मोदी सरकार- एन डी ए २०१४ : जागता पहारा! - भाग १

Submitted by साती on 22 May, 2014 - 00:20

येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.

या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल

याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.

-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.

१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.

२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड

अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री

३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार

४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.

१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार

१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<फक्त अदाणीला इतक्या कवडीमोल दराने पंधरा हजार एकर एवढी अवाढव्य जमीन द्यायचे कारण मोदींनी स्पष्ट केलेले नाही.>>

अदानीला ज्या दराने जमीन दिली आहे त्याच दराने त्याच्याच शेजारी केंद्र सरकारला (त्यावेळच्या काँग्रेस-युपीए सरकारला) जमीन दिली आहे. आपण गुजरात सरकारकडे यासंबंधी विचारणा करु शकता.

४ महिन्यांच्या बाळाला कोणा दाईच्या भरोशावर टाकून हृदयावर दगड ठेवून, लोकलमध्ये लोंबकळत कामाला जाणार्‍या महिलाही आज हेच म्हणत असतील-
"चला बाई, ह्या महिन्यात रोज एक तास ओव्हरटाइम करायला पाहिजे. आपले गुणी मंत्री ब्राझिलला जाणारेत ना फुटबॉलचा अभ्यास करायला. ८९ लाख लागणार आहेत.पैसे नकोत का द्यायला त्यांना?">>

मुंबई मधल्या बायकांच्या पगारातल्या टॅक्समधून गोव्यातल्या मंत्र्यांच्या प्रवासासाठी पैसे जातात हे वाचून अंमळ करमणूक जाहली.

तीच शोधतोय. मागे बघितली होती ते आठवले तसे लिहीले. लिंकच शोधतोय. काय आहे ना "आप" सारखा रिकामटेकडा वेळ नसल्याने वेळ लागतोय जरा.

अदानींना दिलेली जमीन कच्छच्या वाळवंटातली आहे. टाटांना दिलेली अहमदाबादमधली आहे.
दोन्हीचा भाव वेगवेगळाच असणार ना?
अर्णव गोस्वामीनी मोदीजींना हा प्रश विचारला होता. त्यावर मोदीजींचं वर दिलेलं उत्तर ऐकून त्यानं गपगुमान पुढच्या प्रश्नाला हात घातला.

अदानींना दिलेली जमीन कच्छच्या वाळवंटातली आहे. टाटांना दिलेली अहमदाबादमधली आहे.
दोन्हीचा भाव वेगवेगळाच असणार ना?


गुड वन शुगोल.

समजून घ्यायची इच्छाच नसली आणि केवळ द्वेषभावनेने विरोध केला ही एवढी साधी लॉजिकल गोष्ट सहज निसटते.

हो हो, तिथे नॅचरल गॅस / ऑइल इ. काही सापडल्यास ते रिलायन्सप्रमाणे अडाण्यांचं नशीब असेल फक्तं!
बाकी काही साट्यालोट्याची शंका घेऊ नका.

हीच लॉजिकल गोष्ट म्हणताय होय?

Adani has, over the years, leased 7,350 hectares–much of which he got from 2005 onward–from the government in an area called Mundra in the Gulf of Kutch in Gujarat. FORBES ASIA has copies of the agreements that show he got the 30-year, renewable leases for as little as one U.S. cent a square meter (the rate maxed out at 45 cents a square meter). He in turn has sublet this land to other companies, including state-owned Indian Oil Co., for as much as $11 a square meter. Between 2005 and 2007 at least 1,200 hectares of grazing land was taken away from villagers.

हजार धावा पुर्ण :स्मित:, किमान वेळात (२२ दिवसात) १००० धावा पुर्ण असे नवे रेकॉर्ड, सर्वान्चे अभिनन्दन...

मला एक समजत नाहीये. इथे सगळे लिंका देत सुटलेत. सगळेच.

पण
.
.
.
.
.
.
.
.
पण
.
.
.
.
.
नदी असेल तर प्रत्यक्ष तिथे जाऊन कुणी बघितलं आहे का (काही अपवाद वगळता)
किती रेटला जमीन दिली ती जागा काय होती, तो रेट आणि ती जागा यांचा परस्परसंबंध, सरकारी कागदपत्रे हे प्रत्यक्ष कुणी बघितली आहेत का?

नाही तर हज्जार लिंका दिल्या तरी एका मर्यादेपलिकडे त्याला काहीही अर्थ नाही.

अजून एक प्रश्नं, मोदींनी मुख्यमंत्री पदावर असताना मिळालेला सगळा पगार दान केला आणि मुख्यमंत्रीपदावर असताना नॉमिनल एक रूपया पगार घेतला तर त्यांच्या आजीविकेचा खर्चं किण करत होतं? भाजपावाले का?
आणि आता त्यांच्या सूटांचे आणि इमेज कन्सल्टंटचे खर्च कोण करतं ?
पक्षनिधीतून होतो का?

तो माणूस मुख्यमंत्री होता साती. त्यांना काही previliges असणारच ना. आणि सडाफटिंग असलेल्या एका माणसाचा खर्च तो किती असणार? एन्डीए सरकार वरुन आता मुख्यमंत्री होता तेव्हाचा खर्च आणि पगार यावर गाडी गेली आहे. Wink आता धागाकर्तीनेच विषयांतर करायचे म्हटल्यावर काय करणार ब्वॉ.

आले, लिहिता येऊ लागले.
गंगेतल्या मालवहातुकीबद्दल असे म्हणता येईल की गंगा तिच्या मुखापासून आत ८०० कि.मी.(बहुधा अधिकच) नॅविगेबल आहे. सद्ध्याही तिच्यातून मालवहातूक होते. हूगली नदीसंव्यवस्थेतून कलकत्त्यापर्यंत १४० कि.मी. सागरी भरतीच्या लाटांचा वापर करीत सागरी जहाजे आत कलकत्त्यापर्यंत येतात. पुढे भागीरथीमध्ये फराक्का बंधार्‍याद्वारे पाण्याची पातळी नौकानयनयोग्य राखली जाते. आणखी आत गंगेच्या मुख्य प्रवाहात इन्लँड जहाजे मालवहातूक करतात. हे अलाहाबाद (वाराणसीच्याही अलीकडे) पर्यंत चालते. आता धक्के, टर्मिनस इ.साठी देखभाल आणि दुरुस्तीची सततची गरज पूर्ण केली गेली नसेल तर ती करावी लागेल. हिमालयाच्या ठिसूळपणामुळे हिमालयोद्भव नद्यांमध्ये वारंवार आणि प्रचंड प्रमाणात गाळ साठतो. तेव्हा डीसिल्टिंग अत्यंत गरजेचे असते. ते करावे लागते आणि लागेलच.
प्रवासी वहातूकही होत असतेच. आपण बंगाली दिग्दर्शकांच्या चित्रपटांतून ती पहातो आणि उ.प्र.-बिहारमधील नौका-दुर्घटनांच्या बातम्यांद्वारे या वहातुकीविषयी आपल्याला कळतेच. इथेही विद्यमान सुविधांची देखभालदुरुस्ती आवश्यक असावी/आहे. क्रूझ ची कल्पना मात्र नावीन्यपूर्ण आणि फार छान आहे.

<<साबरमती वाह्ती आणि स्वच्छ राखण्यासाठी नर्मदा धरणाचे पाणी तिच्यात वळवले आहे असे ऐकले आहे. हे खरे असेल तर केवळ सुशोभितीकरणासाठी पाणी असे वापरणे योग्य आहे काय? >> अजिब्बात नाही हीरा.

"नरेन्द्र मोदी यह नहीं बता रहे हैं कि साबरमती में नर्मदा, जो एक बड़ी नदी है, का पानी डाला जाता है।
नर्मदा का उद्गम स्थल अमरकंटक है और इसके किनारे कोई बड़े कारखाने या जबलपुर को छोड़कर कोई बड़े शहर न होने के कारण यह नदी पहले से ही काफी साफ है। एक साफ बड़ी नदी का पानी एक छोटी प्रदूषित नदी में डाल कर उसे साफ करने का दावा करना लोगों के साथ धोखा है। मोदी बताएं की गंगा को साफ करने के लिए इसमें किस नदी का पानी डालेंगे?"
http://www.citizen-news.org/2014/05/modis-claim-of-clean-sabarmati-river...

इच्छुकांनी हे पण बघा.
Ecologists don't buy new Ganga rejuvenation plan
http://www.indiawaterportal.org/articles/ecologists-dont-buy-new-ganga-r...
(आणि हो, असू दे आम्ही रिक्कामटेकडे...नमो नमो जप करण्यातून सवड मिळाली तर तुम्ही पण वाचा बर्का विचारवंत)

विचारवंत, वर मी दिलेल्या उतार्‍यामध्ये लिहिलंय की Forbes Asia कडे कागदपत्रं आहेत म्हणुन. Happy

तसं नाही हो विचारवंत, ते सगळे साठलेले पैसे डोनेट करायचा निर्णय मोदींनी पंतप्रधान झाल्यावर गुनरातवरून बाडबिस्तर्‍ हलवून दिल्लीत आणला तेव्हाचा आहे म्हणून विचारतेय.

<<अदानीला ज्या दराने जमीन दिली आहे त्याच दराने त्याच्याच शेजारी केंद्र सरकारला (त्यावेळच्या काँग्रेस-युपीए सरकारला) जमीन दिली आहे.>>
बरं मग? म्हणून तर आम्ही म्हणतोय की ही बाँग्रेस आहे. फक्त सत्तेवर कोण आणि विरोधात कोण बसणार एवढ्यासाठी भांडतात ते. लूटमार दोन्हीही करतातच.

<<मुंबई मधल्या बायकांच्या पगारातल्या टॅक्समधून गोव्यातल्या मंत्र्यांच्या प्रवासासाठी पैसे जातात हे वाचून अंमळ करमणूक जाहली.>>

अग्गंबाई हो का? मग हा पैसा कुठून आलाय ह्या ज्ञानाचे चार-दोन तुषार आमच्यावर पण शिंपडा.

<<आणि सडाफटिंग असलेल्या एका माणसाचा खर्च तो किती असणार? >>
Rofl Lol भयंकर विनोदी वाक्य.

"It is said that Modi is aware of his popularity among women and ensures that he is always well turned out. His bright kurtas, made of the finest linen and almost always stitched by tailors from Jade Blue, an outlet in Ahmedabad, are never frayed or ruffled. This, despite the intensity of a vigorous outdoor campaign. It helps, of course, that his hair and neatly-trimmed beard are always in place. He is known to wear only rimless Bvlgari glasses, carry a Mont Blanc pen, and it is rumoured that during Gujarat’s 2007 Assembly election campaign, he underwent a hair transplant to get himself a head full of hair."
http://www.openthemagazine.com/article/nation/the-modi-hotness-quotient

हीरा, गंगेमध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक करतायेऊ शकते तेवढ्यामोठ्या प्रमाणावर ती केली जात नाही. प्रवासी वाहतूकदेखील छोट्या टप्प्यांसाठी होते. मोट्।या टप्प्यांसाठी नाही. अधिक माहिती मिळाली की लिहिते.

ही यमुनेसंदर्भात लिंक मिळाली. http://www.thelivepost.com/modi-government-wants-make-dead-yamuna-river-...

एकंदर भारतामध्येच जलवाहतूक ही फार अंडर एस्टीमेटेड आहे. एवढा मोठा किनारा असूनदेखील आपल्याकडे बर्‍याच बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरमधेच कमी असल्यामुळे आपण त्याचा योग्य उपयोग करू शकत नाही.

सडेतोड यांच्या लिंक प्रमाणे अदाणीने ४ सेंट या दराने जमीन घेतली व इतर कंपनीजना ११ डॉलर या दराने विकली. अदाणीचा मागच्या दहावर्षातला उत्कर्ष कसा झाला असावा याचे हे द्योतक आहे.
पब्लिक सेक्टरमध्ये खाजगीकरण /परदेशी गुंतवणुक आणुन मोदी गुजरात व देश मुठभर लोकांच्या हातात देत आहेत. कमीअधीक सगळेच पक्ष भांडवलवाद राबवत असले तरी मोदी टोकाचा भांडवलवाद राबवत आहेत.
डीफेन्स सेक्टर मध्ये १०० टक्के एफडीआय आणणार आहेत, याचा अर्थ भारताचे संरक्षण सामुग्रीचे तंत्र मंत्र अमेरीकेकडे व युरापाकडे राहणार. कारण बहुतांश शस्त्रे तयार करणार्या संस्था याच देशातल्या खाजगी सरकारी संस्था आस्थापने आहेत .

http://m.timesofindia.com/india/Govt-moves-to-hike-defence-FDI-up-to-100...

नरेंद्र मोदींची एकूण मिळकत असे शोधल्यास एकट्या सडाफटिंग माणसाकडे, ज्याने मागच्या दहा वर्षांत मेवळ १२० रु. वेतन घेतले आहे ; किती मिळकत आहे हे कळेल.

http://m.ndtv.com/elections/article/election-2014/from-vadodara-to-varan...

@मिर्ची ताई

काँग्रेस आणि भाजप दोनीही भ्रष्ट आहेत आणि तिसरा पर्याय फक्त आआप आहे असे तुमचे म्हणणे असेल तर आआप चा इकॉनॉमिक अजेंडा तरी सांगा.

साती, धागा एन डी ए सरकारच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आहे की, मोदी आणी त्यांची मिळकत अथवा त्यांचे कुर्ते वग्सैरेची चर्चा करण्यासाठी?

http://timesofindia.indiatimes.com/home/specials/gujarat-assembly-electi...

इथे त्यांच्या एकूण इन्कमबद्दल माहिती दिलेली आहे.

"It is said that Modi is aware of his popularity among women and ensures that he is always well turned out. His bright kurtas, made of the finest linen and almost always stitched by tailors from Jade Blue, an outlet in Ahmedabad, are never frayed or ruffled. This, despite the intensity of a vigorous outdoor campaign. It helps, of course, that his hair and neatly-trimmed beard are always in place. He is known to wear only rimless Bvlgari glasses, carry a Mont Blanc pen, and it is rumoured that during Gujarat’s 2007 Assembly election campaign, he underwent a hair transplant to get himself a head full of hair."

मिर्ची, तुमच्या पोस्ट कशा मस्तपैकी बकवास असतात त्याचे उत्तम उदाहरण. आख्खि पोस्ट It is said आणि It is romoured यावर आधारित आहे Proud Lol Biggrin Rofl

काल केंद्र सरकारने नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला. पण त्यामुळे होणारे हजारो कुटुंबांचे होणारे विस्थापन, शेतजमिनी पाण्याखाली गेल्यामुळे भुमिहीन होणारे शेतकरी, पर्यावरणसंबंधी निर्माण होणारे प्रश्न, ह्यासंबंधी कोणी माहिती देईल का? सरकारकचे ह्यासंबंधी पुनर्वसनाचे नेमके धोरण काय आहे.

काँग्रेस आणि भाजप दोनीही भ्रष्ट आहेत आणि तिसरा पर्याय फक्त आआप आहे असे तुमचे म्हणणे असेल तर आआप चा इकॉनॉमिक अजेंडा तरी सांगा.>>

त्यांचा अजेंडा म्हणजे

  • काँग्रेसला थॉडेसे आणि भाजपाला भरपूर झोडपायचे
  • काश्मीर भारतापासून वेगळा करायचा
  • मुसलमानांनी कम्युनल झाले पाहीजे असे यांच्या शाजिया इल्मी म्हणतात

वगैरे
वगैरे

Pages