होणार सून मी या घरची" -१

Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15

नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया Proud

Honar-Sun-Mee-Hya-Gharchi.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घागरा खायचा म्हणजे सामान्य काम नाही <<<

तेच ना! अजून घागरा घालता येत नाही तर खाणार कुठली! घारग्याचे डोहाळे असले तर ठीक आहे.

यावरून मला कल्पना सुचलीय. श्री ग्रीनपीस चळवळीत आहेच. तर त्याने घरातच भाज्या पिकवायची चळवळ हाती घ्यावी. सगळ्या बायका(गोखल्यांकडच्या, माबोवरच्या नव्हे) कामाला लागतील. शराला बाहेर जायला कारण राहणार नाही. ती झाडावेलींत मन रमवेल. >>> सॉलीडच Lol
LOL काय एकेक प्रतिसाद आहेत आजचे, सकाळी सकाळीच एवढी हसले मी.. आजचा कोटा फुल्ल...

Biggrin आता जाह्नवीने खाल्ल्या घागर्याला आपलं घारग्याला जागण्यासाठी घागरा घालून नेनेबाईंसारखे 'घारगा' आयटम सॉन्ग फक्त करायचे राहिले आहे....

रयू तर आली नसते अजून मग तेव्हा भोपळा कुठुन आला घरात? >>>> नाही हं इंद्‌आत्या व सरू जातात पटकन रिक्षातून भोपळा आणायला, असे दाखविले आहे, >>>> महत्वाचे तेच मिसले म्हणजे मी Proud

.

प्रिय अशोक (मामा) धन्यवाद तुमच्या उत्तरासाठी...
२-३ दिवस हिसूमीयाघ पाहिलिच नाही पण तुमच्या अपडेटस मुळे कळाले काय काय झाले ते...

अदिति
भोपळ्याचे घारगे म्हणजे भोपळ्याच्या पुर्‍या
साहित्य :१ मोठी वाटी लाल भोपळ्याचा कीस,पाव मोठी वाटी बारीक चिरलेला गूळ,अर्धा चमचा मीठ,१ चमचा तेलाचे मोहन,तांदळाचे पीठ.
कृती :
लाल भोपळा किसून घ्या.नंतर त्यात गूळ घालून दोन्ही एकत्र करून शिजवून घ्या.
नंतर खाली उतरवून त्यात मीठ, तेल व तांदळाचे पीठ घालून पीठ तयार करा.
जेवढे तांदळाचे पीठ सामावेल तेवढे घाला.
नंतर तेलाचा हात फिरवून लहान लहान वडे थापून तळावे.

खालील विषयांवर निबंध लिहा:

१. प्रसाद ओकचे चारित्र्य

२. आई आजींच्या केसांचा रंग

३. जान्हवीच्या साहेबाचे मानसिक संतुलन

४. बेबीआत्याचा घागरा

खालील विषयांवर काल्पनिक कथा लिहा:

१. इंदू वहिनी शहाण्या झाल्या

२. श्री व खोबरेल तेलाची टंचाई

३. पिंट्या अस्तित्वात आला

४. नंदन चालवतो गोखले गृह उद्योग

खालील विषयांवर स्वानुभव लिहा:

१. घरासमोरची चावट भाजीवाली व लाल भोपळा

२. गजरा व टेंगुळ

३. ऑफीसमधील मीटिंग व हसू दाबणे

' झी टी. व्ही.वर ब्रेकिंग न्यूज 'जानू' चा घारगा ssss
नाश्त्याला मुगाचा डोसा का भोपळ्याचा घारगाssss'

मधुरा आणि दक्षिणा.....

तुम्हीच तिसरा धागा सुरू करावा असे मला वाटते. तुम्हा दोघींच्या हाताला यश आहे म्हणूनच ४००० चा आकडा गाठला या मालिकेच्या चर्चेने.

आजचा दिवस "मराठी भाषा" असा असल्याने आजच्याच मुहूर्तावर नवीन धागा सुरू केला तर ते योग्यच दिसेल.

मंजुच्याही हाताला अति यश आहे हो मामा
(एका लग्नाची दुसरी गोष्टचे धागे आजही वाहतात अधुन मधुन Wink )
या पोस्ट नंतर या धाग्याला बांध घालावा ही विनंती.

Pages