निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर झाल नविन भाग सुरु झाला. यावेळेस मी ठरवल आहे की हा भाग नियमीत पणे पुर्ण वाचायाचा.
खुप छान वाटत वाचुन. बरीच नविन माहिती मिळते.
- सुरुचि

नविन भागासाठी अभिनंदन.

माझ्या जास्वंदीच्या झाडाला (जास्त करून टोकांना) पांढर्या रंगाची कीड लागली आहे. काय उपाय करू?

अरे व्वा, छान आहे समुद्री अशोक..

दिनेश दा छान माहिती.... केळीच्या सोपटय़ापासूनच्या धाग्याची एक साडी आहे माझ्याकडे..
परवा एका समारंभाला गेले होते, तीथे सीताफळाच्या झाडापासुन तय्यार केलेली साडी
पाहिली... नवलच वाटले...

नविन भागासाठी अभिनंदन! अक्षय त्रितीयेच्या शुभेच्छा!
यावेळेस मी ठरवल आहे की हा भाग नियमीत पणे पुर्ण वाचायाचा.
खुप छान वाटत वाचुन. बरीच नविन माहिती मिळते. >> मी पण

वरचे सर्व फोटो मस्तच. जागू हा कोलाज पण छान आहे.

वर्षुताई, दुसऱ्याच्या आरोग्याचा पण कित्ती विचार करता .

सायली लेकीला happy birthday.

धन्यवाद ग अन्जु...
मंजु ताई, दर रविवारी ठरवते तुमच्या कडे यायच... पण काही ना काही अडथळे येतात...
या रविवारी येइन म्हणते...

झरबेरा.. सुंदर कोलाज.. Happy

समुद्रा अशोक?? वॉव..
शोभा मस्त आहे फोटो..

मोनालिप, अन्जू.. कॉम्प्लीमेंट समजू ना तुमच्या प्रतिसादांना.. ??? Wink

कालपासून थ्रोट इन्फेक्शन आणी हाय फीवर ने ग्रासलेय.. म्हणून डिलिवरी बॉय ला माझ्या वाटचं विट डी दिलं.

वर्षू, भारत काय मानवत नाही वाटतं तब्येतीला. टेक केअर.

मोनालि, वेगळी टणटणी दिसतेय.. म्हणजे फुले तशीच पण पाने वेगळी दिसताहेत.

धन्यवाद सगळ्यांना आणि पुन्हा एकदा नवीन भागाच्या शुभेच्छा!

कोलाज कसा बनवतात?

मी ऑन लाईन Fotor वापरले. तिथे आपण एक एक चित्र add करू शकतो. अजून असे भरपूर apps आहेत.

वरिल कोलाजम्धे खालचा छोटा उभा फोटो काय आहे? ग्लासचा आहे का, नीट कळत नाहि.
हो, ग्लासच आहे तो, उन्हाळ्यासाठी खास सब्जा घातला आहे त्यात Happy आईची आईडिया

ते करमळ आहे ? मोठ्या करमळासारखेच असणारे पिवळ्या करमळाचे झाड मी चोर्ला घाटात बघितले आहे.

झ्ररबेरा, तुझं कोलाज मस्त जमलयं. अभिनंदन !! नव्या पिढीचे इथे मनापासून स्वागत.
दिनेशदा नेहमीप्रमाणे मस्त, माहित नसलेली माहिती.
फोटो सर्व सुंदर. सरिवा, मध पिताना बघितलेले आहे फुलपाखरूं पण पाणी पिताना प्रथमच पाहिले. फोटो मस्त. फुलपाखराचा फोटो टिपणं कठीण असतं ना ?
सायली, लेकीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
वर्षु नील, टेक केअर.
हे एक अनोखं हस्तांदोलन. नव्या पिढीशी जुन्या पिढीनी केलेलं म्हणा ना ! खास झरबेरासाठी.

From nasik

सगळेच फोटो एकदम मस्त...

मे मूग पेरले होते.छोटि रोपटि आलि आहेत.लवकरच फोटो टाकिन इथे Happy
पुदिना कसा लावायचा कुणि सांगेल का.माझ रोप कोमेजूनच जात.इथे सांगितलत चालेल किवा विपु केलात तरि चालेल

गोपिका
मी भारतात पुदिना असा लावते....बाजारातून जेव्हा पुदिना आणतो तेव्हा त्याची पानं फक्त काढून घ्यायची स्वयंपाकात वापरायला. मग उरलेले मुळांसकट्च्या काड्या रोपायच्या. मातीत जमिनीखाली फक्त मुळं जातील इतक्याच.
अधून मधून पाणी घालणे. मस्त येतो पुदिना.
ही आपली घरगुती पद्धत. बाकी पद्धतशीर लागवडीबद्दल जाणकारच सांगतील.
सायली तुझ्या लेकीला हॅप्पी बड्डे! किती वर्षांची झाली?
ममोचं हस्तांदोलन आणि झरबेराचा कोलाजही मस्त.

पुदीना बाजारातून आणताना जरा जाडच काड्या घ्यायच्या. मग त्याचे खालचे टोक धारदार कात्रीने कापून त्या कपभर पाण्यात उभ्या करून ठेवायच्या. रोज पाणी बदलायचे. २/३ दिवसात मूळे फुटतात. मग ती अलगद मातीत लावायची. मातीत लावल्यानंतरही शक्य झाल्यास दोन दिवस फार उन लागू देऊ नये. कुंडीत लावली तर कुंडीच ( अर्धी कुंडी बुडेल एवढ्या पाण्यात ) १ दिवस पाण्यात ठेवायची. मग पाण्याबाहेर काढून ठेवायची. हमखास जगेल.

मनुषी + मनिमोहर खुप खुप धन्यवाद, सई १३वर्षाची झाली आता.
मनिमोहर, तुझ अनोखं हस्तांदोलन पण खुप भावलं...
दा मी पण पुदिना लावला आहे... फोटो टाकीन.... पण तुम्ही सांगता ती पद्धत फार वेगळी आहे....
प्रयोग केला पाहिजे...

झरबेरा चे काम खरच कौतुकास्पदच आहे....

क्या बात है जागु! अप्रतिम लिहिलेलस... बालपण झरकन डोळ्याखालुन गेलं बघ...

Pages