Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15
नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी तर म्हणते धागा हायजॅक
मी तर म्हणते धागा हायजॅक करा.
त्यांचं दळण दळून होईपर्यंत आपण धम्माल करुयात
एका बाईने नवराबायकोंचे संवाद
एका बाईने नवराबायकोंचे संवाद चोरून ऐकणे आणि त्यात पदरमोड करून अन्य बायकांची डोकी फिरविणे हा प्रकार केवळ असह्य वाटत होता. याचाच अर्थ आपला पोरगा तेवढा सज्जन आणि त्याला मिळालेली बायको मात्र त्या दर्जाची नाहीच [हे तर बेबीआत्या म्हणत असतेच नेहमी] ह्या बाबी वारंवार दाखविणे म्हणजे आपण स्त्री जातीचाच अपमान करीत आहोत हे मुग्धागंदा कुलकर्णी नामक लेखिकेच्या लक्षात का येऊ नये ?
आजीसारख्या ज्येष्ठ स्त्री ने कानउघडणी केल्यानंतर परत त्याच इंदूबाईने पुन्हा श्री च्याच खोलीत जाऊन त्या नवराबायकोंचा काही गोड संवाद चालू आहे त्यात प्रवेश करणे तर अत्यंत हास्यास्पद बाब.
केवळ बालिशपणा चालला आहे.
मुग्धागंदा कुलकर्णी >> हे असं
मुग्धागंदा कुलकर्णी >> हे असं नाव आहे?
मुग्धगंधा असेल
मुग्धगंधा असेल
किंवा मुग्धांगदा असेल
किंवा मुग्धांगदा असेल
मुग्धागंदा नाही, मुग्धगंधा
मुग्धागंदा नाही, मुग्धगंधा नाही, मधुगंधा आहे ते लोकहो
सानी
सानी
मुग्धा गंदा काय , मुग्ध गंधा
मुग्धा गंदा काय , मुग्ध गंधा काय !!! मधुगंधा नावाची वाट लावलीय. ती मधुगंधा जीव देईल ही नावाची चिरफाड वाचून.
बघ ना पियु परी, तिच्या
बघ ना पियु परी, तिच्या बिचारीच्या नावाचा किती वाईट अपभ्रंश झालाय..
नुकतेच "जुळुन येती रेशीमगाठी" धाग्यावर समजलं, की मधुगंधा कुलकर्णी म्हणजे त्या मालिकेतील सुकन्याच्या सूनेचं काम करणारी अभिनेत्री आहे. हीच ती:
अगदी अगदी, सामी
अगदी अगदी, सामी
मुग्धागंदा कुलकर्णी<<< माझ्या
मुग्धागंदा कुलकर्णी<<< माझ्या आधीच्या बॉसला हे नाव म्हणायला सांगितलं पाहिजे. एका ईव्हेंटसाठी तो एकदा मला चीफ गेस्ट "चित्रतंग्डा" आहे असं सांगत होता. तिचा फोटो पाह्यलावर समजलं त्याला चित्रांगदा म्हणायचं होतं.
चित्रतंग्डा? नंदे.. तुला एकदम
चित्रतंग्डा?
नंदे.. तुला एकदम हहगलो झालं असेलना?
किंवा अओ तरी..
नंदिनी तु इथे उच्चार लिहू तरी
नंदिनी तु इथे उच्चार लिहू तरी शकलियेस
"चित्रतंग्डा..?
"चित्रतंग्डा..?
आज तो टकल्या अनिल दिसला......
आज तो टकल्या अनिल दिसला...... कशाला आणलाय त्याला ???
मामाप्रमाणेच अनिलचं कॅरॅक्टर डोक्यात गेलं होतं.
तो परत आल्याने सिरिअल डोक्यात जाऊ नये म्हणजे झालं.
शुक्रवार दि. १३ डिसेंबर २०१३
शुक्रवार दि. १३ डिसेंबर २०१३ : अपडेट
~ गेले काही दिवस मालिकेच्या दिग्दर्शकाला तसेच लेखिकेला [मधुगंधा कुलकर्णी....हो हे नाव बरोबर आहे.... माझ्याकडून मुग्धा नाव कुठून आणि कसे टंकले गेले, देव जाणे...असो] आपल्या हातातून 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेचे तारू भरकटत चालले आहे याची जाणीव झाल्याची दिसत नाही असेच म्हणावे लागेल. काय आपण प्रेक्षकाला दाखवित होतो....आणि काय अवस्था होत चालली आहे याचा ह्या टीमने अभ्यास करणे फार गरजेचे आहे....अन्यथा सुरुवातीला घेतलेले मालिकेचे टीआरपी झपाट्याने घसरणीला लागेल.
आज काय दाखविले...? इतके दिवस ताणतणावाचे वातावरण होते, रंगतही चालले होते....आणि आज त्या डोके ताळ्यावर नसलेल्या दोन आयामध्ये निर्माण झालेला इंग्रजी शिकण्याचा अट्टाहास....एकीला श्री ने शिकवायला हवे...तर दुसरीला जान्हवीने. मग दोघीत पैज लागणार....वाक्य पाठ करीत आहेत....काय वाट्टेल ते दाखवित गेले देवस्थळी. त्यात कालच आजीनी त्या इंदूबाईला सांगितलेले असते की श्री आणि जान्हवीच्या संसारात तुम्ही लक्ष घालू नका...असे असतानाही परत आज सकाळी सकाळी श्री च्या रूममध्ये ही इंदूबाई लगबगीने येते आणि श्री जान्हवीला एकमेकाच्या बाहुपाशात पाहून 'शिवशिव...' चा घोष. बरे तिथून निघूनही जात नाही....उलट 'श्री मला तुझ्याशी काही बोलायचे आहे....' यावर तो बोल म्हणतो तर परत हिचे 'मला एकट्याशीच बोलायचे आहे..." कशासाठी हे सारे नाटक ? जान्हवी तिथून निघून जाते आणि ही बाई मोठे कार्य काय सांगते तर इंग्रजी शिकव..... खाली स्वयंपाकघरात शरयू तेच शब्द जान्हवीला....ती कबूल होते... मग परत तिथे इंदूबाई...तिच्यात आणि शरयूत वादावादी.
हे सारे कमी होते की काय....तेव्हा जान्हवी बस स्टॉपवर उभी आहे....तिला नायर हॉस्पिटलमधून फोन येतो. वडिलांच्या ऑपरेशनसंदर्भातील फोन आहे. तिला गुरुवारी दवाखान्यात यायला सांगितले आहे. जान्हवीला आनंद होतो....वडिलांना घेऊन जाण्याचे ती ठरवित आहे, तोच तिथे अनिल आपटे येतो....त्याला पाहून ती साहजिकच चिंतेत पडते....आता हा का आला असेल ? याचा विचार ती करते तर आपटेच म्हणतो, 'मला माझ्या बायकोने वरून सांगितले की ही तुम्हाला मुलगी सारखी आहे.....मला डीएसपीनी तुमच्याबाबतीत चांगलाच धडा दिला आहे....मला नोकरीवरूनही काढून टाकले आहे, मी बेकार आहे...." वगैरे वगैरे....जान्हवी त्याच्या नादाला न लागतो येणारी बस पकडते आणि बॅन्केत येते. तिथे आल्यावर ती मॅनेजर बोरकरांना भेटते. ऑपरेशनविषयी बोलते.....कर्जाचे हप्ते लागलीच सुरू करण्याविषयी बोरकरांना विनंती करते. बोरकरांना काही सुचत नाही...कारण मुळात हिच्या नावावर कर्ज नसतेच तर हप्ते कुठले कापणार ? तो तिला ऑफिस कामासाठी जा असे सांगतो....आणि मग ती गेल्यावर लागलीच श्री ला फोन करून आपली अडचण सांगतो....श्री आता निर्णय घेतो की गेल्या दोन दिवसातील घडामोडी पाहता आता जान्हवीपासून काही लपवून ठेवण्यात अर्थ नाही. मॅनेजरना विश्वास देतो की मी सारे सांभाळून घेतो.
इकडे सहस्त्रबुद्धे कुटुंबियांनी चाळीतील आपले घर सोडले....रिकामे केले....आणि फ्लॅटमध्ये राहाण्यासाठी जात आहेत....जाताना सदाशिवरावांना या घरातील जुन्या आठवणींनी गदगदून आले आहे....ते एकटेच डोळ्यातून अश्रू काढतातही....पिंट्या त्याना न्यायला येतो, पण त्याची मदत न घेता ते जिना उतरतात.
आज तो टकल्या अनिल दिसला......
आज तो टकल्या अनिल दिसला...... कशाला आणलाय त्याला ???<<<
मामा वाचले. भरकटत चालली आहे
मामा वाचले. भरकटत चालली आहे मालिका. एक माझ्या मनासारखे झाले कि बाबांचे ऑपरेशन होईल बहुतेक लवकर, मी नाही बघत हल्ली.
आज बर्याच दिवसांनी ही मालिका
आज बर्याच दिवसांनी ही मालिका पाहिली. वर अशोकमामांनी लिहिलेल्या पोस्टीशी सहमत. झी अॅवॉर्ड वगैरेमध्ये सर्वात इरिटेटिंग पात्र (म्हणजे जे बोलायला लागले की प्रेक्षकांमध्ये हातात येईल ती वस्तू फेकून मारायची ऊर्मी निर्माण होते ते 'पात्र') अशी नवीन कॅटॅगरी निर्माण करून त्याअंतर्गत इंदूवहिनी बाईंचा जाहीर सत्कार करायला हवा. पार्श्वसंगीताच्या नावाखाली कुणीतरी गायक अत्यंत बेसूर आवाजात आकारात गात होता असं वाटलं....की माझ्या श्रवणयंत्रणेत काही बिघाड झालाय, काही कळायला मार्ग नाही.
जान्हवीला नायर हॉस्पिटलमधून
जान्हवीला नायर हॉस्पिटलमधून फोन येतो?
शरयूला कालही एक लवंगी फटाका संवाद होता.
जान्हवी : मनात आणलं तर स्त्री अख्ख जग जिंकू शकते.
शरयू : हो पण इंदूवहिनीही स्त्रीच आहेत ना.
बोरकर बँकेचे शाखा-प्रबंधक आहेत की चुटक्यांचे एटीएम?
डॉ. नाईक असावे ते.
डॉ. नाईक असावे ते.
डॉ.नायर की डॉ.नाईक
डॉ.नायर की डॉ.नाईक ???
माझ्याही ऐकण्यात फरक पडला असावा. असो....दवाखान्यात नेताना बाहेर किमान बोर्ड तरी दाखवतील देवस्थळी.
पुढे?>> दक्षे, पुढे काही नाही
पुढे?>> दक्षे, पुढे काही नाही
चित्रतंग्डा?>>>> हे एकदा
चित्रतंग्डा?>>>>
हे एकदा तिला ऐकवायला हव.... एकतर ऐकविणारा ढगात गेलेला असेल किंवा चित्रांगदा स्वतः तरी.... 
आता ही मालिकासुद्धा भटकणार
आता ही मालिकासुद्धा भटकणार आहे असे वाटते. कथा जास्त विस्तारत जाताना, नको त्या पात्राला परत आणायला नको होते.
ईव्हेंटच्या वेळी बॉसला "प्लीज
ईव्हेंटच्या वेळी बॉसला "प्लीज तिला फर्स्ट नेमने हाक मारू नका" असं विनवून ठेवलं होतं. यावरून आठवलं आमच्याकडे एक "इंग्लिशशिवाय बात नै" असा एक नमुना होता. तिचं नाव वैशाली. पण नाव सांगताना स्टाईलमधे "वेश्याली" असं सांगायची. ती फोनवर बोलायला लागली "हाय दिस इज वेश्याली फ्रॉम...." की आम्ही खुसूखुशू हसत बसायचो.
तिचं नाव वैशाली. पण नाव
तिचं नाव वैशाली. पण नाव सांगताना स्टाईलमधे "वेश्याली" असं सांगायची.
>> लोल्झ नंदिनी.. असंच ते आजकाल 'गौरव' ला 'गॉरव', 'गौरी' ला 'गॉरी', 'रौनक' ला 'रॉनक' म्हणायची फॅशन आलीये हिंदी मालिकांमुळे.. मी तर परवा स्वप्नील नावाच्या एका मुलाचं नाव दुसर्याच्या मोबाईल मध्ये 'सोपनील' असं सेव्ह केलेलं बघितलं
आपटेची कंप्लेन्ट पोलिसात कोणी
आपटेची कंप्लेन्ट पोलिसात कोणी केली ते रहस्य उलगडायचे असेल.
आपटेची कंप्लेन्ट पोलिसात कोणी
आपटेची कंप्लेन्ट पोलिसात कोणी केली ते रहस्य उलगडायचे असेल.
>> अरे हो.. जान्हवीला माहित नसलेल्या अनेक गोष्टींपैकी ती एक आहे.
बोरकर बँकेचे शाखा-प्रबंधक
बोरकर बँकेचे शाखा-प्रबंधक आहेत की चुटक्यांचे एटीएम?<<<
Pages