होणार सून मी या घरची - २

Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31

होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.

विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पियू
जान्हवीला काय जाते साडी नेसायला रोज रोज, साबाना म्हणावे मला काय व्हॅनिटीतून उतरून फक्त शॉट द्यायचा असेच करायचे असते काय रोज रोज, इथे तुमच्या पायघड्या घालून मला किनई दट्टे पडलेत म्हणावे

हे सगळे तू फक्त मनातच म्हणशील याची खात्री आहे मला!! Lol

आमच्या साबा म्हणाल्या.. "बघा..एवढी हिरोईन असुन लग्न झाल्यानंतर कश्या साड्या नेसायला लागली.">>>> Rofl

पुण्याचीविनिता, गुटगुटित +1

आमच्या साबा म्हणाल्या.. "बघा..एवढी हिरोईन असुन लग्न झाल्यानंतर कश्या साड्या नेसायला लागली." >> त्यांना सांगा, की तिच्या सासवा तिला छान छान डबा, नाश्ता बनवून देतात . गाडीतून ऑफीसला पाठवतात. ती फक्त आठवड्यातून एकदाच नाश्ता बनवते. अस झाल तर मी पण रोज साड्या नेसेन. Happy

या मालिकेत सगळे जण एकामेकांना सारखे सारखे शपथ घालत असतात . या संबंधी आधी आपण एकदा बोललो पण होतो. पण या मालिकेत मुलग्यांना आई आजी घराबाहेर का काढतात?. त्यांना सुधारण्याचे प्रयत्न का करत नाहीत. घरातच ठेऊन त्यांना सुधारण्याचे प्रयत्न केले असते तर एवढी सुनांची कुचंबणा झाली नसती. श्री च्या वडिलांचा काय झाल होत ? त्यांच्या संबंधात कधी बोलण झालाय का मालिकेत? ते मनोज जोशी दाखवतात ते तर श्री चे बाबा नसतील ना?

शरयु बेबीला "माझ्या नवर्‍याला भेटण्याला थेरं म्हणता? मुळात तुम्हाला हे बोलायचा अधिकारच नाही.. हे तुमचे घर नाही.. हे तुमचे माहेर आहे" असं म्हणणार आहे उद्याच्या भागात.

हा इथे विचारायचा प्रश्न नाहिये..पण तरिही...कुणाला हे पक्वांनावरचे गाणे आणि त्याचे लेखक माहिति आहेत का?

शुभ्र पांढर्‍या लवणाजवळी.....

( मला इतकच माहित आहे.. )

शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी २०१४ : अपडेट

~ शरयूच्या नशीबाची गाथा आजही पुढे सुरू राहिली. श्री ऑफिसला गेला आहे आणि अन्य स्त्रिया स्वयंपाकघरात कामात....तर जान्हवी शरयूला तिच्या रडण्यापासून परावृत्त करत आहे. जान्हवी म्हणते, "छोटी आई, आम्ही तुम्हाला सारेजण सांभाळतो, म्हणून तर हे सारे बोललो....तुमच्यावर आमचे खूप प्रेम आहे..." इथे चटदिशी शरयू म्हणते, "तेच म्हणते मी जान्हवी....माझंही त्यांच्यावर खूप प्रेम आहे. मलासुद्धा यांची काळजी घ्यावीशी वाटते. हे का कुणाला पटत नाही ?" जान्हवी, "कोण म्हणते पटत नाही ? तुम्हाला काकांबद्दल काय वाटते हे सगळ्यांना ठाऊक आहे. प्रॉब्लेम हा आहे की काकांनाही तुमच्याबद्दलही असेच वाटते याची खात्री नाही आम्हाला." शरयू तिला थांबविते, विचारते, "आम्हाला म्हणजे ? तुलादेखील असंच वाटतं? तू सांग जान्हवी असे सगळ्यांना वाटतं का ?" जान्हवी चूप राहते. शरयू डोळे कोरडे करते, "म्हणजे तू श्री ला शपथ मागे घ्यायला सांगणार नाहीस...असेच ना ?" जान्हवी, "छोट्या आई मी या घरात सर्वांपेक्षा नवीन आहे. पण मी जेव्हापासून या घरी आले आहे तेव्हापासून काकांबद्दल जे काही ऐकले आहे ते चांगले नाही आणि श्री व आईआजी ही दोन बुद्धिमान माणसं चुकीचा विचार करू शकत नाही याची खात्री आहे मला. तरीही श्री ने तुम्हाला शपथ घातली ही गोष्ट मला नाही आवडलेली; पण तरीही म्हणणं त्याचेच जास्त पटत्ये मला.....ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला काकाच जबाबदार आहेत ना ?" शरयू ते कबूल करते, म्हणते "बरोबर आहे, ते म्हणतातच आता की मी चुकलो आहे, चुकलो आहे. पण आता संधी द्या ना." जान्हवी, "पण असे ते पूर्वीही म्हणत होतेच ना ? माणूस एकदा चुकतो दोनदा चुकतो, तरीही यांच्याबाबतीत ते वारंवार होत आले आहे ना ? म्हणजे असे मी ऐकले आहे हं..." असे म्हणत जान्हवी स्वतःलाच सावरून घेते.....शरयू म्हणते, "ते चुकले असतील तर माझ्या बाबतीत. आईच्याबाबतीत नाही. जान्हवी ते कितीही चिडले असले तरी आईला कायम घाबरूनच असत....कधीही नजर वर उचलून त्यानी आईकडे पाहिलेले नाही. इतका आदर ठेवूनही आईनी त्याना का ओळखलं नाही..." इथे जान्हवी हताशपणे मान हलवते, "म्हणजे इतक्या वर्षात तुम्ही आईआजीना ओळखूच शकला नाही, छोट्या आई. काका जर असे आईशी वागले असते ना....तर आईनी त्याना माफ केले असते. पण ते तुमच्याशी चुकीचे वागले आणि आईआजीच्या नजरेत हा सर्वात मोठा गुन्हा आहे. त्यानी त्यांच्या मुलाचे नाव टाकले ते मुलगा म्हणून तो कमी पडला यासाठी नाही तर नवरा म्हणून त्याने आपले कर्तव्य पार पाडले नाही, यासाठी." शरयू सुन्नपणे जान्हवीचे हे सत्य बोलणे ऐकते....काहीच बोलत नाही. जान्हवी म्हणते, "मी येते, आपण नंतर बोलू या. छोट्या आई, तुम्ही कमकुवत मनाच्या नाही....तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार करू शकता....तो प्लीज करा."....इतका धीर देवून ती जाते.

बेबी आणि इंदू आपल्या रूममध्ये आहेत. तिथे शरयू येते...."बेबीवन्स...मी माझा फोन तुमच्याकडे देते. आता आजींनी व श्री ने मला शपथ घातली आहे. तेव्हा हा फोन नको माझ्याकडे. त्यांचा जर मला फोन आला तर माझे मन तो घे असेच म्हणेल....तेव्हा तुमच्याकडेच हा फोन ठेवा आणि बंदही करा...." बेबीआत्या तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते; पण शरयू श्री च्या शपथेची आठवण सांगून मी देखील त्याचे म्हणणे ऐकायला हवे असे म्हणते.....श्री च्या बालपणीच्या आठवणीही शरयू तिथे सांगत बसते. बेबी शरयूकडून मोबाईल घेते.

श्री ऑफिसमध्ये सकाळच्याच सत्राचा विचार करत बसला आहे. त्याला शरयूची आठवण येते. तो बेबीला फोन करतो...खुशाली विचारतो. बेबी त्याला शरयूने आपला फोन माझ्याकडे दिल्याची बातमी सांगते. ते ऐकून श्री ला बरेही वाटते पण काहीसे दु:खही होते.

श्री ला भेटलेले ते गूढ गृहस्थ त्याच बस स्टॉपवरून अमेरिकेला फोन लावून "प्लीज लिसन टु मी..." अशी आर्जवे करीत आहेत....त्याना दम लागल्याची चिन्हे दिसत आहेत आणि तिथे नेमकी जान्हवी येते. ती त्याना पाहाते आणि ओळखतेही..."एक्स्क्यूज मी..." म्हणत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. ते तोंडाला रुमाल लावून तिच्याकडे पाहतात...जान्हवी चरकते कारण त्यांच्या नाकातून रक्त वाहत असते...."बाप रे, तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही होतंय का ?" असेही काळजीने विचारते. ते गृहस्थ रक्त पुसत "नाही..." असे कसेबसे म्हणतात. जान्हवी त्याना पाण्याची बाटली देवू करते...पण ते गृहस्थ "आय अ‍ॅम ऑलराईट.." म्हणतात....जान्हवी त्यांच्याकडे पाहात राहते.

ंमामा, तुमच्या जन्हवीने आज पण एक शब्द चुकीचा वापरला आहे.
ज़ेव्हा ती शरयुशी बोलत होती, तेव्हा तीने जवाबदार हा शब्द वापरला, पण शरयुने अगदी जबाबदार असा बरोबर शब्द वापरला.

मुक्ता....

केव्हा ? खरेच ? परत रीपिट कार्यक्रम पाहतो उद्या सकाळी....आणि करतो चेक....कारण मी तर समजतो की तेजश्री प्रधान खूप स्वच्छ बोलणारी अभिनेत्री आहे.... उच्चाराची इतकी ढोबळ चूक ती करणार नाही.

पण या मालिकेत मुलग्यांना आई आजी घराबाहेर का काढतात?. त्यांना सुधारण्याचे प्रयत्न का करत नाहीत. घरातच ठेऊन त्यांना सुधारण्याचे प्रयत्न केले असते तर एवढी सुनांची कुचंबणा झाली नसती>> तसे केले असते तर गोखले गृहउद्योगाकडे आजीला लक्षच देता आले नसते तसेही मुलगी अन सूनांना घर सोडले तर बाकिच्या गोष्टीत इंटरेस्ट नाही. एकटी आजी कुठे कुठे लक्ष घालणार?

<<पण या मालिकेत मुलग्यांना आई आजी घराबाहेर का काढतात?. त्यांना सुधारण्याचे प्रयत्न का करत नाहीत. घरातच ठेऊन त्यांना सुधारण्याचे प्रयत्न केले असते तर एवढी सुनांची कुचंबणा झाली नसती>> तसे केले असते तर गोखले गृहउद्योगाकडे आजीला लक्षच देता आले नसते >> पण तरी सुद्धा हा काही कायमचा उपाय होऊ शकत नाही ना ? कायमच सुनांनी नवरा जिवंत असतानाही नवर्यापासून का म्हणून दूर राहायचं ? शरयूचा नवरा जर दारू पिउन तिला त्रास देत असेल तर त्याला रीह्याब मध्ये ठेवता येते/ मानस उपचार तज्ञाची ट्रीटमेंट देता येते / अल्कोहोलिक अनोनिमास च्या मिटींग्स ना पाठवता येते. किती तरी दारुडी माणस या आणि अशा उपायांनी व्यवस्थित होतात. त्या करता त्यांना घराबाहेर काढण्याची जरुरी नाही. किती तरी घरामध्ये किती तरी मोठे प्रोब्लेम्स असतात तरी एकट्या बायका सगळ खंबीर पणे सांभाळतात कि Happy

हुश्श मामा, आले एकदाचे कामावरुन. शुक्रवार संध्याकाळचे बेत आखते. नवरा आजच भारतात गेलाय, आईला भेटायला. चुल पेटवनार नाही आज Happy . माबोवर वेळ घालवणार. मुले पण खुश मम्मा त्रास देणार नाहि Wink

कर्तबगार आईआज्जीनी गोगॄउ सुरु करण्यापेक्षा गोखले वधू-वर सूचक महामंडळ काढले असते तर एव्हाना सगळ्या जणी आपापल्या घरात सुखी झाल्या असत्या. मुलाला घराबाहेर काढण्याची धिटाई असलेली आआ काय सुनांचे दुसरे लग्न करायला कचरली असती काय?

शरयु बेबीला "माझ्या नवर्‍याला भेटण्याला थेरं म्हणता? मुळात तुम्हाला हे बोलायचा अधिकारच नाही.. हे तुमचे घर नाही.. हे तुमचे माहेर आहे" असं म्हणणार आहे उद्याच्या भागात.>>> मला आवडेल हा भाग बघायला. गोखल्यांच्या घरात आई आजी आणि बेबी सोडून पहिल्यांदाच कोणी तडफदारीने बोलणार आहे.

शरयु बेबीला "माझ्या नवर्‍याला भेटण्याला थेरं म्हणता? मुळात तुम्हाला हे बोलायचा अधिकारच नाही.. हे तुमचे घर नाही.. हे तुमचे माहेर आहे" असं म्हणणार आहे उद्याच्या भागात.>>> मला आवडेल हा भाग बघायला. गोखल्यांच्या घरात आई आजी आणि बेबी सोडून पहिल्यांदाच कोणी तडफदारीने बोलणार आहे.>>>>> नताशा, जरा मनावर दगड ठेउन बसा, या लोकाचा काही भरवसा नाही, जाहिरातीत दाखवतात ते मालिकेत दाखवतीलच अस नाही आणि समजा उद्याच्या भागात दाखवणार अस लिहिल असेल तर बर्‍याच्दा ते स्वप्न असत. उगीच आपण दिल थामके वगैरे बसतो आणि खोदा पहाड निकला चुहा अशी अवस्था होते. तुम्हाला डिसकरेज करत नाही, पण आजपर्यतच्या अनुभवाचे बोल आहेत हे. Wink

अरे ....काल शरयूला चक्कर आली अस पण दाखवल ना.????? त्याच काय....???

डोहाळे की काही आजार ....काही तरी मोठ कारण दाखवावचं लागेल ना काकाला परत आणण्यासाठी.... Lol

अरे ....काल शरयूला चक्कर आली अस पण दाखवल ना.????? त्याच काय....???

डोहाळे की काही आजार ....काही तरी मोठ कारण दाखवावचं लागेल ना काकाला परत आणण्यासाठी.... <<<<<<<<अरे वा मग श्री
बाळ दादा होणार म्हणा की आता आणि जान्हवी वहिनीबाई.

असा दारूचा किडा कशाला घरी आणायचा? अरे पाळायचाच असेल तर, कुत्रा पाळा.....निदान इमानदार तरी असतो, उपयोगी पडू शकतो.

मी तिथे असते, तर जे कोण त्या दारुड्याला घरी आणायचा विचार करत असेल, त्या प्रत्येकाला मी फोडून काढले असते. शरयूच्या (आणि गरज पडली तर जान्हवीच्या) तर दोन कानाखाली वाजवल्या असत्या....सणसणीत.

मधुरा अशी टोकाची भूमिका घेऊ नये अस मला स्वताला वाटत.दारुड्या मनुष्य काही एका रात्रीत दारुड्या होत नाही. तो स्टेप बाय स्टेप अतिरेकी दारू प्यायला लागतो. त्यावेळी आई आज्जीनी काय केले ? आत्ता त्या मारे म्हणत आहेत कि मुलानी सुनेला त्रास देऊ नये म्हणून मुलगा घरात नको. पण जेव्हा त्याचे व्यसन वाढत गेले तेव्हा तुमच्या लक्षात आल नाही का ? आणि लक्षात आल असेल तर त्याच व्यसन कमी करण्यासाठी आई आजींनी काय उपाय केले ?
त्याला घराबाहेर काढण हा उपाय होऊ शकत नाही. तुम्ही बाहेरची मुलगी घरात सून म्हणून आणलीत ना ?मग तिच्या मनाचा काही विचार कराल कि नाही.? तिला नवर्यापासून तोडायचं .तिला भेटूच द्यायचं नाही. हा अघोरी उपाय झाला. निदान सुनेच्या बाबतीत तरी.
हा मुलाच लग्न झाल नसेल तर तुम्ही त्याला घरात घेऊ नका .पण मुलाच एकदा लग्न करून दिल्यानंतर सुनेच्या मनाचा विचार तुम्हाला करायलाच पाहिजे. तिला मानसिक रुग्ण बनवाल तुम्ही अस नवर्याला भेटूच दिल नाही तर

मुलगा सुधरला आहे हे न बघता त्याला लांब ठेवणे हे किती अवघड असू शकेल एका आई साठी !! भले सिरिअल का असेना!!
कुठलही व्यसन मारुन मुटकून आटिक्यात आणता येत नाही..
त्या ला सुधाराय्ची संधी दिली पाहिजे.. कितीतरी उपाय असतात... दारु च्या आ हारी गेलेल्या पार्टनर ला प्रेमाने, जरबेने सुधारुन त्याच्याबरोबर संसार स्वखुशीने करणा रे किती तरी लोकं असतात..
श्री घराबहेर पडला होता तेव्हा रोह ल पश्चाताप झालेलं दखवलं आहे न की तत्त्व हर्ड अ‍ॅण्ड फास्ट ठेवली म्हणुन नाती दुरावली!! आता बहुतेक आईआजी सुत्रांतर्फे माहिती काढुन शहनिशा करुन मग प्रओ ला घरात घेतील मग प्र ओ अन जन्हवी मिळुन शरदजोशी+सिमरन यांना घरात घेतील....

होसुमियाघ मधल्या किचन मध्ये एक् पोस्टर आहे- हातात ट्रे घेउन एक बाइ उभी आहे अस- जे एलतिगो मधे पन ग्रीन रुम मधे दिसत--- झी कडे एकच सेट आहे का एल्दुगो पासुन!!!! Happy Wink

Pages