निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज झरबेरा कडून.
अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मोनालिप , कधी कधी आपली पोरंच
मोनालिप , कधी कधी आपली पोरंच आपल्याला धीर देत असतात बघ!! शाबासकी तुझ्या लेकाला..
यंग सफरचंद......वॉव पहिल्यांदाच पाहिलं.. हे च पुढे होऊन सफरचंद बनणारे असं वाटत सुद्धा नाही..
सगळ्यांची उत्तरं चुकलेली पाहून बरं वाटलं.. काँप्लेक्स थोडा कमी झाला
त्यातल्यात्यात जिप्स्या ने कंसात टाकले ल्या उत्तराने त्याचा बचाव झालाय..
अय्या सफरचंद! पहिला फोटो कीती
अय्या सफरचंद! पहिला फोटो कीती वेगळा दिसतोय...
शशांक, खुप छान माहिती आणि
शशांक, खुप छान माहिती आणि तीही सहज समजेल अशा भाषेत.
मनापासुन धन्यवाद.
इंग्लीश मधे अॅपल किती
इंग्लीश मधे अॅपल किती वेगवेगळ्या फळांना म्हणतात बघा.
कस्टर्ड अॅपल ( सिताफळ किंवा तत्सम ), स्टार अॅपल ( सुवर्णपत्राची फळे ) क्रॅब अॅपल ( आंबटसर फळ असते )
पाईन अॅपल ( अननस ) वूड अॅपल ( कवठ - फळ ) रोझ अॅपल ( गुलाबी जाम ) आणखीही असणार .
मोनालि... काळजी घे
मोनालि... काळजी घे लेकाची..
शेंबडी चार सांभाळावीत पण एक उद्योगी सांभाळायचा म्हणजे एकदम कसरत.... मी घेतला आहे हा अनुभव.
या निमित्ताने ईथे फारच चांगली माहीती मिळाली. कॉलेजमधे प्राणी हाताळावे लागतात, कॉलेज आवारातील सगळे कुत्रे आपलेच वाटतात, कॉलनीतले आणि रस्त्यावरचे देखील हवेहवेसे वाटतात... अशा बर्याच कारणाने मल्हारने ५-६ महीन्यापूर्वी रॅबीजचे लसीकरण केले आहे. पुन्हा ६-७ महीन्यांनी करावे का? कदाचीत त्याला माहितही असेल.
दिनेशदा तुम्ही आक्रोड उत्तर
दिनेशदा तुम्ही आक्रोड उत्तर दिल होत
जिप्स्याने त्याच्यावरूनच तर कंसात अॅप्पल लिहिल. मी तेंव्हाच कॉपी पेस्ट करायला पाहीजे होत. 
सगळ्यांची उत्तरं चुकलेली
सगळ्यांची उत्तरं चुकलेली पाहून बरं वाटलं.. काँप्लेक्स थोडा कमी झाला>>> मला पण
शेंबडी चार सांभाळावीत पण एक उद्योगी सांभाळायचा म्हणजे एकदम कसरत..>>> खरय. पण हल्ली उद्योगीच हवीत की मुले.
जिप्स्याने त्याच्यावरूनच तर
जिप्स्याने त्याच्यावरूनच तर कंसात अॅप्पल लिहिल. मी तेंव्हाच कॉपी पेस्ट करायला पाहीजे होत.>>>>>>>नाही, मी दिनेशदांचे उत्तर पाहिलेच नव्हते. अक्रोड याच्यासाठी लिहिलं होतं कि सेम असाच फोटो (अक्रोडचा) राणीखेतला मी काढलेला. तो पाहिला पण पानात फरक जाणवला म्हणुन कंसात सफरचंद लिहिले (एडिट करून).
रच्याकने, जागु आता कश्मिर ट्रिप करून आली तर तिच्या फोटोत सफरचंद, अक्रोड, apricots, केशर इ. इ. चेच फोटो असणार असाही एक विचार होताच.
जिप्स्या मला बहुतेक चष्मा
जिप्स्या मला बहुतेक चष्मा लागलाय म्हणजे.
जिप्स्या काय रे सगळी कोडी बॅन केलीस ना.
तरीपण हे सांगा काय आहे ते.

जागू, ब्लॅक वॉलनट अर्थात
जागू, ब्लॅक वॉलनट अर्थात हिंदचा काळा अक्रोड.
जागू, तू एखाद्या काश्मिरी
जागू, तू एखाद्या काश्मिरी मुलीचा फोटो टाकलास आणि तिचे नाव विचारलेस तरी जिप्स्या सांगेल.. !
(या वाक्यात जिप्स्याचे कौतूकच आहे. मस्करी वगैरे काही नाही... हे वर्षूने लक्षात घ्यावे. )
दिनेशदा फक्त वर्षूताईनेच
दिनेशदा
फक्त वर्षूताईनेच लक्षात घ्यायचेय ना? शोभा आणि मी नाही ना
काळा आक्रोड म्हणजे अक्रोड मध्ये पण प्रकार आहेत हे माहीत नव्हते.
बर उत्तर बरोबर आहे अक्रोडचा मोहोर की फुले आहेत ती.
जागू, हि फुलं मला जंगली
जागू, हि फुलं मला जंगली अख्रोटाची असं सांगितलं. पण खरंच ती तशी आहेत कां?

चश्मेशाही ला जातना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी यांची लागवड केलेली आहे.(तसं तर हि झाडं सगळीकडेच दिसत होती.हि याची पानं=एका बिंदूतून निघालेली पाच पानं. हेच झाड पहेलगाम इथे अगदि खुरट्लेल्या पानांचं दिसलं आणि रंगहि जरा तांबूससर असा होता. ते तिथल्या अतिथंड हवेमुळे असं तिथला स्थानिक माणूस म्हणाला-

अग फुलल्यावर तशी होत असतील तो
अग फुलल्यावर तशी होत असतील तो मोहोर म्हणजे कळ्या असतील कदाचीत. किंवा वेगळेही असू शकेल. पण मी टाकलेले अक्रोडच आहे कारण त्याच झाडाला फळे पण लागली होती.
ही पाने

ही फळे

अक्रोडचा मोहोर की फुले आहेत
अक्रोडचा मोहोर की फुले आहेत ती?> >>> हा अक्रोडचा मोहोर आहे. इथे जो काळा दिसतो तो इंग्लिश वॉलनटमधे हिरवा आणि जरासा काळा असतो.
अक्रोड मध्ये पण प्रकार आहेत हे माहीत नव्हते.>> अक्रोडचे मुख्य तीन प्रकार. इंग्लिश वॉलनट, ब्लॅक वॉलनट आणि बटरनट. आपण खातो ते नेहमीचे अक्रोड फोडायला सोपे असतात आणि चवीला चांगले असतात. काळे अक्रोड हे फोडायला जरा कठीण असतात कारण त्याचे कवच जाड असते. परंतू नेहमीच्या अक्रोडच्या तुलनेत ह्यात पोषणमुल्ये अधिक असतात.
ओले अक्रोड खायला मस्त लागतात. व्हिएन्नात असताना एका मैत्रिणीच्या बागेत अक्रोडचे झाड होते. तिच्या मित्राला ह्याची अॅलर्जी असल्याने ती सगळे अक्रोड वाटून टाकायची. त्यामुळे तीन वर्ष भरपूर ओले अक्रोड खायला मिळाले. ह्याच्या हिरव्या आवरणाचे मात्र हाताला, कपड्यांना डाग पडतात.
नलिनी मस्त माहिती.
नलिनी मस्त माहिती.
नलिनी छान माहिती.
नलिनी छान माहिती.
ओ वॉव.. अक्रोड बद्दल छान
ओ वॉव.. अक्रोड बद्दल छान माहिती सांगितलीस, नलिनी..
दिनेश

पिवळा वेल गुलाब
पिवळा वेल गुलाब

पिवळा वेली गुलाब.. मस्तच.
पिवळा वेली गुलाब.. मस्तच. बघितल्याचे आठवत नाही.
पिवळा वेली गुलाब..पहिल्यांदच
पिवळा वेली गुलाब..पहिल्यांदच पाहिला.. मस्तये
इंग्लीश मधे अॅपल किती
इंग्लीश मधे अॅपल किती वेगवेगळ्या फळांना म्हणतात बघा.>> बहुदा त्यांची शब्द संपदा कमी पडत असावी.

आपल्याकडे पहा एकालाच किती नाव असतात टोम्याटो,ट्माटा,ट्माटु,तांबाटा...
बाकी सर्वांचे प्रचि सुंदर.
ईनमीन तीन वर चाललेली
ईनमीन तीन
वर चाललेली प्रश्नोत्तरान्ची जुगलबन्दी वाचताना मजा येतेय.
मी कधी काश्मिरला जाणार ???? (
मी कधी काश्मिरला जाणार ???? ( मला कुणी नेत्तच नै )
हो जिप्स्या, मुद्दाम वर्षूलाच सांगितले कारण तिच मला सांगत असते तुझी मस्करी करायला. नाहीतर मी काय त्यातला नै कै !
अक्रोड्ची माहीती आणि पिवळा
अक्रोड्ची माहीती आणि पिवळा वेल गुलाब दोन्ही मस्त. हा जो जंगली आक्रोटाच्या मोहोराचा म्हणुन फोटो टाकलाय ना त्याच फुलांचा फोटो खाली देत आहे. मला ते चेस्ट नटच्या मोहोरासारखे वाटले होते म्हणून मी पण त्याची खूप चौकशी केली पण मला ते काहीतरी जंगली आहे असेच सांगितले गेले. फुलं दिसत होती मात्र खूप आकर्षक.
नितीन, आपण तसा घोळ चाफ्याच्या
नितीन, आपण तसा घोळ चाफ्याच्या बाबतीत घातलाय.. खुरचाफा, कवठीचाफा, नागचाफा, भुईचाफा, हिरवा चाफा.... यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.
पिवळा वेल गुलाब मस्तच. मी असा
पिवळा वेल गुलाब मस्तच. मी असा पांढरा गुलाब पाहिला होता.पण पिगु एकदम गच्च भरलेला आहे.
मनीमोहोर.. फुलोरा कसलाही असो
मनीमोहोर.. फुलोरा कसलाही असो दिसतोय मस्त.. भारंगीचा फुलोरा पण असाच दिसतो ( त्याच्या फुलांची भाजी करतात. )
दिनेश, नारदाचा रोल बदललेला
दिनेश, नारदाचा रोल बदललेला दिस्तोय..

जिप्स्या.. तुम समझदार हो इसलिये इशारा काफी है
शशांकजी नखे मारल्यावरही
शशांकजी नखे मारल्यावरही इंजेक्शन घ्यायची गरज असते का? म्हणजे ह्यापुढे काळजी घ्यायला.>>> शशांक ह्यांनी वरती उत्तर दिलेच आहे. मला एक प्रश्न आहे की घरातल्या सगळ्यांनी (ज्यांच्य घरी पाळीव कुत्रा) व्हॅक्सीन घेण्यापेक्शा कुत्र्यालाच दरवर्षी व्हॅक्सीन दिले तर. आणी त्याचे नख लागल्यास व्हॅक्सीनची गरज आहे का?
Pages