होणार सून मी या घरची" -१

Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15

नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया Proud

Honar-Sun-Mee-Hya-Gharchi.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटते की होसूमीहघ धागा वरच जास्त प्रतिक्रिया येतात... बाकीच्या कुठल्याही धाग्यात नाही....

हा धागा मायबोलीवर जास्त फेमस झाला आहे.....

मंजूडी, मलापण हासणे आणि श्रीशी बोलणे नाटकी वाटले, तेजश्री चांगली अभिनेत्री आहे, ह्या गोष्टी खरंच तिने टाळल्या तर तिची भूमिका अजून उंचीवर जाईल.

दक्षिणा.... ह्या नवीन धाग्यासाठी दिसत असलेला फोटो तू निवडला आहेस का ? तसे असेल तर बदल कर ना ! पान समोर आले की एकदम त्या सासवाच दिसतात.....ही लाडकी जोडी गायबच....बाजूला पाहावे लागते. तेव्हा शक्य असल्यास/झाल्यास श्री-जान्हवीच ठेव ना तिथे.

मंजूडी मलापण हासणे आणि श्रीशी बोलणे नाटकी वाटले, तेजश्री चांगली अभिनेत्री आहे, ह्या गोष्टी खरंच तिने टाळल्या तर तिची भूमिका अजून उंचीवर जाईल.
>>
तेच तर!
आधी होतीच तिची भुमिका एका उंचीवर.
त्यांचं नविन नविन प्रेम जमलेलं तेंव्हाचा तिचा अभिनय तर कसलाच गोड असायचा. आणि आता बघा Sad

ह्या गोष्टी खरंच तिने टाळल्या तर तिची भूमिका अजून उंचीवर जाईल.>> मालिकेतील तिच्या भूमिकेची तशी मागणीच असेल तर तिने का टाळाव्यात या गोष्टी? Happy
कदाचित दिग्दर्शकाला पुढे ती अजून कणखर, अधिक मॅचुअर झालेली दाखवायची असेल, त्यामुळे तिचा सध्याचा अल्लडपणा तिच्या अश्या हसण्यातून व्यक्त करून दाखवण्याची गरज असेल.

मग आधीपासुअन्च तिला अल्लड दाखवायचं ना.
आधी मॅच्युअर्ड वगैरे दाखवलं आणि मग अचानक्च अल्लड आणि स्पेशली जेंव्हा तीने कणखर असायला हवं होतं तेंव्हाच अल्लड?
लॉजिक पट्या नै!

ओ मामा.. गटगच्या सौतंत्र बीबीचं काय झालं?

सृष्टी.. त्या "रेशिमगाठी"ची स्टोरी माहितीये मला.. म्हणुन आत्तापासुनच बोर होतं पाहायला..

अरे ..त्या नतंरचि रेशीमगाठी कोण बघत नाहित का ???
>>>
मी बघते मी बघते.
त्यावरुन टोमणे ही खाते Proud
तीही अ‍ॅक्टर अभिनयात बाद आहे. दिसायला छान! मालिका सध्या आवडतेय. प्रोमोज मात्र खुप आवडलेले.

मामा सिरियल सर्वांची आहे मग दोघांचाच फोटो टाकून इतरांवर अन्याव का करायचा?
तुम्ही फोटू बघू नका राव, ष्टोरी लिवा.

आधी मॅच्युअर्ड वगैरे दाखवलं आणि मग अचानक्च अल्लड आणि स्पेशली जेंव्हा तीने कणखर असायला हवं होतं तेंव्हाच अल्लड?
>>>
रिया. Happy
जान्हवीची लग्नाआधीची परिस्थिती, नंतरची परिस्थिती, लग्नाआधीचा संघर्ष, लग्नानंतरचे अनेक संघर्ष यांचा काही विचार करशील की नाही?

बरं, तुझ्यामते ती आधी मॅचुअर्ड होती, तेव्हा ती अशी हसत नव्हती का?

मंजु तेच तर म्हणतेय मी
आताशा तिचं वागणं, हसणं अति आणि कृत्रिम झालय Uhoh

आणि जी मुलगी लग्ना आधी मॅच्युअर्ड असते ती अचानक लग्न झाल्यावर अल्लड सारखं वागायला लागली हे तर अजिबातच पटत नाही.. आणि त्यात ती जान्हवी असेल तर तर नाहीच नाही.

आई वडिलांना घर मिळत नव्हतं ते अचानक मिळालं तर लोकं टेन्शन फ्री होतात म्हणुन हसत सुटतात का?
काहीही! बरं ते मैत्रीणीशी बोलत होती ते पण कित्ती हसत हसत आणि नाटकी सरळ चर्चा नाही करता येत का?

माहेरी आपल्याल सगळे नीटच ओळखत असतात.. मला वाटत की सासरी सगळ्यांशी आपली ओळख होईपर्यंत सागळ्यांना आपला स्वभाव, आवडी निवडी , सगळच कळे पर्यंत वेळ लागतोच .. इथे तर अर्ध्या सासवा तिच्याशी बोलण्यासही उत्सुक नाहित...
त्यामुळे सुरुवातिला थोड नमत घ्याव लागतच सासरी .. हा पण फार दिवस नाहीच..

हळु हळु वेगवेगळ्या प्रसंगांतुन, गप्पा गोष्टींतुन स्वभाव उलगडत जातो..
मग मात्र स्वाभिमान दडपुन नमत घ्यायची गरजच नाही..
होपफुली इथेही तेजश्री चे असेच होईल..

अरे वा, पुढचा धागा का. मी फॅन नाही या सिरियलची पण इथली चर्चा वाचते अनेकदा. आठवड्यातून दोन-तीनदा मालिकेचे भाग रिपिट टेलेकास्टला बघीतले जातात. उरलेल्या दिवशी अशोकमामांचे अपडेट्स आवर्जुन वाचते. स्क्रिप्टवर जर पहिल्यांदा होती तशी पकड राखली गेली असती तर मालिका छान रंगली असती. सध्या फारच कंटाळवाणे प्रसंग टाकतात. अजूनही वेळ गेली नाही पण.

बाकी कालच्या भागाबद्दल माझं मंजूडीला अनुमोदन. जान्हवीने ओव्हर अ‍ॅक्टींग केली पण तिचं हसणं खटकलं नाही किंवा अनाठायीही वाटलं नाही. लग्नाच्या आधीही ती ऑफिसातल्या मैत्रिणीसोबत किंवा चाळीतल्या तिच्या मित्रासोबत वयानुरुप अल्लडपणा करता दाखवलेलीच आहे की. यावेळी आनंदाच्या भरात जरा जास्त इतकंच.

दक्षिणाने टाकलेला फोटो बोरिंग आहे. अगदीच बसस्टॉपवरची जाहिरात वाटतेय तो फोटो.

Pages