होणार सून मी या घरची - २

Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31

होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.

विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शनिवार दि. ८ मार्च २०१४ : अपडेट्स

~ श्री आनंदात असल्याने खोलीत तिच्याशी सीडीवरील गाण्यांबाबत चर्चा करीत आहे. त्याला माहीत नाही सीडी कुठून आली आहे. जान्हवीदेखील "तुला आवडली ना...मग बस्स" इतकेच म्हणून शांत राहते. श्री ला ते खटकते. तो तिच्या तब्येतीविषयी विचारतो....गीतासंदर्भातील प्रॉब्लेमबद्दलही विचारतो...तो पुढे काही विचारणार तत्पूर्वीच ती म्हणते, "श्री ही सीडी मी आजीसाठी आणली आहे. त्याना देवून येते...." थोडावेळ थांबते आणि विचारते, "श्री, तुला कधी कधी आईच्या कठोर वागण्याचा त्रास झाला आहे ?" तो होकार देतो...पण हा प्रश्न हिला का आता पडावा याचाही तो विचार करतो.

जान्हवी सीडी घेऊन आईआजींच्या खोलीत येते. तिथे त्यानी ती ऐकविण्यापूर्वी लक्ष्मीकांतकाकांनी खास आजीसाठी दिलेल्या कूकीजचा पुडाही देते....आजी कूकीज खाताना जुन्या आठवणीत रमून जातात...त्या "लक्ष्मीकांतदेखील अशा कूकीज खूप छान तयार करत असे..." ही आठवणही सांगतात....दुसरीकडे जान्हवी सीडीवरील गाणे लावते "स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा....गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा".....त्या गाण्याच्या आनंदात आजी हरवून जातात....आठवणीही सांगत राहतात. गाणे संपताच पुढील गाणे न लावता ती मशिन ऑफ करते आणि आजीसमोर येऊन बसते आणि त्याना विचारते, "आईआजी, एक प्रश्न विचारायचा आहे...." आजी "विचार ना...मोकळ्या मनाने विचार...." जान्हवी धीर गोळा करून म्हणते, "मी या घरात आल्यापासून खूप काही गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत...काही चांगल्या काही वाईट...त्यापैकी एक म्हणजे ज्यावेळी उमाकांतकाका आणि अमृत स्वर्गवासी झाले त्यावेळी तुम्ही लक्ष्मीकांतकाकांना अंत्यसंस्कारासाठी येऊ दिले नव्हते....काय आहे आईआजी....आय अ‍ॅम सॉरी....मला माहीत आहे मला हे विचारण्याचा अधिकार नाही..." पण आजी म्हणतात, "नाही, तुला आता घरची सून म्हणून विचारण्याचा अधिकार आहे....पण जान्हवी डोळ्यांना जे दिसते ते १००% टक्के खरे असते असे कधी समजू नकोस.... मी त्याला मनाई केली हे सत्य...तो आला होता त्या दिवशी उमाकांत खाली निपचित पडला आहे तर बाजूला अमृतचाही प्राण गेलेला....आभाळ कोसळले होते आमच्यावर....आणि लक्ष्मीकांत तिथे आलाय तो नशेत धुंद होऊन...कसा त्याला तिथे थांबवू मी ? त्याला कसलीच शुद्ध नव्हती. दु:खाने वेड्यापिशा झालो होतो आम्ही...इंदूला धरू की स्वतःला सांभाळू असे झाले होते मला आणि हा इकडे दारूच्या नशेत....त्यावेळी मला तो हवा होता आधारासाठी, घरातील जबाबदार पुरुष म्हणून. पण त्याला स्वतःलाच स्वतःचा तोलही सांभाळता येत नव्हता...." हे सारे सांगताना आईआजी रडू लागतात. त्यांचे दु:ख पाहून जान्हवी समजून चुकते की आपण फार एकांगी प्रसंगाचे वर्णन ऐकले आणि आजींना जाब विचारायला आलो आहे. शरयूने आपल्याला सारेच न सांगता जेवढे तिला उपयोगाचे होईल तेवढेच सांगितले यामुळे जान्हवी अस्वस्थ होते आणि आपल्या खोलीत येते.

तिथे श्रीसमोर मोकळेपणाने रडून घेते...केलेल्या चुकीबद्दल....श्री तिला समजावून सांगतो. इकडे स्वयंपाकघरात नर्मदाबाई, इंदूवहिनी आणि शरयू स्वयंपाकात गुंतल्या आहेत..... शरयू जाणते की इंदूवहिनी आपल्यासोबत बोलायला तयार नाहीत. ती त्यानी "वहिनी, मला माफ करा...मी चुकले...असे बोलायला नको होते मी..." असे वारंवार म्हणत राहते...पण इंदूवहिनींचा राग कमी होत नाही. नर्मदाबाईदेखील इंदूला "विसरून जा" असा सल्ला देतात...पण इंदूवहिनी रडत "माझा नवरा नाही, मुलगा नाही...तरीदेखील माझे दु:ख विसरून मी तुमच्या सुखदु:खात सामील होत असते आणि मलाच असली बोलणी ही सुनावते...." इंदूवहिनीचे हे बोलणे जिन्यावर असलेली बेबी ऐकते....ती खाली येते आणि नर्मदावहिनाला विचारते, "काय बोलली शरयू ?" पण तिघीही बोलत नाहीत. हे पाहिल्यावर बेबी इंदू आणि नर्मदाला "माझा खोलीत या....शरयू इथेच थांबू दे" असा हुकूम देते... त्या जातात....शरयू एकटीच बसली आहे आता तिथे....जान्हवी येते...ती खूप नाराज दिसत आहे. शरयूला तिथे पाहून ती तिला थेटच विचारते, "छोट्या आई, तुम्ही मला काल जे काही सांगितले लक्ष्मीकांतकाकांसंदर्भात....ते सारे का सांगितले नाही..?" यावर शरयू "कुठे, काय, कसले सारे ?" असली भोळेपणाचे सोंग आणणारी प्रश्न विचारते. तथापि जान्हवी आता शरयूला ओळखत असल्याने तिच्या या वर्तनाकडे सरळ दुर्लक्ष करून तिला परत विचारते, "उमाकांतकाका आणि अमृत गेले त्या दिवशी अंत्यसंस्काराला आलो म्हणून सांगणारे लक्ष्मीकांतकाका दारुच्या नशेत तर्र होऊन इथे आले होते, हे का नाही सांगितले ?" यावर शरयूकडे उत्तर नसते....तरीही ती काही बोलणार तोच श्री तिथे ऑफिसला जाण्याच्या तयारीत येतो...ती संधी साधून शरयू तिथून निघून जाते. श्री जान्हवीला काय झाले म्हणून विचारतो तोच जान्हवी "माझा फोन वर राहिला..." असा बहाणा करून जिन्याकडे जाते.

श्री ऑफिसमध्ये आला आहे...त्याला फोन येतोय...तो घेतो "हॅल्लो हॅल्लो" म्हणतो....पलिकडे फोनवर लक्ष्मीकांत गोखले आहेत.

मामा मस्तच. शरयूचा विसरभोळेपणा फक्त तिच्या सोयीचा आहे. विसरभोळेपणाचा आव आणत असते, बाकीच्यांना ते खरे वाटते पण जान्हवीला समजले आता. बरं एकीकडे तिला विसरभोळी समजतात आणि खूप पैसे देऊन भाजी आणायला पाठवतात, विसंगती आहेना ही.

शनिवारच्या भागातले आईआजीचे जान्हवीला म्हणलेले एक वाक्य आवडले.
तु हे बोलली नसतीस तर माझ्यापासून दुरावली असतीस आणि मला त्याचे कारणही कळले नसते.

तु हे बोलली नसतीस तर माझ्यापासून दुरावली असतीस आणि मला त्याचे कारणही कळले नसते.<<< पण असे बोलणेच तर ह्या मालिकेचा पाया आहे Happy

त्या जाह्नवीने श्रीला "तुला आईआज्जींच्या कठोर वागण्याचा त्रास झाला का कधी?" असल पुळचट प्रश्न विचारावाच कशाला?
त्याला त्रास झाला म्हणूनच तो घर सोडुन गेलेला ना? आणि ते बघायला ही बया समोर होती ना तेंव्हा? फालतू कुणीकडचे! Angry

अगं रिया तार्किकतेचा शिरेलशी संबंध नाही असे बोल्लो ना आपण आधीच... आता कुठून आणायची त्यानी ती?

मला वाटते रायटर बाई सुटीवर गेल्यात, व कुणी टेंपरवारी लिहितोय..

सोमवार दि. १० मार्च २०१४ : अपडेट्स

~ श्री च्या डोक्यातील शरयूची मानसिक स्थिती आणि त्यामुळे घरी निर्माण झालेली अस्वस्थता त्याला स्वस्थ बसू देत नाही. त्यातच त्याला दाट शंका आहे की शरयू आणि जान्हवी यांच्या दरम्यान काहीतरी व्यवहार चालू आहेत जे घरातील अन्य सदस्यांना माहीत नाही. आज तो जान्हवीला त्यावरून छेडतोही. पण नेहमीप्रमाणे जान्हवी त्याच्या प्रश्नाला उत्तर न देता "काही नाही..." चे भजन म्हणत राहते. श्री एका प्रमाणाबाहेर चिडत नाही....जान्हवी शरयूची बाजू तर घेतेच पण लक्ष्मीकांतचे नाव घेत नाही. श्री ला तात्पुरते समाधान होते.

शरयूच्या खोलीत ती आपल्या आता रिकाम्या झालेल्या दागिन्याच्या छोट्या पेट्या घेऊन ती विमनस्कपणे बसली आहे...."माझ्या नवर्‍याला पैशाची गरज आहे....मी कुठून आणू ?" या विचारात ती आहे....निर्वाणीने गळ्यातील मंगळसूत्र काढते ती आणि आता हेच विकून तात्पुरते म्हणून त्याला पैसे द्यायचा ती विचार करते तोच तिथे जान्हवी येते. शरयूचा मोकळा गळा पाहून तिला धक्का बसतो....कारणही विचारते. शरयू थेट कारण सांगते....आणि मला हे करावे लागणारच असेही म्हणते. जान्हवी तिच्या हातातून ते मंगळसूत्र काढून घेते आणि स्वतःच तिच्या गळ्यात परत घालते....शरयूची समजूत काढते...."मी काढेन यातून काहीतरी मार्ग..." असे म्हणत बॅन्केत जाण्यासाठी बाहेर पडते.

बॅन्केत त्याच विचारात ती आहे....शेजारी गीता आपल्या कॉम्प्युटरवरील काही व्यवहार पाहात आहे आणि त्यातच तेथील काही आकडेवारी पाहून आश्चर्याने ओरडते "जान्हवी तुझ्या सासर्‍याच्या अकौंटवर फक्त पाच हजार रुपये आहेत..." जान्हवीला समजत नाही, ती तिला विचारायचे म्हणते तोच मॅनेजरसह सारे गीताच्या टेबलकडे येतात...पण जान्हवी सांभाळून घेते सर्वांना....गीता फोन करायला जाते असे सांगून रेस्ट रूमकडे जाते तेवढ्यात जान्हवी स्क्रीनकडे पाहून नेमके तिथे काय आकडेवारी आली आहे ते पाहते.

आईआजी आशा भोसलेंची गाणी सीडीवरून ऐकत आहेत....त्यात त्या गुंगल्या आहेत, मध्येच सीडी बंद करतात आणि जान्हवीला फोन करून तिचे त्याबद्दल आभार मानतात.....त्या गाण्यांनी मला किती आनंद दिला आहे याचे वर्णन आजी करतात....जान्हवीला ही एक आनंदाची घटना वाटते. फोननंतर आजी परत गाणी ऐकत बसल्या असतात तोच तिथे फणकार्‍याने बेबी येते....आजीच्या कॉटवर बसते....बोलत तर काहीच नाही. पण आपल्या कन्येचा तो चिडलेला चेहरा पाहून आजी तिला बोलती करतात...सुरुवातीला काही न सांगणार असे करणारी बेबी सांगते, "शरयू फार बदलून गेली आहे...तिचे काहीतरी करायला हवे....आज तिने इंदू आणि नर्मदावहिनी याना त्यांचे पती गेल्याबद्दल जे काही अपशब्द वापरले त्याबद्दल तिला माफ करता येणार नाही." आजी विचारतात "कोणते शब्द ?" बेबी ते सांगते....शिवाय "मलाही ते तुमचे घर नाही...असेही शरयू बोलली" हे सांगते. दोन्ही गोष्टी ऐकल्यावर आजी म्हणतात, "असे म्हटली असेल तर शरयूचे नक्कीच चुकले आहे...मी विचारते तिला..." आणि शरयूला आपल्या खोलीत न बोलाविता आजी थेट तिच्याच खोलीत जातात.... तर तिथे शरयू पुन्हा ते मंगळसूत्र काढून शरयू बडबडत बसली आहे...."कसे मी पैसे उभे करू...? जान्हवी तर सांगून गेली आहे मंगळसूत्र नका विकू....मी काय करू ?" हातातील मंगळसूत्राकडे ती पाहात आहे तोच आजी तिच्यासमोर. त्याना पाहून शरयू हादरते.

या अगोदर श्री ऑफिसमध्ये कामात असताना त्याला लक्ष्मीकांत फोन करतो....आवाज आल्यावर तो विचारतो, "कानेटकरांचा फोन का ?" श्री त्याना सांगतो, "नाही काका, चुकीचा नंबर लागला आहे...". लक्ष्मीकांत फोन बंद करतो...स्वतःशीच म्हणतो, "ज्याचा नंबर चुकीचा आहे म्हणतो त्याला काका म्हणतो....आणि मला...?"

अरे ती दोघे जान्हवी आणि श्री जाडे झालेत लग्नानंतर(त्यांच्या खर्‍या लग्नानंतर हो). तो केळकर विचित्रच दिसतो डबल हनुवटीमुळे. मारुती नाही झाला म्हणजे मिळवलं.... Proud

तो प्रसाद ओक तर काय भयानक म्हातारा दिसतोय. तसाही मला तो आवडत नाहीच. Wink

तो प्रसाद ओक तर काय भयानक म्हातारा दिसतोय>>>> त्याने तस्सच दिसण अपेक्षित आहे...

आणि श्रीला काय बोलायच नाय हां Wink

शरयू एव्हढे पैसे देते त्याला दागिने विकुन.. तो काय उद्योग करतो?? २५ वर्शांत काहीच कमवण्यायोग्य व्यवसाय नाही करत?

बाकी प्रसाद ओअक ला एव्हढ्या इमोशनल भुमिकेत बघवत नाही !!!

उमाकांत, लक्ष्मीकांत तर मग श्रीकांत का नाही?? श्रीरंग का ? ..>>>> कांत हे नाव गोखल्यांना धार्जिण नसाव नारळीभातासारख... म्हणुन श्रीरंग

शरयू एव्हढे पैसे देते त्याला दागिने विकुन.. तो काय उद्योग करतो?? २५ वर्शांत काहीच कमवण्यायोग्य व्यवसाय नाही करत?>>>> यामुळेच भागिरथीबाईंनी त्याला गेट आउट केलय ना? कमवत नाही, दारु पितो, बायकोला मारहाण करतो इ. इ. कारणांमुळे

बाकी प्रसाद ओअक ला एव्हढ्या इमोशनल भुमिकेत बघवत नाही !!!>>>>+1

उमाकांत, लक्ष्मीकांत तर मग श्रीकांत का नाही?? श्रीरंग का ? ..>>>> कांत हे नाव गोखल्यांना धार्जिण नसाव नारळीभातासारख... म्हणुन श्रीरंग>>> मुग्धा Proud

सस्मित प्रओ मुळात छान्च आहे दिसायला, मलाही आवडतो तो पण या मालिकेत तो मुळात वयाने मोठा दाखवला आहे, त्यात व्यसनी, मायग्रेनच्या आजाराने त्रासलेला, आईने घराबाहेर काढल्याने काहीसा विमनस्क झालेला या सगळ्यामुळे तो तसा दिसत असावा अर्थात हे.मा.वै.म

प्रसाद ओक मलाही आवडतो Happy
रच्याकने लक्ष्मीकांत ला हे सगळे कांता म्हणतात, इतरही सगळे कांतच होते ना?
मग त्यांच्यावर अन्याय का? का? का?
की ते कांता१, कांता२, कांता३ असे असायचे? Uhoh

सस्मित प्रओ मुळात छान्च आहे दिसायला, मलाही आवडतो तो पण या मालिकेत तो मुळात वयाने मोठा दाखवला आहे, त्यात व्यसनी, मायग्रेनच्या आजाराने त्रासलेला, आईने घराबाहेर काढल्याने काहीसा विमनस्क झालेला या सगळ्यामुळे तो तसा दिसत असावा अर्थात हे.मा.वै.म>>>>>>>>>>>>> या सगळ्यामुळे तो तसा दिसत असावा असं नाही ग या सगळ्यामुळे त्याला तस्सच दिसायला हवंय. Happy

हो सस्मित, वर कोणाला तरी प्रतिसाद देताना मीही असच म्हणाले आहे. याचा अर्थ प्रओचा अभिनय आणि त्याचा मेकअप करणारा माणुस या दोघांनाही तो कसा दिसायला हवा हे नीट समजल आहे... नाहीतर बर्‍याच ठिकाणी मुलीला मुलगा/मुलगी झाली तरी आई शोडषाच असल्यासारखी नटलेली दाखवलेली असते. हे.मा.वै.म

अरे ती दोघे जान्हवी आणि श्री जाडे झालेत लग्नानंतर(त्यांच्या खर्‍या लग्नानंतर हो). तो केळकर विचित्रच दिसतो डबल हनुवटीमुळे. मारुती नाही झाला म्हणजे मिळवलं.... फिदीफिदी>>> Lol Rofl
उमाकांत, लक्ष्मीकांत तर मग श्रीकांत का नाही?? श्रीरंग का ? ..>>>> कांत हे नाव गोखल्यांना धार्जिण नसाव नारळीभातासारख... म्हणुन श्रीरंग>>> Proud Biggrin

मला प्रसाद ओक आवडतो ... क्षण या शिनेमात भारी काम केलंय... शिनेमा इमोशनल आहे पण चांगला आहे Happy

उमाकांत, लक्ष्मीकांत तर मग श्रीकांत का नाही?? श्रीरंग का ? ..>>>> कांत हे नाव गोखल्यांना धार्जिण नसाव नारळीभातासारख... म्हणुन श्रीरंग>>>:D Proud

गोखल्यांना म्हणावं .......

छोटा कांता...मोठा कांता...असं पण चाललं असतं Lol Proud

जान्हवी काय म्हणेल मग त्यांना छोटे कांतासासरेबुवा, मधले कांतासासरेबुवा ............

आणि लग्नानंतर काही वर्षानी उमाकांता, लक्ष्मीकांता अस्स कस्स झालं गोखल्यांच खुळं माझ्या नशिबी आलं Lol

Pages