होणार सून मी या घरची - २

Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31

होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.

विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बुधवार दि. १२ मार्च २०१४ : अपडेट्स

~ जान्हवी आणि लक्ष्मीकांत काका गार्डन रेस्टॉरन्टमध्ये चहा घेत बसले आहेत. लक्ष्मीकांत गतइतिहास उगाळत बसला आहे. आता त्याला आपल्या मित्रांनी जोपर्यंत स्वतःजवळ पैसे होते तोपर्यंत कसे आजुबाजूला घुमत होते, दारुच्या पार्ट्या करीत होते, घराकडे त्यामुळे कसे आणि किती दुर्लक्ष होत गेले....याचा पाढा वाचत आहे....त्याला पश्चाताप होत असल्याचे बोलण्यावरून तर दिसतेच तरीही त्यातल्या त्यात तो आईआजींना काही दोष देत नाही. मध्येच तो म्हणतो, "मी असं का केलं, असं का वागलो याचे समर्पक उत्तर कारण मी नाही देवू शकत तरीही तू मी जे काही बोललो ते तू ऐकून घेतलेस ते खूप झालं. अर्थात मी जे काही तुला सांगतोय ते तुला पटेल अशी माझी अजिबात अपेक्षा नाही." जान्हवी शांत आहे....त्याच शांतपणात काकाकडे ती रोखून पाहते, "सख्ख्या भावाच्या अंत्यदर्शनाला तुम्ही पिऊन आला होता, हे कसं पटेल कुणाला ?" काका गडबडतो....काहीतरी उत्तर द्यायलाच पाहिजे म्हणून सूनेच्या चेहर्‍याकडे पाहात म्हणतो, "जान्हवी, मी अंत्यदर्शनाला जायचे म्हणून पिऊन गेलो नव्हतो तर ज्यावेळी मला ती बातमी कळाली त्यावेळी मी पितच होतो. म्हणजे त्या दिवसात मी सतत पितच पडलेला असायचो, त्यात मला काही नवीन वाटत नव्हतेच. पिणारी व्यक्ती आज काहीतरी घडणार आहे तेव्हा आपण प्यायला नको असे काही म्हणत नसते, त्यामुळे मी पित होतोच आणि मग उमाकांत व अमृतची बातमी कळाली तर तसाच नशेत तिकडे गेलो. प्यायला हवे किंवा नको होते असे काही मी समर्थन देत नाही...पण झाले तसे....दारू फार वाईट, फार वाईट....ती पाठच सोडत नाही...."

इथे या वाक्यानंतर जान्हवी खेदाने हास्य करते....काका चमकून तिच्याकडे पाहतो, "तू का हसतेस ?" असे विचारल्यावर जान्हवी म्हणते, "तुम्हाला आवडणार नाही....तरीही मी बोलते. दारू पाठ सोडत नाही असे तुम्ही ज्यावेळी म्हणता ना, त्यावेळी तुम्हीच त्या दारूला मोठे करता....स्वतःपेक्षाही...स्वतःपेक्षा दारू वरचढ आहे, पॉवरफूल आहे असेच मान्य करून टाकता तुम्ही...दारू ठरविणार तुम्हाला सोडायचे की नाही ते ? तुम्ही अगतीक आहात, तिच्यापुढे हात टेकलेत असे सरेंडर करून रिकामे होता....खरं म्हणजे हा प्रकार उलटा असायला हवा. म्हणजे दारू धरायची की सोडायची हा निर्णय सर्वस्वी माणसाने ठरविले पाहिजे. ठरविण्याचा हक्क दारूला नाही द्यायचा...." इतके बोलून समजुतीने जान्हवी काकाकडे स्मित हास्य करीत पाहाते....तो स्तब्धच आहे जान्हवीचे बोलणे ऐकत. जान्हवीचा फोन वाजतो....श्री चा फोन आहे. तो तिला घरी ताबडतोब निघ...काहीतरी झाले आहे असे सांगतो...अन् आपणही ऑफिसमधून बाहेर पडलो आहे असे सांगतो. जान्हवी लक्ष्मीकांतचा निरोप घेऊन तिथून निघते.

घरात जणू काय महाअभियोग चालला आहे.....आरोपीच्या पिंजर्‍यात शरयू आहे आणि बाकीची सात जज्ज आजुबाजूला उभे आहेत. आजी दागिन्याबाबत आणि तिच्या वर्तनाबद्दल शरयूला जाब विचारीत आहेत आणि आतापर्यंत श्री व जान्हवीची खोटी कारणे सांगत बसलेली शरयू कोलमडते आणि आपण सारे दागिने नवर्‍यावर खर्च केलेत असे कबूल करते. "माझी चूक झाली आहे, मला शिक्षा करा हवी ती....पण त्याना माफ करा." असे सातत्याने म्हणत राहते...पण आता आजीबरोबर दोन्ही सासवा व बेबीदेखील तिच्यावर शाब्दिक तुटून पडतात. श्री व जान्हवी काही न बोलता सारी घडामोड पाहात आहेत. प्रसंगी बेबी तर म्हणतेच आता ही इथून जाऊ दे आणि त्याच्याबरोबर आपले नशीब अजमावू देत.....वादाला नवीन वळण लागत आहे असे दिसल्यावर श्री मध्ये लक्ष घालतो आणि छोट्या आईला म्हणतो, "तुला या घरातून बाहेर काढण्याचा कुणाचाही तसा विचार नाही. पण तू देखील या घराचे काही नियम पाळणे गरजेचे आहेच. त्या माणसाला भेटायचे नाही असे एकदा ठरल्यावर त्याला भेटण्यार्‍या कोणत्याही व्यक्तीला या घरात स्थान नाही..." हे वाक्य तो शरयूकडे बघत म्हणतो पण दुसरीकडे ते जान्हवी आपल्यालाही लागू आहे असे समजून घेते.

नंतर स्वतःच्या खोलीत ते दोघे बोलत बसले आहेत....जान्हवी नवर्‍याला म्हणते, "तू छोट्या आईला मदत करायची म्हणत आहेस, पण तुला त्याना काकापासून तोडून देऊन नाही करता येणार...." श्री तिच्याकडे पाहतो, म्हणतो, "तू हे असे म्हणू शकतेस कारण तू त्याना ओळखत नाही...." जान्हवी त्याच्याकडे मुद्दाम रोखून पाहते आणि म्हणते, "त्याना तू एकदाही भेटलेला नाहीस, तरी तू त्याना ओळखू शकतोस. असं वाटतय का तुला ?" या प्रश्नाचे श्री कडे उत्तर नाही.

मामा छान लिहिलेत. बापरे नवरा एवढा दारू पिणारा आणि ती शरयू सगळे दागिने त्याला देते.

गोखल्यांच्या घरात काकाला सुधरवायचे कोणीच प्रयत्न कसे केले नाहीत, त्याला घराच्या बाहेर काढून उलट अधिक दारू प्यायला प्रवृत्त केले. कितीतरी संस्था ह्याबाबतीती काम करतात आपण ऐकतो, अल्कोहोलिक अनोनिमस, मुक्तांगण वगैरे अशा कोणाची मदत घ्यावी असे वाटले नाही कोणाला, आश्चर्य वाटते.

दारूचा नाद लागण्याबाबतची कारणे लक्ष्मीकांत जान्हवीसमोर सविस्तर सांगतो. त्यावरून दिसून येते की त्याच्याजवळ जोपर्यंत गोखल्यांच्या घरातील पैसा येत होता....जबाबदा-या काही नव्हत्या....तो धाकटाच असल्याने....तोपर्यंत त्याच्याभोवती कल्याण करण्याचा आव आणणारे मित्र होतेच, त्यानीच त्याला पुरते लुटले. पैसा संपल्यावर त्या मुंग्या दूर झाल्या....त्याचे नैराश्य त्याला अधिकच आले आणि मग बायकोकडून तो पैसे घेऊ लागला. आईआजी उद्योगधंद्यात मग्न आणि त्यानी हा सुधारत नसल्याचे पाहून सूनेचे अधिक हाल होऊ नयेत म्हणून मग मुलालाच बाहेर काढले....असे कथानक.

Janhawi cha driver ghari sangat nahi ka hi madam baher kuthe kunala kadhi bhetate?
Itakya warshanmadhe sharayu la kalu naye nawra paise kashawar kharcha kartoy?
Evhdhe mothe udyojika--daagdagine ghari thewtat? Sarkha kahitari chorila jaata? Shara ne sagale dahine wikale hote tar shree janu cheap lagnat mirwayala tichyakad kuthun ale dahine?
Janhawi chya banke cha timing nakki kay ahe? Bhar unhachi kaka la bhetayala kashi jau shakate ti?
sagale tracks achanak ka open kele asawet? --#kant simran, pintya apte, shara kanta, baby dewndra rahila ata... aai ajji nchya nawaryachinpan kahi story aselach.m
Janhavi cha mitra kuthe gayab zala?

....contd...

abcdefghijklmnopqrstuvwxyzabcdefghijklmnopqrstuvwxyzabcdefghijklmnopqrstuvwxyzabcdefghijklmnopqrstuvwxyz Sad

गोगा ४ दाच का? Happy
गीता ह्या प्रश्नांसाठी वेगळा धागा काढावा लागेल Lol
आणि तरीही संपणार नाहीत..

आईआज्जीने उद्योग वाढवला पण आपली पोरं सुधारण्या ऐवजी घराबाहेर का काढली? Uhoh
घरात इतक्या गाड्या पडून असतानाही शरयू भाजीला रिक्षाने का जाते? Uhoh
काका २३ वर्ष घराबाहेर आहे, शरयू इतकी वर्ष त्याला दागिने पुरवून पुरवून देतेय. कुबेराचा खजिना होता की काय तिच्याकडे? आणि इतक्या वर्षात एकही असा सण आला नाही जेव्हा हे दागिने घालण्याची वेळ आली असेल? Uhoh

दक्षिणा हे प्रश्न फक्त आपल्यालाच पडतात. लेखक आणि दिग्दर्शक स्वतःच्या सोयीनेच कथानक वळवतात.

घरात इतक्या गाड्या पडून असतानाही शरयू भाजीला रिक्षाने का जाते? >>वाहनचालक चुगली करेल म्हणून.

ती अधून मधून भाजीचे पैसे पण देत असेल आणि तिचा पॉकेटमनी सुद्धा. Proud

गुरुवार दि. १३ मार्च २०१४ : अपडेट्स

~ जान्हवी आणि श्री या जोडीत शरयूची स्थिती आणि घरातील त्यामुळे बदललेले वातावरण याबाबत दीर्घ असा संवाद घडतो [जो खूपच चांगल्या रितीने लिहिला गेल्याचे जाणवले....लेखिकेने विशेष श्रम घेतले आहेत]. श्री आक्रस्ताळेपणे वेडेवाकडे बोलत असल्याने जान्हवी "शरयू प्रश्नावर उपाय" या विषयावर आपण नंतर बोलू या असे सुचविते कारण ती जाणते की बोलले पाहिजे असे की श्री ला संशय येता कामा नये की आपली पत्नीदेखील काकाला भेटते. अर्थात संवादाला खूप वेळ दिला जाणे योग्यच होते. बेबी आणि इंदू आजीच्या खोलीत त्या त्रासल्या असतील म्हणून तिथेच झोपण्यासाठी येतात, पण आजी त्याना तसे करू देत नाही. "मी ठीक आहे, माझी काळजी करू नका. तुम्ही जावा" असे सांगून त्या एकट्याच विचारात आरामात खुर्चीत बसून राहतात.

इकडे जान्हवी कॉटवर बसली आहे तर श्री रुममध्ये अस्वस्थपणे येरझार्‍या घालीत आहे. त्याला शरयू प्रश्नावर काय उपाय काढावा हे काही सुचत नाही. वैतागून तो जान्हवीला "चल, आपण बाहेर कॉफी पिऊन येऊ या..." असे सुचवितो पण जान्हवी "अरे, आपण एरव्ही जातो ते ठीक आहे, पण घरात अशी स्थिती असताना बाहेर जाणे योग्य नाही वाटत.." असे सांगून तो विषय टाळते. श्री स्वतःशीच बडबडत आहे, "मला छोट्या आईचे हेच कळत नाही....एकीकडे आईआजीने घालून दिलेले नियम पाळायचे नाहीत, तर दुसरीकडे तिचे म्हणणे आम्ही ऐकायचे, म्हणजे काय ? मला तिच्याकडून जास्त समजुतदारपणाची अपेक्षा होती. तिला स्वतःच्या हिताचा विचार करता येत नसेल तर आईआजी तिच्यासाठी जे करत आहे ते तिने का स्वीकारू नय ? तिला तू सांग की स्वतःचा निर्णय घे आणि वाग तसेच.".... इथे श्री थोडा वेळ थांबतो आणि जान्हवीजवळ येऊन म्हणतो, "म्हणजे असे तर नाही ना की ती त्याच्यासाठी हे घर सोडून कायमची निघून जाणार ? तुला काय वाटते ? ती सर्व बाजूंनी विचार करेल ना ? आय होप....तिने इथेच राहणे शहाणपणाचे आहे.".....जान्हवी नवर्‍याची तडफड ओळखते पण ती काहीच बोलत नाही....श्री परत म्हणत राहतो, "आत्ताची परिस्थितीच अशी आहे की मीच कशाची खात्री देवू शकत नाही. जान्हवी, छोटी आई घराबाहेर पडली, हा मी विचारच नाही करू शकत....मला हा विचार सहनच होणार, शिवाय घरातील बाकीच्याही सार्‍या खचतील गं ! ती राहील ना ? तुला काय वाटतं ?" श्री उत्सुकतेने आणि आशेने आपल्या बायकोच्या चेहर्‍याकडे पाहतो पण जान्हवी त्याच्याकडे पाहत नकारार्थी मान हलवते, "खात्री नाही मला त्याबाबत...".....श्री कावराबावरा होतो, "मग जान्हवी मला सांग ना मी काय करू आता...? तू बोल ना माझ्याशी....मी करतो ते बरोबर करतोय ना ?" जान्हवी ओळखते की श्री भावनाप्रधान झाला आहे. ती म्हणते, "श्री ऐक ना...नंतर बोलू या आपण या विषयावर..." श्री, "नाही, नको, नंतर का ?" "कारण, आत्ता तुला तुझंच बरोबर वाटते ना....तर ते तसंच राहू दे. मला माझं मत यावर आत्ता देवू सारखे नाही वाटत. म्हणजे ही वेळ नाही, आणि कदाचित मी जे काही बोलणार आहे ते तुला आवडणार नाही." श्री गोंधळतो, "म्हणजे काय ?" जान्हवी म्हणते, "हे बघ श्री, एकाच गोष्टीकडे बघण्याचा आपला अ‍ॅंगल वेगवेगळा असल्याने आता मी जे काही सांगेन ते तू ऐकून घेणार नाहीस, ऐकलास तर पटणार नाही." श्री म्हणतो, "तू सांगच जान्हवी...म्हणजे मी जर काही चुकत असेन तर मला आत्ताच कळले, समजले पाहिजे ना...?" जान्हवी म्हणते, "चूक की बरोबर हा प्रश्न नाही, त्यातील फरकाचा नाही....फरक असलाच तर तो दृष्टीकोणाचा आहे." श्री इथे जोरात म्हणतो, "तोच तर इथे कळायला हवा ना..." जान्हवी शांत राहते आणि निग्रहाने बोलते, "श्री छोटी आई काकांवर प्रेम करतात रे." श्री चिडतो, "हाच तुझा वेगळा अँगल आहे का ?" जान्हवी म्हणते, "बघ, तू पहिल्याच वाक्याला चिडायला लागलास." श्री तेवढ्याच घाईने म्हणतो, "मी चिडलेलो नाही....छोटी आई काहीतरी चुकीचा निर्णय घेईल याची भीती वाटते मला, बाकी काही नाही. " "पण श्री आता तूच त्याना त्यांचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहेस ना ? मग आता त्यावर बोलून काय उपयोग सांग ?" "होय, पण आपण त्यावरच बोलू या ना..." जान्हवी म्हणते, "श्री, आता त्यावरून आपल्या दोघात भांडण नको आहे मला...बाकी काहीही असो." श्री निर्वाणीचे बोलतो, "होऊ दे ना भांडण. चांगल्या गोष्टीसाठी होणारे भांडण चांगलेच असते ना ? तसेच आपण जे काही बोलत आहोत ते छोट्या आईच्या प्रेमाखातरच बोलत आहोत." इथे जान्हवी पुन्हा त्याच्याकडे पाहते आणि शांतपणे म्हणते, "मग त्या जे काही करत आहेत ते त्यांच्या प्रेमाखातरच करीत आहेत ना ? काकांवर प्रेम आहे रे त्यांचे....तुमच्यावरही आहे, म्हणून ह्या घरच्या एक सदस्या म्हणून तुमच्या म्हणण्यालाही त्या तितकाच मान देत आहेत ना ? श्री, तुम्ही आणि काका यांच्यात त्या अशा काही सापडल्या आहेत की यात होणारी त्यांची घालमेल एक स्त्री म्हणून मी समजू शकते. त्यांच्यावर त्या किती प्रेम करतात हे मी जाणते." श्री खेकसतो, "प्रेम करण्याच्या लायकीचा माणूस आहे का तो ? अशा माणसावर प्रेम करीत राहणे म्हणजे वेडेपणा आहे." जान्हवी गप्प राहते ते पाहून श्री तिला म्हणतो, "जान्हवी बोल ना...काय झालं ?" जान्हवी म्हणते, "श्री तू अगदी जजमेन्टल बोलतो आहेस. तूच मला म्हणाला होतास ना छोट्या आईंशी बोल, त्यांची मैत्रिण हो. आणि खरं तर आज मी त्याच नात्याने, किंबहुना एक माणूस म्हणून समजून घेण्याचा मी प्रयत्न करत आहे.....आणि खरं सांगू श्री...माझंही तुला हेच म्हणणं आहे की बाकी सगळं बाजूला ठेवून एक माणूस म्हणून तू त्याना समजून घे." जान्हवीकडे बघत श्री म्हणतो, "मी तसे करतोच ना, जान्हवी..." "हो मला कळते, म्हणूनच मला तुझे कौतुकही वाटते....पण कसं आहे माहीत आहे का श्री...तुला त्यांची मानसिक अवस्था समजून घ्यायची आहे...यासाठी तू काहीही करायला तयार आहेस, पण त्याचवेळी दुसरीकडे त्यानी काकांशी संबंधही ठेवलेले चालणार नाही तुला....म्हणजेच याचा अर्थ की हे सारे परस्परविरोधी होत चालले आहे. ...अरे कॉन्ट्राडिक्ट करत आहेत गोष्टी एकमेकाविरुद्ध." श्री मान हलवून म्हणतो, "हे बघ जान्हवी, मी खूप लॉजिकली विचार करण्याचा प्रयत्न करतोय." जान्हवी त्याला थांबविते, "नाही, तू एरव्ही तसा विचार करतोस, पण ज्यावेळी तुझ्या फॅमिलाचा प्रश्न येतो ना त्यावेळी तू भावनिक होऊन जातोस. लॉजिकचा काहीच संबंध उरत नाही तेव्हा." श्री म्हणतो, "ओ कमॉन जान्हवी, मारहाण करणार्‍या नवर्‍यासोबत बायकोने राहू नये असे म्हणण्यामागे कोणतेही लॉजिक नाही. त्यामागे एक साधा विचार आहे." जान्हवी म्हणते, "ओके, पण अशाही स्थितीत छोट्या आईना त्यांच्यासोबतच राह्यचे असेल तर मारहाणीखेरीजही काहीतरी दुसरा विचार त्यांच्या मनी असेल...असं त्याना वाटत असेल श्री." श्री मान हलवून अविश्वासाने म्हणतो, "अशक्य आहे. ही केवळ पळवाट आहे....आणि जान्हवी तू बरी आहेस ना ? दारू पिऊन बायकोला मारहाण करणार्‍या नवर्‍याला डीफेन्ड करत आहेस तू." जान्हवी थेट म्हणते, "नाही, अशा कुठल्याच माणसाला मी डीफेन्ड करीत नाही." श्री उद्गगारतो, "मग काय म्हणतेस ? ह्या माणसाबरोबर छोट्या आईने राहावे असे तुला म्हणायचे आहे ?" जान्हवी बोलते, "असे मी काहीच म्हणालेले नाही श्री.....माझा रोख तसा नाही.." "मग कसा आहे?" या प्रश्नावर जान्हवी शांतपणे बोलते, "श्री आपल्याला जर खरंच छोट्या आईला मदत करायची असेल तर ती त्याना समजून घेऊन करावी लागेल. " श्री वैतागतो "मग आता मी काय करायला हवं ? काकाला घरी घेऊन येऊ का ?" जान्हवीने आपला तोल ढळू दिलेला नाही, ती म्हणते, "आपण नंतर बोलू या का ? कारण आत्ता तू माझे काहीच समजून घेण्याच्या मनःस्थितीत नाही आहेस तू." श्री अगदी गंभीरपणे म्हणतो, "त्याची काळजी तू करू नकोस. आईच्या पोटात असताना ज्याला बाप सोडून गेला त्याचा मुलगा आहे मी. ..त्यामुळे तुझ्या या बोलण्याने माझी मनःस्थिती बिघडेल असा विचारही मनी आणू नकोस." जान्हवी दुखावते, "अरे श्री...तू काही कुठेही हे सारे जोडत आहेस..." श्री म्हणतो..."हे बघ जान्हवी तू माझी बायको आहेस आणि...." जान्हवी त्याला थांबवते, "मग नवराबायको या नात्याने मी तुझ्या प्रत्येक हो ला हो मिळवायचे असे तुला म्हणायचे आहे का ?" "नाही नाही, मी तुझे म्हणणे प्रत्येक खेपेस स्वतंत्रपणे ऐकून घेतोच ना....तू बोल." जान्हवी अगदी निग्रहाने म्हणते, "श्री तुला जर त्याना मदत करायची असेल...तर ती त्याना काकापासून तोडून नाही करता येणार...." श्री सुन्नपणे बायकोकडे बघत राहतो....रागावर ताबा ठेवतो, "तू हे जे म्हणत आहेस म्हणजे तू त्याला ओळखत नाहीस..." जान्हवीही निर्णयाप्रत आली आहे, तीही नवर्‍याच्या डोळ्याला डोळा भिडवून म्हणते, "त्याना एकदाही न भेटता तू त्याना ओळखतोस....असे वाटते का तुला ?" श्री मुकाटच होतो.

[ हा प्रसंग फार नाट्यमयरित्या रंगला हे सांगितले पाहिजे]

दुसर्‍या दिवसाची सकाळ. सरूमावशी शरयूच्या खोलीत तिला उठवायला आली आहे. ती उठत नाही, ते पाहून तिच्या अंगावरील पांघरून ती ओढते, तर शरयू निद्रेत बडबडत आहे....आणि तिला खूप ताप आला आहे. सरूमावशी घाबरून खाली येऊन सार्‍यांना तापाबद्दल सांगते. डॉक्टरांना बोलाविण्यात येते....तिच्यावर उपचार सुरू आहेत....आता मात्र बेबीआत्या, श्री, नर्मदा या सर्वानाच शरयूची काळजी वाटत आहे. बॅन्केत जान्हवी गेली आहे. तिथे तिचे लक्ष लागलेले नाही. मॅनेजर तिची अवस्था पाहून रजा काढ अशी सूचना करतात. पण ती नको म्हणते.

रात्री ती आजींना भेटली आहे आणि विचारीत आहे..."आईआजी, असे नेमके काय घडले की ज्यामुळे तुम्ही काकांना घराबाहेर काढले ?"

मामा , वाक्यन्वाक्य लिहून काढतात. उद्या मधले म्युझिक (ढॅ... ढॅ...), आणि जाहिराती वगैरे पण टाकतील... अशी आशा आहे... Light 1 घ्या मामा.....

अन्जू....आणि गोष्टीगावचे....

~ आजच्या भागातील जान्हवी आणि श्री यांच्या संवादाची प्रभावी बांधणी मला फार भावली....जान्हवी पत्नी आहे हे मान्य पण त्याचबरोबरीने ती एका अशा स्त्रीची बाजू घेणारी आहे की जिच्या वैयक्तिक भावनांचीही तिला कदर आहे. त्यामुळे पतीला ती थेट विचारते, "म्हणजे मी तुझी बायको म्हणून तुझ्या हो ला हो म्हणायला हवे का ?" स्त्री चा हा स्वतंत्र बाणा लेखिकेने छान दाखविला आहे....त्यामुळे इथल्या सार्‍याच स्त्री वाचकांच्या दृष्टीने मला तो संवादाचा सारा भाग द्यावासा वाटला...इतकेच.

श्री.गोगा..... मालिका बघण्याच्या चिकाटीच्या संदर्भात इथेच मागे एकदा खुलासा केला होता की (जो कदाचित तुमच्या वाचनात आला नसेल.....) मी केवळ "होणार सून मी ह्या घरची" हीच एकमेव मालिका बघत असतो. टीव्ही चॅनेल्सवरील अन्य कोणतीही [मराठी, हिंदी, इंग्रजी] मालिका मला बघण्याची अनुमती नाही.....[प्रकृती अस्वास्थ्यामुळे]....त्यामुळे ही मालिका मनापासून पाहत असतो असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

>>केळकर ...<< केतकर हो... गलतीसे मिस्टेक होया. ....

>>बाकी प्रसाद ओअक ला एव्हढ्या इमोशनल भुमिकेत बघवत नाही !!!<<<
प्रसाद ओक दिसतो टर्रेबाजचा त्यामुळे तो शोभत नाही. तरी बरं, आणखी एक पुरुष पात्र आणलं नाहितर कंटाळा आला बघून तो एकच लांडोर..(म्हणजे केतकर हो).

त्या सर्व बायांमध्ये त्या श्री ला बोर कसं होत नाही हा प्रश्ण आहे. Proud

(भारतात ह्या सिरीली बघायचे वेड लागते... छ्य्या!)

अशोकमामा, तुम्ही एकदम माझ्या एका काकीसारखी अपडेट्स देता..

ती प्रत्येक भाव, हालचाल सांगेल ..
म्हणजे, शरयु तितक्यात हात पुसत, चेहर्‍यावर चिंतित भाव घेवून बेडरूमध्ये येते जान्हवीच्या वगैरे...
अगदी असे सांगते ती..
तिला अपडेट्स विचारण्यापेक्षा सिरीयल बघितली तर लवकर आटपेल..

पण तुमच्या चिकाटीला सलाम!(चांगला अर्थाने हा).

झंपी....

धन्यवाद.... तुमच्या काकी जशा देत असत तसेच अपडेट्स देत असेन मी, तर मला खात्री आहे की नक्की त्याना हे वाचन आवडत असेल..... नेमके असेच मला इथल्या माझ्या अनेक भाचेभाच्यांनी खास अशी विनंती केली होती की "मामा, अगदी सविस्तर पद्धतीने मालिका भागाचा वृत्तांत द्या..." त्याना ना ८ चा ना ११ चा भाग पाह्यला मिळतो, म्हणून ते माझा हा असा बर्‍यापैकी दीर्घ असा प्रतिसाद नंतर वाचतात.....त्यामुळे मग ती सवयच पडून गेली आहे. बरेही वाटते इतके टंकन करताना.

मलाही मामांच्या अपडेट आवडतात. माझ्याकडे इथे झी मराठी नाहीये. नेटवर लिंका शोधून मालिका बघण्याइतका पेशन्स नसतो. पण एकेकाळी ही मालिका बघत असे आवडीने. त्यामुळे आता अपडेट वाचून कळतं तरी काय चाललंय ते.

मामांना अनुमोदन. परवाचा शरायू ला जाब विचारण्याचा आणि कालचा श्री जानव्ही प्रसंग छान घेतले आहेत. श्री ऐन प्रसंगात शांत वागतो पण बेडरूम मध्ये बायको समोर आपला वैताग आणि असमर्थता व्यक्त करतो. त्यांचा
संवाद खरेच बघण्यासारखा होता. अगदी नैसर्गिक काम केले आहे दोघांनी.

घरातले सर्वच जण मनातली दु:खे दाबून आ नंदात जगायचे प्रयत्न करत असतात पण शरयूच्या प्रश्नामुळे
प्रत्येक जण आतून कसा तुटत गेला आहे ते हळू हळू दिसते आहे. श्रीच्या मनातही बाप सोडून गेल्याचे शल्य आहे. बेबी पण कसल्यातरी आठवणीने रडायला आलेली आहे. गीता व बॉस ही पात्रे कॉमिक रिलीफ साठी आहेत पण ती नटी अगदी छान अभिनय करते. जुन्या मराठी चुणचुणीत हे एक विशेषण होते तशी ती आहे. नॉर्मल मुलगी.

मामा कसले ग्रेट आहात तुम्ही. डिटेल मध्ये संवाद लिहिताय. मी पण कालचा भाग बघू शकले नाही पण मामांच्या अपडेट्स नी सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. खरच सलाम तुम्हाला Happy

Pages