होणार सून मी या घरची - २

Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31

होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.

विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतुल परचुरे हा बरा नट होता ना? या सिरीयलमधे त्याचे माकड केले आहे. अतिशय पांचट्ट. त्याला काम मिळत नाहीये का कुठेच? किती तो बावळट्पणा. :रागः

कांदापोहे लिहितात : "...अतुल परचुरे हा बरा नट होता ना? या सिरीयलमधे त्याचे माकड केले आहे..." ~ १००% सहमत. खरेच, अतिशय चतुरस्त्र अभिनेता आहेत ते....पण या मालिकेत त्यांचे पुरते काम हास्यास्पद नव्हे तर बावळटपणाचे दाखविले आहे....एका बॅन्केचा हा मॅनेजर आहे....थोडेतरी गांभीर्य असावे !! त्या गीताची चेष्टा करणे आणि उठसूठ "मितूडी मितूडी" म्हणत बायकोचा फोन घेणे..! या व्यतिरिक्त मॅनेजर पदाचे काही काम नाहीच का ?

स्मितूडी...म्हणतो ? मला तर नेहमी मितूडी असेच ऐकू येते....अर्थात मी लक्ष देवून त्याचे संवाद ऐकत नसल्यामुळे तसे होत असेल कदाचित.

गुरुवार दि. २० मार्च २०१४ : अपडेट्स

~ जान्हवी....मालिकेची नायिका. आज या नायिकेला एका मिनिटाचेही काम नव्हते....दिसली नाहीच ती. त्यामुळे कॅमेरा सारा लक्ष्मीकांत आणि शरयू या दोघांभोवतीच फिरत राहिला आणि जोडीला काही वेळ श्री सोबतीला. त्या अगोदर घरातील सर्वांची परवानगी घेऊन विघ्नेश्वराच्या पाया पडण्यासाठी मी छोट्या आईला एकटाच घेऊन जाणार आहे असे श्री सांगतो....फक्त जान्हवी मनातल्या मनात "आश्चर्य आहे..." असा उद्गगार काढते.

वस्तीत घराचे दार बंद करून लक्ष्मीकांत "सखी मंद झाल्या तारका.." गाणे म्हणत आहे आणि नेहमीप्रमाणे त्याच्या घराबाहेर त्याचे काही चाहते त्याचा आवाज ऐकत उभे आहेत. थोड्या वेळाने लक्ष्मीकांत बाहेर येतो आणि सर्वांना विनंती करून आपापल्या घरी जाण्यास सांगतो. सारे गेल्यावर तो दार बंद करून घेतो आणि परत गाणे सुरू करतो. थोड्यावेळाने दारावर नव्याने थाप ऐकू येते. तो कानोसा घेतो आणि दार उघडतो....दारात शरयू आहे, तर बाजूला श्री उभा. लक्ष्मीकांतला कमालीचा आनंद होतो आणि तो दोघानांही आत या अशी विनंती करतो. श्री आणि शरयू आत तर जातात....पण श्री बसत नाही, तो उभाच राहतो. काकाला काही बोलायचे सुचत नाही. तो केवळ शरयूकडे पाहात "बघ, मी घर स्वच्छ ठेवले आहे....पाणी आणतो..." असे काहीबाही बोलत राहतो. श्री छोट्या आईला म्हणतो, "तू बस यांच्याबरोबर बोलत, मी ऑफिसला जाऊन एक मीटिंग अटेंड करून इथेच परत येतो..." पण शरयू त्याला "श्री जावू नकोस ना....तू थांब इथे माझ्याबरोबर.." अशी विनंती करते, पण श्री ला माहीत आहे की या दोघांचाच संवाद होणे आवश्यक आहे त्यामुळे आपण तिथे थांबणे योग्य नाही. तो पुन्हा पुन्हा छोट्या आईला समजावून सांगून काकाकडे पाहात "आजारी आहे ही, तिची काळजी घ्या..." असे सांगून तिथून निघून जातो. तो गेल्यावर शरयू थोडावेळ रडते आणि लक्ष्मीकांत बरोबर संवाद सुरू करते...."तो खूप कामात होता ना, म्हणून असा तो घाईघाईने निघून गेला. एरव्ही तो स्वभावाने फार चांगला, मनमिळावू आहे श्री. सगळ्यांशी आदराने वागतो...." ती लक्ष्मीकांतकडे पाहते...तो म्हणतो, "हं...माहीत आहे मला ते...." बराच वेळ हे पतीपत्नी अशाच संवादावर बोलत राहतात....मग शरयू अखेर लक्ष्मीकांतला म्हणतेच, "तुम्ही या ना घरी आणि एकदा आईंच्या पाया पडा व माफी मागा...त्या जरूर माफ करतील तुम्हाला..." पण लक्ष्मीकांत ठाम नकार देतो. म्हणतो, "खर्‍या आईचा मुलगा असशील तर या घरात तुझे तोंड पाहणार नाही असे तिने म्हटले आहे, त्यामुळे त्या घरात मी परत येण्याचा विचार करू शकत नाही...".

उद्याच्या भागात....श्री लक्ष्मीकांतच्या घरी आला आहे. एक कोरा चेक घेऊन....काकाला म्हणतो, "तुम्ही जी काही रक्कम यावर लिहाल ती तुमची..." लक्ष्मीकांत त्याच्याकडे पाहून म्हणतो "मला गरज नाही या रकमेची...." पण श्री,"मला आहे..." असे म्हणत तो चेक त्याच्या हाती ठेवतो.

मामा अपडेटस बद्दल धन्यवाद. आता हि मालिका बघायचा जाम कंटाळा येतो.

"खर्‍या आईचा मुलगा असशील तर या घरात तुझे तोंड पाहणार नाही असे तिने म्हटले आहे, त्यामुळे त्या घरात मी परत येण्याचा विचार करू शकत नाही...".>>>काहिही!!! आधी याच आईने हजारो वेळा 'दारू सोड' म्हणून सांगितले होते ना, मग तेव्हा ऐकले नाही...हां..तिने "खर्‍या आईचा मुलगा असशील तर दारु पिऊ नकोस" असे सांगायला हवे होते.

हो ना...अन्जू....नव्हती ती आज....एकच मिनिट दिसली, नवरा छोट्या आईला आणण्यासाठी जीना चढून वर जातो, त्यावेळी....त्यामुळे शरयू + लक्ष्मीकांत....आणि त्यांचाही कंटाळा येईल म्हणून दिग्दर्शकाने इकडे बंगल्यावर इंदू व सरूमावशी यांचे इंग्रजीचे हास्यास्पद बालिश प्रयोग दाखविले....काहीही चालले होते.

जे काही चाललं आहे त्याला जान्हवी काय कोणीही कंटाळेल :)) नाहीतर तिची खरी सासुआई म्हणाली असेल तु त्या सहा आयांची करतेस तशी माझीही सेवा कर. सुनबाईच स्टॅन्डर्ड वाढवण्याचं "पाप" तिला कुठे तरी फेडावच लागेल ना Lol

शुक्रवार दि. २१ मार्च २०१४ : अपडेट्स

~ बॅन्केतून जान्हवी श्री ला फोन करीत आहे. सुरुवातीला तो फोन उचलत नाही. पण नंतर घेतो. जान्हवीला वाटते तो ऑफिसच्या कामात आहे; प्रत्यक्षात तो लक्ष्मीकांतच्या घराच्या आसपासच कार पार्क करून शरयूची वाट पाहात आहे. जान्हवी त्याला "तू कुठे आहेस ? कामात आहेस का ?" असे विचारते, तर त्याला तो "हो...काही काम होते का?" उलट विचारतो. जान्हवी "दोन मिनिटे बोलू का ? या प्रश्नाला तो "बोल.." असे म्हटल्यावर ती विचारते, "श्री, काय चालले आहे तुझे ? आज सकाळी तू सर्वांना असे कोड्यात का टाकलेस ? अचानकच छोट्या आईना विघ्नेश्वराच्या मंदिरात घेऊन जायचे असे का ठरविलेस ?".... श्री गडबडतो "तुला काय वाटते ?" जान्हवी "काय वाटतं म्हणजे ? जायचे तर सर्वांनाच घेऊन जायचेस ना..." "नाही मला तसं नाही वाटलं" जान्हवी म्हणते, "अरे छोट्या आईची तब्येतही बरी नव्हती ना...! देवाला असे पेशंटला घेऊन जाणे हा तुझा स्वभाव नाही, हे मला माहीत आहे. सगळ्यांनाच कोड्यात टाकले आहेस तू." श्री स्वतःवर ताबा ठेवून म्हणतो, "जान्हवी, मी जे करतो आहे ते बरोबर करतो आहे...ओके ?माझ्यावर विश्वास ठेव" जान्हवी "ओके श्री. विश्वास आहेच..." एवढे म्हणते आणि गप्प राहते. फोन बंद करताना तो म्हणतो "आपण संध्याकाळी बोलू या..." असे वरवरचे कारण देतो.

लक्ष्मीकांत आणि शरयू अगदी ऐसपैस सतरंजी अंथरुण त्या घरात बसले आहेत...चहा आणि खाणे चालले आहे. शरयूचा आजार जणू पळून गेला आहे व ती नवर्‍यासमवेत छान गप्पा मारीत बसली आहे. तोही प्रेमाने तिच्याबरोबरीने बोलताना श्री चे कौतुक करीत आहे. त्याच्यासाठी स्वतंत्र चहा करतो असे बायकोला म्हणतो. त्यांची बोलणी चालू असताना आता वेळ झाला आहे म्हणत श्री आत येतो. त्याला पाहून काका "मी चहा आणतो" असे म्हणतो, पण श्री त्याला थांबवितो आणि शरयूला म्हणतो, "छोटी आई, निघायला हवे...वेळ झालाय आता..." शरयूला ते पटते....नवर्‍याकडे ती पाहते....तोही मान डोलावतो. मग ही दोघे बाहेर पडतात. कारजवळ आल्यावर श्री शरयूला सांगतो "हे जे काही भेटीचे झाले ते फक्त तुझ्या माझ्यातच ठेवायचे आहे. घरी कळू द्यायचे नाही..." शरयू हसत हो म्हणते...."माझे जरा काम आहे..." असे श्री तिला सांगतो आणि कारजवळच तिला थांबवितो. तो परत काकाच्या घरी येतो...काका त्याला पाहून चमकतो, पण श्री आत येतो आणि म्हणतो, "छोट्या आईला मी इथे आणले आणि मला जसे हवे होते तसे वर्तन तुमच्याकडून झाले....तिला आनंद झाल्याचे दिसत आहे मला....याचा मोबदला मला देणे गरजेचे आहे..." काका म्हणतो, "ती तुझी छोटी आहे ते नंतर, पण प्रथम ती माझी पत्नी आहे...तिला बरे वाटावे याबाबत मी लक्ष घालणारच...त्याबाबत कसला मोबदला ?" पण श्री ऐकत नाही...तो काकाच्या हाती एक कोरा चेक ठेवतो आणि म्हणतो, "हा ब्लॅन्क चेक आहे. यावर तुम्ही जी रक्कम घालायची ती घाला..." काका पुतण्याकडे रोखून पाहतो....म्हणतो, "शरयूच्या तब्येतीची किंमत घेऊ ? गरज नाही मला..." पुतण्या म्हणतो, "मला आहे...." आणि पुढच्या क्षणाला तो चेक काकाच्या हातात ठेवतो. "त्याचं असं आहे की कुठलीही गोष्ट कधी फुकट घेऊ नये, अशी माझ्या आजीची शिकवण आहे...." काका जाणीवपूर्णक हसून म्हणतो, "...आणि आपण केलेल्या मदतीचे मूल्य लावायचे नसते अशी माझ्या आईची शिकवण आहे. मदत ही कायम अमूल्य असायला हवी." श्री तिथून जायला निघतो....काका हाक मारतो, "श्री... माझ्या आईला बरे वाटले म्हणून थॅन्क्स....हे जिच्याबद्दल तू बोलतोस ना ती प्रथम माझी बायको आहे रे बाळा, हे विसरू नकोस...." श्री त्याच्याकडे पाहात असतानाच काका तो चेक फाडून टाकतो....श्री जातो.

बॅन्केत जान्हवीची सहकारी मैत्रीण गीता आपल्या मित्राला फोन लावण्याचा प्रयत्न करीत आहे, पण तो उचलत नाही. ते पाहून ती रडकुंडीला आली आहे. जान्हवी तिला शांतपणे हे प्रकरण हाताळण्याचा सल्ला देत आहे. आपला मित्र भेटतही नाही म्हणून गीता अस्वस्थ झाली आहे. दोघींचे बोलणे चालू असताना लक्ष्मीकांत तिथे येऊन जान्हवीसमोर उभा राहतो. "मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे..." असे म्हणतो. जान्हवी व तो गेस्ट रूममध्ये बसले आहेत. तिथे काका "शरयू व श्री माझ्याकडे आले होते...." हे सांगितल्यावर जान्हवीच्या चेहर्‍यावर आनंद येतो....ती त्याला त्याबद्दल सविस्तर विचारते, तोही सारे सांगतो. जान्हवीचा तर असे काही घडले असेल याचा विश्वासच बसत नाही...पण काका सांगत आहे ते सारे आनंदाने ऐकत बसते.

इकडे गोखले गृहउद्योगमध्ये नवीन जागाभरतीसाठी उमेदवारांच्या मुलाखती चालू आहेत. श्री घेत आहे. एक उमेदवार गेल्यावर दुसरा येईपर्यंत तो फोनवरून चहा मागवितो....दारावर टकटक होते आणि उमेदवार "मे आय कम इन सर ?" असे म्हणत आत येतो....श्री वर पाहतो...आणि आनंदमिश्रीत आश्चर्यचकीतच होतो...तो उमेदवार असतो जान्हवीचा तिच्या गल्लीतील मित्र मनिष. श्री चटकन उठून त्याचे स्वागत करतो. रिसेप्शनीस्टला चहाचा आणखीन एक कप पाठविण्याची सूचनाही करतो....मनिषला तो विचारतो, "सगळं काही ठीक आहे ना?" मनिष दबलेल्या आवाजात म्हणतो, "हो श्री..." पटकन थांबतो आणि वाक्य दुरुस्त करतो..."हो सर...". श्री त्याच्याकडे पाहत राहतो.

मामा, मस्त. आज तो चेक फाडण्याचा प्रसंग मी बघितला. श्री नवीन भरती करतोय तर पिंट्यानेपण यायचं ना नोकरीसाठी.

अन्जू....

नवीन भरती चालू आहे ती क्वालिटी कंट्रोलसारख्या टेकनिकल आणि वरच्या पोस्टसाठी....आणि पिंट्या तर बारावी नापास मुलगा....तो कसा काय पात्र ठरेल त्या जागेसाठी ? म्हणून किमान मनिष तरी या निमित्ताने कथानकात पुन्हा आल्याचे दिसते.

अगो, फालतू भानगड आहे ती!
त्या दोन महामातांना वाटतय की आपला श्री बदललाय. हा जो घरात आहे तो आपला श्री नाहीये. तोतया आहे

त्या दोन महामातांना वाटतय की आपला श्री बदललाय. हा जो घरात आहे तो आपला श्री नाहीये. तोतया आहे
>>>>>>>>> महामाता म्हणजे नक्की कोणाला वाटतय? काय प्रकार आहे हा?

रिया., अगं त्या दोन मातांचा संवाद ऐकला मी पण कशामुळे त्यांना श्री तोतया आहे असं वाटलं ते नाही कळलं.

मराठेशाहीला तोतया प्रकरण नवे नाही. >>> मयेकर होसू ची बाजू लावून धरणे सोडत नाहीत Proud Light 1

Pages