होणार सून मी या घरची - २

Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31

होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.

विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मएपिमध्ये काय दाखवलं म्हणे?? Uhoh
तसा थोडा पाहिला मी... काल प्रथमच बेबीआत्त्या किचनमध्ये पाहिल्या...भांडण मिटण्यापूर्वी त्या चक्क किचनात काम करत होत्या Wink भांडण कालच झालं आणि कालचं मिटलं का?
बेबी 'झिजली' >>> Lol

ती आजी नक्की हिटलर आहे की कैकेयी
एक नहीं दोन नाही एकदम पाच मुलाना वनवास घडवला
बरण्या पण बर्या तिलाच चिकटून बसल्यात
सगल्या नवर्यानी लग्न न करता कसे राहिले

दर रविवारी नसतो. कधीतरी महिन्या-दोन महिन्याने एखाद्या रविवारी असतो. मामांनी मिसला. मी काल मामांना रात्री ९ला फोन केला बघण्यासाठी पण ते बिझी होते. त्यांनी मला साडेदहाला फोन केला.

होय....गावाहून आलो....धावपळही खूपच झाली होती....डोक्यात कालच्या रविवारी महाएपिसोड आहे हे लक्षातही आले नाही. आंघोळ करून मग जेवलो आणि त्यानंतर अन्जूने फोन केल्याचे दिसले. तिच्याशी परत बोलल्यावर तिने महाभागाची माहिती सांगितली.

तुम्ही म्हणजे मी आणि अन्जू....असं म्हणायचं आहे का तुला जानवि ? तसे असेल तर उत्तर हो असे आहे. ती माझी भाची आहे.

ती आजी नक्की हिटलर आहे की कैकेयी
एक नहीं दोन नाही एकदम पाच मुलाना वनवास घडवला>>>> I think people who are writing this line are the new viewer of this serial or they haven't watch the serial properly. Bhagirathi Gokhale haven't asked all her sons to get out of her house. Now I am writing this for the last time on this page.

First of all Bhagirathi Gokhale is not having 5 sons. She has only 3 sons & a daughter.

  • Her 1st son (Shrirang's father) himself left the house because he wanted to make his career in US.
  • Her 2nd son & grandson died in an accident, I guess Indu is not wearing mangalsutra & few dialogues given to her about accident is enough to know the situation.
  • She kicked out her 3rd son only.
  • Her daughter came back cause she don't want to stay with her husband.
  • & Shrirang's aunty(his mother's sister) is not married yet.
  • I think now the things must be clear to the readers of this page.

काल महाएपी मधे असं दाखवलं की गुबगुबीत बेबी आणि शरयू मधील भांडण मिटले सुद्धा... आणि शरयूच्या सांगण्यावरून जान्हवी शरयूच्या नवर्याला मायग्रेनच्या गोळ्या द्यायला जायला तयार होते... ती त्याच्या घरी पोहचेपर्यंत एपिसोड संपला.

त्यातल्या त्यात श्रीच्या काकूची परिस्थिती समजू शकते. तिचा नवरा व लहान मुलगा अपघातात गेले. त्याआधी ती नवऱ्याबरोबर सुखात होती. त्यामुळे त्या दोघांच्या आठवणीत तिने राहाणं एकवेळ समजू शकेल. पण श्रीची आई तर त्या नवऱ्यासाठी रडत बसते जो तिला सरळसरळ ’टाकून’ गेलाय! त्याचप्रमाणे मारहाण करणाऱ्या माणसासाठी शरयूने झुरणं, ज्या नवऱ्याला सोडून आली आहे त्याच्याचसाठी बेबीने वाट पहात राहाणं- हे खूपच unrealistic वाटतं. म्हणजे त्या तिघींनी दुसरं लग्नच केलं पाहिजे असं नाही पण मुळात वाईट वागलेल्या पहिल्या नवऱ्याबद्दलच्या भावना उडून जायला इतका काळ पुरेसा आहे. इथे काकूची परिस्थिती फक्त वेगळी आहे कारण तिचा नवरा चांगला व प्रेमळ होता.

सोमवार दि. ३ मार्च २०१४ : अपडेट

~ शनिवार व रविवार या दोन दिवसांचे अपडेट मला इथे देता आले नाही कारण मी काही कामानिमित्य बाहेरगावी होतो. आज सोमवारपासून वृत्तांत देत आहे.

अर्थात आज जास्तीतजास्त भाग जान्हवी आणि तिचे चुलत सासरे,,, शरयूचा नवरा लक्ष्मीकांत...यांच्यातील संवादासाठी वापरल्याचे दिसून आले. तिच्याकडे शरयूने नवर्‍याच्या प्रकृतीच्या काही गोळ्या दिलेल्या असतात आणि विनंती केलेली असते की प्लीज तिच्याकडे पाहून जान्हवीने लक्ष्मीकांतच्या घरी जाऊन त्या गोळ्या द्याव्यात. जान्हवी नकार देवू शकत नाही. ती त्या पत्त्यावर जाते. तिला आतल्या देवघरातून कुणीतरी पुरुष देवीची पूजा करतानाचे आवाज येतात. ती आत जाते तर भिंतीवर भागिरथीबाईंचा फोटो अडकवलेला असतो आणि लक्ष्मीकांत गोखले त्या फोटोची मनोभावे पूजा करीत असताना जान्हवीला दिसते. ती त्याची प्रार्थना ऐकत असतानाच तिच्या पर्समधील मोबाईल रिंग देतो. रिंगचा आवाज ऐकून काका मागे वळून पाहतो. एका अनोळखी स्त्रीला आपल्या खोलीत पाहून त्याला संताप येतो आणि तुमचे इथे काही काम नसेल तर तुम्ही लागलीच जा.....जान्हवी सुरुवातीला थोडीफार गोंधळते पण ती त्याला आपली ओळख सांगून छोट्या आईने तुमच्यासाठी ह्या औषधाच्या गोळ्या दिल्या आहेत असे सांगते. छोटी आई माझ्या सासुबाई आहेत असे सांगितल्यावर काकाला खूप आनंद होतो. तो "जान्हवी..." अशी आनंदाने हाकही मारतो. त्याला मनस्वी आनंद झाल्याचे दिसून येते. जान्हवीला समोर बसवून तो आई, शरयू, दोन वहिनी, बेबी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे श्री विषयी फार प्रेमाने बोलत राहतो. श्री समवेतच्या लहानपणाच्या आठवणीतही गुंगून जातो. जान्हवीला आता हा इसम काहीतरी वेगळा कौटुंबिक प्रवृत्तीचा वाटू लागतो. ती त्याला वाकून नमस्कार केल्यावर काकाला सूनेने आपल्याला नमस्कार केला त्याचे अप्रुप वाटते. तो जान्हवीसाठी स्वतःच चहा करतो....दोघे बराच वेळ बोलत बसतात....मग जान्हवी आनंदाने तिथून घरी जाण्यासाठी निघते.

इकडून घरात सारेजण पार्टी करणार आहेत म्हणून स्वयंपाकघरात मग्न आहे. आजी कोचवर बोलत बसल्या आहेत नर्मदा आणि इंदूशी.....जान्हवीची आठवण सारेजण काढीत आहेत. ती कुठे गेली आहे हे माहीत नाही. श्री तिला फोन करीत आहे, पण ती उचलत नाही. सारे चिंतेत आहेत....फक्त शरयूला माहीत आहे ती या वेळी कुठे आहे ते, पण सांगणे म्हणजे रहस्यभेद होईल या भीतीने ती चूप बसून आहे. शेवटी एकदाचा जान्हवीचा फोन लागतो. श्री काहीसा चिडला आहे. पण जान्हवी त्याला सांगते, "मी अमुक एका ब्रिजच्या ट्रॅफिकमध्ये अडकले आहे....वेळ लागणार असे दिसत आहे. तरी तुम्ही जेऊन घ्या..." पण आजी 'नको, होऊ दे उशीर, पण तिची वाट पाहू या.." असे म्हणतात. थोड्या वेळाने काहीशी घाबरलेली जान्हवी घरात येते आणि सार्‍यांना दिवाणखान्यात असे आपल्यावर डोळे रोखून पाहात जात आहे हे समजल्यावर डोळ्यातून पाणी वाहायला लागते. ते अश्रू आवरत ती एकदा ट्रॅफिकचे कारण सांगते....पण श्री विचारतो, "ते समजले, पण तू गेली होतीस कुठे ?" या प्रश्नाला उत्तर देंण्यापूर्वी ती हळूच शरयूकडे पाहते, पण शरयू तिला खाणाखुणा करून "काही बोलू नकोस..." अशी विनंती करते. जान्हवी तिला वाचवावे म्हणून, "मी गीताच्या घरी गेलो होतो....तिथे काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम झाला आहे..." असा दुसराच खुलासा करते. तो आजी आणि श्री याना पटतो.

मामा धाग्यावर वेलकम. अपडेट्स गुड. मामा लक्ष्मीकांतचे आईवर इतके प्रेम असते तर तो सुधारत का नाही, आईला बरे वाटेल असे का वागत नाही.

अन्जू....

तो ज्या वयात बिघडला....दारु, जुगार, धंद्यातील बेजबाबदारपणा...वास्तविक घरचा तो कर्ता पुरुष होता. श्री च्या वडिलांनी अमेरिकाला जवळ केले होते....तर इंदूचा नवरा आणि मुलगा अपघाताने स्वर्गवासी झालेले....श्री तीनचार वर्षाचा....अशा समयी लक्ष्मीकांतने आपली जबाबदारी ओळखून गोखले गृह उद्योगाची धुरा सांभाळायला हवी होती. पण त्याऐवजी तो चार टुकार मित्रांना सोबतीला घेऊन लाल वारुणीच्या बाटलीत आयुष्य बुडवित बसला होता.... यामुळे आईने त्याला बाहेर काढले....पण ज्या वयात त्याला ह्या अनिष्ट सवयी लागल्या होत्या त्या वयात सुधारणा हा प्रकार त्याच्या डोक्यात आला नसणारच.....आता सारेच काही दूर झाल्यावर त्याला आपल्या चुकांचा पश्चाताप होत आहे असे दिसत्ये.

त्या काकाला घराबाहेर पडताना आईने स्वतःचा फोटो दिला होता का भिंतीवर लावायला, का शरयू ने लपतछपत नवर्‍याला ती फोटो फ्रेम आणून दिली Wink

कालच काकाचं बोलणं / एकूणच अभिनय फारच मेलोड्रामॅटीक वाटला.

ती जान्हवी एवढी २-३ गायबली होती तरी घरी गेल्यावर काय सांगायचे याचा काही विचार केला नव्हता Uhoh

Pages