होणार सून मी या घरची" -१

Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15

नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया Proud

Honar-Sun-Mee-Hya-Gharchi.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे अजुन सुरु आहे का मालिका??

पाणी मिसळुन कथानक पातळ नाही झालं का अजुन?
आणि त्याला दाटपणा यावा म्हणुन उपकथांची ठिगळं नाही जोडली??

आश्चर्य आहे.

अरेरे! लोकांना अजिबात आवडत नसणार्‍या , डोक्यात जाणार्‍या मालिकेसाठी इतके प्रतिसाद आले की दुसरा धागा काढावा लागला Sad (भिजक्या पापण्या मोड ऑन असल्यानेच हा निळा चेहरा टाकला आहे)

दक्षे....बघ....कित्येक सदस्यांचे मत वरील फोटो निवडीच्या विरोधातच दिसत आहे.... मालिका पाहिली जात आहे ती त्या जोडीमुळे. मधुराने अगोदर टाकलेला सिंगल फोटोही छानच होता.

कालचा जान्हवीचा बॅन्केतील अभिनय मी 'ओव्हर अ‍ॅक्टिंग कॅटेगरी' त टाकणार नाही. तिथे ती एका मर्यादेतच गीतासमवेत संवाद करीत होती. आपल्या वडिलांची 'आपण जसे आहोत तसेच वागावे' असे सांगत बॅन्केतून बसने घरी जाणार असे म्हणते....बॅन्केतही ती जान्हवी सहस्त्रबुद्धे याच नावाने आली आहे. आता बसस्टॉपवर जरूर हास्यमुद्रेचे प्रमाण दूध उतू गेल्याप्रमाणे झाले असेल, तरीही तो आनंदाचा एक नैसर्गिक आविष्कार होता असे मानले गेले तर तेजश्रीने त्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे.

मी इथले अपडेट आणि दुपारी अधूनमधून रीपीट टेलीकास्ट्मधे ही मालिकाबघते.

अगदी मालिक सुरू झाली तेव्हा तेजश्रीचा एकंदरेत अभिनय खूप सहज होता, स्क्रीनवरचा वावर पण फ्रेश असायचा, आता गेल्या महिन्याभरात मात्र ती मला थो....डी नाटकी वाटत चालली आहे. लग्नं झालं नाही झालं त्याचा प्रश्न नाही पण हसणं, संवाद सगळेच नाटकी होत चाललेत. त्या मानाने श्री जरा सुधारलाय. आधी अगदीच "माझा सोनुला सोनुला" टाईप दिसत रह्हायचा. आता अधूनमधून का होइना पण थोडा स्मार्टगिरी करताना दिसतो.

नंदिनी टोटल अनुमोदन!
श्री ची अ‍ॅक्टींग सुधारलीये पण पात्र गंडवतोय दिग्दर्शक...!
भरतदादा, हेच एलदुगो सोबत नव्हतं का झालं?
असो!
म्हणून मी काही लिहित नव्हते . मालिकेचे पाठीराखे असले प्रतिसाद देणार याची खात्री होती.
हे खास तुम्हाला उद्देशुन नाही पण एकुणच!

<<आधी अगदीच "माझा सोनुला सोनुला" टाईप दिसत रह्हायचा. आता अधूनमधून का होइना पण थोडा स्मार्टगिरी करताना दिसतो.>> नंदिनी अगदी अगदी

मंगळवार दि.३ डिसेंबर २०१३ : अपडेट

~ नवीन सुरू झालेल्या धाग्यावरील हे पहिले अपडेट.

योगायोगाची गोष्ट म्हणजे आज प्रथमच श्रीरंग गोखले तोल सुटल्यासारखे रागाने जान्हवीला बोलले आणि मालिकेतील ही पहिलीच वरच्या पट्टीतील विसंवादाची सुरुवात म्हणावी लागेल. नंदन याने त्या पन्नास हजार रुपयांबाबत श्री वर काही बालंट येऊ नये म्हणून 'मीच ते पैसे घेतले आहेत घरातील आजारपणासाठी' असे जे खोटे कारण सांगून भागीरथीबाईंचा श्री वर कोप होऊ नये यासाठी जी भूमिका घेतली तिचे श्रीला फार दु:ख होत आहे. कारण आपण खोटे बोललो आहोत आणि आपल्यावर तो आळ येऊ नये म्हणून एक निष्पाप कर्मचारी आपल्यासाठी खोटे बोलला आहे शिवाय उद्या त्याच्यावर भागीरथीबाईची खपा मर्जी झाली तर तो नोकरीतून काढला जाईल; याचीही भीती आहेच....हे विचार श्री च्या मनात खेळत आहेत. श्री समवेत बोलायला हवे सविस्तर म्हणून आईआजी मुख्य दिवाणखान्यातच त्याची वाट पाहात बसल्या आहेत आणि त्या काहीशा अर्धवेट झोपेतही आहेत. वरच्या मजल्यावरून शरयू आपल्या पतीला चोरटेपणाने भेटायला चालली आहे; त्याचा फोनही येत आहे, पण खाली पाहाताच शरयूला आजी खुर्चीत पहुडलेल्या दिसतात....ही घाबरते आणि नवर्‍याला 'मी आज येत नाही....आई खाली आहेत, त्या जाग्या होतील.....आपण उद्या भेटू..." तो खूपच आग्रह करतो, पण ही शहाणपणा दाखविते आणि आत निघून जाते.

श्री आणि जान्हवी रात्री येतात आणि दार उघडताच समोर आजी झोपलेली पाहून श्री थबकतो...तिला हाक मारतो. आजी उठतात आणि श्री ला म्हणतात, 'मला तुझ्याशी काही बोलायचे आहे...' जान्हवी उमजते व ती वर निघून जाते. श्री आजीजवळ जाऊन बसतो तर आजी त्याला नंदन प्रकरणाची सारी माहिती स्वत:च देतात, म्हणजे जणू काही श्री ने त्याला जे ५० हजार दिले म्हणतो ते खरेच दिले आहे ते त्या मान्य करतात. पण नोकराकडून घेतलेल्या पैशांची वसूली होणे गरजेचे आहे आणि ती तू उद्योगसमूहाचा मालक या नात्याने केली पाहिजे....असा सल्लाही देतात.

श्री वर येतो तर तिथे जान्हवी सकाळपासून झालेल्य विविध घटनांची पारायणे करीत बसली आहे. श्री येतो आणि बेडवर डोके धरून बसतो....जान्हवी त्याला काय झाले विचारते तर तो डोके काहीसे दुखत आहे असे सांगतो....ती त्याला कॉटला टेकवून बसविते व आपण त्याचे डोके दाबत बसते....पण एकदोन मिनिटात सारे काही असह्य झाल्यामुळे श्री तिथून उठतो....जान्हवीला सारे कशामुळे होत आहे हे सांगणे त्याला जिकीरीचे होते. ती त्याला स्पष्टच विचारते, "श्री आजच्या तुझ्या या डोकेदुखीचा आणि सायंकाळी बस स्टॉपवर जे माझ्या घरातील काही बाबीविषयी बोलणार होतास त्याच्याशी काही संबंध आहे का ?" याला उत्तर म्हणून श्री मोघम अळमटळम पद्धतीचे उत्तर देतो...हो देखील, नाही देखील...यामुळे गुंता न सुटता तो अधिकाधिक गर्द होत जातो.

इकडे शशीकलाबाई आपला नवरा रघुअण्णा यांच्याकडे गेलेला पाहून पन्नास हजाराच्या नोटाचे बंडल काढून कॉटवर पसरतात आणि हजाराच्या त्या नोटांकडी लोभी नजरेने पाहात राहतात. तोच दरवाजा लोटून सदाशिवराव आत येतात आणि बायको नोटांचा तो ढीग पसरवून त्याकडे नजर लावून बसलेली पाहताच त्याना आश्चर्याचा धक्का बसतो. 'कुठून आणलास इतका पैसा ?" या प्रश्नाला शशीकलाबाईंकडे काहीच उत्तर नसते....ती केवळ 'तुम्हाला काय करायचे ? मला कुणी देणार नाही का पैसे ?" असली बिनकण्याची उत्तरे देत बसते. सदाशिवराव मानाने जगणारा माणूस असल्याने 'जोपर्यंत तू या पैशांचा खुलासा करत नाहीस तोपर्यंत या घरात मी अन्नाचा एक कण आणि पाण्यचा एक थेंबही पिणार नाही....." असे सांगतात, त्याबद्दलची कसलीही अपराधीपणाची भावना बाईच्या चेहर्‍यावर दिसत नाही. त्या चादर घेऊन बिनधास्त झोपी जातात.

बंगल्यात मध्यरात्री श्री जागा झाला आहे....त्याला झोप न येण्याचे कारण म्हणजे आयुष्यात तो प्रथमच असे काही खोटे बोलला आहे की त्याची झळ एका प्रामाणिक माणसाला लागू शकणार आहे. एक खोटे लपविण्यासाठी दुसरे, दुसर्‍यासाठी तिसरे...अशी मालिका चालू झाली आहे त्याचा त्याला मनस्ताप होत आहे. दुसरीकडे जान्हवी शेजारी श्री नाही हे जाणवल्यामुळे उठते तर हा डोक्याला हात लावून बसलेला पाहून परत चिंतेत पडते. दोघांचा संवाद सुरू होतो आणि श्री च्या खोटे बोलण्याचा कोणत्याही युक्तीवादाला जान्हवी होकार देत नाही, तर उलटपक्षी ती त्याचे मुद्दे खोडून काढते हे पाहून श्री प्रथमच तिच्यावर संतापतो आणि म्हणतो, "स्टॉप स्टॉप नाऊ....तू असाच कायम निगेटिव्ह विचार करणार का ?" याला ती "श्री तू प्रथम शांत हो आणि मगच आपण यावर विचार करू...' असे संयतपणे सांगते, तर हा मध्यरात्री बाहेर जातो....ती विचारते तर 'मी जरा पाय रिकामे करून येतो...." म्हणत बाहेर पडतो.

उद्या हाच प्रसंग पुढे चालू राहाणार आहे.

मामा, श्रीने आज आजीला खरं सांगायला हवे होते. त्याने खरे सांगितले तरच त्याच्या मनावरचे ओझे कमी होईल, मुळात त्याला आजीचा स्वभाव माहिती आहे तरी सारख्या चुका करतोय, tactfully प्रश्न सोडवत नाहीयेत लेखक-दिग्दर्शक, सारखे घोळ घालणे चालू आहे पहिल्यापासून.

मी या मालिकेचा एकही एपिसोड बघितला नाहीये, पण इथे सगळ्या पोस्ट्स वाचतेच वाचते.. Happy

दक्षिणा, शब्दखुणांमध्ये - गोडाचा शिरा!! Rofl

हो ना. एवढा आक्सफर्डाचा एम्बीए, एका मोठ्या उद्योगसमूहाचा मालक तरी असे घोळ घालून ठेवतोय. आणि तो घोळ घालतोय याचाच अर्थ ले.दि. घोळ घालताहेत.

जान्हवी जरा जास्तच मेंदीच्या पानावर मोडात आहे. नुसता त्या कडक्क आजेसासूने तिच्या हातचा चहा घेतला, नमस्कार घेऊन वर आशीर्वाद दिला तर एवढे काय खूश व्हायचे? माहेरी कशी सगळ्या जबाबदार्‍या उचलायची, तसेच तिने या घरात आल्याबरोबर करायला हवे होते. प्रेमळ नवरा आणि तिच्या बाजूच्या तीन बिन्डोक सासवांच्या मायेत लगेच पाघळली आणि जबाबदारी घ्यायची सवयच विसरून गेली. श्या!

आपला नवरा हा एक लाडावलेला. हातात करिअर मिळालेला. उगीच सुभाषिते बोलणारा पोपट पन स्वतःवर वेळ आल्यावर थापा मारणारा. त्यामुळे लोक्स गोत्यात आले तर काहीच न वाटणारा बाळ्या आहे हे तिच्या
लक्षात यायला तिची पस्तिशी येइल. शी इज मंजिरी इन द मेकिन्ग.

मामा, तुमचे हे अपडेट्स आवडले....एखादी कथा सांगताय असं वाटत आणि प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिल्यासारखे वाटतात.

श्री आणि जान्हवी बस स्टॉपवरून घरी निघाले तेचा चांगला उजेड होता. घरी वाट बघतील म्हणून ते बाहेर जेवायलाही गेले नाहीत. पण घरी पोचले तर आजी आणि लीना भागवत सोडून सगळे झोपलेले Uhoh Normally लीना भागवत रात्री उशीरा बाहेर पडातेना नवर्याला भेटायला. मग हे एवढा वेळ कुठे होते??? आणि त्या ४-५ आया चक्क झोपल्या ही दोन बाळं घरी यायच्या आत Proud

हेच एलदुगो सोबत नव्हतं का झालं?>>>>>>> ए........रिये, त्या मालिकेबद्दल अस नव्हत झालं गं. सगळी पात्र छान होती ह. आणि थोड्या चुका तर प्रत्येक मालिकेत असतातच!!! मी अजूनही पाहते ती मालिका.....डाऊनलोड मारलेत मी एपिसोड!!! Happy

आज पहिलं भांडण होता होता राहिलं>>>> राहिल कसल? झालच की, फक्त आपल्यासारख कडाकडा नाही झाल....

काल ११ वाजता सर्फिन्ग करताना , श्री आणि जान्हवी चा संवाद बघितला. श्री चिडलेला दाखवला होता. वाटलेल की तो आता म्हणेल की 'आजी आई चे ऐकायला हवं होतं, ती सांगत होती त्या मुलीचे घरचे विचित्र आहेत'. शेवटी तिच्या आई, भावामुळे त्याला मनस्ताप होतोय आणि तो खोटं पण बोलायला लागलाय. थोडक्यात काय तर मोठ्यांचे ऐकायचे असते. Happy

रिया Lol ही सिरीयल पाहून आता असेच वाटतेय. कोणतेच कॅरॅक्टर नीट वाटत/वागत नाही. जान्हवी लग्नानंतर बदलली, श्री बदलला, सगळे वाईट च वागायला लागले ना? श्री ला पण पच्छाताप झाल्यासारखा वागत होता काल.

Pages