होणार सून मी या घरची" -१

Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15

नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया Proud

Honar-Sun-Mee-Hya-Gharchi.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल ११ वाजता सर्फिन्ग करताना , श्री आणि जान्हवी चा संवाद बघितला. श्री चिडलेला दाखवला होता. वाटलेल की तो आता म्हणेल की 'आजी आई चे ऐकायला हवं होतं, ती सांगत होती त्या मुलीचे घरचे विचित्र आहेत'. शेवटी तिच्या आई, भावामुळे त्याला मनस्ताप होतोय आणि तो खोटं पण बोलायला लागलाय. थोडक्यात काय तर मोठ्यांचे ऐकायचे असते. >>>> सामी श्री अस कध्धी कध्धी बोलणार नाहि. खूप गुणी आणि जरा अतीच चांगला आहे तो, म्हणुन तर अडकला आहे सगळ्यात.

सामी श्री अस कध्धी कध्धी बोलणार नाहि. खूप गुणी आणि जरा अतीच चांगला आहे तो, म्हणुन तर अडकला आहे सगळ्यात. >> आई आजीचे ऐकले नाही म्हणून अडकला ना? Happy
अग त्याचा मूड बघुन असं वाटल की तो असे म्हणेल. सिरीयल मधे नाही दाखवणार.

सामी, पण माझ्या घरात कोणाच्या डोक्यात असलं काही आलं तर वाट माझी.
मी आपलं घरात काही झालं की हे उदाहरण देते- बघा श्रीच्या घरच्यांचा उगाच विरोध होता की नाही तिला... किती गुणी मुलगीये ती. होऊ शकतं असं.. कधी कधी आई वडिल पण चुकू शकतात. आपल्या मुलांवर, त्यांच्या निवडीवर विश्वास टाकुन पहावा त्यांनीही Proud

बुधवार दि. ४ डिसेंबर २०१३ : अपडेट

~ "तुझ्यासारखी निर्लज्ज आणि मूर्ख बाई मी कधी पाहिली नाही....आणि माझ्याशी खोटे बोलू नको....२५ वर्षे तुझ्याशी संसार केला त्याची आज मला लाज वाटते.....आणि मी जे काही बोलतो आहे ते करून दाखविणारच.... मला षंढ समजू नकोस....!" ~ असल्या भारदस्त वाक्यांनी आणि त्याच्या तोडीस तोड अशी अभिनयक्षमता दाखविणार्‍या मनोज कोल्हटकरांनी आज 'सदाशिवराव सहस्त्रबुद्धे' या भूमिकेचे अगदी सोने केले. जीवापलिकडे जान्हवीवर प्रेम करणारा हा बाप कवडीची अक्कल नसलेल्या लोभी बायकोने जावयाकडून ५० हजार रुपये घेतले हे कळताच आता ही बातमी गोखले घरात समजली तर त्या पोरीचे काय होईल या विचाराने व्याकूळ झाला आहे....आणि त्यापोटी संतापाने तो धगधगत आहे, बायकोला जणू काही आता मारणारच असाच त्याचा पवित्रा आहे.

मालिका सुरू झालेल्या दिवसापासून हा प्रथमच असा एक भाग झाला की यामध्ये फक्त सुरुवातीलाच मावशी श्री ला दोनतीन मिनिटे भेटते....अन्य ५ ही सासुबायांना सुट्टी होती....त्यामुळे पडद्यावर केवळ अभिनय पाहायला मिळाला....हास्यविनोद बिलकुल नव्हते हाही एक दिलासा. सुरुवातीलाच जान्हवीवर चिडून खाली पाय मोकळे करायला आलेला श्री डोळ्यात पाणी आणून उभा आहे तर त्याला त्या अवस्थेत पाहून सरसूमावशी काळजीने त्याच्याजवळ येऊन कारण विचारते. हा नेहमीप्रमाणे "काही नाही गं...सहजच आलो आहे..." यावर मावशी म्हणते, "जान्हवीशी भांडला आहेस का ?" "नाही, फक्त चिडलो तिच्यावर..." "मग जा आणि तिची चटकन माफी माग....असली मुलगी तुला पत्नी म्हणून मिळाली आहे हे तुझे भाग्य समज...." श्री मावशीचा हा सल्ला ऐकतो आणि आपल्या रूममध्ये परततो. तिथे जान्हवी हमसाहमशी रडत बसली आहे कॉटवर.....श्री प्रथम तिची माफी मागतो. चुकून मी बोललो तसे असेही सांगतो....जान्हवीही 'मी इतके निगेटिव्ह बोलायला नको होते तुझ्याशी' असे म्हणून नवर्‍याचे डोके दाबत बसते.

चाळीत शशीकलाबाई शांताबाईकडून चहा आणि पोहे सदाशिवरावांपुढे ठेवते....खाण्याची विनंतीही करते; पण ते अजिबात तिकडे पाहात नाही...त्यांचा ठेका एकच..."पैसे कुठून आणलेस ? आणि ते मला समजत नाही जोपर्यंत तो पर्यंत या घरात मी अन्नपाणी घेणार नाही, बस्स !". कलाबाई आकांडतांडव करते....'मला काय सुख मिळाले असल्या नवर्‍याकडून...पोरगा तसला तर नवरा असला....आणले पैसे मी...दिले मला कुणीतरी" असे काही बेताल बोलल्याक्षणीच सदाशिवराव तिच्याकडे पाहात...."मला अंदाज आहे तू कुणापुढे हात पसरायला गेली होतीस....पण तुझ्या तोंडून मला ते ऐकायचे आहे...." कलाबाई कामवाल्या शांताबाईला घरातून जाण्यास सांगते....आणि नवर्‍याला जितके बोलायचे तितके वाकडे बोलत असतानाच त्यांच्या तोंडून जाते की, 'आता दिले जावईबापूनी पैसे तर....." त्याक्षणी सदाशिवराव तिला थांबवितात...."हेच ते, हेच ते.... मी केलाच होता अंदाज....तर सारा मानपान मर्यादा सोडून निर्लज्जासारखी तू जावयाकडे जाऊन हात पसरलीस याची तुला शरम वाटली नाहीच....पण या पैशामुळे तू माझ्या सोन्यासारख्या मुलीला किती संकटात लोटले आहेच याची तुला कल्पना नाही....आता ते पैसे ते दिलेस तरी...परत उद्या द्या पैसे, आणखी द्या असे करत नेहमीच त्याच्याकडे जाणार....आता हे जर थांबायचे असेल तर एकच मार्ग मला दिसतो आणि तो म्हणजे मी हे घर सोडून जाणार...." हा एक मोठा धक्का असतो शशीकलाबाईला....ती हात जोडते नवर्‍यासमोर....जान्हवीला बोलावून घ्या आणि द्या तिच्याकडे ते पैसे अशी विनवणी करीत राहते.

गोखले ऑफिसमध्ये श्री आणि नंदन यांचा संवाद.... श्री ला दु:ख या गोष्टीचे की आपल्या खोटे बोलण्यामुळे आजी नंदनवर चिडली असून आता जरी त्याने नंदनशी पैशाचा व्यवहार झालेला नाही असे सांगितले तरी तो माझ्याशी मग खोटे का बोलला या एकाच मुद्द्यावरून ती याला नोकरीवरून काढून टाकेल याची भीती त्याला वाटत राहते....आणि यामुळेच त्याला अपराधीपणाची भावना लागून राहिली आहे. तरीदेखील नंदन त्याला अनुभवाच्या जोरावर तुम्ही यातील काहीच सांगू नका...पैसे मी घेतले आहेच असेच गृहित धरा आणि माझ्या पगारातून रक्कम कपात करा....म्हणजे मग कुणालाच संशय येणार नाही.....श्री ला अर्थातच हे पटत नाही, तो केवळ विचारात पडतो.

सदाशिवरावांनी घरी जान्हवीला बोलावून घेतले आहे आणि तिला समजले की आईने श्री कडून ५० हजार घेतले....त्याविषयी पुढील भागात.

आजचा भाग मात्र मनोज कोल्हटकर आणि आशा शेलार यांच्या अप्रतिम अभिनयामुळे लक्षात राहाण्यासारखा झाला.

मामा, हेच वाचायला येते मी. मला त्या बिचाऱ्या नंदनचे वाईट वाटते. आजचा एपिसोड चांगला झाला एकंदरीत, उद्या बघेन रिपीट टेलीकास्ट.

अन्जू.... जरूर बघ, रिपीट टेलीकास्ट.....सहस्त्रबुद्धे पतीपत्नीचा वाखाणण्यासारखा अभिनय....अगदी अस्सल घरातील भांडण....आणि त्यातही बापाचा पोरीबद्दलचा कळवळा....हे मला फ़ार भावले.

त्या सहा सासवांपेक्षाही आशा शेलार यांची शशीकलाबाईंची भूमिका फ़ार उजवी आणि प्रभावी वाटते.

<त्या सहा सासवांपेक्षाही आशा शेलार यांची शशीकलाबाईंची भूमिका फ़ार उजवी आणि प्रभावी वाटते.>
भूमिका(अभिनेत्री) आणि व्यक्तिरेखा यांत गल्लत होतेय का?, पडद्यावर मिळणारा कालावधी, वेगवेगळ्या भावना दाखवायची संधी यांत अंतर आहे. सहा जणींमध्ये आजी सोडली तर कोणावरही फोकस येत नाही. .मुळात स्वतःचे असे विचार, डोके नाही. शशिकलाबाई मालिकेच्या बहुतांशी भागात जवळजवळ सूत्रधाराच्या भूमिकेत होत्या. तरीही सहा सासवांच्या भूमिका करणार्या अभिनेत्री कुठेही कमी पडल्याचे दिसत नाही. त्यातल्या त्यात लीना भागवतना थोडाफार वाव मिळतो आणि त्या सोने करतात.
परवाच्या भागात श्रीचे फ्रस्ट्रेशन छान उतरले होते; संवादांशिवायही.

आता हातपाय आपटणारी बाहुली मोड ऑन.
श्री आणि त्याची सासू यांच्यात खोटारडेपणाची, लपवाछपवीची स्पर्धा सुरू आहे. श्री मुळ्ळातच खोट्टारडा आहे. आठवा, जान्हवीने शरयूसाठी पोस्टर्स लावल्याची जबाबदारी घेणे आणि जान्हवीला असे काही झाले की तू सरळ माझ्यावर ढकल, तुझी इमेज या घरात चांगली होणे गरजेचे आहे असे म्हणणे.
चंद्रहार आणि पिंट्या पुन्हा गायब. जान्हवीच्या घरचे लग्नात तो हार चोरीला गेला नव्हता तर फक्त हरवला होता आणि परत मिळाला या समजात आहेत का?

हापाआबा मोड ऑफ.

लग्न झाल्यावर मुलीने सासरच्या सगळ्या जबाबदार्‍यांत हातभार लावावा अशी सर्वसाधारण पद्धत आहे. मग जावयाने सासरच्या जबाबदार्‍यांना हातभार लावला तर जगबुडी का येते?

लग्न झाल्यावर मुलीने सासरच्या सगळ्या जबाबदार्‍यांत हातभार लावावा अशी सर्वसाधारण पद्धत आहे. मग जावयाने सासरच्या जबाबदार्‍यांना हातभार लावला तर जगबुडी का येते? >>>

ते इतर बाबतीत (गुप्तधनाचा शोध इ.) सुधारक असलेल्या सदाशिवरावांना विचारा. Lol

"....जावयाने सासरच्या जबाबदार्‍यांना हातभार लावला तर जगबुडी का येते?....."

~ भरत.....याचे उत्तर मी जान्हवीच्या दृष्टीकोणातून देतो.
तिचे म्हणणे असे की, "माझ्या घरच्या लोकांना आधार हवा आहे हे मान्य, पण तो आर्थिक मदतीच्या स्वरूपात दिला गेला तर माझ्या मानी स्वभावाच्या वडिलांना ते मान्य होणार नाही. प्रत्येक घराच्या काही परंपरा असतात. नोकरीत असताना बाबांवर अफरातफरीचा आळ आला....जो अकारण होता....नोकरी सुटली, अपघात झाला, पण शांतपणे ते स्वीकारले....मी नोकरी सुरू केली तेव्हा माझ्या पैशावर घर चालू लागले म्हणजे त्यात त्याना दु:ख झाले असेलच पण वावगे वाटले नसणार. त्यांच्या या स्वभावात आता बदल होणे अपेक्षित नाही. सबब श्री तु कितीही चांगुलपणाने आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आलास तर तसे तू करू नये असेच मी म्हणत राहीन. कारण मला माझ्या बाबांना मिंधे झाल्याचे मला पाहणे आवडणार नाही.....जावई समर्थ आहे आणि त्याने पीडित असलेल्या सासरवाशीयांसाठी काही प्रमाणात आर्थिक मदत केली तर ती कितपत आणि कुठपर्यंत ? हाही एक प्रश्न असतो. आईला ५० हजार दिले....म्हणजे मागणीचा प्रवास थांबला का ? नाही, परत त्या ऑफिसमध्ये येणार, तुझ्यासमोर उभ्या राहाणार....तू नव्याने पाकिट करणार.... ही सगळ्यात वाईट गोष्ट होईल आमच्या बाबांसाठी....त्यामुळे जगबुडीचा प्रश्न असला का नसला काय.... जावयाकडून सहारा शोधणे वा मदत घेणे हे त्या घेणार्‍या व्यक्तीच्या मतावर सोपवावे....."

आजचा भाग मात्र मनोज कोल्हटकर आणि आशा शेलार यांच्या अप्रतिम अभिनयामुळे लक्षात राहाण्यासारखा झाला.>>>> बरोबर मामा

आपल्याला हा युक्तीवाद पटो न पटो.. मामांनी अगदी जान्हवीच्या मनात उतरून उत्तर दिले आहे जगबुडीवाल्या प्रश्नाचे..

कालचा बाकीचा भाग छान होता पण श्री आणि नंदनचे संवाद आवडले नाहीत. तो श्री नुसतेच लवकरात लवकर खरे सांगायला पाहीजे एवढेच म्हणतो हालचाल तर काहीच करत नाही.

तो नंदनला विचारतो की तो आजीला खरे काय ते का सांगीतले नाहीस Uhoh आता हा शहाणा सगळ्यांच्या नावाने (नंदन, मावशी इत्यादी) खोटे बोलतो, खरे सांगायची हिंमत करत नाही तर बाकीचे कशी काय करतील.

नंदन अजूनही जान्हवीचा उल्लेख "छत्रीवाली" करतो तेही पटत नाही

तो नंदनला विचारतो की तो आजीला खरे काय ते का सांगीतले नाहीस आता हा शहाणा सगळ्यांच्या नावाने (नंदन, मावशी इत्यादी) खोटे बोलतो, खरे सांगायची हिंमत करत नाही तर बाकीचे कशी काय करतील. >> हैट आहे. याला म्हणतात आर्यनी ऑफ लाईफ Rofl

Pages