निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिया नो प्रॉब्लेम ग आणि जागू मावशी झरबेराचा कोलाज टाकणार नाही? Happy मला केक खायचा आहे अजून Lol हा जोक होता. पण नविन पिढीच्या उत्तम गुणांना प्रोत्साहन हे द्यायलाच हवे.

जागुले कसला गोडुला लेख लिहिलायेस गं.. खूऊऊप आवडला विठोबा.. उपमा ही अगदी युनिक.. सुप्पर्ब!!

जियो!!!

हे करून पहा Happy

पर्स कभी धन से खाली नहीं होगा, आजमाएं टोटका

शनिवार के दिन पीपल का एक पत्ता तोड़ें व उसे गंगाजल से धोकर उसके ऊपर हल्दी तथा हल्दी के घोल से अपने दाएं हाथ की अनामिका अंगुली से ह्रीं लिखकर उस पत्ते को धूप-दीप दिखाकर अपने पर्स में रखें।

मी नाही म्हणत, http://hindi.webdunia.com/religion-astrology-tantra/%E0%A4%AA%E0%A4%B0%E...

इथे लिहिलेय.

सावरीचे ओले बोंड (शेंग)

आणि हे सुकून फुटले आहे. त्यातून कापुस आणि म्हातार्‍या बाहेर पडणार.

थांकु शोभे.. आज बरच बरंय.. Happy

दिनेश.. नको रे अस्ले टोटके बिटके इथे टाकूस.. टेरिबल साईट वाटली.. मनोहर कहानियाँ टाईप्स Biggrin

ममो छान हस्तांदोलन!
जागू लेख खूप आवडला. खसखशीची भाजी करायची होती न खसखस वाटायला पाटा वरवंटा नव्हता तर शेजारच्या काकूंकडून आणला आणि मला वाटता आलं ....कोण आनंद झाला......कैक वर्षानंतर वाटण केलं... तो पाटा वरवंटा वेगळाच ...पिवळसर रंगाचा व वरवंटा साधारण २बाय ६ बाय६ आयाताक्रुती वर निमुळता ..... लक्षात येत नाहीयेना Happy मी बाहेर आहे नाहीतर फोटो टाकला असता मी असा वरवंटा पहिल्यांदाच पाहिला ...त्यांनी तो ग्वाल्हेरला घेतलाय....

जागू मस्त लिहिलायसं लेख. नावापासूनच इंटरेस्टिंग वाटत गेलं आणि जसजशी वाचत गेले तशी गुंगत गेले त्यात.

जागू अभिनंदन. हा दिवाळी अंकातला लेख का गो की कुठे टाकला होतास आधी? मला इथेच वाचल्यासारखा वाटतो. पुन्हा वाचेन Happy

केनयात सुकी नाचणी ( विंबी ) वाटायला, शेंगदाण्याच्या ( नजूगू ) शेंगा फोडायला वेगळा पाटा वरवंटा वापरतात.
पाटा आयता़कृती असतो पण त्याला चहू बाजूनी काठ असतात. ( नाहीतर सुकी नाचणी कशी वाटणार ?) आणि वरवंटा बदामाकृती असतो. त्याचा रुंद भाग खालच्या बाजूला आणि निमुळता भाग दोन्ही हातानी पकडायचा. आपल्या वरवंट्यापेक्षा त्याची पकड घट्ट बसते. मी तिथल्या म्यूझियममधे बघितला होता, पण अजूनही ग्रामीण भागात वापरात असावा.

जागू, छान लेख. Happy
मी काल बाहेर गेलो होतो.घरी आल्यावर वास्तुरंग वाचताना शिर्षक बघुन/वाचुन आधी लेखिकेचे नाव पाहिले. १००% खात्री होती तुझाच लेख असणार. Happy घरी सर्वांना दाखवला. Happy

काल भंडारदरा परीसरातील साम्रद गावातील सांदण दरीचे निसर्गनवल पाहुन आलो. हि दरी जमिनीच्या खाली साधारण १००-१५० फूट खोल आणि १-२ किमी अंतराची आहे. थोडक्यात जमिनीला पडलेली प्रचंड भेग. या ठिकाणी खालपर्यंत सूर्यकिरण पोहचत नसल्यामुळे घळीत कमालीचा गारवा जाणवतो त्यामुळे वैशाख वणव्यातही सांदण दरीची भटकंती सुसह्य ठरते. दोन ठिकाणी पाण्यातुन पुढे जावे लागते (सूर्यकिरण खालपर्यंत पोहचत नसल्याने येथील पाणी कधीही आटत नाही). सामद्र गावातुन दिसणार्‍या सह्याद्रीच्या रांगा तर केवळ अप्रतिम. या सार्‍या परीसराची भटकंती करताना मनोमन जाणवते कि निसर्गापुढे माणुस किती खुजा आहे ते.

या परीसरात "सह्याद्री सुंदरी" म्हणजेच "अंजनीची" झाडे प्रचंड प्रमाणात आढळली, नुकतंच अंजनीच्या बहराला सुरूवात झाली आहे. करवंदाच्या जाळ्याही जागोजाग होत्या, थोडीफार पिकलेली करंवद दिसली, तोडली आणि खाल्ली. अहाहा! काय तो स्वाद!!. आंब्याच्या झाडावरच्या कैर्‍याही पाडल्या. सह्याद्रीच्या कुशीत भटकुन आल्यावर उद्दिपीत झालेल्या जठराग्नीला शांत करण्यासाठी गावातल्याच एका अन्नपूर्णेने वाढलेल्या पिठलं भाकर, हिरवी मिरची-शेंगदाण्याचा झणझणीत ठेचा, तिखटमीठ लावलेल्या कैर्‍या, चुलीत खरपूस भाजलेला पापड, घरच्या तांदुळाचा मऊसुत भात आणि गरमागरम तुरीच्या डाळीच्या वरणाची आहुती दिली.

अलंग, मदन, कुलंग हे दुर्गम दूर्ग त्रिकुट, महाराष्ट्रातील एव्हरेस्ट "कळसुबाई", निसर्ग नवल "सांदण दरी", रौद्रभीषण सह्यकडे यांनी हा सारा परीसर सजलेला/नटलेला आहे. पावसाळ्यात तर येथे स्वर्ग उतरतो.


सांदण दरीची चित्रझलक पाहण्यासाठी क्लिक करा

वॉव जिप्सी.. लक्कीयेस..

तुझ्या वर्णनामुळे ही दरी इतकी बघावीशी वाटतीये ना..
क्लिक केल्यावर एकच फोटो का दिस्तोय

धन्यवाद वर्षूदी, अन्जू आणि मामी.
हो सध्या एकच फोटो टाकलाय. उरलेले फोटो अपलोड केल्यावर कळवतोच. Happy
हो मामी, आदल्या रात्री शेवटची कसारा लोकलने (कसारा ते साम्रद (रिटर्न) प्रायव्हेट गाडी बूक केली होती) जाउन दुसर्‍या दिवशी संध्याकाळी घरी परत आलो. Happy

गोपिका, मूगाचे रोप मस्तच Happy

मस्त आणखी फोटोंची वाट बघते आहे>>>>उरलेले फोटो त्याच लिंकवर अपडेट केले आहे. अंजनीच्या कळ्यांचा, फुलांचा आणि फळांचा फोटो आवर्जुन पहा. Happy

वाह..सुपर फोटोज जिप्सी..

ते निळं जांभळं फुलगुच्छ कसलाय??

लास्ट मे जिप्स्याची सिग्नेचर पोझ.. Happy

गोपिका.मुगाचं रोप नाजूक आहे अगदी.. Happy

ते निळं जांभळं फुलगुच्छ कसलाय??>>>>वर्षूदी, तीच "सह्याद्री सुंदरी" - अंजनी Happy
पहिला फोटो त्याच्या कळ्यांचा आहे, दुसरा-तिसरा फुलांचा आणि चौथा फोटो फळांचा आहे. Happy

मस्त आणखी फोटोंची वाट बघते आहे>>>>उरलेले फोटो त्याच लिंकवर अपडेट केले आहे. अंजनीच्या कळ्यांचा, फुलांचा आणि फळांचा फोटो आवर्जुन पहा. स्मित>>> आताच पाहिले.छानच. ते बैल गाडिच्या चाकांचा फोटो विशेष आवडला

Pages