होणार सून मी या घरची - २

Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31

होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.

विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती जान्हवी एवढी २-३ गायबली होती तरी घरी गेल्यावर काय सांगायचे याचा काही विचार केला नव्हता अ ओ, आता काय करायचं>>>> नाहीतर काय, थापा नाही मारता येत साध्या साध्या तर असल्या कारवाया गुपचुप कराव्याच कशाला!!

+१ Proud
आज काल जान्हवी पहिल्यासारखी क्युट का दिसत नसावी? Uhoh
तिने हेअरस्टाईल बदललीये का?

जान्हवी कशाला इतका आगाऊपणा करायला जाते? तेही नवर्‍याला विश्वासात न घेता? हॉल ऑफ फेम बनण्याचा इतका अट्टहास कशासाठी?

हे सगळे गोखले एकत्र बसुन, "स्पष्ट" बोलून प्रॉब्लेम्स का सोडवत नाहीत? बावळट्पणा चाललाय सगळा... अर्थात एक्मेकांशी नीट स्पष्टपणे बोलले तर सिरियल कशी चालु रहाणार म्हणा..!

आता तो इर्रिटेटींग आपट्या कांता ला पण भेटल्याचं दिसलं... हा काय सगळ्या गोखल्यांच्या राशीला लागलाय का शनी... आणि प्रेक्षकांच्या सुद्धा... :रागः

आता तो इर्रिटेटींग आपट्या कांता ला पण भेटल्याचं दिसलं... हा काय सगळ्या गोखल्यांच्या राशीला लागलाय का शनी.. << योगायोग!!

आज काल जान्हवी पहिल्यासारखी क्युट का दिसत नसावी>>>>>>>. रिये लग्न झालं नं प्रत्यक्षात तीचं.....जाडी झालीय ती म्हणुन क्युट का काय ते दिसत नाहीये......मला ती आधी पासुन विशेष आवडत नाही अशीही....:(

लग्न कधीही होउ दे....पण मला तीची डबल चीन बघवत नाही....आधी लुकडी सुकडी होती तेव्हा बरी दिसायची...पण आता कशी तरीच पेल दिसते ती.....

अरे तो कांता ... जर आधि पासुन दारु पित होता .. तर आईआजि ने शरयु बरोबर लग्नच का लावुन दिले ??

पहिल्यापासूनच एकमेकांशी स्पष्ट न बोलता कोड्यात बोलायचे हा त्यांच्या घरातील अलिखित नियम आहे.>>

haa sagalyaa siriyal madheel gahraateel niyam aahe.
naitar siriyal chalanar kashee?

अरे तो कांता ... जर आधि पासुन दारु पित होता .. तर आईआजि ने शरयु बरोबर लग्नच का लावुन दिले ??
>> तिला कुठे माहिती होतं सगळी ब्याद परत तिच्याच गळ्यात अडकणार ते .. Proud

गोखल्यांच्या घरातले लोक सुधारले वाटत काल मावशीबाई येऊ का मंडळी अस मोठ्याने विचारून मग श्री - जानूच्या खोलीत आली .
बाय द वे लग्न मानवले असे दिसते . Happy

सीरीयल चालू असताना खाली एक पट्टी वाचली जान्हवी शोधतेय गोखल्यांच्या घरातली हरवलेली
नाती. मी ते चुकून जान्हवी शोभतेय ........घरातली माती असं वाचलं.

च्यामारी त्या काकाला श्री ला पहावसं नाही इतक्या वर्षात .? लांबुन सुद्धा?.? समोर येऊन सुद्धा ओळ्खलं नाही त्याने श्री ला. बरं इतकं लग्न झालं घरातल्या एकुलत्या एक पोराचं तर शरयु कडुन एक फोटो पण घ्यावासा वाटला नाहि त्याला श्री जान्हवी ला बघायला?. फक्त आईचा फोटो भिंतीवर लावला की झालं?

मंगळवार दि. ४ मार्च २०१४ : अपडेट

~ लक्ष्मीकांतला भेटून आल्याचा ताण जान्हवीच्या चेहर्‍यावर आहेच शिवाय श्री तिने फोन करून वेळेबाबतचे कारण सांगितले नाही म्हणून काहीसा चिडलेला आहेच, तरीही तिने गीताचे नाव घेऊन जी सफाई दिली ती त्याने वरकरणीतरी मान्य केली आणि आईने मग सार्‍यांना जेवायला चला म्हटल्यावर तो विषय संपला. त्या अगोदर कपडे बदलण्यासाठी ती रुममध्ये आल्यावर तिथे श्री "मी तुझ्यावर मगाशी काहीसा चिडलो; ते विसरून जा..." असे स्मित करत म्हणतो, पण जान्हवीला माहीत आहे की आपण श्री बरोबर खोटे बोललो आहोत आणि ती त्याला सत्य सांगण्याच्या स्थितीत आहे. तो ते ऐकून घेत नाही....तरीही "समज श्री, मी तुझ्या काकाकडे कधी गेलेच तर तुला काय वाटेल ?" यावर श्री तिला जवळजवळ थंडपणे म्हणतो, "मग घरात तिसरे महायुद्ध सुरू होईल. मी आणि आईआजी एका बाजूला तर दुसर्‍या बाजूला तू...." एवढ्या बोलण्यावर जान्हवी जाणून जाते की आपण लक्ष्मीकांतला भेटून चूक केली. विचारात असतानाच सरुमावशी त्याना जेवायला बोलाविण्यासाठी तिथे येते आणि श्री ला खाली घेऊन जाते....जान्हवी थोड्यावेळाने तिथे जाणार आहे, पण त्यापूर्वी ती संभाव्य धोक्याचा विचार करते.

मेजवानीचा खास बेत असल्याने तत्पूर्वी सर्व स्त्रिया आणि श्री आनंदाने गप्पा मारीत मारीत गाणीही म्हणतात. श्री "छुकर मेरे मनको किया तूने क्या इशारा" हे गाणे म्हणतो....विशेष म्हणजे श्री ची आई नर्मदाबाईदेखील "घननिळा..." हे गाणे म्हणून दाखवितात जे त्यानी रमाकांत त्याना पाहायला गेले असता त्यावेळी त्यांच्यासमोर गाईलेले असते. त्यांची आठवण निघते. बेबीआत्या "अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहा खत्म....ये मंझिले है कौनसी..." हे गाणे म्हणते आणि म्हणत असतानाच कोणत्यातरी जुन्या आठवणींनी ती भावुक होते आणि तिच्या डोळ्यात पाणी येते.....जान्हवीचा नंबर येतो...ती "जब कोई बात बिगड जाये, जब कोई मुश्किल पड जाये...." हे गाणे म्हणते; पण त्या गाण्यातील भावामुळे तिच्या शेजारी बसलेली शरयू अस्वस्थ होऊन रडू लागते, पण लागलीच स्वतःला सांभाळतेही.

जेवणानंतर शरयूच्या खोलीत जान्हवी येते. तिला पाहून शरयू तिला आनंदाने आणि कृतज्ञतेने मिठी मारते....आभार मानते,....तिथे काय संभाषण झाले याची चौकशी करते....जान्हवी शक्य तितकी माहिती देते, पण तिचे सांगण्याकडे लक्ष नाही तर "मी आज जे तिथे गेले ते शेवटचे छोटी आई....मी माझ्या नवर्‍याशी खोटे बोलले....जे मी पुन्हा करणार नाही...." शरयू तिला आभाराबद्दल एक भेट देवू करते, पण जान्हवी ते न घेता तिथून बाहेर जाते आणि आपल्या खोलीत येते. तिथे आनंदात गाणे म्हणत बसलेला श्री तिला दिसतो....तो आजच्या दिवसाच्या घडामोडीचे सारे श्रेय जान्हवीला देतो; पण ती स्वीकारत नाही, म्हणते, "पण माझ्याकडूनसुद्धा चुका होत असतात..." श्री ला काही कळत नाही, तो म्हणतो "तुझ्याकडून कसली चूक होणार ?" जान्हवी त्याच्याकडे पाहात म्हणते, "मला इतके मोठे करू नकोस....माझ्याकडूनही चुका होतात, आजही चुकले आहे माझे...".

या मध्ये परत तो आपटे आणि पिंट्या संभाषणाचा वैताग दाखविला गेला....रस्त्यावरील एका गाडीवर चहा घेत पान खात पिचकार्‍या टाकत आपटे वेळ काढीत आहे तर पिंट्या त्याची बडबड ऐकत आहे. फोन आला म्हणून तो तिथून निघून जातो. तेवढ्यात दुसर्‍या बाजूने लक्ष्मीकांत तिथेच चहासाठी येतो....आपटे पानाची पिचकारी टाकतो ती नेमकी लक्ष्मीकांतच्या पायावर पडते....तो आपट्याला मुस्काडात मारतो....आपटे धडा शिकतो.

मामा गुड अपडेट्स. आज गाण्याचा प्रोग्रॅम होता वाटतं गोखल्यांकडे.

हा पिंट्या कधी सुधारणार? बरं झालं श्रीच्या काकाने आपटेच्या मुस्कटात मारली ते. पिंट्याला पण आठवायला हवं होतं आपण अशीच आपटेला मारली होती आणि घराबाहेर काढलं होतं.

मला वाटते आता काका आणि पिंट्या कहीतरी व्यवसाय करतील (खरतर ह्याला काही लॉजीक नाही पण तसही सगळे इललॉजीकलच चालले आहे) Proud

अरे तो काका दारु पित नाही ना?? त्याला माय्ग्रेन चा त्रास आहे ना??>>>> पण त्याच्या घरात तर होत्या टेबलावर दारुच्या बाटल्या...!!! नं?

Pages