होणार सून मी या घरची - २

Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31

होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.

विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे पण केळकर कोण? श्री, शशांक केतकर आहे. नवीन कोण केळकर आलंय का मालिकेत?>>>> हो अन्जु तोच अजुन कोणी नाहीये

जान्हवी काय म्हणेल मग त्यांना छोटे कांतासासरेबुवा, मधले कांतासासरेबुवा ............

बहुदा श्री आधी आयांना जसे लहान आई, छोटी आई, मोठी आई वैगरे हाक मारायचा तसे आता लहान बाबा, छोटे बाबा, मोठे बाबा वैगरे म्हणणार.
आणि जान्हवी लहान सासरेबुवा, छोटे सासरेबुवा… Happy

इतक्या वर्षांत कित्ती दागिने विकून खाल्ले आणि घरातल्या इतर बायकांना पत्ताही नाही!!!
कांता म्हणतो"जेव्हा केव्हा आई आणि मी अशी निवड करायची वेळ येईल तेव्हा आईलाच निवड म्हणावं"..(आणि काय? जमेल तसे पैसे पाठवत जा?)

तेव्हा आईलाच निवड म्हणावं"..(आणि काय? जमेल तसे पैसे पाठवत जा?)>>> Uhoh Lol इमोशनल सीन चा पचका केला गं बै... Wink Biggrin

इतक्या वर्षांत कित्ती दागिने विकून खाल्ले आणि घरातल्या इतर बायकांना पत्ताही नाही!!!
कांता म्हणतो"जेव्हा केव्हा आई आणि मी अशी निवड करायची वेळ येईल तेव्हा आईलाच निवड म्हणावं"..(आणि काय? जमेल तसे पैसे पाठवत जा?)>>>>>=+ ११११

मंगळवार दि. ११ मार्च २०१४ : अपडेट्स

~ आईआजी आणि बेबी दोघीही शरयूच्या कुटुंब व्यथीत करणार्‍या स्वभावाबाबत चिंतेने चर्चा करीत आहेत. आजी शरयूला थेट दोष न देता ही स्थिती कशामुळे आली त्याबद्दल विचार करायला हवा असे म्हणतात तर बेबीला ते पटत नाही. शेवटी आजी "मीच तिला विचारते..." असे म्हणत शरयूच्या खोलीत जातात. तिथे भानात नसल्याप्रमाणे शरयू कॉटवर दागिन्याच्या सार्‍या मोकळ्या पेट्या बघत बसली आहे आणि "त्याना पैशाची गरज आहे...मी आता कुठून पाठवू....? मंगळसूत्रच शिल्लक आहे...तेच विकून टाकते..." असे काहीसे बेताल बोलत आहे....गळ्यातून मंगळसूत्र काढताना ती वर पाहते आणि दचकून थांबते, कारण समोर सासूबाई आहेत तिच्या. आईआजीना ती काहीतरी खुलासा देण्याचा प्रयत्न करते....पण आजी एकच प्रश्न सतत विचारतात..."लग्नापासून तू या घरात आल्यानंतर तुला जितके दागिने दिले होते....ते सारे दागिने कुठे आहेत ? मला तर ह्या पिशव्या रिकाम्याच दिसत आहेत....". आपले रहस्य उघडे पडल्याचे पाहून शरयूची नित्याची धांदल उडते....एक चूक झाकण्यासाठी दुसरी या न्यायाप्रमाणे ती इकडेतिकडे बघत श्री चे नाव घेते....त्याच्याकडे माझे दागिने आहेत. आजीचा अर्थातच ह्या थापेवर विश्वास बसत नाही....श्री कडे म्हणजे जान्हवीकडे ते दागिने आहेत असे समजायचे का ? असे त्या विचारतात....शरयू फक्त मान हलवते घाबरून.....आजी म्हणतात, "मग तू सांगत असलेली ही बाब खरी आहे की नाही याचा तपास आत्ताच करू या....श्री ला फोनवरून विचारते मी..." असे म्हणताच शरयू घाईघाईने त्याना विनंती करते की ते आत्ता ऑफिसमध्ये असतील, त्याना त्रास द्यायला नको....आजी रोखून तिच्याकडे पाहतात...."माझ्या मनी जी एक शंका येत आहे, ती खोटी ठरावी....म्हणून मी आत्ता शांत राहते, श्री आणि जान्हवी ऑफिसमधून आल्यानंतर सर्वांच्यासमोरच खर्‍याखोट्याचा शहानिशा करू या..." असे म्हणत बाहेर जातात. खाली दिवाणखान्यात आजी आणि बाकीच्या चार स्त्रिया याच विषयावर बोलत आहेत. बेबीला शरयूने दागिने श्री कडे दिले आहेत ही थापच वाटते तर बाकीच्या दोघी शरयूने आपल्याला न विचारता दागिने असे का दिले असावे याचा विचार करत बसतात....सरूमावशी चर्चेत भाग घेत नाही पण तिला समजून चुकते की शरयूवर काही तरी संकट येणार म्हणून ती हळूच तिथून निघते आणि वर शरयूच्या खोलीत येते....तिला पाहून शरयू रडून कोसळतेच आणि आपले असत्य आता सर्वांच्यासमोर उघडे होणार या भीतीने हादरते....तिची ती अवस्था पाहून सरूमावशी तातडीने श्री ला ऑफिसमध्ये फोन लावते आणि "तू लागलीच घरी ये..." असा निरोप देते....तो विचारतो की नक्की काय झाले आहे पण त्याला फक्त शरयूचे मोठ्याने रडणे ओरडणे ऐकू येते....तो ऑफिसमधून घरी येण्यासाठी निघतो.

इकडे जान्हवी ऑफिसकडे निघाली असता एका चहाच्या टपरीवर तिला लक्ष्मीकांतकाका दिसतात. तोही तिला पाहतो....दोघे बोलतात. जान्हवी काकाला घरच्याबद्दल सांगते....आजीला सीडी दिल्याचे आणि त्यातील गाणी आजीला खूप आवडल्याचे सांगते.....शरयूला मी निरोप दिला हे सांगताना ती म्हणते, "सुरुवातीला त्या काहीशा अपसेट झाल्या पण..." इथे काका तिला थांबवितो, "होऊ दे....ती कितीही अपसेट झाली तरी तिला तू हेच सांग की मी आणि आई यांच्यात निवड करण्याचा प्रसंग आला तर तिने आईचीच निवड केली पाहिजे....सासू म्हणून तिने शरयूसाठी जेवढे केले आहे त्यातील पाच टक्केसुद्धा मी नवरा असूनसुद्धा केलेले नाही....मी तिला जेव्हा घालवायला निघालो होतो, तेव्हा....." इथे लक्ष्मीकांत अचानक थांबतो आणि बाजूला तोंड वळवितो....जान्हवी त्याच्याकडे पाहात विचारते, "तेव्हा ?", पण तो खुलासा न करतो म्हणतो, "राहू दे, सांगेन तुला पुन्हा कधीतरी.." जान्हवी थोडावेळ थांबते आणि धीर करून काकाला विचारते, "मी तुम्हाला एक विचारू का ?" लक्ष्मीकांत तिला म्हणतो, "जरूर विचार...तू तर माझ्यातील आणि आईतील दुवा आहेस आता, विचार" जान्हवी म्हणते "तुम्हाला इतके सारे वाटते तर तुम्ही असे का वागलात ?" लक्ष्मीकांत चूप राहतो....दोघे पुढे एका हॉटेलमध्ये जातात. तिथे लक्ष्मीकांत आपल्या चुका जान्हवीपुढे कबूल करतो....त्यामागील कारणे म्हणजे नको त्या वयात नको ते मित्र जोडले....पैशामुळे मित्र जमले आणि त्याच मित्रांनी नादाला लावले. जान्हवी ऐकत राहते.

इकडे बंगल्यात शरयू आरोपीसारखी मध्यभागी थांबली आहे आणि श्री ठामपणे म्हणत आहे, "हे घर तुझेच आहे छोटी आई, पण त्याच्याशी संपर्कात राहाणार्‍या कुणालाही ह्या घरात स्थान नाही..." हे जान्हवी चमकून ऐकते.

mama aaj mi pahili pratikriya denari Happy

me pan attach baghat hote malika. pan ekikade laptopvar kam pan suru hote... aata updates vachate

आले मामा मी, मस्त अपडेट्स. सगळे दागिने नवऱ्याला देणारी आणि वर खोटं बोलणारी शरयू, आता तिच्याबाबतीत अजिबात सहानुभूती वाटत नाही पण लीना भागवतने अभिनय चांगला केला असेलना?

हो अन्जू..... लीना भागवत हसण्यात आणि रडण्याच्या प्रसंगीही कधीही कृत्रिम अभिनय करते असे वाटत नाही. गेले काही भाग तर निव्वळ तिच्या अभिनयाच्या क्षमतेवरच चालले आहेत.

"जेव्हा केव्हा आई आणि मी अशी निवड करायची वेळ येईल तेव्हा आईलाच निवड म्हणावं"..(आणि काय? जमेल तसे पैसे पाठवत जा?)... Lol

सगळाच फालतूपणा चाललाय सध्या.

श्री आणि जान्हवी ऑफिसमधून आल्यानंतर सर्वांच्यासमोरच खर्‍याखोट्याचा शहानिशा करू या हे ठीक आहे पण ह्यावर निर्णयही तेच दोघे घेतील हे जरा अतीच आहे Uhoh

थोड्या दिवसांनी श्री ला कळेल की जान्हवी कांता ला भेटते...मग त्यांच्यात वाद...मग जान्हवी घर सोडुन निघुन जाईल....मग दोघे झुरत राहतील.....कांता ला नंतर ब्रेन ट्युमर वगैरे होईल.....मग तो मरेल...मग शरयु जीव देईल किंवा दुख्खातिरेकाने वेडिपिशी होईल....मग पुन्हा कथा जानु कडे वळेल.....मग आई आज्जी मोडुन पडतील....मग म्हणतील.. " देवा हे सर्व बघायला मला का जिवंत ठेवलेस...मला का नाही नेलेस? "....मग इंदु वहिनी त्यांच वाक्य रिपीट करतील..." हो देवा यांना का नाही नेलेस" ...मग जानु त्यांचा सहारा होईल...मग श्री ला तिच्या शिवाय रहवणार नाही......मग ती परत येइल...मग जरा बरे दिवस येतिल...त्यात पिंट्या चा घोळ होइल ...मग ते निस्तरण्यात १ आठवडा जाईल...मग जनु गोड बातमी देईल....मग आज्जी बोलतील कांताच परत येईल....तसा तिला मुलगाच होईल.....अत्त्यानंद मावशी ला तसंही काहीच न करण्याचे पैसे मिळतात...तिच्या ईतकं सुखी कोणीच नाही......आणि इतक्या उलाढाली होउन....जानु चे हेयर स्ट्रेटनिंग तस्से च्या तस्से......फक्त ती जाडी दिसत जाईल जरा जरा.....बाबांना बरं वाटेल...ऑपरेशन नाही केल तरी चालेल.....

आणि मी???????
मी आयडिया घेउन त्यांच्या कडे जाउन मान हलवुन हलवुन बोलेन.......नो उल्लु बनाविंग...नो उल्लु बनाविंग

:रागः :रागः

हो अन्जू..... लीना भागवत हसण्यात आणि रडण्याच्या प्रसंगीही कधीही कृत्रिम अभिनय करते असे वाटत नाही. गेले काही भाग तर निव्वळ तिच्या अभिनयाच्या क्षमतेवरच चालले आहेत.>>>> प्रचंड अनुमोदन मामा तुम्हाला.

आणि लग्नानंतर काही वर्षानी उमाकांता, लक्ष्मीकांता अस्स कस्स झालं गोखल्यांच खुळं माझ्या नशिबी आलं
>>> Lol

कांता म्हणतो"जेव्हा केव्हा आई आणि मी अशी निवड करायची वेळ येईल तेव्हा आईलाच निवड म्हणावं"..(आणि काय? जमेल तसे पैसे पाठवत जा?)>> Rofl

बरंय, ही मालिका बघायला वेळ मिळत नाहीये..

शरयुने दागिने विकले असतिल तर .. सोनाराने फोन कसा नाहि केला आई आजिला ... पिंट्या हार घेउन गेला होता तेव्हा लगेच कळले होते... Happy Happy बहुतेक दुसरया सोनाराकडे गेलि असेल );) Wink

Pages