निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

mI, ananas laaval aahe.pan hyaa padhatine nahi..baghuya yeta ka..pudhacya veli hya padhatine lavun bahgen

जिप्स्या...जळवतोस रे सांदणदरीचे फोटो टाकुन! एकटाच जाऊन आलास तिथे??? Sad
सांगितलं पण नाही आधी! मी कधीपासुन जायचं म्हणतेय. मागच्या महिन्यात यात्री जाउन आला, तेव्हा पण हुकलं माझं. Sad

सुदुपार सर्वांना!
किती पानं वाचायची राहिली होती! जागू तुझा लेख वाचला लोकसत्तेत. एकदम आवडला.
हा माझ्याकडून फोटो. फुलाचं नाव माहित नाही. न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्क झू मध्ये काढला होता.

जिप्स्या तुझ्या कॅमेर्‍यात पाहीलेली अंजनी आणि पिवळी सावर प्रत्यक्षात कधी बघायचा योग येईल माहीत नाही.

लेखावरच्या प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.

कैलाशपतीच्या कळ्या. शिवाजी पार्कला आहे हे झाड.

वर्षा,फोटो छान आहे.मे फ्लॉवर सारखी दिसतायत का फुले?रंग मात्र वेगळा आहे.

जागू.लेख वाचला.मस्त आहे.पण मीही याआधी तो कुठे तरी वाचला होता.

सीताफळाच्या धाग्यांची साडी?व्वा!नवीनच.

मानिमोहोर मस्त फोटो.

वर्षु नील,बरी झालीस कि नाही अजून?

थांकु सरिवा.. जस्ट थोडा वीकनेस... बाकी ठीकाय..

मस्त आलेत फोटो वर्षा, जागु..
जुहू ला एरोप्लेन च्या गार्डन मधे ही पाहिलं हे कैलाशपतीचं झाड..

जिप्सी,सांदणदरीचे फोटो अप्रतिम.... आणि अंजनी तर अहाहा! डोळ्याचे पारणं फिटले बघा....
गोपिका, मुगाची रोपं कसली गोडं आहेत ग....
वर्षा ते फुटबोल लीली सारखे वाटते आहे... जाणकार खुलासा करतीलच..
सरिवा चा हिम वर्षाव मस्तच आहे.
वैशाली मस्त लिंक्स...

धन्यवाद Happy

सांगितलं पण नाही आधी! मी कधीपासुन जायचं म्हणतेय. मागच्या महिन्यात यात्री जाउन आला, तेव्हा पण हुकलं माझं.>>>>>आर्या, तुला यायचंय हे माहित नव्हत नाहीतर खरंच विचारलं असतं. Happy

आणि अंजनी तर अहाहा! डोळ्याचे पारणं फिटले बघा....>>>>अगदी अगदी Happy प्रत्यक्ष अजुन सुंदर दिसतात ती फुले, फळे आणि कळ्या. Happy

जॅकरांदा, कैलाशपती, अंजनी... ही झाडं पहायची ओढ लागलीये मला आता.
जिप्स्या...अंजनीचं झाड मोठं उंबराच्या झाडासारखं असतं का?

सरीवा अग मायबोली दिवाळी अंकात दिला होता मी.

काल रात्री पासून आमच्या घरात जन्मलेली बुलबुल बाळे उडण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या फरशी, फॅन, सोफा, पडदे कुठेही उडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे आई-बाबा त्या बाळांना पंख हलवून दाखवताहेत कसे उडायचे ते.

जिप्स्या...अंजनीचं झाड मोठं उंबराच्या झाडासारखं असतं का?>>>>>मी हिरानंदानी बाग, मुंबईत बघितलेली झाडे हि ५-७ फूटाची होती मात्र साम्रद गावी काहि झाड मोठी मोठी होती. Happy

बरे एक सांगा. कांचन म्हणजे आपट्यासारखी पाने असतात तोच ना. मग याचे उंच म्हणजे वडाएवढ्या उंचीचे झाड पण असते का? मी झुडुप पाहिलेय मागे म्हणुन विचारतेय. हसु नकाच बरे कोणी Uhoh

ओक्के... जिप्सी, मी हे यासाठी विचारतेय की अंगणात लावता येण्यासारखं झाड आहे का हे?
अगदी सोनचाफा सारखं मोठं असेल तर नाही लावता येणार. माझा सोनचाफा ४ महिन्यापुर्वी तोडला तेव्हा फार वाईट वाटले होते मला.

मोनालिप -
Bauhinia racemosa म्हणजेच आपटा आणि
Bauhinia variegata म्हणजेच कांचन - ही दोन्ही एकाच कुळातली आहेत - Caesalpiniaceae (Gulmohar family)
आपट्यापेक्षा कांचनाची पाने खूप मोठी असतात (पण पानांचा आकार सारखाच ) व कांचन बर्‍यापैकी उंच झाड आहे - ४० फूटापर्यंत...

जिप्स्या, मस्तच आहे ती दरी.. अगदी अलिकडेच नाव ऐकण्यात यायला लागले. लवकरच पिकनिक स्पॉट होणार तो.
व्हायला हरकत नाही, गाववल्यांना रोजगार मिळेल. पण स्वच्छता राखायला पाहिजे.

खरी अंजनी बघायची ती अंबोलीलाच , ( असे मी नाही साधना म्हणते. ) फोटो छानच. गोव्यात पण खुप आहे.

शशांक, धन्स. मागे हायपरसिटी ठाण्याला याचे लहान झुडुप पाहिलेले. म्हणुन कन्फ्युज झाले. पानांच्या आकारावरुन कांचन ओळखला पण झाडाची ऊंची पाहुन खात्री केली इथे.

तुमच्या पुण्यनगरीतच उत्सव जवळ, शिक्षक नगर मधे पाहिले काल ते झाड.

मेन गेटच्या बाजुलाच बहुदा पर्पल जॅकरंडा आहे. लांबुन पाहिला सो खात्री नाही.

Bauhinia acuminata हा Dwarf White orchid tree, Dwarf white bauhinia

तर Bauhinia variegata var. candida हा Buddhist Bauhinia, White orchid tree, White Mountain Ebony

आणि Bauhinia roxburghiana हा सेमला कांचन किंवा Roxburgh's Bauhinia

या सर्वांच्या फुलातील छोटे फरक गुगलून पाहिल्यास नीट कळतील .... Happy

लवकरच पिकनिक स्पॉट होणार तो.
व्हायला हरकत नाही, गाववल्यांना रोजगार मिळेल>>>>>नाही दिनेशदा, याचा पिकनिक स्पॉट व्हायला नकोय.
गिर्यारोहणाचा धंदा या लिंकवरील पहिले दोन परीच्छेद वाचा.

तुमच्या पुण्यनगरीतच उत्सव जवळ, शिक्षक नगर मधे पाहिले काल ते झाड.>>>>>>>>अग, तिकडे आली होतीस? कळवायचस तरी आधी. भेट झाली असती. शनीवारी मी तिथून येताना बहवा पाहिला. छान फ़ुलला होता. Happy

स्विसमधली आर गॉर्ज पण अशीच देखणी आहे. ( अशा गॉर्जेस तैवान, कझकस्तान मधेही आहेत. ) तिथली शिस्त आणि सोयी आपल्याकडे कधी येणार ?

सध्या पुण्यात -
१] पेल्टोफोरम
२] गुलमोहोर
३] बहावा / अमलताश
४] झकरंदा
५] करंज
६] रेन ट्री
अशी अनेक झाडे फुलून राहिली आहेत, त्या त्या झाडांच्या तळाशी गालिचे पसरल्यासारखे दृष्य आहे .... Happy

shashanka dada, yatale 2,3,4,6 mala hi olakhu yetat ata Happy

a ani 6 cha photo dya na baghayala ekhada Happy

Pages