नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्यांदा हा धागा वाचला. अजुन सिरीय्ल पाहिली नाहीये.. पण जो कोणी लिखक , दिग्दर्श्क असेल त्याने जरुर वाचावा हा धागा. एकतर कामात सुधारना करेल नाहीतर हे कामच करायचे सोडेल Wink

या मालिकेचे आणखी दोन भाग येणार आहेत ! अगदी खात्रीने..

का ते विचारा ?
Ç
Ç
Ç
Ç

कारण त्या गाण्यात ( लेक लाडकी.... ) ती ओळ तीनदा येते Happy

<<त्या सगळ्यांचे नवरे ( ज्यांचे जिंवत आहेत ते ) कदाचित लग्नानंतर दाखवतील.स्टोरी पुढे जाण्यासाठी >>

जिवंत नसतील तर ते जिवंत होतील. डेली सोपवाल्यांच्या लेखणीत सॉल्लीड ताकद असते.

त्या सगळ्यांचे नवरे ( ज्यांचे जिंवत आहेत ते ) कदाचित लग्नानंतर दाखवतील.स्टोरी पुढे जाण्यासाठी >>आणि त्यांना परत आणण्यात हिरवीण मध्यस्थी करेल. हिरो तिला मदत करेल.. त्यामुळे सुरुवातीला हिरवीणीला सासुरवास करणार्‍या सासवा तिच्याशी परत चांगल्या वागू लागतील. अशी स्टोरीलाईन ठेवली, तर महाबोअर होईल ही मालिका.

एकदा का सगळ्या अडचणी संपून लग्न लागले की सिरियल बोअर व्हायला लागेल असे वाटते>> हो.. हेच कुंकू आणि कुलवधू मालिकांच्या बाबतीत झाले होते. इतरही बर्‍याच मालिकांची केस याहून वेगळी नाही. एकदा लग्न झाले की लव्हस्टोरी संपून सासुरवास स्टोरी सुरु होते आणि तीच बोअर होते. परत या मालिकेत जाह्नवीची आई डोक्याला ताप देईल. श्री कडून बाबांचे ऑपरेशन, मुलाला नोकरी ह्या सगळ्या मागण्या करेल. श्री जाह्नवीच्या प्रेमापोटी सगळं मान्य करेल पण सासरच्या मंडळींना ही लुडबुड खपणार नाही.. आधीच मनाविरुद्ध लग्न इ. इ. असं सगळं प्रेडिक्टेबल दाखवतील का?

त्यामुळे सुरुवातीला हिरवीणीला सासुरवास करणार्‍या सासवा तिच्याशी परत चांगल्या वागू लागतील.<< आत्ता पर्यंत च्या त्यांच्या वागण्यावरुन आणि त्यांच्या श्री वर्च्या प्रेमावरुन त्या सुनेशी वाईट वागतील अस वाटत का?

कुजबुज होईल खरी
ठेवू नको अढी
उलट बोलूनी
नको परतू माहेरी

रोज रोज कसरत तारेवरची...

अदिती, ज्या मालिकेचे हे असे शीर्षक गीत आहे, तिच्याकडून तू वेगळी काय अपेक्षा करु शकतेस? Proud

तीन जावा एक सासु एक ननंद अजुन एक जावेची बहीण इतके लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहात असतांना फक्त सुनेशीच
वाइट वागतात. कमाल आहे

तीन जावा एक सासु एक ननंद अजुन एक जावेची बहीण इतके लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहात असतांना फक्त सुनेशीच
वाइट वागतात. कमाल आहे>>> मालिकांमधली नवीन येणारी सून कायम एकतर घरच्यांच्या मनाविरुद्ध तरी आलेली असते किंवा नवर्‍याची अगदी लाडकी तरी असते. त्यामुळे पझेसिव्ह स्वभावाच्या नातेवाईकांची ती इन्स्टन्टली नावडती होते. शिवाय ती फार हुशार, सोशिक, उलट न बोलणारी, समजूतदार, सर्वांना धरुन राहणारी असते. थोडक्यात, राग काढण्यासाठी आणि घरच्यांची सासूरवास करण्याची खुमखुमी जिरवण्यासाठी ती एकदम परफेक्ट असते. Proud
झाडून बहुतेक सगळ्या मालिकांचा हाच्च फंडा आहे!

>>>ही हिरविण त्यांचे नवरे परत आणणार.. तिचा रोलच तो दिसतो>>>
आता मला मेलेल्या तिच्या फॅ.मेंबरांना परत आणणारी वहिनीसाहेब आठवतेय हा.. Proud वीरेन महान है!!

हा धागा वाहता आहे त्यामुळे आपले अमुल्य प्रतिसाद वाहून जाणार....

श्रीच्या आईची तर एकदम भन्नाट स्टोरी आहे. तीने नवर्‍याला प्रेग्नंसीची बातमी दिली त्यामुळे तो घाबरुन जो अमेरिकेत पळाला तो परत आलाच नाहि. >>> Happy
त्याचे अगदी लहानपणा पासून अमेरिकेत जायचे स्वप्न असते.(आता या स्वप्नाला....(अमेरिकेत जायच्या स्वप्नाला) कोण किती महत्व देईल ते सांगता येत नाही....एलदुगो मध्ये तर त्यापायी घना किती घोळ घालतो....तर तुतिमी मध्ये प्रियाचा होणारा नवरा ..त्यालाही अमेरिकेत जायचे असते पण प्रियासाठी तो अमेरिकेला टांग देतो.) त्याची तयारी झालेली असते ... तो तिला बरोबर घेऊन जाणार असतो. ...तर हि त्याला प्रेग्नंसीची बातमी देते....त्याला बाळ नको असते....आणि ती म्हणते मी नाही येणार....त्यांचे इतके मोठे भांडण होते कि तो जातो तो येतच नाही.

या लोकांना अमेरिकेचा विसा मिळतो तरी कसा? आणि उठ सुट कोणीही अमेरिकेतच जातो म्हणतो. अरे कधी जपान, चीन, घाना, वगैरेचे नाव घ्या रे...

दक्षिणा Lol

तो जानवीच्या खोटेपणाचा काय किस्सा आहे?? मी बघितला नाही तो एपिसोड. काल त्या बाया कायतरी बोलत होत्या त्याबद्दल. त्यातल्या एकीला जान्हवी मंडईत दिसते आणि ती येउन सगळ्यांना तिच्याबद्दल सांगत असते. ते आजीबाई ऐकत असतात. मग पुढच्या भागात मधे आजीबाई खोटं बोलण्यावरुन लेक्चर देतायत असं दिसलं.

जान्हवी त्यांच्या घरी चेकबुक द्यायला गेलेली असते....तेंव्हा ती श्री ची नोकरी वाचवण्यासाठी आजीबाईशी खोटं बोलते....पण जेव्हा आजीबाईना कळेल की आपला नातूच खोटं सांगतोय कि तो accountant आहे तेंव्हा त्या काय करणार देव जाणे................

तेंव्हा ती श्री ची नोकरी वाचवण्यासाठी आजीबाईशी खोटं बोलते>>>>>>>>> पण काय खोटं बोलते???

सध्या तरी खूप इंटरेस्टींग मालिका वाटत आहे..श्री आणि जान्हवीचा जोडा मस्तच आहे.टायटल गीत पण छान आहे.रोज आवर्जून बघतो.

आमच्या ठाण्याची म्हणून मालिका आवडतेय ;). शिर्षकगीत अफलातून आहे. आमच्याकडले कार्टूनप्रेमी पण आवर्जून शिर्षकगीताला हजेरी लावतात.

नायक नायिका अजून तरी आवडताहेत. नायिकेचे हसणे थोडे जास्तच असले तरी तिच्या सकारात्मक दृष्टीकोनात ते चपखल बसतय अजून तरी. नायकाला मध्यंतरी ओठाचा चंबू करून बोलायची सवय होती. आता ती खूप कमी झालीये. त्याचा प्रेमात पडण्याचा अभिनय मस्तच आहे. त्याचा तो प्युन पण मस्त आहे. (त्याने आधी कशात काम केलय का?)

नायकाच्या घरी मात्र आनंदी-आनंद आहे. महामालिकेची महानायीका (४ दिवसांची सासू) बघून हादरलोच होतो मी. पण त्या शिर्षकगीताच्या प्रेमात आहे मी म्हणून बघायला लागलोय ('प्रेमात आहे' हा शब्दप्रयोग माझा नाही, मालिकेचाच आहे. हल्ली लोक प्रेमात पडत नाहीत तर ते प्रेमात असतात - In Love यु नो!). नायीका सून झाल्यावर मात्र मालिकेला रटाळ होण्याशिवाय काही पर्याय आहे असे वाटत नाहीये.

देवा, हिला मेगा-सासूची मेगा-सून करू नकोस रे!

Pages