निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश सुंदर आहेत फुलं या लिंक वर..

जायफळाचं झाड.......... वॉव.. शोभी..मस्तच गं.. तू कुठे पाहिलंस??

आणी जागुमातेला कोटिकोटि पर्णाम..!!!! Happy

शोभा, ओल्या जायफळाचे, कदंबाच्या फळाचे लोणचे खाल्ले आहेस का ? मस्त स्वाद असतो त्यांना.>>>>>>..दिनेशदा, आधी कळलं असतं तर ओली जायफ़ळं घेऊन आले असते. आता रेसिपी द्या. आज फ़ोन करणार आहे तेव्हा वहिनीला लोणच कस करतात ते माहित आहे का विचारेन. नाहीतर रेसिपी सांगेन. Happy

जायफळाचं झाड.......... वॉव.. शोभी..मस्तच गं.. तू कुठे पाहिलंस??>>>>>>> मालवणला माझ्या काकांच घर आहे. त्यांच्या आगरात हे पाहिलं. Happy

शोभा, कैरीचे करतो तसेच. फक्त त्यात आंबटपणासाठी कैरी पण घालायची>>>>>>>>>>धन्यवाद दिनेशदा. संध्याकाळी फ़ोन करणार आहे तेव्हा सांगते. Happy
दिनेशदा, तुम्ही हळदीचे केलेल कौतुक आणि हळदीचा परदेश प्रवास काकूंना सांगितला. Happy

शोभा, तूझी फुले, शांकली, अवल चे विणकामाचे नमुने आणि यापेक्षा मोलाच्या म्हणजे तूम्हा सर्वांच्या आठवणी..
नेहमीच माझ्यासोबत असतात.

दिनेशदा, धन्यवाद! Happy
असं नातं निर्माण झालयं ना सगळ्यांच. कुठेही कोणी असला/असली तरी निग. आणि निगकरांची आठवण येतेच. Happy

हे झाड कसले आहे? फ़ळे करांद्यासारखी आणि कडूजार होती. तिथे असलेल्या लोकांना विचारल तर त्यांना नाव माहित नव्हत फ़क्त औषधी आहे म्हणाले. पण कडू आहे म्हणजे मधुमेहवर असेल हा अस्मादिकांनी अंदाज केला.

डेरेदार बहरलं झाड, लागला पाड
पानाच्या आड खुणावतो आंबा
खुणावतो आंबा..
नका तोडू पावणं जरा थांबा Proud
(चित्रपट: पिंजरा)

कलमी आंब्याला मोहर फुटता,
गुलाबी सुटली हवा..
अन राघूचा, टपून बसलाय थवा !

--------------

आंब्यांचा रंग शेंदरी, वर लाली शोभल केशरी
तोंडाला तूझ्या पाणी सुटल, घेऊन टाक लगी
माझी काळजी मिटल.
घुटमळू नको तू बाबा.. पाडाला...

जिप्स्या, हे वाचलंस का ?>>>>दिनेशद, वाचतो घरी जाऊन. इथे लिंक ओपन होत नाही. Sad

पुढच्या लावण्या लिहित नाही नाहितर इथे "लॉजिकल अंताक्षरी" सुरू होईल. Proud

अरे, कासच्या रस्त्यावर एक देवराई आहे म्हणे. घाटाई असे नाव आहे. उन्हाळ्यातही जाता येईल अशी जागा आहे ती. बघ जमव एकदा.

गवत उंच दाट दाट, मळलेली पायवाट
वळणावर आंब्याचे, झाड एक वाकडे,
माझिया प्रियेचे झोपडे... त्या तिथे पलिकडे..

======

सहज सख्या एकटाच येई सांजवेळी
पाहीन मी वाट तूझी, त्या आम्रतरु खाली..

मला डिवचू नका रे Happy

Pages