज काटकर | 13 June, 2014 - 12:24 नवीन
विचारवंत यांनी मोदींना सडाफटींग म्हण्टले आहे .आता विचारवंतानी सांगावे कि दिड कोटींचा मालक सडाफटींग असतो काय?
http://www.livemint.com/Politics/RnMAMPAl6FWtLU5JAY1kQP/Narendra-Modi-as...
धीरज. तुम्ही आधी अर्थशास्त्राचा अभ्यास करा. मी सुद्धा साठ लाखांच्या संपत्तीचा मालक आहे. पण कस? तर एक फ्लॅट माझ्या मालकीचा आहे. त्या संपत्तीचा काही उपयोग असतो का? हां. आता दीड कोटींची कॅश आहे तर गोष्ट वेगळी पण तशी ती नाही मोदींकडे. मोदींच्या मालकीचे जे घर आहे त्याची किंमत काय ते आधी काढा मग बोलू
आपण सगळ्यानी साबरमती गटग
आपण सगळ्यानी साबरमती गटग करूया का?
सगळ्यानी सगळी नदी पहायची.
मला डिसेंबरात वेळ आहे.
चालेल. करुया. शनीवार रविवार
चालेल. करुया. शनीवार रविवार असेल तर अधीकच उत्तम
<<मुसलमानांनी कम्युनल झाले
<<मुसलमानांनी कम्युनल झाले पाहीजे असे यांच्या शाजिया इल्मी म्हणतात>> <<<<<<<
आणि तुम्ही ह्याच समर्थन करता then I think you need Horlicks to Grow Up.
>>आप आणि केजरीवालच्या
>>आप आणि केजरीवालच्या प्रश्नांना पास. तुमची जमीन मोदी-तणाने नापीक झाली आहे त्यात कुठलंही बी रूजणार नाही सध्या. आधी नांगरणी करू या.>>.

आप वाले पळपुटे असतात याचा ढळढळीत पुरावा
प्रश्न विचारताच पळणारे भगोडे आप वाले
आपण सगळ्यानी साबरमती गटग
आपण सगळ्यानी साबरमती गटग करूया का?
सगळ्यानी सगळी नदी पहायची.
मला डिसेंबरात वेळ आहे.>>> मला सप्टेंबर ऑक्टॉबर चालेल. मला गीरचं जंगल पण बघायचंय....
<<माफ करा, ते डायन वाले वाक्य
<<माफ करा, ते डायन वाले वाक्य आझम खान याचे होते. >>
फारच सिलेक्टिव माफी मागता बुवा तुम्ही.
तोपर्यंत बातमी वणव्यासारखी पसरलेली असते. ABP news वाल्यांनी परवा केलं तसं.
Won't support AAP's 'diabolical power play' in Delhi: Congress
http://www.abplive.in/india/2014/06/10/article340666.ece/Wont-support-AA...
विचारायला गेलंच कोण होतं?

भगवान बचाये भारत को.
प्रश्न विचारताच पळणारे भगोडे
प्रश्न विचारताच पळणारे भगोडे आप वाले
या धाग्यावर मोदींवर
या धाग्यावर मोदींवर पुराव्यानिशी होत असलेले आरोप खोडता येत नसल्याने श्रीयुत विचारवंत हे धाग्याचा फोकस केजरीवाल/ आप इ इ कडे वळवू इच्छित आहेत .तरी कृपया त्यांच्या आऊट ऑफ फोकस कमेंट्स कडे दुर्लक्ष करावे.
नरेश माने | 13 June, 2014 -
नरेश माने | 13 June, 2014 - 12:31
<<मुसलमानांनी कम्युनल झाले पाहीजे असे यांच्या शाजिया इल्मी म्हणतात>> <<<<<<<
आणि तुम्ही ह्याच समर्थन करता then I think you need Horlicks to Grow Up.
अनुमोदन नरेश माने. काय हे? चक्क communal होण्याचे समर्थन? शी!!!!
<<आपण सगळ्यानी साबरमती गटग
<<आपण सगळ्यानी साबरमती गटग करूया का?
सगळ्यानी सगळी नदी पहायची.>>
मस्त आयडिया. पण फक्त ११ किमी चा दिवाणखाना पाहून परत नाही यायचं.
मुद्दे संपल्यामुळे विचारवंतांच्या बाहुल्या नाचायला लागल्या. चालू द्या.
तेवढं ते "दूध मांगे तो खीर देंगे, काश्मिर मांगोगे तो लाहोर भी छिन लेंगे" चं काय झालं नेमकं ते कळेल का? फायरिंग झाली आहे आज.
बाय. सध्या पुरे. परत भेटूच.
मिर्ची ह्या विचारलेल्या
मिर्ची ह्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न देता पास देऊन पळून गेलेल्या असल्याने या धाग्यावरची माझी ही शेवटची पोस्ट. असल्या पळपुट्या लोकांशी कसली चर्चा?
<<या धाग्यावर मोदींवर
<<या धाग्यावर मोदींवर पुराव्यानिशी होत असलेले आरोप खोडता येत नसल्याने श्रीयुत विचारवंत हे धाग्याचा फोकस केजरीवाल/ आप इ इ कडे वळवू इच्छित आहेत .तरी कृपया त्यांच्या आऊट ऑफ फोकस कमेंट्स कडे दुर्लक्ष करावे. >> +१००
आपण सगळ्यानी साबरमती गटग
आपण सगळ्यानी साबरमती गटग करूया का?>> हो. आणि कच्छ.
कच्छ (kuccha) नही देखा तो कुछ नही देखा.
पुढच्या वेळेस साबरमतीचा फोटो काढून आणिन.
मस्त आयडिया. पण फक्त ११ किमी
मस्त आयडिया. पण फक्त ११ किमी चा दिवाणखाना पाहून परत नाही यायचं. <<< चलो, डन.
पूर्ण उगमापासून संगमापर्यंत चालत जायचं. माझी या प्रोजेक्टला लागतील तितके दिवस द्यायची पूर्ण तयारी आहे, तुम्ही कधी येणार ते सांगा. त्याधी काय वाचन वगैरे करायचं तेही ठरवून घेऊ. वाटेत कुठे कुठे तेदेखील, मुक्काम कुक्ठे करायचे तेदेखील शोधून ठेवता येईल. विक्रमसिंह वगैरे लोक मदत करतीलच. व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करण्याची जबाबदारी माझी.
सोबत कुणी पर्यावरण तज्ञ वगैरे आले तर अजून उत्तम!! एक चांगला प्रोजेक्ट होइल.
And that is how I make my opinions!!! अब आप बोलो!!!
विचारवंत, मोदींकडे एक कोटीचा
विचारवंत, मोदींकडे एक कोटीचा फ्लॅट व" पन्नास लाखाची "मुवेबल असेट आहे. आता भारतासारख्या देशात पन्नास लाख खिशात घेऊन फिरणारा जर कफ्फलक आहे असे आपण समजत असाल तर आपण कोणत्या तरी संस्थानचे अधिपती असणार याविषयी आमच्या मनात तिळमात्र शंका नाही.
गुजराथ मधे मी नेहमी जातो
गुजराथ मधे मी नेहमी जातो तिथली दोन निरीक्षणे.
१. अहमदाबाद मधील साबरमती नदी नजर जाईपर्यंत नजर लागण्या इतकी स्वच्छ आहे. नदीच्या काठावर मी येवढी स्वच्छता भारतातील कुठल्याही शहरात तरी कुठेही पाहिली नाही.
------- विक्रमसिह तसेच केदार तुम्ही नेहेमी गुजराथ मधे जात असता म्हणुन तुम्हाला विनन्ती. पुढच्या वेळेस साबरमतीचे फोटो टाका. हे फोटो गान्धीनगर आणि अहमदाबाद शहर आआपा प्रमुखान्च्या आणि दोन कॉन्ग्रेस कार्यकर्त्यान्च्या साक्षीने घ्या, फोटोवर त्यान्च्या स्वाक्षर्या घ्या आणि मगच येथे टाका.... कुणालाही शन्का येणार नाही
विकासपुरुषाला (हे नामकरण मला जाम भावले :स्मित:) किमान सहा महिने काम करु द्यावे आणि मग जरुर टिका करावी असे माझे मत मी नोन्दवतो. अगोदरच कोट्यावधी लोकान्च्या अपेक्षान्चे ओझे विकासपुरुषाच्या मानगुटीवर आहे, आताच आक्रस्ताळेपणा करुन आपण केवळ अडथळे निर्माण करुन भाजपाने विरोधात असताना केले त्याचे अनुकरण का करतो?
मोदी यान्च्या साठी तुर्तास एक प्रेमाचा सल्ला - सर्व सत्ता केवळ स्वत: कडेच एकवटेल असे काही करु नका, सर्वाना सोबत घ्या.
मोदी सरकारचा बाबूंना दट्टया!
मोदी सरकारचा बाबूंना दट्टया! .... महाराष्ट्र टाईम्स.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Staff/articleshow/36478829...
इथे लिंक देणा-या प्रत्येकाने
इथे लिंक देणा-या प्रत्येकाने प्रत्यक्ष जाऊन पाहूनच आजवर चर्चा केल्यात का ? अगदी नमो नमो करणा-या किती जणांनी अदानी- अंबानींची कागदपत्रे पाहून गुजरात मॉडेलचा प्रचार केला होता. लिंकाच दिलेल्या ना हेडक्वार्टरक्डून आलेल्या ?
नागपूर दि. १३, जून २०१३ :
नागपूर दि. १३, जून २०१३ : (आमच्या वार्ताहराकडून) मायबोलीवर अचानक बदललेल्या वातावरणाची नागपूर येथे उच्चस्तरीय बैठकीमधे दखल घेण्यात आलेली आहे. रामभाऊ म्हाळगी फाउंडेशनच्या विनय सहस्त्रबुद्धे यांना परिस्थिती कशी हाताळावी याचा अहवाल ताबडतोब पाठवून द्यावा असे तातडीचे खलिते वरकाय वरून गेले असण्याची शक्यता आहे. पुढचे आदेश प्राप्त झाल्यानंतर त्याचा इथे इफेक्ट दिसून येईल. कदाचित वौयक्तिक हल्ले, हहगलो स्मायल्या यांचा वापर करावा असे खुद्द मोहनराव यांना वाटतेय असे सूत्रांचे म्हणणे आहे.
Pages