निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज झरबेरा कडून.
अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

हाहाहाहा... दिनेश च्या आधी
हाहाहाहा... दिनेश च्या आधी तुम्ही सर्व शोभा ला पकडणार बहुतेक..
दिनेश... फणस इन सो मेनी पदार्थ?????
<<अधून मधून माझे लक्ष तिच्या
<<अधून मधून माझे लक्ष तिच्या हाताकडे होते.<<
अगं मला तर वाटलं 'उमो' काढते की काय हातातनं.
आता मात्र मला शोभाची बाजू
आता मात्र मला शोभाची बाजू घ्यावीच लागेल.. मला तिने स्वहस्ते विणलेली फुले दिली होती.. अजून माझ्याकडे आहेत.
दिनेशदा, तुमाखमि. (ही आर्या
दिनेशदा, तुमाखमि.
(ही आर्या नुसती नावालाच मैत्रीण आहे. :दिवा:)
फणसाची भाजी , लोणचे,
फणसाची भाजी , लोणचे, गर्यांची भाजी इतकेच येते... बाकी रेसिपी द्या ना दिनेश दा...
. दिनेश च्या आधी तुम्ही सर्व
. दिनेश च्या आधी तुम्ही सर्व शोभा ला पकडणार बहुतेक..>>>>>..की फ़ाडणार?
(मला फ़णसाच्या जागी मीच दिसतेय. ;)) 
विषयांतराबद्दल
विषयांतराबद्दल क्षमस्व.
गेल्या रविवारी भोरला गेलो होतो. भोरच्या राजवाड्याचे हे प्रचि.
विविध मालिका, हिंदी/मराठी चित्रपटांमध्ये हा राजवाडा पाहिलाच असेल. गेल्या वेळेस गेलो होतो तेंव्हा R Rajkumar चित्रपटाची शूटिंग चालू होती.
अरेच्चा ... खरच की! बहुतेक
अरेच्चा ... खरच की! बहुतेक चित्रपटात असतो हा वाडा.
जिप्स्या, मस्त फ़ोटो. सगळ काय
जिप्स्या, मस्त फ़ोटो.

सगळ काय फ़ोटोतच बघायच आम्ही?
हो आर्या, "बालगंधर्व"
हो आर्या, "बालगंधर्व" चित्रपटाची शूटिंगही इथेच झाली होती.
सगळ काय फ़ोटोतच बघायच आम्ही? >>>>>>पुण्याहुन तासाभराच्या अंतरावरच आहे कि भोर. जाऊन ये. पावसाळी भटकंतीसाठी भोर अतिशय सुंदर ठिकाण आहे.
१. भोर - महाड रस्त्यावरचा वरंधा घाट
२. भोरचा राजवाडा
३. निरा भाटघर धरण
४. भोर गावाच्या आधी निरा नदीचे वळण (नेकलेस पॉईंट)
५. रोहिडा किल्ला, रायरेश्वर पठार इ. इ.
'बालगंधर्व' पाहिला नाही
'बालगंधर्व' पाहिला नाही जिप्स्या! पण मला वाटतं बर्याचशा ऐतिहासिक मराठी मालिकांचही शुटींग तिथे होत असावं.
व्वा काय सुरेख वाडा आहे! मागे
व्वा काय सुरेख वाडा आहे! मागे इंदुर ला होळकर वाडा पाहिला होता... त्याची आठवण झाली...खुपच सुंदर वाडा होता तो... त्यांचे देव पण बघायला मिळाले होते, डोळ्याचे पारणे फिटावे इतके लख्खं शुभ्र चांदिचे....
अरे व्वा.. बरच काही आहे भोर ला पाहाण्यासारखे! हे पुण्याजवळच आहे ना?
'बालगंधर्व' पाहिला नाही
'बालगंधर्व' पाहिला नाही दिनेशदा!>>>>>आर्या, सुप्रभात!! मी "जिप्सी")
मला वाटतं बर्याचशा ऐतिहासिक मराठी मालिकांचही शुटींग तिथे होत असावं. >>>>>हो राजा शिवछत्रपती मालिकेचेही शूटिंग इथे झाले होते.
'बालगंधर्व' पाहिला नाही
'बालगंधर्व' पाहिला नाही दिनेशदा!>>>>>आर्या, सुप्रभात!! मी "जिप्सी") >>>>>>>मी पण परत वर जाउन पोस्टचे लेखक पाहिले.
<<आर्या, सुप्रभात!! मी
<<आर्या, सुप्रभात!! मी "जिप्सी")<< सॉरी...
छान राखलाय हा वाडा. पुर्वी
छान राखलाय हा वाडा.
पुर्वी प्रत्येक मोठ्या गावी असे वाडे असायचे.. मग त्याचे एकेक भाग गावकर्यांनी पळवले.
<<आर्या, सुप्रभात!! मी
<<आर्या, सुप्रभात!! मी "जिप्सी")<< सॉरी...>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>आर्ये, कालचं कॉकटेल अजून उतरलं नाही?
इथल्या गेल्या काही भागातल्या
इथल्या गेल्या काही भागातल्या पोस्ट्स पाहता त्या भागांचे शीर्षक 'निसर्गाच्या रोमँटिक गप्पा' असे करावे असा ठराव मांडत आहे. याच ठरावाचा उपठराव म्हणून भविष्यातील भागांना 'निसर्गाच्या लेकुरवाळ्या गप्पा' असे शीर्षक गरज पडेल तेव्हा द्यावे असाही ठराव मांडत आहे.
मामी :D
मामी

आर्ये.. कित्नी बार बोला.. डे
आर्ये.. कित्नी बार बोला.. डे टैम मे नै लेनेका
मामी... धन्य हैस गा ..
जिप्स्या सुंदरच आहे वाडा.. बिचारा शूटिंग लाच सारखा वापरला गेल्याने ऐतिहासिक वगैरे दिसायचं सोडून चक्क फिल्लमी दिस्तोय
वाडा मस्त आहे. मला आधी तो
वाडा मस्त आहे. मला आधी तो सेटच वाटला. पण किती देखणी वास्तु आहे. शुटिंगच्या निमित्ताने निदान हे सौंदर्य सगळ्यांना बघायला मिळत आहे हे छानच.
मामी बिचारा शूटिंग लाच सारखा
मामी
बिचारा शूटिंग लाच सारखा वापरला गेल्याने ऐतिहासिक वगैरे दिसायचं सोडून चक्क फिल्लमी दिस्तोय>>>>वर्षूदी, हा वाडा लग्नसराईसाठीही देतात. तो तिसरा फोटो लग्नाच्या सजावटीचाच आहे.
पण किती देखणी वास्तु आहे>>>>>अगदी अगदी. प्रत्यक्षात अजुन सुरेख दिसतो.
माझी कावळ्याची बाळे..
माझी कावळ्याची बाळे..


कावळे निळी अंडी देतात? की
कावळे निळी अंडी देतात?
की मलाच ती निळी दिसतायेत?
होय. मीही पाहुन दचकलो होतो.
होय. मीही पाहुन दचकलो होतो. मला वाटले कोकिळेनं नियोग केला कि काय. पण कावळेच उपजले.
५ अन्दे ३ बाले झाली
५ अन्दे ३ बाले झाली
बरं आता एक निर्बुद्ध प्रश्न
बरं आता एक निर्बुद्ध प्रश्न (पण तरीही विचारतेच कारण मला खरच हे माहीत नाहीये)
एवढी छोटी पिल्लं काव काव असा आवाज करतात का? ओरडतात का? नस्तील तर कावळ्याचीच आहेत हे कसं कळालं? असतील तर सेम कावळ्यासारखी कर्कश ओरडतात का?
कावळ्याची पिल्लं आणि कोकीळेची पिल्लं सेम दिसत असतील ना? म्हणूनच कावळी कन्फ्युज होऊन त्यांना सांभाळते ना?
आणि कोकीळेची अंडी आणि कावळ्याची अंडी सेम दिसतात का?
रच्याकने सध्या मी इथली माहीती वाचुन घरी, ऑफिसमध्ये सांगते आणि भाव खाऊन घेते मला कित्ती माहीत आहे याचा
तिअरा फोटो आहे त्यात बाले
तिअरा फोटो आहे त्यात बाले मोथे झाली आहे. कावल्यागत दिसतात. अजुन ओरदत नाहीत
OKZ Thanks! पण पिल्लू कोकिळ
OKZ Thanks!
पण पिल्लू कोकिळ आणि कावळे सेम दिसतात का हा प्रश्न राहिलाच तरीही
गोपिका, खरं आहे. चिनार
गोपिका, खरं आहे. चिनार म्हण्जेच मॅपलचं झाड. नोव्हेंबरमधे ह्याच्या पानांचा रंग पिवळा/ लाल होतो. आणि त्या सीझनमधे काश्मिर आण्खिनच देखणं असतं.
मराठीतलं गाणं- हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरि,
दिससी तू नवतरूणी काश्मिरी >>>>>>
ओके.....पान रंग बदलतात त्यालच इकडे फॉल सीझन असे म्हणतात.आगदि रमणीय असत ते...
बाकि आता मात्र मला एक प्रश्नच पडला कि चिंचेचि पाने आणि चिनार चि पाने कुठल्या कुठे साम्य नाहि.झाडांचा अकारात हि नाहि.मग चिंचेचे झाड त्या कवि कसेकाय चिनार वृक्षा सारखे दिसले????
Pages