होणार सून मी या घरची - २

Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31

होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.

विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलगा दारूडा आहे तर त्याला व्यसनमुक्ती केंद्रात घाल, कामात अडकव. बायकोला मारहाण करत असेल तर काऊन्सिलरकडे घेऊन जा. त्याचे अजून काय मानसिक प्रॉब्लेम असतील तर त्यात मदत कर.
>>>>he sagale karayla janhavi LA analay name

खरेच तार्किक दृष्ट्या योग्य दाखवले तर....
टीआरपी घसरेल की वाढेल?>> अर्थातच घसरेल. मालिकेचे लेखक दिग्दर्शक मूर्ख नसतात, पण प्रेक्षकांसार्‍ठी त्यांना तसे सोंग घ्यावे लाग्ते.

प्रेक्षकांबद्दल जुन्या धाग्यावर मी आधीच एक पोस्ट लिहिले आहे.

नंदिनी मी सिरियलच्या दॄष्टिकोनातूनच म्हणाले की त्यांना इतकी वर्ष असच रहायची सवय लागली आहे म्हणून. तर्क वापरून शिरेली लिहिल्या गेल्या असत्या तर एव्हाना अख्खा प्रेक्षकवर्गही स्वप्नात रमण्याऐवजी भानावर येऊन ठेपला असता.

दक्षिणा +१

अ‍ॅटलीस्ट मालिकेतील स्त्रीपात्रांविषयी तरी चांगलं (लॉजिकल) दाखवायला हवं होतं.
म्हणजे "सासुरवाडी" नामक साईडच्या लोकांच्या अपेक्षा अश्या अवास्तव उंचावण्याला खतपाणी मिळालं नसतं.

त्या अपेक्षा मुळात असतात म्हणून सीरीयलमधे तसं दाखव्लं जातं. डोके फोड करायची तर मालिकांसमोर असल्या फालतू अपेक्षा करणार्‍या लोकांसमोर करावी

पियू पण सिरियल एक धंदा या दृष्टिकोनातून तसं करणं म्हणजे टिआरपी आणि इनकम दोन्ही कमी करणं आहे. लोक चांगलंही पाहतात. चांगलं इन द सेन्स वास्तविक किंवा तार्किकदृष्ट्याबरोबर. पण तसं दाखवायची अजून कुणी हिंमत केली नाहिये.
रूप बदलून आलं तर घरच्यांनी न ओळखणे, घरच्याच लोकांनी खुनाची कट कारस्थानं रचणं हे अतीरंजित दाखवतात.

अल्बम काढल्या सारखा वडीलांचा फोटो पण बघायला/दिसायला हवा होता ना, डायरेक्ट मधला फोटो, त्या दिवशी जान्हवीने पण डायरेक्ट काकाचाच फोटो पाहिला, .. काहिहि( तिच्याच भाषेत).

आणि जान्हवीचं 'नको जाऊयात' नको करूया, नको बोलूया हे डोक्यात जातं. हे करायला नको, बोलायला नको, करायला नको असं योग्य मराठी का बोलत नाहीत?

त्या अपेक्षा मुळात असतात म्हणून सीरीयलमधे तसं दाखव्लं जातं. डोके फोड करायची तर मालिकांसमोर असल्या फालतू अपेक्षा करणार्‍या लोकांसमोर करावी

>> मे बी.. मग मालिका वास्तवदर्शी म्हणायला हवी. सगळ्यांचं सगळ्ळं व्यवस्थित करणार्‍या (जान्हवीसारख्या) या सुना कुठे मिळतील? मला जाऊ म्हणुन एक हवी आहे. Happy

पियू पण सिरियल एक धंदा या दृष्टिकोनातून तसं करणं म्हणजे टिआरपी आणि इनकम दोन्ही कमी करणं आहे. लोक चांगलंही पाहतात. चांगलं इन द सेन्स वास्तविक किंवा तार्किकदृष्ट्याबरोबर. पण तसं दाखवायची अजून कुणी हिंमत केली नाहिये.

>> खरंय दक्षे.. बर्‍याचश्या लोकांना सीआयडीमधले गुफ अप्स लक्षात येत नाहीत तर हि मालिका आज १६-१७ वर्ष चालु आहे. (म्हणजे त्यांना बर्‍यापैकी वास्तवदर्शी वाटते म्हणून) मी आणि माझ्या माहितीत बरेचजण याचे दिवसभराचे एपिसोड्स पण बघतो जमेल तेव्हा.

गुरुवार दि. २७ फेब्रुवारी २०१४ : अपडेट

~ "शरयू पतीकांड" प्रकरण स्वयंपाकघरात अव्याहतपणे चालू आहे. शरयूने घरातील सार्‍यांना फसवून तसेच आजीला जी गोष्ट अजिबात आवडणार नाही हे माहीत असूनही वेड्याप्रमाणे लक्ष्मीकांतला चोरून भेटण्याचे सत्र चालूच ठेवल्याने गोकुळमध्ये जी अस्वस्थता निर्माण झाली आहे त्याबद्दल चौघी स्त्रिया तिला पूर्णपणे दोष देत आहेत. नर्मदा आणि इंदू याना त्यांचा दीर कशा पद्धतीचे बेताल वर्तन करीत होता हे प्रत्यक्ष माहीत असल्याने त्याना शरयूचे पाऊल हे धाडसी वाटते, तर लक्ष्मीकांतची सख्खी बहीण बेबीदेखील आपल्या भावाच्या विरोधातच मत देते आणि शरयूचे चुकले असे सांगत आहे.

आईआजी खुर्चीत सुन्नपणे बसल्या आहेत....त्यांच्यासमोर श्री आणि जान्हवी उभे आहेत. आजीना लक्ष्मीकांत दारूने तर्र होऊन घरात दंगा घालत आहे आणि शरयू त्याच्या हातातून मदिरेची ती बाटली काढून घेण्याचा निष्फळ प्रयत्न करीत आहे. लक्ष्मीकांत तिला मारहाणीसाठी हात वर करतो तोच आजी "कांता..." अशी मोठ्याने हाक मारतात आणि त्या वर्तमानात येतात. श्री त्यांच्याशी बोलतो, त्याला जाणवते की काय झाले असेल. तरीही तो विचारतो, "आईआजी काय झाले ?" आजी उत्तरतात, "गाडून टाकलेल्या आठवणींनी डोके वर काढले. आपला मेंदू काही गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करतो, पण त्या गोष्टी मनाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात दडवून ठेवल्या जातात आणि त्या अशा समोर येऊन त्रास द्यायला सुरुवात करतात." श्री विचारतो, "मग काकांची अशी आठवण आल्यावर तुला काय वाटते ?" आजी नैराश्येने मान हलवून म्हणतात, "बरं वाटावे अशा आठवणी फार कमी आहेत." या ठिकाणी श्री जान्हवीकडे वळून पाहतो, म्हणतो, "जान्हवी पाहिलंस ना....किती त्या माणसाने आमच्या घरातील लोकांना छळले आहे. ज्या माणसाने इतका त्रास दिला आहे, त्याला मी कधीच क्षमा करू शकणार नाही. आम्हाला कुणालाच ते शक्य होणार नाही..." या ठिकाणी गेले दोन्ही दिवस तोंड चूप करून राहिलेली जान्हवी धाडस करून आईआजीकडे चेहरा करून म्हणते, "पण, माणूस बदलतो ना ?" आजी चिडत नाहीत. जान्हवीची भूमिका समजावून घेतात. "नाही जान्हवी....सामान्य माणसाचे कुठलेही नियम कांताला लागू पडणार नाहीत. त्याचे सारेच टोकाचे होते....हुशारी, प्रेम, राग, वाहवत जाणे....सामान्य काहीच नाही. संयम, विवेक हे शब्दच त्याला माहीत नव्हते. त्याचा त्रास सर्वाधिक शरयूला होत होता." जान्हवी त्यातूनही धीर एकवटून म्हणते, "मला वाटतं, छोट्या आईंशी एकदा बोलायला हवं. अजूनही मनानं या सर्वातून त्या बाहेर पडतील." आजी म्हणतात, "नाही, मला नाही वाटत असे काही होईल. मनाने ती कमकुवत आहे. तिच्याकडून कणखरपणाची अपेक्षा आपण नाही ठेवू शकत. शरयू सारख्या बायकांमुळेच असल्या पुरुषांच फावतं. राक्षस असला तरी माझा जीव अडकला आहे त्याच्यात असे छळ सहन करणार्‍या स्त्री चे त्या स्थितीला जबाबदार असते. ज्या घरात स्त्री चा अशारितीने अपमान होतो त्या घरात त्या पुरुषाला स्थान दिले गेले नसले पाहिजे असे मी म्हणते, म्हणून मी कांताला घराबाहेर काढले." आजीची स्त्री विषयीची ही भूमिका श्री आणि जान्हवी दोघांनाही पटते. त्यामुळे श्री "मी छोट्या आईकडे जातो आणि माझ्याकडून समजाऊन सांगतो...." आजी होकार देतात आणि त्याच्यापाठोपाठ जान्हवीलादेखील त्या शरयूच्या खोलीकडे पाठवितात.

श्री शरयूच्या समोर बसला आहे.....ती अस्वस्थपणे बसली आहे. श्री म्हणतो, "छोटीआई, मला कळतं की तुला काय वाटते ते..." शरयू त्याला लागलीच प्रत्युत्तर देते, "नाही श्री, तुला नाही कळू शकत. कुणालाच नाही कळत मला काय होते ते." श्री म्हणतो, "मग सांग ना मला..." शरयू चिडून बोलते, "सांगितलं ना....सर्वांच्या समोर मी कबूल केले ना की मी ह्याना भेटते. आता तुम्ही जी काही शिक्षा द्याल ना ती मी भोगायला तयार आहे. तू जाऊन सांग आईआजीना...." श्री कळवळून तिला म्हणतो, "छोटी आई तसं काही नाही शिक्षा वगैरे....फक्त काका तुला जे सुख हवे आहे ते त्यांच्या व्यसनी स्वभावामुळे देणार नाहीत, त्याची काळजी आम्हाला आहे. भूतकाळात काय घडले त्यावरून धडा घेऊन भविष्यकाळाचा विचार करायला हवा..." लागलीच शरयू निर्वाणीचे उत्तर देते, "मला नाही करायचा विचार. मला कुठल्याच गोष्टीचा विचार नाही करायचा. मला त्रास होतो विचार करायचा..." इथे श्री तोच धागा पकडून विचारतो, "का त्रास होतो तुला ? कारण जो त्रास होणार आहे त्याचा विचार केला म्हणून. आता तू माझी शपथ घेऊन सांग की तू आजपासून काकांना भेटायला जाणार नाही..." इतके बोलून शरयूचा हात तो घेतो आणि स्वतःच्या डोक्यावर ठेवतो....

हा प्रकार जान्हवीला अजिबात आवडत नाही. ती सरळ श्री ला म्हणते, "श्री अरे काय बोलतो आहेस हे तू ? शपथ वगैरे काय घ्यायला सांगतो आहेस ?" श्री तिच्याकडे पाहत तिला थांबवितो, "जान्हवी मला माहीत आहे मी काय करतो आहे ते...." म्हणजे तू यात पडू नकोस असेच त्याला सुचवायचे आहे. शेवटी तो शरयूला स्वतःच्या डोक्यावर हात ठेवायला लावून काकाना न भेटण्याची शपथ देतोच. जान्हवी असहाय्यतेने शपथेचा हा बालिशपणा पाहते. "माझी शपथ मोडू नकोस...." असे डोळ्यात पाणी आणून तो सांगतो आणि मीटिंगला जायचे आहे असे सांगून तिथून बाहेर पडतो....जान्हवी रडत बसलेल्या शरयूजवळ बसते.

हो ना...दक्षिणा....खुद्द जान्हवीला देखील हा शपथ प्रकार पसंत नाही हे तिने त्याबद्दल काढलेल्या उद्गारावरून स्पष्ट होतेच. त्यात हा पठ्ठ्या एम.बी.ए. आणि ऑक्सफर्डचा विद्यार्थी....त्याने तरी किमान वैज्ञानिक दृष्टिकोण बाळगावा.... उगाच ती शरयू भोळी आहे म्हणून शपथेचा बागुलबोवा उभा केला आहे.

मामा मी मागेच शपथ घेतलीय मालिका न बघण्याची आणि फक्त तुमचे अपडेट्स वाचण्याची कारण तेच मालिकेपेक्षा चांगले असतात.

होय, अन्जू....आज मला समजते की तू तसा निर्णय का घेतला असावास. मलाही हे शरयू दळण अजिबात पसंत पडलेले नाही....त्यातच हा शपथ प्रकार तर डोक्यात गरगरला अगदी....कशाला स्वतःला सुशिक्षित म्हणत असतील हे कलाकार ?

होसूमीयाघ च्या ad मधे पाहीलं की जान्हवी आता कांताकाकाला मदत करणार कुटुंबात परत एकत्र यायला किंवा शरयूला भेटायला... आता बघुया की हे किती दिवस लांबवणार...

गोखल्यांच्या घरात एकूणच संवाद साधणे हा प्रकार कमीच आहे. श्री शरयूशी बोलायला म्हणून गेला. साधारण ३ मिनिटे बोलला आणि शपथ घालून मोकळा झाला.

अरे एवढा महत्वाचा विषय तिच्याशी नीट बोलायला नको? त्या बाकीच्या बायका तर सगळं आई आजींवर सोपवून मोकळ्या झाल्या आहेत.

अवांतर १ - जान्हवी खर्या आयुष्यात लग्न झाल्यापासून सिरेलीत साड्या का नेसते?
अवांतर २ - आज सकाळी "प्यार तो होनाही था" ह्या सिनेमात अजय देवगणची बहीण म्हणून बाळसेदार बेबी बघीतली.

खूपशा मालिका आत्या बेबीच असतात.ए.ल.दु.गो मध्येही मुक्ता बर्वेच्या आत्याचं (सुकन्या मोने) नाव बेबीच होतं बहुतेक....

जान्हवी खर्या आयुष्यात लग्न झाल्यापासून सिरेलीत साड्या का नेसते?

>> कोणास ठाऊक. कदाचित ते मेहंदिचे हात लपवायला.

आमच्या साबा म्हणाल्या.. "बघा..एवढी हिरोईन असुन लग्न झाल्यानंतर कश्या साड्या नेसायला लागली."

आमच्या साबा म्हणाल्या <<< त्याना म्हणावे गोखल्यांच्या सुनेगत दररोज एक भारी साडी विकत घेऊन द्या.. मग बघा .. Happy

नको जाऊयात' नको करूया, नको बोलूया हे डोक्यात जातं. हे करायला नको, बोलायला नको, करायला नको असं योग्य मराठी का बोलत नाहीत? > +१ .

खूपशा मालिका आत्या बेबीच असतात.ए.ल.दु.गो मध्येही मुक्ता बर्वेच्या आत्याचं (सुकन्या मोने) नाव बेबीच होतं बहुतेक > करेक्ट . व्यक्तिगत जीवनात पण .... माझ्या पण एका आत्याला आम्ही बेबी आत्या म्हणतो Happy

Pages