निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेन ट्री - Albizia saman (फोटो आंतरजालावरुन साभार... )

Rain Tree.jpg

या दिवसात कोकणातल्या घाटात पोपटी उक्षी आणि पांढरा कुडा पण असाच बहरलेला असतो. रस्त्याच्या कडेने धायटीची गोड ( हो चवीला गोड ) लाल फुले असतात. काजूला पण मोहोर आलेला असतो.

Sorry Sorry, rain tree I know.

पेल्टोफोरम and करंज - I don't know...

yanche photos havet Happy

या दिवसात कोकणातल्या घाटात पोपटी उक्षी आणि पांढरा कुडा पण असाच बहरलेला असतो. रस्त्याच्या कडेने धायटीची गोड ( हो चवीला गोड ) लाल फुले असतात. काजूला पण मोहोर आलेला असतो.>>>>...दिनेशदा, काजूचा मोहोर जळलाय. Sad

मी_आर्या , सिटी प्राईड - कोथ्रूड कडून पश्चिमानगरी कडे जायचे. तिथे गोळविलकर लॅबच्या जवळच आहे . काय सुरेख रंग दिसतो!

आर्या, अंगणात लावायला वांगीवृक्ष ( जायंट पोटॅटो ट्री ) चांगला आहे. सावली पण असते आणि फार मोठा होत नाही. एकाचवेळी त्याच्यावर निळी, आकाशी आणि पांढरी फुले असतात.

माझ्या पाहण्यात केवळ कोल्हापूरला आहे तो. पुण्यातही असेल.

या लिंकवर छान फोटो आहेत.
https://www.google.com/search?q=potato+tree&biw=1920&bih=979&tbm=isch&im...

हे बटाटा ट्री क्या है? मर्‍हाठीत काय म्हणतात?
फणसाप्रमाणे अंगाखांद्यावर बटाटे घेऊन उभय ते झाड गुगल इमेजच्या पानावर.

अहा... कसली सुंदर फुलं दिसतायत दिनेशदा त्या झाडाची. धन्स! Happy
पुण्यात कुठे मिळेल ते पहावं लागेल.

पुण्याच्या हवेत ते झाड वाढायला हवे.
मोनालि, त्याला बटाटे नाही लागत पण फुले तशी दिसतात म्हणून ते नाव. मराठीत वांगीवृक्ष.
हवामानाप्रमाणे फुले लहानमोठी असतात. केनयात ती २ इंच व्यासाची असतात. खुप देखणे झाड.

शोभा आशिर्वाद तुला.

बाजूची सुपारीची झाडे आणि झाडावरची पाने ह्यावरून अंदाज लावला. तसे मी जायफळ असे कधी झाडावर पाहीले नाही.

वरचे फोटो मस्तच आणि शशांकजी आणि दिनेशदा मस्त लिंक.

मी गावाहून वांग्याचे बी आणले होते आम्ही नालासोपारा येथे राहायचो तेव्हा, कुंडीत लावले होते, तेव्हा ४-५ वांगी मिळाली होती, पण लहान लहान होती, जास्त मोठी झाली नाहीत. काकडीचे बी पण आणले होते पण ते नाही झालं.

बाजूची सुपारीची झाडे आणि झाडावरची पाने ह्यावरून अंदाज लावला. तसे मी जायफळ असे कधी झाडावर पाहीले नाही.>>>>>>मग तर शतनमन! Happy

बाजूची सुपारीची झाडे आणि झाडावरची पाने ह्यावरून अंदाज लावला.>>>>>>>>>हे कसे काय? Uhoh

अग ही जायफळाची झाड ही अलिबागमध्ये नारळ-सुपार्‍यांच्या वाडीत लावलेली असतात हे ऐकलेय व लांबून पाहीलेय. खास करुन रेवदंडा भागात.

अच्छा! मी पण प्रथमच पाहिलं. पण असं काही दिसल की डोळ्यासमोर ’निग’येतात, आणि आपोआप कॆमेरा हातात येतो. Proud

जागू, रेवदंडा किंवा चौल येथे कोणीतरी राईलकर (बहुतेक हेच आडनाव आहे), त्यांची बाग एकदा टीव्हीवर दाखवली होती, खूप औषधी झाडे लावली आहेत त्यांनी.

सुसंध्याकाळ....

आमच्या ऑफीस जवळचा नजारा......
आज तुरळक का होईना पावसाने हजेरी लावली बघा!Photo-0236.jpg

ऑफीस जवळ चर्च + वसतीगृह आहे... खुप हिरवळ आणि सुंदर परिसर आहे....

दिनेश दा... मस्त लिंक्स...

जायफळाचे झाड खुप छान... मी देखिल पहिल्यांदाच बघते आहे.....

शोभा, ओल्या जायफळाचे, कदंबाच्या फळाचे लोणचे खाल्ले आहेस का ? मस्त स्वाद असतो त्यांना.

केमोथेरपी या नावावरून ती तीव्र रसायने असावीत असा माझा समज होता. त्यातही काही औषधे वनस्पतिजन्यच असतात ते या लेखातून कळले.

http://www.loksatta.com/navneet-news/curiosity-chemotherapy-491176/

केमोथेरपी ही कॅन्सरवरील पद्धतशीर उपाययोजना आहे. यात वापरण्यात येणारी औषधे शरीरातल्या बऱ्याचशा भागांपर्यंत सहज पोहोचू शकतात. त्यामुळेच शरीरात वेगवेगळ्या भागांत कॅन्सर पसरला असेल किंवा एकापेक्षा जास्त ठिकाणी कॅन्सरच्या गाठी आढळत असतील किंवा ज्या शस्त्रक्रियेने काढता येत नसतील, तर अशा वेळी केमोथेरपीचा अवलंब करण्यास सांगण्यात येते. या उपचारात काही औषधे पोटात (तोंडावाटे) घ्यायची असतात, तर काही स्नायूंमध्ये, त्वचेखाली किंवा शिरेत इंजेक्शनच्या रूपात दिली जातात. पद्धत कोणतीही असो, ही औषधे रक्तात शोषली जातात आणि शरीरभर वाहून नेली जातात.
औषधात आढळणाऱ्या रासायनिक रचनेप्रमाणे व ती कोणत्या प्रकारे कॅन्सरच्या पेशीवर परिणामकारक आहेत, त्यानुसार या औषधांचे वर्गीकरण प्रामुख्याने चार प्रकारांत होते.
पहिला प्रकार आहे, अल्किलेटिंग एजंट्स. या औषधातील अल्काईल हा रासायनिक गट प्रथिने किंवा पेशीतील गुणसूत्रांमध्ये आढळणाऱ्या आम्लाबरोबर बंध निर्माण करतो, ज्यामुळे पेशींचे विभाजन होऊ शकत नाही, त्यामुळे पुढील वाढ थांबते. पेशी तिच्या जीवनचक्राच्या कोणत्याही अवस्थेत असली तरी ही औषधे प्रभावशाली ठरतात. धिम्या गतीने वाढणाऱ्या कॅन्सरच्या उपचाराकरिता ही औषधे वापरली जातात. उदा. क्लोरामबुसिल, सायक्लोफॉस्फमाइड, थायोटेपा इत्यादी.
अ‍ॅन्टिटिमेटाबोलाइट्स या वर्गातील औषधे कॅन्सर पेशींच्या वाढीला आवश्यक असलेल्या घटकांची उदा. पोषकतत्त्व, विकरे, संप्रेरकांची नक्कल करतात. त्यामुळे या कॅन्सरपेशी त्यांचा सहज स्वीकार करतात. आवश्यक क्रिया न झाल्यामुळे उपासमार होऊन कॅन्सरपेशी मरतात. ही औषधे पेशींच्या जीवनचक्राच्या विशिष्ट अवस्थेतच प्रभावी ठरतात. उदा. प्युरीन अ‍ॅन्टागोनिस्ट, पिरिमिडीन अ‍ॅन्टागोनिस्ट इ.
अ‍ॅन्टिमायक्रोटय़ुबुल एजंट्स या प्रकारातील औषधे वनस्पतीजन्य अल्कलॉइडस असतात. यात मुख्यत्वे क्षारयुक्त नायट्रोजन असतो. तसेच यात सौम्य आम्ल गुण असतात. ही विशेषत्वाने कॅन्सरच्या पेशींचे विभाजन थांबवतात. पेशींचे जीवनचक्र मध्येच थांबल्यामुळे त्या नाश पावतात. उदा. अ‍ॅक्टिनोमायसीन डी, डोक्सोरुबिसिन, मायटोनायसिन इ.
अ‍ॅन्टिटय़ूमर अ‍ॅन्टिबायॉटिक वर्गातील औषधे पेशीच्या जीवनचक्राच्या विशिष्ट अवस्थेशी निगडित नसतात. पेशीला जिवंत राहण्याकरिता लागणाऱ्या प्रथिनांच्या निर्मितीत अडथळा निर्माण करतात, त्यामुळे पेशींचे पुनरुत्पादन थांबते. उदा. मायटोझ्ॉनट्रोन, ब्लिओमायसिन इ.

डॉ. नंदा सं. हरम, (पुणे) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२

Pages