होणार सून मी या घरची - २

Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31

होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.

विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या जानूपेक्षा आपल्या अंजूलाच त्या पिंट्याची काळजी जास्त आहे.
तिच्यासाठी तरी पिंट्याची गाडी रुळावर आणा आता......

हो ग अवनी, मला तो रोहन गुजर खूप आवडतो अगदी लहान भावासारखा वाटतो. बाबांच्या पायाचीपण काळजी वाटते पण कोणी लक्षच देत नाहीत त्यांच्या घरातले.

अवनी नाही ग, माझा भाऊ आणि बाबा खूप चांगले आहेत. मामापण चांगले आहेत.

sorry इथे अवांतर लिहिल्याबद्दल.

मी पण sorry....अवांतर बद्दल......(मंजूडी ला फार्फार घाबरते बै मी )
पण आता मालिका इतकी पकवायला लागलीय तर आमचं लक्ष वर्गातून बाहेर जाणारच ना.....

बुधवार दि. ५ मार्च २०१४ : अपडेट्स

~ श्री जान्हवीवर खूप खूष आहे कारण त्याच्या मतानुसार आज घरात जे प्रसन्न वातावरण झाले, खास मेजवानी रंगली हे सारे जान्हवीने घेतलेल्या पुढाकारामुळे घडले असे तो म्हणतो. जान्हवी एकीकडे नवर्‍याकडून स्तुती ऐकून घेते खरे, पण तिचे मन तिला खात आहे कारण ती आईआजी व श्री याना न सांगता लक्ष्मीकांतला त्याच्या घरी जाऊन भेटली आहे अन् हे जर श्री ला कळाले की त्याचा परिणाम बिकट होणार याची तिला खात्री आहे. त्यातूनही त्याला ती सांगण्याचा प्रयत्न करीत आहे; पण तो इतका आनंदी दिसत आहे, तर त्या आनंदावर विरजण पडायला नको असेच तिचे मन सांगते व काकाभेट गुपीत तिच्याजवळ राहते.

बेबी कालपासून आपल्या भूतकाळातील रम्य आठवणीत रमली आहे. तिने नवरा - देवेन्द्र - ची कवितांची वही हातात घेतली आहे आणि त्याच्या कविता वाचत बसली आहे. प्रत्यक्षात तिचे प्रकरण तिचा भाऊ लक्ष्मीकांतला माहीत आहे आणि तोच ती वही घेऊन देवेन्द्रच्या कविता मोठमोठ्याने म्हणत विडंबन करीत आहे. या दोघांना भूतकाळातील भेटीत दाखविले असून या बहीणभावांचा त्या वहीवरूनचा लटका रुसवा त्यांची आई कौतुकाने पाहात आहे. देवेन्द्रच्या कित्येक कवितांना लक्ष्मीकांतने सुंदर चाली लावल्याचे आईआजी आवर्जून सांगतात आणि त्याचबरोबर त्याही मुलाच्या आठवणीत रमून जातात.

स्वयंपाकघरात जान्हवी चहा करत आहे तर शेजारी शरयू बोलत बसली आहे.....ती नवर्‍याबाबतच्या आठवणी जान्हवीबरोबर बोलू इच्छिते, पण खुद्द जान्हवीला ते नकोसे झाले आहे. शरयू आता ओळखून आहे की जान्हवीचे गोखल्यांच्या घरात वजन वाढलेले आहे तेव्हा ती तिलाच विनंती करते की तिने आईशी या संदर्भात म्हणजे लक्ष्मीकांतला क्षमा करण्याबाबत बोलावे. जान्हवी घाबरून म्हणते, "छोट्या आई, तुम्ही माझ्याकडून खूप अपेक्षा करीत आहात....". शरयू अगदी हट्टाने हे तूच करू शकतेस असेच म्हणत राहते. तिथे बेबी येते. ती आईसाठी चहा घेण्यासाठी आली आहे. ती संधी साधून जान्हवी चहाचा कप घेऊन आईकडे निघते.

आई खोलीत लक्ष्मीकांतच्या आठवणीतच आहेत. तो गाणे म्हणत असल्याचा तिला आठवते. वरील खोलीत तो "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे...." गाणे म्हणत आहे....आणि खाली आईआजी, नर्मदावहिनी आणि बहीण बेबी कौतुकाने ते गाणे ऐकत आहे. त्याला चहा घेऊन वर या असे आजी सांगून त्याच्या खोलीकडे जातात....तिथे तो रमलेला दिसतो....आजी शेजारच्या कॉटवर त्याला जाणीव होऊ न देता बसतात....थोड्यावेळाने नर्मदावहिनी आणि बेबी चहा घेऊन तिथे येतात.....गाणे संपल्यावर लक्ष्मीकांत भानावर येतो. तो सर्वांकडे पाहतो. आईआजी त्याला आपल्याजवळ बोलावून आशीर्वाद देतात, "गाणे जो पर्यंत तुझ्याकडे आहे तोपर्यंत तुला कसलीही चिंता नाही. आनंदात राहशील...". आजी वर्तमानात येतात. जान्हवी चहा घेऊन आली आहे त्यांच्यासाठी. तिच्याकडे हसत पाहून त्या म्हणतात, "कालचा गाण्याचा कार्यक्रम ऐकल्यावर मला मी ऐकलेला एक सर्वोत्कृष्ट गायक आठवला...." जान्हवी विचारते, "कोण ?"....आजी तिच्या चेहर्‍याकडे पाहतात पण उत्तर देत नाहीत.

तो श्री इतका मठ्ठ कसा Uhoh बायकोचे काहीतरी बिनसले आहे / ती कसल्यातरी चिंतेत आहे हे त्याला कसे कळले नाही? तिचा चेहरा, बोलण्याची पद्धत, एकूण संवाद, स्पर्श कशानेच त्याला काहीच कळू नये?

त्यांच्या त्या गप्पा आणि गाण्याच्या कार्यक्रमात पण तिचा नेहमीसारखा सहभाग नव्हता हे पण त्याला समजले नाही.

नाही तेव्हा उगाचच हसत असते आणि आता तोंड पाडून बसली आहे हे ही त्याच्या लक्षात आले नाही.

नाही तेव्हा उगाचच हसत असते आणि आता तोंड पाडून बसली आहे हे ही त्याच्या लक्षात आले नाही.>> हाहाहा...
हो नं, इतर वेळी तर अगदी या जिवाचं त्या जिवाला सग्गळ्ळ सग्गळ्ळ कळत असतं

श्री ला कळलंय. जान्हवी जाताजाता शरयूच्या खांद्यावर थोपटून जाते हेही पाहिलं त्याने. नात्यातली स्पेस जपतोय तो फक्त Wink

बाकी आपटे प्रकरण काऽहीऽही चालू आहे. गोखल्यांच्या दोन कांतांपाठोपाठ आता बेबीच्या कांताशीही त्याची गाठ पडलेली दाखवली तर तो प्रसंग व्हॉट्सअ‍ॅपवर 'हाईट ऑफ योगायोग' म्हणून फिरवायला हरकत नाही. आणि पिंट्याला हा "गोखल्यांच्या घरात तुझी बहीण सुखी नाही,तुझ्या बहिणीला श्री नांदवणार नाही पण तिच्याशी काय कुणीही लग्न करेल." असे सांगतो आणि पिंट्या ऐकतो ? Uhoh आपटे अगदी टोटल MCP दाखवला आहे सुरुवातीपासून आणि पिंट्याला ह्याच कारणासाठी त्याची चीड आलेली दाखवलीय ! पिंट्या त्याच्या नादी लागेल हेच आधी पटण्याजोगे नाही. ह्या मालिका लिहिणार्‍यांची स्मरणशक्ती इतकी कमकुवत कशी ? काहीही अतार्किक दाखवतात !

काहीही अतार्किक दाखवतात !>> यावरून प्रसाद ओक झीच्या सारेगमप मध्ये होता म्हणून त्याला जबरदस्तीने गायला लावलं. वर 'लोण्यासारखा आवाज' आहे त्याचा हे जबरस्तीने आपल्याला ऐकायला लावलं! Proud

यावरून प्रसाद ओक झीच्या सारेगमप मध्ये होता म्हणून त्याला जबरदस्तीने गायला लावलं. वर 'लोण्यासारखा आवाज' आहे त्याचा हे जबरस्तीने आपल्याला ऐकायला लावलं! >>> +१ Lol

नाहीतर लक्ष्मीकांत अचानक गायला कसा लागला असता? >>> अंताक्षरी, गाणी असले प्रकार सुरु झाले की मालिका पाणचट व्हायला सुरुवात असे समजावे. बावर्‍या राधात सारखी असायची गाणीबजावणी.
घननिळा ऐकून फार हसू आले. थत्तेबाईंनी चाल बदललीच आणि नंतर श्रीने हुबेहूब ती बदललेली चालच म्हटली Proud

पूनम Lol

सध्या खुपच ताणत आहेत हे शरयू-कांता प्रकरण... आणि त्यात प्रचंड 'दयाळू, मायाळू, परोपकारी' अशी जान्हवी तर डोक्यातच जाते...

आणि त्यात प्रचंड 'दयाळू, मायाळू, परोपकारी' अशी जान्हवी तर डोक्यातच जाते... >> साक्षात देवी ला असं वाटतयं तर ... Wink

मी देवी Light 1

एकतर लोक सिरिअलला थोडे कंटाळलेच आहेत.
त्यातून त्या आपट्याला मधे मधे पिंका टाकायला आणतात. वैताग ..... Sad
गोखल्यांकडचे लोक या आपट्याला त्याच बस-स्टॉपवर कसे काय भेटतात ?
हा योगायोग म्हणायचा की संपूर्ण शहरात एकच बस-स्टॉप आहे म्हणायचे ??
असो....
मला योगायोगाने आज आणखी एक योगायोग सापडला.

पान खाऊन पिंका टाकणारा पिंक्या आपटे
आणि जान्हवीचा भाऊ पिंट्या सहस्रबुद्धे

Proud

आणि हे दोघे भाऊ + पुतण्या त्याच बसस्टॉपवर आपट्याला नेहमी भेटतात पण एकमेकांना भेटत नाहीत बरे!
आणि इतक्या वर्षांनी आत्ता कुठे कांता त्या बसस्टॉप वर यायला लागलाय

चनस Lol

तो आपटे सबंध दिवस बस-स्टॉपवरच पिंका टाकत असतो का?
दोन गोखले बंधु त्या आपटयाला बस-स्टॉपवर भेटतात. पण त्याच बस-स्टॉपवर एकमेकांना भेटत नाहीत? का?
दोघा भावांना ऐकमेकांसमोर यायला आणखी एक महारविवार!

Pages