होणार सून मी या घरची" -१

Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15

नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया Proud

Honar-Sun-Mee-Hya-Gharchi.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामा नाय मारणार ग पियु. त्यांनी पण मान्य केलय ते म्हणुन्तर अपडेटस मधे तिच्या गाण्याचा उल्लेख केला नाहिये त्यांनी Wink Lol

त्यांनी पण मान्य केलय ते म्हणुन्तर अपडेटस मधे तिच्या गाण्याचा उल्लेख केला नाहिये त्यांनी

>> Lol

नाही नाही....शुभांगी.....तू या पियुचे काही ऐकू नकोस....छ्ळा किती छ्ळायचे तितके त्या बिचा-या जान्हवीला. तिच्या भाग्यात केवळ छळच आहे असे दिसत्ये.

शुक्रवार दि. ६ डिसेंबर २०१३ : अपडेट

~ आजचा भाग हा सर्वस्वी जान्हवीचाच आणि आपल्या स्वाभिमानाला धक्का लागला तो आईच्या लोभीपणामुळे या गोष्टीमुळे तिला झालेल्या वेदनांपेक्षा श्री ने आपल्याला लपवून हे पैसे देण्याचे जे कृत्य केले त्याबद्दल त्याला काय आणि कसे बोलायचे या संभ्रमात पडलेली मुलगी म्हणजे जान्हवी. एरव्ही अनेक कलाकार एकाच वेळी पडद्यावर येत असतात पण आज जान्हवी जवळपास एकटीच होती अभिनयासाठी. नवरा श्री फक्त फोनवर बोलला आणि त्यालाही अपराधीपणाच्या भावनेने खाल्ले आहे....तर जान्हवीचे बाबा कॉटवर बसून हताशपणे जान्हवीच्या भावनेचा उद्रेक पाहात आहे तर शशीकलाबाई जणू मी काही गुन्हा केलेलाच नाही अशा आविर्भावात जावईबापूकडून पैसे घेतले म्हणून काय झाले ? असला पोकळ युक्तीवाद करीत जान्हवीच्या त्राग्यात भर घालत आहे.

त्या अगोदर श्री खाली मान घालून घरी आला आहे आणि मावशीच्या देवघरात गेला आहे....मावशीचे पोथीवाचन चालू आहे....तिच्या शेजारी बसून थंडपणे तिला, 'मला फार दोषी वाटत आहे मावशी....काय करावे हे सुचत नाही...." मावशीला नेमके कारण कळत नाही, तरीही ती त्याला धीराने वागून वर्तन कर असा सल्ला देते...श्री तिला वरवर हो ला हो म्हणतो...पण त्याला एकच भीती आहे म्हणजे जर जान्हवीला ५० हजाराची वार्ता समजली तर तिची प्रतिक्रिया काय होईल. इकडे जान्हवी आईच्या खुलाशाला अजिबात सामोरे जात नाही. ती म्हणते, "अगं, मी तुमच्यासाठी नोकरी करीत आहे ना ? मग कशासाठी तुम्ही आपला स्वाभिमान बाजूला ठेवून जावयापुढे हात पसरले ? पसरायचेच होते तर त्याबाबत मला तुम्ही विचारायला नको का ?" याला परत लबाडपणे आई उत्तर देते, "मी मागितलेच नव्हते....पाच हजार मागणार होते, बिलांसाठी. पण जावईबापूनी ५० हजार दिले...." जान्हवी परत संतापून म्हणते, "आई, कोणत्या तोंडाने आणि कशी आता मी आजीपुढे जाऊन ताठ मानेने उभी राहीन ? काय कमी होते आपल्या घरात ? तुम्ही मागितले असते माझ्याकडे पैसे तर मी देवू शकत नव्हते का ? माझ्या सासरी पंचपक्वानाचे जेवण असते पण मला या घरातील मीठभाकरी चांगली लागते....का ? तर मी स्वाभिमान सोडलेला नाही....आणि आता तू हे काय करून बसलीस आई...." यावर आईचे नाटक..."मग मी चुकले म्हण आणि मार मला...." असे म्हणत स्वत:च मुस्काटात मारून घेते....पण आता जान्हवीला या नाटकाचा कंटाळा आला आहे....ती तिकडे दुर्लक्ष करते आणि यातून आता काय पुढे हा विचार करत असतानाचा मनिष येतो....तो या तिघांकडे पाहतो आणि त्याला उमजते की इथे काहीतरी गंभीर चालले आहे. प्रत्यक्षात त्याच्या आईने जान्हवीला आलेले पाहिलेले असते आणि तो तिला आपल्या घरी नेण्यासाठी आलेला असतो....जान्हवी त्याच्याबरोबर होऊ दे घरातून वादाची सुटका म्हणून जाते. त्याच्या घरातून आपल्या घरी येताना मनिष तिला नेमके काय चालले आहे हे मित्रत्वाच्या नात्याने विचारतो. जान्हवी त्याला सारे सांगून टाकते. पण तोही "श्रीकडून घेतले पैसे तर त्यात काय चुकले...?" असे म्हटल्यावर जान्हवी "अरे, श्री ने हे करण्यापूर्वी मला सांगायला विचारायला नको होते का ? मी त्याला एकमेकाच्या नात्यसंदर्भातील ज्या गोष्टी आणि जी भूमिका सांगते त्यापासून त्याने काहीच बोध घेतला नाही असाच अर्थ होत नाही का ?" मनिष आपला मुद्दा सोडत नसल्याचे पाहून निराश झालेली जान्हवी..."राहू दे....सोडून दे..." म्हणते व घराकडे वळते. घरी आल्यावर कलाबाई अगदी तिच्या कौतुकाच्या गोष्टी करू पाहते, जान्हवी त्याला दाद न देता स्वयंपाकघराकडे निघते तोच मोबाईलची रिंग होते. श्री चा फोन असतो पण ती तो बंद करते....दुसर्‍यांदा वाजतो, तोही बंद करते. आता मात्र बाबा 'फोन का घेत नाहीस?" असे विचारतात तर "नको, मी नंतर करते...." असे म्हणत आत जाते.

पुढील भागासाठी दोघांचा फोनवरील जो संवाद दाखविला आहे त्यामध्ये जान्हवी श्री ला सांगत आहे, "मी आज येत नाही घरी....उद्या परस्पर इथूनच बॅन्केत जाते...." पलिकडे श्री स्तब्ध आहे.

श्री आणि जान्हवी खरंच लग्न करणार आहेत .... गुरूवारी सकाळ पेपर प्रतिबिंब पुरवणीत वाचलं..... >>> लिन्क टाकता येईल का?

[मराठी चित्रपट, रंगभूमी आणि टीव्ही मालिकांतील एक नामवंत कलाकार विनय आपटे यांचे आज हृदयविकाराच्या आजाराने मुंबईत निधन झाले....त्याना भावपूर्ण श्रद्धांजली....]

शनिवार दि. ७ डिसेंबर २०१३ : अपडेट

~ आजचा दिवस जान्हवीच्या दृष्टीने कार्यवाहीचा होता. प्रथम सासरी फोन करून "मी आज येणार नाही..." असे नवर्‍याला सांगणे; पण त्यापूर्वी गोखले घराची शिस्त पाळायची म्हणून आपल्या हालचालीविषयी बेबीआत्याला सांगून तिची परवानगी मागायची. इकडे गोखल्यांच्या घरात बेबी, शरयू आणि श्री दिवाणखान्यात जान्हवीच्या फोनची वाट पाहत आहेत. बेबी संतापाने धुमसत आहे [हे पात्र म्हणजे हिटलरची थोरली की धाकटी बहीण असल्याच्या थाटातच वावरताना दिसते...]....त्यातच ती श्री चा फोन उचलत नाही म्हणून आगावू चिडलेली आहेच...शरयू समजावणीच्या सुरात काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते पण बेबी नेहमीप्रमाणे आपले घारे डोळे तिच्याकडे रोखून पाहते. इतक्यात तिचाच मोबाईल वाजतो....तिला समजत नाही नंबर कुणाचा आहे, पण शरयूच्या सांगण्यावरून घेते...तो असतो जान्हवीचा. तिच्याकडे घरी राहाण्याबद्दल परवानगी मागण्यासाठी तिने केला आहे.....बेबी काहीही न ऐकता आपल्या कडू स्वभावाचे दर्शन संवादातून देते आणि तेही तिच्या नवर्‍यासमोर....हा नवरादेखील बेबीला काहीच न बोलता संवाद ऐकत राहतो....बेबीला जे काही सांगायचे ते सांगून झाल्यावर तिघेही आपापल्या रूमकडे निघून जातात. श्री आपल्या रुममधून जान्हवीला "मध्यरात्र होत आली आहे मी तुला न्यायला येतो" असे म्हणतो तर ती पिंट्याचे कारण सांगून तू येऊ नकोस....आणि मी सकाळी इथूनच बॅन्केला जाईन असे म्हणते. श्री तिला "तू चिडली आहेस का माझ्यावर जान्हवी ?" याला "आपले आपण समजून घ्यावे सारे....मी फोन ठेवते, मी थकले आहे...." असे म्हटल्यावर हा 'आय लव्ह यू..." म्हणतो तर ती काहीही प्रतिसाद न देता फोन बंद करते, हाही श्री ला अस्वस्थ करणारा एक क्षण.

मध्यरात्र उलटल्यावर पिंट्या घरात हळूच प्रवेश करतो....आईबाबा झोपले आहेत पण जान्हवी उठते. तिला पाहाताच हा चपापतो...."तू इथे कशी ?" विचारतो, पण जान्हवी त्याला अधिकचे काही न बोलू देता खाली घेऊन जाते. तिथे ती त्याची त्याच्या अनिर्बंध बेताल वागण्याबद्दल जाब विचारते. तर हा बाकीचे कसलेही कारण न देता 'मी मित्रांसमवेत अभ्यास करीत असतोय...." हे ठरलेले कारण सांगतो....आईवडील तुझी वाट पाहात असतात, या युक्तीवादालाही त्याच्याकडे उत्तर आहे आणि ते म्हणजे, "बाबा, मला मुलगा मानतच नाहीत...त्यामुळे मी आलो काय नाही आलो काय त्याना काही फरक पडत नाही." जान्हवी हतबुद्ध होते या भावासमोर....घरात आई अशी लोभी तर बाहेर भाऊ असा बेफिकीर....तिला काही सुचत नाही काय करावे अशा स्थितीत....ती घराकडे वळते.

सकाळी ऑफिसला जाताना सारे चहा घेत आहेत तर ही आईकडे "ते पैसे दे मला....मी घेऊन जाते आणि श्री ला देते...". त्यावर कलाबाई चटकन हालचाल न करता चहा पीत बसतात....सदाशिवराव चिडतात....तेव्हा चेहरा टाकून ती आतून ते ५० हजार आणते....जान्हवी वडिलांच्या कॉटवर बसून नोटा मोजायला सुरुवात करते तेव्हा 'आहेत ते जितके दिले होते...." असे कलाबाईने म्हटल्यावर जान्हवी म्हणते, 'मला ते श्री ला देण्यापूर्वी बरोबर आहेत का नाही ते पाहायलाच हवेत...." यावर मात्र कलाबाई काही न बोलता गप्प राहते. वडिलांना फ्लॅटची किल्ली देते....सूचनाही करते आणि पैसे घेऊन जान्हवी बॅन्केत.....अजूनी गीता आलेली नाही...तोपर्यंत काम करता करता तिला श्री समवेतच्या काही आनंदाच्या भेटी आठवतात व ती त्यात रमून जाते. गीता येते...तिला चिडविते...पण जान्हवीकडून जितका प्रतिसाद मिळाला हवा होता तिला तितका तो मिळत नसल्याने ती कोड्यात पडते. जान्हवीही तिच्याशी खुलून नाही बोलू शकत.

गोखले बंगल्यावरील तीन सासवा जान्हवीची वाट पाहात आहेत....तशात शरयूच्या तोंडून "बस मिळाली असेल ना ?" असे म्हणताच बेबीआत्या "म्हणजे ती बसने ये जा करते ?" असे आश्चर्याने उदगारते.... म्हणजे गोखल्यांचा हा अपमान झाला असा स्वर..... आता या मुद्द्यावर सोमवारी काथ्याकूट करीत बसणार या बायका हे नक्की.

मामा वाचले, आजचा मी बघितलाच नव्हता बाहेर गेले होते. आता परत रटाळपणा कमी झालेला दिसतो मालिकेतला, मला मनापासून वाटतेकी आता बाबांच्या ऑपरेशनकडे लक्ष द्यावे जान्हवीने, त्यांना असे चालताना बघून वाईट वाटते.

ऑर्थोपेडिक सर्जन परदेशी गेलेत. मंडळींना त्यांचीच ट्रीटमेंट हवीय.

काल सरूमावशी शरयूला 'तू माझ्या डोक्यात जाऊ नकोस हं" असं म्हणाली. हा वाक्प्रचार माबो वाचूनच संवादलेखिकेच्या डोक्यात आला असेल का? Wink
आधीच्या एका भागात पिंट्या आईला , "तू माझ्या डोक्याचे दही करू नकोस" असे म्हणाला. यातून आताच्या तरुणांच्या मराठी भाषेवर हिंदीचा पगडा कसा बसू लागला आहे हेच संवादलेखिकेला दाखवायचे आहे.
सरूमावशीने शरयूला "तू मोबाइल कंपनीचे फोन म्हणून कोणाशी गप्पा मारतेस ते मला माहीत आहे असे म्हटले.
शरयूने या बेबीवन्संचं काहीही होऊ शकत नाही असं म्हटलं. शरयूच्या कमेंटस अगदी मार्मिक असतात.

ते म्हणजे, "बाबा, मला मुलगा मानतच नाहीत...त्यामुळे मी आलो काय नाही आलो काय त्याना काही फरक पडत नाही." जान्हवी हतबुद्ध होते या भावासमोर....घरात आई अशी लोभी तर बाहेर भाऊ असा बेफिकीर....>>>
पिंट्या सध्या बेफिकीर वाटत नाही उलट दुखावलेला वाटतो

काल सरूमावशी शरयूला 'तू माझ्या डोक्यात जाऊ नकोस हं" असं म्हणाली. हा वाक्प्रचार माबो वाचूनच संवादलेखिकेच्या डोक्यात आला असेल का?

>> कोणी वाचो न वाचो.. शरयु नक्की वाचत असावी.. मागे एकदा जान्हवीने शरयुच्या विसरभोळेपणासाठी त्या पाट्या लावल्या होत्या ना.. त्यात शरयु शेवटी म्हणाली "आणी खुप सार्‍या हसणार्‍या बाहुल्या"

स्माईलींना बाहुल्या म्हणणे मी इथेच पाहीले आहे. :स्मित करणारी बाहुली:

नताशा...

"....पिंट्या सध्या बेफिकीर वाटत नाही उलट दुखावलेला वाटतो......." ~ मान्य, पण आईबाबाशिवाय त्याला आपल्या बहिणीची ओढ खूप आहे आणि दोघांचे नाते सावत्र आहे असे एकदाही वाटले नाही अशी कथानकाची मांडणी आहे. मग अशी आतड्याची थोरली बहीण ज्यावेळी अगदी मध्यरात्री त्याला घराबाहेरील अंगणात अत्यंत कळकळीने विचारीत आहे त्याच्या दिनमानाविषयी तर त्याने आपले दुखावलेपण बाजूला ठेवून बहिणीला सारे काही खरेखरे सांगून टाकणे प्रशस्त वाटले असते.

शिवाय 'तायडे, मला मामाच्या ट्रंकेत हा चंद्रहार सापडला....जो तुझाच आहे....' हे वाक्य कधी वापरणार ? हा हार चोरीचा आहे....पिंट्यासह सारे शोधत होते लग्नाच्या आदल्यादिवशी....जरी जान्हवीच्या गळ्यात दुसरा हार दिसला तरी तो हार हा नव्हे, इतके साधे गणित याला कळू नये ही बाब पटत नाही....तो हार चक्क आपल्या खिशात घालतो आणि बापाला म्हणतो 'तुम्ही काळजी करू नका, डिपॉझिटची रक्कम मी भरतो..." कुठून आणणार रक्कम हा वाघ्या ? हाराच्या जीवावरच बोलत असेल ना ?

म्हणजे ही देखील एक बेफिकीर वृत्तीच म्हणावी लागेल.

हो हाराच्या बाबतीत बरोबर आहे तुमचे.

बाकी मला वाटते पिंट्या काहीतरी हलके / कमी दर्जाचे काम करत असावा आणि ते सांगायची त्याला लाज वाटत असावी म्हणून तो लपवत आहे. काही बरे काम मिळाले की सांगू असा विचार करून.

नताशा,
मला वाटतं की पिंट्या एखाद्या पाव-भाजीच्या/बुरजी-पाव्/चायनीज्/तत्सम गाडीवर काम करत असावा.
अशा प्रकारच्या रस्त्यावरील गाड्या रात्री उशीरापर्यंत सुरू असतात.

पान क्र. ४ वरील भरत मयेकरांच्या पोस्टसंदर्भाने :
५ सासवांमधे लीना भागवतला थोडा अधिक वाव मिळतो. ती त्याचं सोनं करते अशा आशयाच्या कमेंटशी
सहमत. लीना भागवत मस्तच काम करतेय.
(ती आमच्या बोरिवलीत आहे म्हणे Happy )

अत्यंत बंडल मालिका आहे ही! सहमत , काहीजण मालिकेला विशेष महत्व देत नाही त्यातील पात्रांवर ते फिदा होतात, आणि मालिका पाहत राहतात.

मामाश्रीनी बेबीआत्याला हिटलर काय
म्हटले
इथे बेबी आत्याने लगेच आजच्या एपीसोडात
जान्हवीला लगेच ड्राइवरसकट गाडी ऑफर
केली
मामाश्री लगे रहो

सोमवार दि. ९ डिसेंबर २०१३ : अपडेट

~ एरव्ही सोमवार हा आठवड्याचा सुरुवातीचा दिवस म्हणून मालिकेचे दिग्दर्शक कथानक खुलविण्यासाठी काही नाट्यमयता आणण्याचा प्रयत्न करीत असतात. पण आजचा "होणार सून...." अतिशय फिक्या स्वरुपातच सादर केले गेले. भाग सुरू होतानाच शनिवारचाच दोन मैत्रिणीचा संवाद आज पुनर्पेक्षित केला गेला. जान्हवी आपला तोच स्वाभिमानाचा मुद्दा उगाळत बसली आहे, शब्दांची जादुमय कसरत करीत तर गीतातर्फे तिचे म्हणणे खोडून काढण्याचा केविलवाणा प्रयत्न. दोघींकडून ठोस काहीच निष्पण्ण होत नाही. मग बॅन्केतील ते तणावाचे वातावरण हलके करण्यासाठी शिपायाकडून चहा दिला जातो....तोही फक्त जान्हवीला....गीता चिडते, मग हसून जान्हवी आपला कप तिला देते. जान्हवीला परत श्री समवेतचेच संवाद आठवत राहतात. इकडे श्री ऑफिसमधून जान्हवीला फोन करण्याचा प्रयत्न करत आहे तर तो व्यस्त आहे असा संदेश येत राहतो. त्याचा अर्थ श्री असा घेतो की ती मुद्दाम आपला फोन घेत नाही.

गोकुळ बंगल्यात शरयू आणि सरसू मावशी यांच्या बालबोध वक्तव्याची फुगडी सुरू आहेच. शरयूचे काम करणार्‍या लीना भागवत यांच्या अभिनय कौशल्याबाबत काहीच वाद नसला तरी तो विसराळूपणाचा वारंवार दाखविला जाणारा प्रसंग आणखीन् किती भाग दाखविण्यात येणार आहेत ? हाच प्रश्न प्रेक्षकांसमोर येत आहे. आज ती बेबीआत्याला विचारणार आहे, "घरी काहीही घडले तरी त्याची वार्ता बेबीआत्याला द्यायची...अशी आईआजीने सूचना केला आहे....तर जान्हवी काल रात्री घरी आली नाही हे मला का सांगितले नाही?" असा प्रश्न. बेबीआत्या तिथे येते....सुरुवातीचा मग तो विसरण्याचा प्रयोग झाल्यावर एकदाचे तिला आठवते आणि ती झटदिशी तो प्रश्न विचारून टाकते. सुरुवातीला बेबी काहीसे गोंधळते पण नंतर म्हणते, "मी प्रत्येकीच्या खोलीत जाऊन जान्हवीबद्दल विचारले....पण तुझ्या खोलीत तू नव्हतीस....मग तू बाहेर कुठेतरी असशील म्हणून फोनही केला, तू उचलला नाहीस...त्यामुळे आता तूच सांग मला काल रात्री तू कुठे गेली होतीस..?" या सरबत्तीवर शरयू गांगरते कारण हा प्रश्न तिचे पितळ उघडे पाडणारा होऊ शकत होता. पण तिच्या मदतीला सरसू मावशी येते आणि शरयू इथेच होती असे काहीबाही सांगून विषय परत जान्हवीवर आणते आणि म्हणते ती आता बॅन्केतून येईल. बस येईलच आता....बसचे नाव काढतात बेबीआत्याचे डोळे मोठे होतात...."म्हणजे गोखल्यांची सून बसने नोकरीला जाते ? आणि तुम्ही ते कसे होऊ देता ?" यावर ह्या दोघी काही बोलत नाहीत. पण उदारपणे बेबीआत्या हुकूम सोडते, "ते असो....आपल्याकडे पाच गाड्या पडून आहेत. ड्रायव्हरला सांगून त्याला जान्हवीला बॅन्केत सोडणे व सायंकाळी बॅन्क सुटल्यानंतर घरी आणणे अशी ड्युटी द्या...." असे सांगून तिथून निघून जाते. या दोघींना बेबीआत्याच्या स्वभावाची ही बाजू फारच आवडते आणि कधी एकदा जान्हवीला ही बातमी सांगून टाकावी असे होते आणि त्या लागलीच तिला फोन करतात.

बॅन्केत जान्हवी मॅनेजर बोरकरांच्या केबिनमध्ये कामासाठी आहे. तिथे नेहमीप्रमाणे बोरकर व तिचा हास्यविनोदाचा संवाद होतो. त्या बोलण्यात बोरकर पतीपत्नीमधील नाते किती हृद्य असते, एका क्षणाला गैरसमज झाले तर दुसर्‍या क्षणाला ते कसे दूर केले पाहिजेत, त्यामुळे संसारात किती प्रेम राहते इ. उदाहरणे सांगतात. ती ऐकताना जान्हवीला आपल्या दोघात निर्माण झालेला तणाव आठवतो. ती शांत राहते, बाहेर येते आणि कामाला सुरुवात करतानाच शरयू आणि सरसूमावशीचा फोन येतो....या दोघी इतका वेळ फोनवर तिच्याशी बोलत राहतात की त्यात उद्यापासून तू गाडीने बॅन्केत जायला सांगितले आहे बेबीआत्याने हे शेवटचे ठरते. बेबीआत्याचे म्हणणे ऐकल्यावर जान्हवी 'मी बसनेच येजा करणे किती योग्य आहे...मला बसची सवय आहे....पाचपंचवीस लोक असतात, फ्रीक्वेन्सी चांगली आहे....कार घेऊन बॅन्केला येणे बरोबर नाही..." आदी सबबी सांगत राहते तर दुसरीकडे ह्या दोघी तिच्यावर कारबाबत दडपण आणत राहतात. तिसरीकडे श्री जान्हवीला फोन करण्याचा प्रयत्न करीत आहेच....पण सतत व्यस्त....हा आता भलतच चिंताग्रस्त होत चालला आहे.

शरयूला शेवटी जान्हवी 'मी घरी येते आणि परत यावर बोलू' असे सांगून तो कारचा विषय बंद करते. घरी आल्यावर ती बेडरुममध्ये गेली आहे आणि आपल्या पर्समधून ५० हजार रुपये काढते आणि श्री च्या हाती ठेवते....श्री चकित होऊन तिच्याकडे पाहात आहे....उद्या तिथून पुढे.

मामा वाचले, आजचा बघितला नव्हता पण काही विशेष घडले नाही. गोखल्यांच्या घरात इतक्या गाड्या आहेत तरी सर्व आया घरीच बसून असतात, बाहेर फिरायला किंवा shoppingला किंवा प्रवर्चन,
कीर्तन वगैरे कुठेच जातांना दिसत नाहीत.

होय अन्जू....गोखल्यांच्या घरात इतक्या गाड्या आहेत तेही आजच्या संवादात बेबी आत्या म्हटली म्हणून समजले. एरव्ही तर फक्त एकच गाडी श्री वापरताना दिसतो. तसे पाहिले तर घरी नोकरही नाहीत....अगदी धुण्याभांड्यालासुद्धा बाई नाही.....सहाही स्त्रिया केवळ एकतर रडत असतात आणि ज्यावेळी रडत नसतात त्यावेळी हसत असतात....झाले यांचे काम....बेबीआत्याच तेवढी देखरेखीसाठी आहे...सर्वांवर असेच चित्र.

Pages