होणार सून मी या घरची" -१

Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15

नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया Proud

Honar-Sun-Mee-Hya-Gharchi.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नताशा.....

"...नंदन अजूनही जान्हवीचा उल्लेख "छत्रीवाली" करतो तेही पटत नाही...." ~ करेक्ट. हे मलाही लिहायचे होते; पण नेमके केव्हा लिहावे हे समजले नव्हते. एवढ्या मोठ्या बॉसची ती पत्नी आणि आपण इथून पुढे आदरार्थीच तिचा उल्लेख केला पाहिजे इतकी समजूत त्याला [नंदनला] नक्कीच असायला हवी. " छत्रीवाली" हा काही योग्य उल्लेख नाहीच.

नाही .. लग्न झाल्यावर जेव्हा नंदन आणि श्री पहिल्यांदा ऑफिस मध्ये दाखवले तेव्हा नंदन जानू बद्दल विचारपुस करताना तिला मॅडम की वहिनीसाहेब अस काही आदरार्थी म्हणाला होता.. तेव्हा श्री च म्हणाला की अरे तु तिला छत्रीवाली म्हणतोस ना? मग आमच लग्न झाल म्हणुन काय झाल तु तिला तशीच हाक मार वगैरे..
सगळ्यांच्या च नजरेतुन कसा निसटला तो क्षण,,, Uhoh

"....तु तिला तशीच हाक मार वगैरे....."

~ अरेच्या...रीअली ? माझ्याकडून हुकला मग हा प्रसंग. तसे असेल तर मग नंदनला दोष देता येणार नाही. तरीही एक सामाजिक प्रघात म्हणून "वहिनी" या नावाने जो आदर व्यक्त करता येतो, तो 'छत्रीवाली' या उल्लेखामध्ये नक्कीच नाही....अर्थात हे माझे व्यक्तिगत मत.

मामास्नी जानुला जरा काही बोललं तरी लागतं.. ती काय म्हणेल तेही कळते, जरा एखाद दुसरया एपिसोड मध्ये रडवलं की आज जानु अगदी रडवेली झालेली दाखवली अशा वाक्याने सुरवात, तिकडं मंजिरीबाई बघा जरा पुर आला रडुन रडुन , .. ,, Wink
मामा बाहेर या जरा सिरीय्ल मधुन..

दक्षे..... फ़रक पडतो ना ! ऐकायला काहीतरीच वाटतं. आता श्री हा पठ्ठ्या गोखले उद्योगसमुहाचा मालक आणि नंदन कितीही चांगला वागणारा असला तरी त्याने मालकिणीला चक्क ’छत्रीवाली’ अशी एकेरी हाक मारणे नाही पचनी पडत.

दिप्ये.....येप्प्प....!! जान्हवी फ़ार सोशीक आहे म्हणून तिला छळू नये असे वाटते....तसेच तिचा उल्लेखदेखील आदरार्थी करायला काय हरकत आहे ?

अरे आशुबाबा..... साधासोपा 'वहिनी' हा उल्लेख उपलब्ध असताना त्याला कुठल्याही प्रीफिक्स वा सफिक्सची जोड का द्यावी ? हाही प्रश्न समोर ठाकतोच ना.

जान्हवी फ़ार सोशीक आहे म्हणून तिला छळू नये असे वाटते....>>ओ मामा तिला छळून घेण्यासाठी पब्लिसिटी आणि पैसे मिळतात... Angry

लग्न झाल्यावर मुलीने सासरच्या सगळ्या जबाबदार्‍यांत हातभार लावावा अशी सर्वसाधारण पद्धत आहे. मग जावयाने सासरच्या जबाबदार्‍यांना हातभार लावला तर जगबुडी का येते?>>>>>>>>> +१११११११११११

दक्षे..... इतकी मनमिळावू मुलगी आहे ती.....कधीच असं कानात सांगणार नाही.... छळाबाबत....तुला तर नाहीच नाही ! मार्क माय वर्ड.

लग्नानंतर मुलीचं नाव बदलायला श्रीचा सक्त विरोध आहे, मग ते नाव आईवडिलांनी ठेवलेले असो किंवा नंदनने.>> Rofl

मामा फारच पर्सनली घेताय सिरीयल तुम्ही :))

काय करणार अदिति.....एवढ्या ढीगाने समोर येत असलेल्या विविध मालिकांतून ही एकमेव मालिका मी पाहात असल्याने तिच्यातच जास्त मन गुंतून गेले आहे.....कथानक आणि पात्रांचा अभिनय आवडत असल्यामुळेही कदाचित हा सारा प्रपंच तू म्हणतेस तसा पर्सनली झालाय खरा....बट आय होप, तू समजून घेशील.

मामा, मी कालचा एपिसोड बघितला आणि आजचाही बघितला, आजचा आवडला मला, सर्वांनी छान काम केले आणि जान्हवी अजिबात नाटकी वाटली नाही, पहिल्यासारखाच सहज-सुंदर अभिनय वाटला. जान्हवीचे बॉस, मैत्रीण, आई-बाबा, श्री, नंदन सर्वांनी आज सुंदर काम केले.

तरीपण तुमचे अपडेट्स वाचायला येणार आहे.

गुरुवार दि. ५ डिसेंबर २०१३ : अपडेट

~ आजच्या भागाची सुरुवात विजया बॅन्केतील दोन मैत्रिणी....जान्हवी आणि गीता....फ्लॅटसंदर्भात करीत असलेल्या बोलाचालीने झाली. जान्हवी रेंटबद्दल विचारीत आहे तर गीता म्हणते, "बंगलोरहून ताईचा फोन आला आहे की जर फ्लॅट जान्हवीला हवा असेल तर भाडे नको...." पण जान्हवी हट्टच धरते तेव्हा गीता तिला म्हणते, "तू चाळीतील तुमच्या घराला किती भाडे देतेस ?" "चार हजार." जान्हवी उत्तरते, "तर मग फ्लॅटलाही तितकेच दे..." यावर जान्हवीला काय उत्तर द्यावे ते कळत नाही. गीताविषयी तिचे प्रेम तिच्या चेहर्‍यावर दिसून येते. ती म्हणतेही "गीता किती मोठे काम केले आहेस तू माझ्यासाठी...." यावर हसून गीता सांगते, "अगं', तू मला बॅन्केतील कामात मदत करतेसच ना ? तसेच हे समज....आज अर्धा तास आपण लवकर जाऊ आणि फ्लॅट पाहू...." तथापि एक आदर्श कर्मचारी या नात्याने कामाचे तास संपण्यापूर्वी बॅन्केतून जायला जान्हवी हसतहसत नकार देते....तिथे मॅनेजर बोरकर येतात...त्यांचा तो ठरलेला मोबाईलवरील संवाद बायकोशी....आणि या दोघींनी हसू लपवत ते ऐकणे चालू होते. नंतर ऑफिस सुटल्यानंतर जान्हवी व गीता तो ठरलेला फ्लॅट बघून येतात. जान्हवी असला डीसेन्ट फ्लॅट फर्निचरसह भाड्याने मिळणार म्हणून परत खुश होते आणि गीताचे आभार मानते....गीता 'सोडून दे हा विषय...' असे म्हणत तिचा निरोप घेताना फ्लॅटची किल्ली देते, ती घेताना जान्हवीचे डोळे पाण्याने भरून येतात....मग जान्हवी चाळीकडे वळते.

इकडे श्री आपल्या ऑफिसमध्ये अस्वस्थपणे इकडून तिकडून फेर्‍या मारीत आहे....त्याचे मन खात असल्याने तो निर्णय घेतोच की आता आईआजीला त्या ५० हजार रुपयांबाबत सत्य सांगण्याची वेळ आली आहे.... आणि जान्हवीलाही सांगून मन हलके करून घ्यावे असे वाटते. आजीला फोन लावतोही, पण त्या वाचनात गुंग असल्याने त्याच्याशी सविस्तरपणे फोनवर बोलता येत नाही असे म्हणताच "मी तुला सहज फोन केला होता...काही विशेष नाही...घरी येऊन बोलतोच.." असे सांगून वेळ मारून नेतो.....दुसरीकडे जान्हवीला फोन लावतो तर ती त्याचवेळी माहेरच्या चाळीत प्रवेश करीत आहे....फोनवर नेहमीप्रमाणे एकीकडे श्री चे तत्वज्ञान तर दुसरीकडे जान्हवीची प्रत्यक्ष जीवनातील समस्यांना सामोरे जाण्यासाठी ज्याचे त्यानेच केले पाहिजे ह्या तत्वाचा पुरस्कार करताना वापरायची भाषा बोलणे....हे संवाद फोनवर....अगदी दीर्घपणे. शेवटी श्री माघार घेतो....आणि फोन चालू असताना जान्हवीला वाटते की श्री आनंदाने "तू मला, मी तुला....' हे गाणे म्हणत आहे, तर ती त्याला पूर्ण म्हण असे सांगते.....जान्हवीचा उल्हसित आवाज ऐकून श्री ठरवितो की आता तिला पैशाची बातमी सांगायला नको....घरी आल्यावर बोलू.....[श्री ला अर्थातच हे माहीत नाही की सासर्‍याला सासूबाईने ५० हजार आणल्याची बातमी समजली आहे....आणि घरात रणकंदन झडले आहे]. बायकोच्या आग्रहास्तव फोनवर ते गाणेही तो म्हणतो....ही खूष.

जान्हवी घरात प्रवेश करते....तर बाप कॉटवर बसला आहे तर आई दुसरीकडे कपाटाला टेकून अपराधी भावनेने उभी आहे. जान्हवी फ्लॅटची बातमी सांगते....गीताबरोबर कसा व्यवहार झाला हेही सांगते आणि फ्लॅटची किल्लीही सदाशिवराव यांच्याकडे देते....पण या दोघांच्या चेहर्‍यावर कसलेच भाव उमटत नाहीत. काळजीत पडलेली जान्हवी "काय झाले आहे तुम्हा दोघांना ?" असे विचारते....तर शेवटी शशीकलाबाईच म्हणते..."अगं मी पैसे आणले बाहेरून घर चालवायला म्हणून याना लाज वाटत आहे....". यावर जान्हवी "पैसे आणलेस ? कुठून ?" असे थेट विचारल्यावर शशीकलाबाई काही न बोलता इकडेतिकडे पाहते....तर चिडलेले सदाशिवराव मोठ्याने ओरडून जान्हवीला सांगतात, "श्री कडून आणले हिने.....आणि तेही पन्नास हजार..."

जान्हवीला हादराच बसतो....हे तिला बिलकुल अपेक्षित नाही....तिचे संतापलेले रूप आणि प्रतिक्रिया उद्याच्या भागात पाहायला मिळेल.

मामा, आले वाचायला. एपिसोड बघितला किंवा नाही बघितला तरी तुमचे अपडेट्स वाचणे आनंददायी असते माझ्यासाठी.

जानू खुशीत आली की जागच्या जागी एका पायावर उडी मारते ती स्टाईल मला फार आवडते.>>> मलापणा

लग्नानंतर मुलीचं नाव बदलायला श्रीचा सक्त विरोध आहे, मग ते नाव आईवडिलांनी ठेवलेले असो किंवा नंदनने>>> Proud

बायकोच्या आग्रहास्तव फोनवर ते गाणेही तो म्हणतो...

>> इथे श्रीने सुरात गाण्यासाठी बर्‍यापैकी रियाज केलेला जाणवला.
काही जागा छान घेतल्या त्याने..

जान्हवीने कसले भयंकर गायले पण ते Wink नंतर श्री गायला म्हणुन बरं

नाहीतर बाई, तू मलाआआआआआआआआआआआआआआअ
मी तुलाआआआआआआआआआआआआआआआआआ
इतकच म्हणाल्या पण किती ते बेसूर Sad

नाहीतर बाई, तू मलाआआआआआआआआआआआआआआअ
मी तुलाआआआआआआआआआआआआआआआआआ
इतकच म्हणाल्या पण किती ते बेसूर

>> अनुमोदन..
(गुब्बे पळ.. आता मामा मारणार आपल्याला Wink )

Pages