होणार सून मी या घरची" -१

Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15

नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया Proud

Honar-Sun-Mee-Hya-Gharchi.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

".....पण श्रीच्या मदतीसाठी घेतलेले नंदन हे पात्र मात्र लहान तोंडी मोठा घास वाटते....."

~ तरी बरे.... गेले काही भाग नंदन याने "छत्रीवाली" नामाचा त्याग केलेला दिसतोय....हल्ली श्री बरोबरीने बोलताना तो "मॅडम" असा उल्लेख करू लागला आहे....बहुतेक दिग्दर्शकाने मालिका प्रेक्षकांच्या मतांची नोंद घेतली आहे असे दिसते.

ती जाह्नवी एवढी हळुहळू का बोलते. ती बोलत असताना टीव्हीला जर फास्ट फॉरवर्ड बटन असेल तर ते दाबून धरावे असे वाटते Happy

< श्रीच्या मदतीसाठी घेतलेले नंदन हे पात्र मात्र लहान तोंडी मोठा घास वाटते> असे म्हटलेले श्रीला मुळीच आवडणार नाही. तो साम्यवादी विचारांचा भांडवलदार आहे.

तो साम्यवादी विचारांचा भांडवलदार आहे.>>> भरत Lol

त्याने पैसे दिल्याचे आजचे जस्टिफिकेशन म्हणजे एक नंबर भंकस होती. बायकोच्या आईने पैसे मागितले, दिले. बायकोला आवडले नाही. बिग डील! आधी माहीत नव्हते. कसले अपमान, दुखावणे आणि काय काय? हे लोक नॉर्मल बोलू शकत नाहीत का? बायकोची आई म्हंटल्यावर पुन्हा मागितले तरी देणारच. नातेवाईकांना पैसे देणे आणि "दुसर्‍याला मदत करणे" ई गोष्टीतला फरक कळत नाही का यांना?

त्यावर कहर म्हणजे आयांनी लगेच चुगली करुन ब्रेकिंग न्युज लावलीच .. ह्यांना एक न्युज चॅनेल दिलं पाहिजे चालवायला ..
श्री चक्क रडतोय .. बाकी आया आल्याच काय झाल रे वगैरे गुळ्गुळीत वाक्य घेवुन..
अरे श्वास घेवु द्या की त्याला.. प्रायव्हसी नावाची गोष्टच नाही .. नवीन लग्न झालयं म्हणत या आयांच नाक खुपसतायत

बुधवार दि. ११ डिसेंबर २०१३ : अपडेट

~ आज जान्हवी श्री सोबत वाद घालणार हे निश्चित होते. श्री ला समजत नाही की आपली पत्नी अशी तुटल्यासारखे का वागत आहे. तो तिला कारण विचारीत राहतो, सातत्याने. ती निमूटपणे कॉटवर ठेवलेल्या आपल्या पर्सकडे जाते आणि शांतपणे त्यातील ५० हजाराचा गठ्ठा काढते आणि त्याच्या हातात देताना म्हणते, "हे घे, तुझेच आहेत". श्री स्तब्ध उभा आहे, त्याला धक्का बसला हे जाणवते. तो खुलासा करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी मात्र जान्हवी चिडल्यासारखी झाली आणि "श्री तू माझ्यापासून हे लपवून ठेवलेस. मी तुझी अर्धांगिनी आहे आणि आपण एकमेकाला विश्वासात घेऊनच संसार पुढे चालवायचा असे ठरले होते....पण तू ही जी पैशाची मदत आमच्या घरी केलीस ते तू मला निदान विचारून तरी करायची होतीस. अशी मदत करून तुला जर देवपण लाभत असेल तर...." इथे श्री जान्हवीला थांबवितो.... संतापतोही...."जान्हवी, माझी चूक झाली हे मी कबूल करतो. पैसे देण्यापूर्वी तुला सांगायला पाहिजे होते हे मान्य. पण म्हणून मी मला देवपण मिळावे यासाठी केले असे अजिबात म्हणू नकोस. मला ज्याप्रमाणे माझ्या सहा आया जवळच्या वाटतात तशाच इतरांच्या आयादेखील....त्यानी मदत मागितली आणि मला ती द्यावीशी वाटली तर मी देणार आणि त्या बाबतीत तू मला अडवू नकोस..." असे म्हणून तिच्यापासून जातो....दार उघडून बाहेर जातो. आता या पतीपत्नीचे वाद भांडण दाराला कान लावून ऐकणारी इंदूबाई...तिथून लगबगीने बेबीआत्याच्या रूममध्ये येते आणि भांडणाचे रसभरीत वर्णन करताना श्री रडत होता आणि काहीतरी पैशाचा वाद आहे वगैरे मसालाही पुरविते. बेबीआत्याला तर जान्हवीच्या विरोधात असे काहीतरी चमकदार हवेच असते. ती आईआजीच्या खोलीत जाते. आजी तिला "आता काही सांगू नकोस, उद्या बोलू...." इतके म्हणत असतानादेखील श्री साठी सांगत आहे असे म्हणून त्यानाही भांडणाचे सारे काही प्रकरण सांगते. आजी अर्थातच अस्वस्थ आणि बेबीला म्हणतात, "खरं तर गोखले घराण्यातील पोरांना लग्नाचे सुख नाही हा शापच आहे; मलाही ही श्री च्या बाबतीत असेच वाटत होते. ही मुलगी मला पसंत नव्हती, तरीही ही आल्यानंतर जर श्री आनंदात संसार करू लागला तर ह्या मुलीला मी सारे काही माफ करून आपलेसे केले असते....पण तसे दिसत नाही. आता श्री ला नेमके कारण विचारले पाहिजे...."

इकडे जान्हवी आपण श्री ला जे बोललो ते समजुतीचे होते की कठोरपणाचे होते याची विचार करीत बसली आहे... एकटीच....श्री ने आईने पैसे मागितले म्हणून दिले असे म्हटल्यामुळे आपली आई त्या स्वभावाचीच आहे हे तिला माहीत असल्याने श्री चे त्यात काही चुकले असे आता तिला वाटत नाही....फरक आहे तो इतकाच की त्याने सर्वप्रथम आपल्याला विचारायला हवे होते....तरीही न विचारल्याबद्दल त्याने आपली माफी मागितली आही....अशा विचाराच्या गर्तेत असतानाच तिचा फोन वाजतो. तो असतो मनिषचा. तो सांगतो, "जान्हवी, मी आणि पिंट्या गीताच्या बहिणीचा फ्लॅट पाहून आलोय. टेम्पो ठरविला असून उद्या आम्ही तिकडे शिफ्ट होत आहोत. तू सायंकाळी ऑफिस सुटल्यावर नव्या जागी ये...." जान्हवी केवळ हो ला हो करीत आहे. ते ऐकून मनिष तिला काळ्जीने विचारतो काय झाले ? जान्हवी आपले आणि श्री चे छोटे भांडण झाल्याचे सांगते. मनिष उलटे तिच्यावरच नाराज होतो. म्हणतो, "हे बघ बॉय फ्रेंड आणि गर्ल फ्रेंड आपापल्या घरी राहात असतानादेखील त्यांच्यात भांडणे होत असतात, तुम्ही तर एकाच घरात राहात असल्याने अधुनमधून भांडण हे होणारच...त्याला मोठे करू नकोस...शिवाय तुमच्यातील भांडण घरातील इतरांना समजले तर त्या त्याला मोठे रुप देतील आणि मग तुझीच पंचाईत होऊन बसेल....आत्ताच्या आता बाहेर जाऊन श्री ला घेऊन ये आणि सॉरी म्हण..." जान्हवीला हा सल्ला पटतो आणि ती बाहेर निघते.

इकडे श्री मुख्य गॅलरीत उभा आहे, त्याच्या डोळ्यातून पाणी येत आहे....आणि अशावेळी त्याच्या खांद्यावर एक हात पडतो, तो असतो आईआजीची....मागे वळून पाहतो आणि त्याला आजीसोबत आलेल्या पाचही आया दिसतात.

<त्याने पैसे दिल्याचे आजचे जस्टिफिकेशन म्हणजे एक नंबर भंकस होती. बायकोच्या आईने पैसे मागितले, दिले. बायकोला आवडले नाही. बिग डील! आधी माहीत नव्हते. कसले अपमान, दुखावणे आणि काय काय? हे लोक नॉर्मल बोलू शकत नाहीत का? बायकोची आई म्हंटल्यावर पुन्हा मागितले तरी देणारच. नातेवाईकांना पैसे देणे आणि "दुसर्‍याला मदत करणे" ई गोष्टीतला फरक कळत नाही का यांना?>
फारेण्ड , याला काहे पार्श्वभूमी आहे. नवर्‍याला आपण पकडले गेलोय, . बायकोला आवडणार नाही
हे माहीत असूनही तसे वागलोय हे माहीतच होते. त्याबद्दल त्याचे मन त्याला आधीपासूनच खात होते. पण चांगुलपणाने वागणे हाच आपला धर्म असे त्याने अनेकांच्या विरोधाला न जुमानता फार आधीपासून ठरवले आहे. कोंडीत सापडल्यावर त्याच्या दृष्टीने तात्त्विक, वैश्विक स्पष्टीकरणे तो देत सुटला. इथे त्याचा स्वतःशीही झगडा चाललेलाच आहे. (आधीच्या एका भागात चांगुलपणाने वागूनही आपण लोकांना दुखावतो, मग काय करायचे असा तात्त्विक वाद बायकोशी + स्वतःशी घातला).
बायकोने आपल्या माहेरच्या गोष्टींसाठी नवर्‍याची कोणतीही आर्थिक मदत चालणार नाही हे लग्नाच्या आधीपासूनच अनेक वेळा स्पष्ट केले आहे. तरीही त्याने असे वागावे यामुळे ती दुखावली गेली आहे.
बायकोपासून लपवून तिच्या घरच्यांना आर्थिक मदत करायची ही त्याची पहिली वेळ नाही. पण पकडले जाण्याची मात्र पहिली वेळ आहे.

आधीच्या एका भागात इंग्रजी न येण्यावरून चाललेल्या रडारडीबद्दल : बहुतेक मालिकांमध्ये तणावाचे आणि विनोदाचे सीन आलटून पालटून पेरलेले असतात. मला ते दृश्य पाहताना चिमणराब गुंड्याभाऊंच्या सरकारीपाहुणे या चित्रपटाचे सुरुवातीचे दृश्य आठवले. ज्यात राजेसाहेबांकडे शोकाकुल वातावरण असते. मग कळते की राजेसाहेबांचा कुत्रा मेलाय.

तसेच त्या घरातल्या बायकांना स्वतःचे काही आयुष्य, उद्दिष्ट नाही, आपल्या ठरलेल्या लहानशा कामांनाही त्या किती चिकटून बसतात, ही खरीतर दयनीय स्थिती अनेकदा दाखवली आहे.

जान्हवीने घरात साड्या सोडून गाऊन घालायला सुरुवात केली. (आणखी एक पुरावा मालिकावाले इथे डोळा ठेवून असल्याचा) Wink

अंजली....

लोनच काय.....पण हरविलेल्या चंद्रहाराच्या जागी श्री ने आपले पैसे घालून रातोरात दुसरा चंद्रहार आणून तिला दिला होता, हेही जान्हवीला अजून समजलेले नाही.....तो चोरीचा चंद्रहार खिशात हातरुमाल ठेवल्यागत करत बंधू पिंट्या रात्रभर फिरतोय आपला.

आणी तिला सोन्याच्या जरीची साडी आणि आईने मागितलेला अजुन एक चंद्रहार याविषयीही काही माहित नाहीये. याशिवाय आईने लग्नात दागिन्यांच्या केलेल्या भरमसाठ दागिन्यांच्या बिलाबद्दलही जान्हवीला काही माहित नाहीये. मामाकडे गोखल्यांच्या घरात जाऊन आल्यानंतर एवढा महागडा मोबाईल कुठुन आला हेही तिला माहित नाहीये. श्रीने अचानक उत्पन्न केलेल्या चंद्रहाराविषयी काही माहित नाहीये. बाबांच्या ऑपरेशन साठी बँकेतून घेतलेले कर्ज हे कर्जच नाही हे तिला माहित नाहीये. इतके ख्यातनाम डॉक्टर तिच्या बॉसच्या नाही तर श्रीच्या सांगण्यावरून ऑपरेशन स्वस्तात करणार आहेत हे तिला माहित नाहीये. आपला चंद्रहार आपल्याच मामाने चोरला होता आणि तो आता आपल्या भावाकडे आहे हे तिला माहित नाहीये. एकदंर जान्हवीला बरेच काहीच माहित नाहीये. आणी एक एक गोष्ट जसजशी उघड होत जाईल तसतसे जान्हवीच्या स्वाभिमान एपिसोडचा रिपीट टेलिकास्ट होईल हे नक्की.

श्री कधी नव्हे ते भांडणाचं खरं कारणं सांगेल आणि आईआजी जान्हवी कशी बरोबर आहे ते समजावून सांगेल, बाकीच्या साळकाया माळकायांना स्वतःची अक्कल नसल्याने त्या पण जान्हवीच्या बाजूने बोलतील.

काल जो प्रोमो दाखवलायं त्यावरून हा अंदाज Happy

आणी तिला सोन्याच्या जरीची साडी आणि आईने मागितलेला अजुन एक चंद्रहार याविषयीही काही माहित नाहीये. याशिवाय आईने लग्नात दागिन्यांच्या केलेल्या भरमसाठ दागिन्यांच्या बिलाबद्दलही जान्हवीला काही माहित नाहीये. ..... स्वाभिमान एपिसोडचा रिपीट टेलिकास्ट होईल हे नक्की.>> पियु परी , तिला हा बाफ वाचायला लावू सगळे कळेल Happy

पियु परी , सामी Happy

प्राजक्ता.. इतक्या लवकर कसं सांगेल तो.. ६ आयांना अजुन बरेच तर्क वितर्क लावायचे आहेत.. नाहितर सिरीअल संपेल लवलर

श्री कधी नव्हे ते भांडणाचं खरं कारणं सांगेल>>>>>>नाही मगं आईआजीला श्री चा खोटारडेपणा कळेल ना....
आता असं वाटतय, जान्हवीलाच गैरसमज होईल की याने दोघातले भांडण सगळ्यांना सांगितले म्हणून...

जान्हवीने तिच्या मूल्यांचे कधी कधी अवास्तव थोतांड केले आहे असे वाटते. गाडी नको, बसची सवय आहे. नौकरी करणार हे सगळं मान्य मग सकाळी आयता चहा घशाखाली उतरतो कसा हिच्या? सवय आहे ना हिला घरातलं सगळं सांभाळून ऑफिसल जायची? मग आयता डबा तरी कशाला न्यायचा ऑफिसात? त्यावेळी बसली दात विचकत थँक्यू वगैरे म्हणत . म्हणायचे ना सरळ " नका माझ्या सवयी बिघडवू . सकाळी लवकर उठून स्वयंपाक करायची सवय आहे मला ." पण आयते गिळायला मिळाले की झाले .... ठाम राहयचे तर सगळ्याच गोष्टींवर राहा ना. ..

आधीच्या एका भागात इंग्रजी न येण्यावरून चाललेल्या रडारडीबद्दल : बहुतेक मालिकांमध्ये तणावाचे आणि विनोदाचे सीन आलटून पालटून पेरलेले असतात. मला ते दृश्य पाहताना चिमणराब गुंड्याभाऊंच्या सरकारीपाहुणे या चित्रपटाचे सुरुवातीचे दृश्य आठवले. ज्यात राजेसाहेबांकडे शोकाकुल वातावरण असते. मग कळते की राजेसाहेबांचा कुत्रा मेलाय>> ह्यावर होते हो हे.

बाकीचे काही माहीत नाही पण कुत्रा जाणे हा ग्रेड वन लेव्हलचा दु:खद प्रसंग असतो. त्याचे यथास्तित मोर्निग करतात. त्या शिरेलीत ते विनोदी अर्थाने वापरले आहे?!

बोअर आहे सीरेअल.

अगदी अगदी आदिती जणू काही हिला कुणी जबरदस्तीच केलीय चाळ सोडून बंगल्यात राहणा-या माणसाशी लग्न करायची. रच्याकने यात कुत्रा कुठे आहे अमा?

Pages