निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही शोभा! हा प्राणी/पक्षी योनीचा स्वभावधर्म आहे. मनुष्याला बुद्धी असल्याने विचार नावाचा प्रकार जास्त असतो. प्रगल्भ विचार असूनही जो कमलपत्रासारखा सगळ्यापासून कोरडा राहतो तो संत.

बहुतेक चितमपल्ली असावेत - त्यांनी पक्ष्यांना योगी म्हटलंय - ते अन्नाचा साठा करीत नाहीत, पिल्लांकरताच घरटे बांधतात (स्वतः करता नाही), अंडी उबवण्याचे काम असो की पिल्लांचे संगोपन, संरक्षण - सगळे अगदी कर्तव्य बुद्धीने (निष्कामतेने) करतात, पिल्ले उडून गेली तरी त्याबद्दल हे शोकही करत नाहीत, तसेच अगदी सहजतेने मृत्यूलाही सामोरे जातात (मृत्यूचा सहज स्वीकार) ..... ही सर्व योगी मंडळींचीच लक्षणे आहेत ..... Happy

शशांक, हे ते जाणून बुजून करत नाहीत. मनुष्याला ह्यासाठी प्रयास करावे लागतात कारण जाणिवा खूप अ‍ॅड्व्हान्स्ड असतात. तरीही मनुष्य ह्यांच्यापासून खूप काही शिकू शकतो. स्वतः दत्तगुरुंनी २४ गुरु केले त्यात प्राणी, किटक आहेत.

एक विण झाली की त्या कुटुंबातलं कुणीच कुणाचं उरत नाही का? ना जोडीदार, ना आईवडिल व पिल्लं, ना
भावंड!!!!+१ मला ही असे नेहमीच वाटते...

ते त्यांचे नैसर्गिक अन्नच आहे ना ? Sad

आपल्याला पक्षी प्राण्यांचे सर्व भावविश्व कळले असल्याची शक्यता कमीच आहे.
खुपदा ते असे का वागतात ते आपल्याला कळत नाही त्यामूळे त्यांनी आपल्यासारखे वागावे अशी अपेक्षाही ठेवता
येणार नाही आपल्याला.

कालच आफ्रिका सिरीज मधे बघितले. समुद्रातले किंग फिश.. शेकडो किलोमीटर्स चा प्रवास करत नदीच्या आत जातात. सामन माश्याप्रमाणे ते अंडी वगैरे घालायला जात नाहीत. एका विशिष्ठ ठिकाणी ते प्रदक्षिणा घातल्यासारखे करतात आणि तेवढाच प्रवास करत समुद्रात येतात. एरवी आक्रमक असणारे ते या प्रवासात यात्रेकरुंप्रमाणे ( सर अटेंबरोंची उपमा ) शांत राहतात. का असे करतात.. आपल्याला माहीत नाही !

जागू हे तर थ्रील आहे गं.

बरे एक सांगा, अशा प्रकारे टॉर्च ने लाईट पाडुन फोटो काढला तर त्या सापाला डिस्टर्ब नसेल का झाले? तो पण वेळ साधुनच भक्ष्य गीळायला आलेला ना. प्राण्यांचेही स्थळ / वेळ त्यांचे गणित असते ना.

बाकी खरच फोटो पाहुन साळुंखी एकदम बिच्चारी वाटली.

प्रगल्भ विचार असूनही जो कमलपत्रासारखा सगळ्यापासून कोरडा राहतो तो संत. वा अश्विनी.

मला तर स्वतःची कधी कधी लाज वाटते. शशांकजी इथे लिहितात ते अध्यात्मिक साहित्य वाचते, गीता वाचते, ज्ञानेश्वरी वाचते पण आचरण शून्य.

मोनाली आजीबात नाही ग डिस्टर्ब झाला तो. उलट तो व्हावा आणि साळुंखी त्याने सोडावी असे आम्हाला वाटत होते.

नंतर त्याला मार्ग मिळावा म्हणून आम्ही लाईट मारत होतो पण त्याला वाट सापडत नव्हती.

मस्त चर्चा चालू आहे सगळ्यांची. वाचतोय.

नंतर त्याला मार्ग मिळावा म्हणून आम्ही लाईट मारत होतो पण त्याला वाट सापडत नव्हती.>>>>>:फिदी:

जागू, फोटो एडिट करूनही पाहिजे तसा रीझल्ट नाही मिळणार आणि हो पुढच्या भागाच्या कोलाज आणि लिखाणासाठी माझा रूमाल आत्तापासुन. Wink

जागू, फोटो एडिट करूनही पाहिजे तसा रीझल्ट नाही मिळणार आणि हो पुढच्या भागाच्या कोलाज आणि लिखाणासाठी माझा रूमाल आत्तापासुन. डोळा मारा>>>>>>>>>>>>>>>व्वा! अभी आया ना लाईन पे! Proud

जागु.. थरारक फोटोज..

निसर्गाचा कायदाच पाळताहेत सर्व पशुपक्षी...

अर्रे व्वा.. जिप्स्याचा रुमाल पडला.. वावा!!! क्लॅपिंग बाहुली..!!!! Happy

घराच्या मागच्या पुढच्या भागात असलेली दोन मोठ्ठी जांभळा ची झाडं मुक्त हस्ते जांभळांचा वर्षाव करताहेत..

पण दुर्दैवाने सगळी जमीनीवर पडतात ..केंव्हातरी ..

आम्हाला आपली सगळी जमीन जांभळी झालेली दिसते सकाळी.. Uhoh

वर्षू, झाडाच्या भोवती अधांतरी जूनी साडी वगैरे बांधून ठेव. सगळी जांभळे त्यातच पडतील.. साडीवर पण छान डीझाईन तयार होईल !

संत एकनाथ महाराज आणि विंचू..>>>>>>>>>>>’विचू चावला, विंचू चावला” हे ना ?मस्त आहे.
वर्षू, झाडाच्या भोवती अधांतरी जूनी साडी वगैरे बांधून ठेव. सगळी जांभळे त्यातच पडतील.. >>>>>>..हेच सांगणार होते. Happy

जिप्स्या
लवकरच तयार करुन मला मेल कर.>>>>>>>>>>>जागू, त्याच्याकडे तयार असेलच . आजच मेल येइल बघ तुला. Proud

अश्विनी Happy
या जांभळांना पार्ल्यात खासच भाव मिळतो. स्टेशनसमोरच्या गल्लीत तर आकारानुसार ग्रेड केलेल्या दिसतात.
एखादी गोष्ट गुज्जु लोकांनी मनावर घेतली कि त्याला बाजारभाव चांगला मिळतोच !

नाही शोभा.. नदीवर विंचवाला वाचवण्याची कथा आहे ती. विंचू प्रत्येकवेळी दंश करतो आणि तरीही त्याला ते वाचवतात कारण दोघेही आपापला धर्म पाळत असतात... !

वर्षू ताई खरे अगदी. माझ्या पण अंगणा समोर जांभूळ आहे गेटवरच अगदी. सगळी
जांभळे फुटून पडलेली असतात खाली. अगदी सडाच. पण काही उपयोग होत नाही त्यांचा. पाला-पाचोळ्यावर पडली तर ठिक असतात पण जमिनीवर फुटून जातात.

मागे मानुषीने टाकलेली फांद्यांसकट फुले हिच होती ना? काशिमिरमध्ये गुलमर्गला दिसली. फुले नव्हती पण कळ्या होत्या.

नाही शोभा.. नदीवर विंचवाला वाचवण्याची कथा आहे ती. विंचू प्रत्येकवेळी दंश करतो आणि तरीही त्याला ते वाचवतात कारण दोघेही आपापला धर्म पाळत असतात... !>>>>>>>>>>हो हो. तेही ऐकलेय लहानपणी. मला विंचू म्हटला की ते भारूडच आठवते. Happy

आपल्याला पक्षी प्राण्यांचे सर्व भावविश्व कळले असल्याची शक्यता कमीच आहे.>>> व्वा खुप गहन विचार करता दिनेश दा...

प्रगल्भ विचार असूनही जो कमलपत्रासारखा सगळ्यापासून कोरडा राहतो तो संत. .... खुपच आवडले..

मला तर स्वतःची कधी कधी लाज वाटते. शशांकजी इथे लिहितात ते अध्यात्मिक साहित्य वाचते, गीता वाचते, ज्ञानेश्वरी वाचते पण आचरण शून्य.... अपना भी हाल कुछ ऐसा ही है... त्यामुळे श्रवण कीजे... हळुहळु आचरणात थोडं फारतर येईल...

आम्ही पण लाहान पणी नाशिक ला मावशी कडे रहायला जात असु... तेव्हा चैघं जण झाडाखाली चादर/साडी धरुन उभं राहायचो आणि भाउ टिणावर चढुन झाड हालवुन जांभळं पाडायचा... नंतर त्याची वाटाघाटी व्हायची... त्याचा हिस्सा जास्त असायचा, कारण त्यानी जास्त मेहनत केलेली असायची... हा हा हा.... कित्ती कित्ती मज्जा यायची...

Pages