येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.
या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल
याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.
-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.
१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.
२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड
अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री
३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार
४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.
१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार
१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.
नर्मदा आंदोलन , कोण ? कुठल
नर्मदा आंदोलन ,
कोण ? कुठल आंदोलन ?
मेधा बाईंनी निवडणुक लढवली, हरल्या देखील. पण त्या दरम्यान आंदोलन कुठे हरवल माहीत नाही ?
मोदी विमानात बस्ले. हाअ पायलट
मोदी विमानात बस्ले. हाअ पायलट एप्सोड अहे.
हॅलो,नॉक...नॉक... कुठेत
हॅलो,नॉक...नॉक...
कुठेत सगळे...? नॉक.. नॉक.. नॉक..
'गोंधळाला यावं...' ऑडीओ वाजवायची का? हॅलो...
अबब , ११०० पोस्ट्स! हे वाचून
अबब , ११०० पोस्ट्स! हे वाचून एखाद्या पहारेकर्याला निद्रानाश जडायचा.
विज्ञानदास, करमेना का ? अनेक
विज्ञानदास, करमेना का ?
अनेक विवादास्पद ताज्या ताज्या बातम्या आहेत. लिहायला वेळ मिळेना.
(स्वगतः कामधंदा सोडून फुलटाइम राजकारणात पडावं का?)
विवेक नाईक | 14 June, 2014 -
विवेक नाईक | 14 June, 2014 - 16:58
नर्मदा आंदोलन ,
कोण ? कुठल आंदोलन ?
मेधा बाईंनी निवडणुक लढवली, हरल्या देखील. पण त्या दरम्यान आंदोलन कुठे हरवल माहीत नाही ?
<<
आंदोलन हरवलं? की तुमचे डोळे / कान उर्फ मेडिया बंद झालेत?
मिर्चीताई, कामधंदा करून
मिर्चीताई,
कामधंदा करून फुलटाइम राजकारणात पडावं का?<<< डन्... पण कामपण करायचं आणि राजकारणपण...? दोन्हीपैकी एक कायतर करायला सांगा की?
राजकारण,धंदा म्हटलं पडायलाच पाहिजे का मराठी माणसानं... त्यात उतरता नाय का येत... ??
कसं ना अस्मादिक राजकारणातले जुजबी जाणकार .पण आजूबाजूला हा गोंधळ असला ना की कसं झ्याक वाटतं.... त्यात ह्यो जो हिथं चालतो त्याला तोड न्हाई... तो कमल हसनचा कुठला पिक्चर... बर्फीटाईप.... त्यात त्याला रेकॉर्ड केलेले आवाज ऐकले की झोप लागायची...तसं हे धागे वाचत-वाचत बाकीचं काम... प्रायोरिटी आधी हे धागे...
पूर्वी रामायण-महाभारत लागलं कि म्हणे रस्ते ओस पडायचे..आत्ता तसं वाटायला लागलंय...असो,विकेंड आहे ना? Only Two Days Of Week,Like a Double Scoop Icecream... त्या दोन एकावर एक चढवलेल्या गोळ्यांपैकी खालच्या गोळ्याला जास्त महत्व असतं.वरचा संपला तरी आनंद असतो की अजून एक आहे शिल्लक,, स्स्स्स... तसं विकांताचं.तो येतो म्हणून माणूस काम करत असतो... असं सगळं...
टायपर ठेवावा का एखादा?
(डॉ.साती,अवांतराबद्दल क्षमस्व,प्लीज.)
---------------------------------------------------------------
Everything in parentheses can be igonred.
-Murphy
<<पण कामपण करायचं आणि
<<पण कामपण करायचं आणि राजकारणपण...? दोन्हीपैकी एक कायतर करायला सांगा की?>>
पिक्चरचं शूटिंग करू या का ?
स्मृतीतै परवा २४ विद्यार्थी वाहून गेलेल्या स्थळाला भेट द्यायला गेल्या आणि लगे हाथ 'ऑल इज वेल' चं शूटिंगही उरकून आल्या तसं...
जनतेच्या पैश्यावर मस्त फुटबॉल
जनतेच्या पैश्यावर मस्त फुटबॉल बघून या
भाजप्येचे अच्छे दिन हेच आहेत
अहो, ते जंकेट कॅन्सल झालं ना
अहो, ते जंकेट कॅन्सल झालं ना आता.
आता पुढचे बोला.
चुकीचे वागणे एकवेळ ठीक पण लोकांचा रोष समजल्यावरही चूक मस्तवालपणे कंटीन्यू करणे वाईट( जसे आमच्या कर्नाटकच्या
काँग्रेसच्या आमदारांनी केले होते) त्यामुळे ही ट्रीप कॅन्सल केल्याबद्दलल भाजपाला दहापैकी पाच मार्क्स!
झालेली चूक सुधारावीच. भाजपा
झालेली चूक सुधारावीच. भाजपा असो वा कॉन्ग्रेस जनता ह्याना खरोखर वैतागलीय. पण या दोघान्खेरीज कुठलाच सक्षम पर्याय नसल्याने आलटुन पालटुन दोघे खुर्च्या साम्भाळतायत्,झाले.
काल आमच्या गोव्यात माननीय
काल आमच्या गोव्यात माननीय पंतप्रधान मोदीजींनी विक्रमादित्य चे लोकार्पण केले. मांडवी नदीवरील पुलाच्या नामफलकाचे अनावरण केले, आणि जुवारीवर नव्या पुलाची घोषणा केली. मनोहरभाई ही कामे ठरलेल्या वेळेत ती करुन घेतील याबाबत खात्री.
१) नितीन गडकरींनी बेरोजगार
१) नितीन गडकरींनी बेरोजगार युवकांना काम मिळावं म्हणून १ लाख किलोमीटर च्या रस्त्यांवर २०० कोटी झाडे लावण्याची घोषणा केली आहे.
रस्त्याच्या दुतर्फा लावणार असं धरून हिशोब केला तर एक मीटर जागेत १० झाडे असं उत्तर येतंय !
(अनदर स्कॅम इन मेकिंग?)
२) गृहमंत्रालय ग्रीनपीस ह्या पर्यावरणसंवर्धनासाठी काम करणार्या आंतरराष्ट्रीय NGO ला आणि तत्सम आणखी १० NGO ना नोटीस बजावणार.
आयबी ने दिलेल्या रिपोर्टमध्ये ग्रीनपीस आणि इतर NGO मुळे भारताचा GDP ३% ने कमी झाला आहे. याखेरीज इतरही आरोप आहेत.
ग्रीनपीसने दिलेलं उत्तर इथे वाचता येईल.
"Leaving aside the IB’s questionable math and understanding of economics, the
burden of proof is on them to substantiate their wild claims with evidence !"
आयबीच्या रिपोर्टमधला एक पॅरा
आयबीच्या रिपोर्टमधला एक पॅरा दस्तुरखुद्द मोदींच्याच जुन्या भाषणातून उचललेला आहे.
मिर्ची , ते दूर्वांची झाडे
मिर्ची , ते दूर्वांची झाडे लावणार असतील!

अतिउत्साह... हाच अतिउत्साह
अतिउत्साह...
हाच अतिउत्साह जनता पक्ष सत्तेवर आला तेव्हा फसफसून चालला होता ..
त्यातून अनेक वेडगळ योजना जन्माला आल्या होत्या.
...
...
आपले मराठी लोक्स!
आपले मराठी लोक्स!
त्या झाडांवर मोदी अन गडकरी
त्या झाडांवर मोदी अन गडकरी स्वतः सॅटॅलाईटद्वारे लक्ष ठेवून असणार आहेत, अशी बातमी पाहिली. दोघे बसून टीव्हीवर उगवती झाडे सॅटॅलाईटद्वारा पहात आहेत असं अॅनिमेशन भलतंच चित्तवेधक होतं.
मुर्खांचा बाजार नविन तुघलक
मुर्खांचा बाजार
नविन तुघलक आले रे
इथे राजधानी अंधारात आहे आणि
इथे राजधानी अंधारात आहे आणि राजा दुसर्या उद्योगपतीची वीज विकायला परदेशी गेलाय
हे सगळे वीजेचे दर वाजवण्याचे
हे सगळे वीजेचे दर वाजवण्याचे कारस्थान
निवडणूकची खर्च वसूली जोरात
जनता मात्र कोमात
भाजपाने इलेक्शनात दहा हजार
भाजपाने इलेक्शनात दहा हजार कोटींचा चुराडा केला अशी कुजबुज आहे,ते पैसे आधी वसुल झाले पाहीजेत .प्रखर राष्ट्रवाद, चाल चरित्र नंतर.
(No subject)
स्वामीजी कहां हो आप इन दिनों
स्वामीजी
कहां हो आप इन दिनों ?
झी न्युज वर याच्याच पंतजली
झी न्युज वर याच्याच पंतजली च्या जाहीराती आहे आता
अच्छे दिन आ गये
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/36554643.cms
वा बेटा! कैसी पोस्ट शेयर की
वा बेटा! कैसी पोस्ट शेयर की है तूने.
http://www.ndtv.com/article/s
http://www.ndtv.com/article/south/nine-students-in-kerala-arrested-for-p...
अरे ! मग सिंघम चे व्हिडीओज,
अरे ! मग सिंघम चे व्हिडीओज, सायकलवरून सबसिडी रहीत सिलेंडर आणतानाचे मॉर्फ्ड फोटोज शेअर केले तर काय होईल ?
Pages