होणार सून मी या घरची - २

Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31

होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.

विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol
क्या नयी है वह? तुम क्या बोल रही हो मै क्या बोल रही हूं? मै उसकी पोस्टके बारे मे बोल रही हू Proud

अग मी पण असचं टीपी लिहिलेलं Wink

गुरुवार दि. ६ मार्च २०१४ : अपडेट्स

~ आईआजी आपल्या मुलाचे लक्ष्मीकांतचे गाण्याच्या तयारीबद्दल मनसोक्त कौतुक करीत आहे. कांता म्हणतो, "मी जर काही चांगले गात असेन वा करत असेन ते सारे तुझ्यामुळे...." आईला आनंद होतो. त्या दोघांचे ते संवाद ऐकत उभी आहेत नर्मदाबाई आणि बेबी. दोघांना "आता काही तरी पोटापाण्याचे बघा...." असे हसत म्हणत नर्मदाबाई चहाचा कप पुढे करतात....आणि आईआजी भूतकाळातून वर्तमानात येतात. समोर नातसून जान्हवी चहाचा कप घेऊन उभी आहे. कालच्या एकूण कार्यक्रमाबद्दल आईआजी जान्हवीला श्रेय देतात....गाण्याच्या आठवणीत मला एक चांगला गायक आठवला असेही त्या सांगतात, पण जान्हवीला नाव सांगत नाहीत...."तुला ऑफिसला जायचे असेल, तर तू जात..." असे त्या तिला सांगतात.

सरुमावशीच्या देवघरात सरू आणि शरयू गणेशपूजा करीत आहेत. शरयू प्रार्थना करीत आहे "घरात चांगले चालले आहे तर आता या घरातून बाहेर गेलेली माणसेही परत येऊ देत...." शरयूच्या या प्रार्थनेला सरूमावशी तर विरोध करतातच पण त्याचवेळी तिथे आलेला श्री देखील शरयू रडत असतानाही ठाम विरोध करतो. "जे घरातून बाहेर पडले आहेत त्यानी या घरात परत येऊ नयेत यातच घराचा आनंद आहे असे माझे मत आहे...." श्री चे हे मत बाजूला जिन्यात असलेली जान्हवी ऐकते. तिला वाईट वाटते, पण ती त्यावेळी काही बोलत नाही आणि बॅन्केत येते. बॅन्केत जान्हवी आणि गीता कामाबरोबरीने गप्पाही चालू ठेवतात. मध्येच मॅनेजर बोरकर येऊन आपली नित्याची विनोदी एंट्री करून गीताच्या कामाबाबत तिला शाब्दिक टपल्या मारतात....जान्हवीशी दुपारच्या मीटिंगबाबत बोलत असतानाच गीताच्या टेबलवरील फोन वाजतो. गीता घेते, तो असतो श्री चा. "जान्हवी फोन का उचलत नाही..." असे तो विचारतो....जान्हवीचा मोबाईल पर्समध्ये आहे पण सायलेन्ट मोडवर असल्याने तिला रिंग ऐकू येत नाही. इकडे गीता श्रीबरोबर "जिज्जू..." म्हणत लाडिकपणे बोलते, ते जान्हवीला पसंत पडत नाही कारण बॅन्केचा फोन खाजगी बोलण्यासाठी वापरू नये असे तिचे मत आहे. तसे ती स्पष्टपणे गीताला सांगण्याचा प्रयत्न करते, पण गीताचा गैरसमज होतो....ती रुसते व फोन जान्हवीला देते. जान्हवी फोनवरून श्री ला "मी कामात आहे. नंतर मोबाईलवरून फोन करते" असे सांगते....नंतर गीताला समजावून सांगण्याचा प्रयत्नही जान्हवी करते, तिच्यासाठी कॉफी मागविते आणि तिची कळी खुलवते. या दरम्यान बॅन्केत कस्टमर्स आपल्या कामासाठी येत आहेत....त्यात एक म्हणजे लक्ष्मीकांत आहे. तो बॅन्केत लागलेल्या पाळीत उभा आहे. पण श्रमामुळे त्याला चक्कर येते...दोन्ही हातांनी डोके धरून तो खाली पडतो. एकदोन क्लार्क्स, शिपाई अन्य ग्राहक त्याला सावरतात....जान्हवी तिथे येते आणि ती लक्ष्मीकांतला ओळखतेही. मॅनेजर बोरकर बाहेर येतात. लक्ष्मीकांतला खुर्चीवर बसविले जाते पण त्याने डोके धरलेले असतेच. त्याची अवस्था पाहून जान्हवी एका पानावर औषध लिहिते आणि बॅन्केतील शिपायाला ते आणायला सांगते. मॅनेजर तिला विचारतात, "औषध कोणते हे तुला कसे कळाले ? तू याना ओळखतेस का ?" यावर जान्हवी लक्ष्मीकांतकडे पाहून उत्तर देते, "हो, हे माझे सासरे आहेत....".

दरम्यान "गोकुळ" मध्ये चार स्त्रिया एकत्र आल्या आहेत....आणि शरयू तिघींनी "माझ्या नवर्‍याला घरी आणण्यासाठी तुम्ही आईआजीकडे रदबदली करा ना...!" अशी रडतरडत विनंती करती आहे. पण नर्मदाबाई आणि इंदुबाई ती जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. सरूमावशीला नेमकी कुणाची बाजू घ्यावी हे समजत नाही. मध्येच शरयू अगतिक होऊन बोलून जाते, "तुम्ही दोघींचे नवरे परत येणार नाहीत, पण माझा नवरा मला रोज भेटतो, तो आजारी आहे. त्याला माझ्या मदतीची गरज आहे....मी त्याच्याकडे जाणे गरजेचे आहे...मला हवं तर घराबाहेर काढा...मी जाते त्याच्याकडे..." असा आक्रोशही चालू करते. त्याला घाबरून इंदू आणि त्यापाठोपाठ नर्मदाबाई खोलीबाहेर जातात. सरूमावशी शरयूला शांत करण्याचा प्रयत्न करते, पण शरयू आता सरूलाच "तूच आता श्री आणि जान्हवीला सांगून यातून मार्ग काढ...." असा धोशा लावते....सरूमावशी जान्हवीला हे सांगून या प्रश्नाची उकल करावी का असा विचार करते.

मस्त अपडेट्स| अत्ताच मी अकरा वाजता हि सिरियल पाहिलि, तर एथे मामान्चे अपडेट्स हजर . छान वाटले वाचून.

ह्या सिरिअलमधे पार्श्वसंगीत म्हणून मागे कोण एक भसाड्या आवाजात अत्यंत बेसूर गात असतो. अजूनही समजत नाहीका शिरिलवाल्यांना? त्याला बदलावे असे वाटले कसे नाही? लोण्यासाऱख्या आवाजाच्या कांताला तरी द्यायचे..तो थोडा बरा गाईल. श्री पण गाउ शकेल तितपत.

ह्या सिरिअलमधे पार्श्वसंगीत म्हणून मागे कोण एक भसाड्या आवाजात अत्यंत बेसूर गात असतो. अजूनही समजत नाहीका शिरिलवाल्यांना? त्याला बदलावे असे वाटले कसे नाही? लोण्यासाऱख्या आवाजाच्या कांताला तरी द्यायचे..तो थोडा बरा गाईल. श्री पण गाउ शकेल तितपत.

सुमेधा, अगो, अगदी अगदी. पाहिजे तेवढे मोदक घ्या. मागे कधी तरी मी याबद्दल लिहीले होते.

काल शरयू सरूशी बोलताना "माझी" मदत कर च्या ऐवजी "मला" मदत कर असे म्हणत होती.

आजकाल मालीकेमध्ये असे क्वचीत ऐकायला मिळते. केवळ ह्या गोष्टीसाठी बाकीचा बावळटपणा माफ करावा का?

नवीन तर मी आहेच माबोवर. पण खरंतर माझा आळशीपणा नडला. आधीच्या पोस्ट न वाचताच मी माझी बडबड केली. मग नंतर चुक लक्षात आली. रिया, अग मोदक द्यायला कुठलेही कारण लागतेच असे नाही. मोदक द्यायला सदैव तयार आहे.

सारिका, चूक वगैरे काही नाही गं Happy
त्यात काय एवढं Happy
मी सहज तुझी टांग खिचाई करत होते.
आता पुढील चर्चा दुसरीकडे करुयात इथे नको Wink

आजकाल मालिकेमध्ये असे क्वचीत ऐकायला मिळते. केवळ ह्या गोष्टीसाठी बाकीचा बावळटपणा माफ करावा का?>>>बेफिंचे अपडेट्स नसल्याने आपोआप माफ होईल.

प्रसाद ओकचं काम आज एका प्रसंगात आवडलं.. जेव्हा जान्हवी त्याच्या पाया पडते आणि त्याचे डोळे भरून येतात.

शुक्रवार दि. ७ मार्च २०१४ : अपडेट्स

~ विजया बॅन्केत चक्कर आलेल्या लक्ष्मीकांतला त्याच्या घरी जान्हवी बॅन्केतील शिपाई नितीनच्या मदतीने आणते. तिथे आल्यावर त्याला थोडे बरे वाटण्यासाठी ती त्याला पाणी देते. गोळी खाल्ली असल्यामुळे लक्ष्मीकांत आता बर्‍यापैकी सावरला आहे.....इथे काही आवश्यकता नसतानाही हा नितीननामक कर्मचारी लक्ष्मीकांतला "तुम्ही इथेच राहता ?" असा प्रश्न विचारतो....त्याच्याकडे नापसंतीच्या नजरेने जान्हवी पाहते; पण लक्ष्मीकांत "का ?" असा प्रश्न विचारल्यावर नितीन जादाचे बोलतो, "नाही म्हणजे, ताईंच्या सासर्‍यांचे घर म्हणजे मला वाटले बंगला असेल तुमचा..." इथे लक्ष्मीकांत आणि जान्हवी काहीच बोलत नाहीत. नितीन मी चलतो असे सांगून तिथून निघून जातो. थोड्यावेळाने लक्ष्मीकांत जान्हवीला खाण्यासाठी बिस्किट्स देतो. शिवाय आईसाठी मराठी गाण्यांची एक सीडीही देतो मात्र "ही सीडी मी दिली आहे असे आईला सांगू नकोस" अशी सूचनाही करतो. शाराला [शरयूला या नावाने तो हाक मारत असतो] काहीही झाले तरी आईकडे लक्ष दे आणि तिचेच ऐक असा निरोप देतो. जान्हवी त्याला वाकून नमस्कार करते आणि तिथून निघते.

बॅन्केत आल्यावर गीता सासर्‍याविषयी परत तेच विचारते....म्हणजे, "तुझे ते सासरे तर कोणत्या आईचे मिस्टर?" "छोटी आई" असे उत्तर मिळाल्यानंतरही गीताचे त्या पुढील निरर्थक प्रश्न चालूच झाल्यावर मग जान्हवी ऑफिस कामाचा विषय काढून चर्चा बंद करते. सायंकाळी घरी येते त्यावेळी सरूमावशी तिचीच वाट पाहात असते. ती जान्हवीला घरात शरयूमुळे घडलेला रडारडीचा प्रसंग सांगते आणि आता तूच यातून काहीतरी मार्ग काढ आणि शरयूला समजावून सांग अशी विनंती करते.

जान्हवी शरयूच्या खोलीत येते. तिला पाहताच शरयू तिच्याजवळ जाऊन प्रश्नांची सरबत्ती करते. जान्हवीकडून तिला समजते की ती आजही लक्ष्मीकांतच्या घरी गेली होती. पण जान्हवी आजारपणाचे कारण सांगत नाही. श्री आणि जान्हवी दोघांनीही आता आईना सांगून लक्ष्मीकांतबाबतचे मत बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे अगदी हट्टाने म्हणते. जान्हवी तिला थांबविते आणि लक्ष्मीकांतने जो निरोप दिला आहे तो सांगते....त्यात त्याने शरयूला आईजवळ राहूनच तू सुखी होशील असे म्हटले आहे....ते ऐकताना शरयू अविश्वासाने जान्हवीकडे पाहात राहते...."बघ जान्हवी, जो मुलगा आता अशा आजाराच्या स्थितीत आहे तरीदेखील त्याला आईची काळजी आहे; मग तो चांगला नाही का ? आणि तू मला आईआजीच्या स्वभावाविषयी काही सांगू नकोस. तुला बर्‍याच गोष्टी माहीत नाहीत. उमाकांत भावोजी आणि छोटा अमृत अपघातात दगावले त्यावेळी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हे आले सख्खा धाकटा भाऊ म्हणून तर याच आईआजीनी त्याला त्यावेळीही घराबाहेर काढले.....ही बाब तुला योग्य वाटते का ?"

जान्हवी हे ऐकून सुन्नच होते....हाच प्रश्न घेऊन त्याच्या उत्तरासाठी ती आत्ता आईआजीसमोर उभी राहिली आहे.

मामा वाचले अपडेट्स, चांगले आहेत. आता एकेक प्रॉब्लेम सुटत जाईल, त्या जान्हवीला म्हणावं जरा भावाकडेपण लक्ष दे.

विजया बॅन्केत चक्कर आलेल्या लक्ष्मीकांतला <<<ही जान्हवीची बँक ना? म्हण्जे बस स्टॉप पण एकाच आणि बँकही एकच का?

आता खरतर जान्हवीला घरी सांगायला (ती काकाला भेटली) चांगला चान्स आहे. ते बँकेत आले होते. चक्कर येऊन पडले आणि त्यांना घरी घेऊन जाण्याचे जबाबदारी तिच्यावर सोपवली गेली. कारण तसेही बँकेत सगळी कामे ती एकटीच करते उदा. गोखले ग्रुह उद्योगमधे फायली पोचवणे, गोखल्यांच्या घरी चेकबूक पोचवणे, बॉसला स्मितूडीवरून आलेल्य फ्रस्ट्र्शन मघून वाचवणे इत्यादी.

प्रसाद ओकचं काम आज एका प्रसंगात आवडलं.. जेव्हा जान्हवी त्याच्या पाया पडते आणि त्याचे डोळे भरून येतात.>>>> +1.

नताशा....

तू जो अभिप्राय दिला आहेस....त्याच्याच अनुषंगाने आज जान्हवी आजीशी बोलेल असा [माझा] अंदाज आहे. काल तिने आजीच्यासमोर "लक्ष्मीकांत" विषय छेडला आहेच....कदाचित त्या ओघात बॅन्केचाही प्रसंग तिच्या बोलण्यात येईल.

Pages