मरणोत्तर अन्तिमसन्स्कारान्चे अनुभव व त्यावरील भाष्य

Submitted by limbutimbu on 18 June, 2009 - 04:15

मरणोत्तर अन्तिमसन्स्कारान्चे अनुभव व त्यावरील भाष्य

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या प्रश्नाचे उत्तर माहित नाही लिंबू. परंतू मला एक शंका आहे, ती विषय निघालाच आहे म्हणून विचारते.
हिंदू धर्मात स्त्रियांना स्मशानात मज्जाव का आहे ?

(मी आयुष्यात एकाच दहनक्रियेला स्वतः उपस्थित होते, तेही दूर्दैवाने अपघातात मृत पावलेल्या एका एम्प्लॉयीसाठी. )

रैना, मला वाटते फक्त ब्राह्मण जातीतील (इतर जातीतदेखील असेल तर माहिती नाही) महिला स्मशानात जात नाहीत. हिंदू धर्मातील बाकी अनेक जातींमध्ये स्मशानात बायका जातात. तसेच हिंदू धर्मातील सर्व पंथात जाळतातच असे नाही (लहान मुले, अर्भके सहसा जाळत नाहीत). उदा: लिंगायतांमध्ये खुर्चीवर प्रेतास बसवलेले असते व एक खड्डा खणून ती खुर्चीच त्या खड्ड्यात सारतात.

वरती लिम्ब्याने म्हटल्याप्रमाणे त्यात मानसिक/भावनिक कारणे जास्त असतील. बाकी स्मशानात जाण्याची जिज्ञासा (शब्द अयोग्य वाटत असला तरी भावना तीच असते) पहिल्यांदाच असते. अनेकदा जायला लागले की ते नकोसेच वाटते. त्यामुळे स्त्रीयांना जायला मिळत नाही ह्यात त्यांच्यावर अन्याय न होता चांगलीच गोष्ट होते आहे.

मी बेवारस प्रेत अंतिमसंस्कार मंडळाचा अ‍ॅक्टिव्ह सदस्य होतो एके काळी, त्यामुळे घाटावर जाणे हा नित्याचा अनुभव असे.

>>>> उदा: लिंगायतांमध्ये खुर्चीवर प्रेतास बसवलेले असते व एक खड्डा खणून ती खुर्चीच त्या खड्ड्यात सारतात.
अरे खुर्ची वापरतात की "मान्डी घालुन बसलेल्या अवस्थेत" पुरतात????
माझ्या माहितीप्रमाणे, काही कारणामुळे मान्डी घालुन नेमक्या अवस्थेत बॉडी आणायच्या आधीच कडक झाली तर शक्यतो पाय पसरून वा तशीच कशीतरि बसवलेल्या अवस्थेत पुरतात! व हे नेण्यासाठी वापरण्यात येणारी काचेची, आत खुर्ची असलेली गाडी वापरल्यावर खूर्ची मात्र परत आणतात न विसरता! खुर्ची हे जस्ट लाईक "स्ट्रेचर" सारखी वापरतात

जिज्ञासा?
मला वाटतं एक सेन्स ऑफ क्लोजर असतो कुठल्याही शेवटच्या राईटस मध्ये.
नुसतं अचेतन शरीर पाहून ते येत नसावं. कुठल्याही धर्मातील मरणोत्तर विधी त्यासाठीच असतात ना?

>>>>> तसेच हिंदू धर्मातील सर्व पंथात जाळतातच असे नाही (लहान मुले, अर्भके सहसा जाळत नाहीत). उदा: लिंगायतांमध्ये खुर्चीवर प्रेतास बसवलेले असते व एक खड्डा खणून ती खुर्चीच त्या खड्ड्यात सारतात.
एक शन्का हे टण्या! (या बीबीशी सम्बन्धित फारच दूरून, पण विषय निघाला म्हणून विचारतो, माहित असावे या दृष्टिने)
वर तू उल्लेखित असलेले हिन्दु धर्मान्तर्गत पन्थ कोणकोणते?
तुमच्या दृष्टीने असलेले कोणते हिन्दुधर्मान्तर्गत पन्थ, भारतीय घटने नुसार मात्र "स्वतन्त्र धर्म" म्हणून मान्यता पावलेले आहेत??? Happy

तू म्हणतो आहेस ती काचेची गाडी बहुतेक बुद्ध लोकांच्यात असते. आणि बहुतेक खुर्चीसकटच पुरतात. एक लक्षात आहे की त्यांचे जे स्वामी असतात ते खुर्चीत ठेवलेल्या प्रेताला लाथ मारुन खड्यात ढकलतात.

लिंगायत बहुतेक पंथ आहे. खात्री करुन घ्यायला लागेल. जैन मात्र स्वतंत्र धर्म मानला जातो बहुतेक. पण आमच्या इथले अनेक जैन लोक, धर्म: हिंदू आणि जातः जैन असे लावायचे बघितलेले आहे.

उदा: लिंगायतांमध्ये खुर्चीवर प्रेतास बसवलेले असते व एक खड्डा खणून ती खुर्चीच त्या खड्ड्यात सारतात.
>> सॉरी , मी लिंगायत आहे पण आमच्याकडे खुर्चीवर बसवून पुरत नाही , मांडी घालून बसवतात . लिंगायतांसाठीच खास बनवलेली तिरडी असते त्या तिरडीवरुनच प्रेत नेतात . बाकी कुठे खुर्ची वापरत असले तर माहीत नाही.

हे प्रत्येकाच्या समाजाच्या पद्धतीवर झाल...
पण जिव नसलेला देह जतन करण आणि त्याकरता होणार्‍या यातना मी फार जवळून बघितल्या आहेत.
गेल्या शनिवारी आमच्या बिल्डिंगम्धला एक मुलगा ९ वर्षाचा कराटे क्लास बरोबर पिकनिक ला गेलेला , अर्नाळ्याला रिसॉर्ट्च्या स्विमिंग पूल मध्ये बुडुन मरण पावला, त्याचे नातेवाईक चेन्नई वरुन सोमवारी येइपर्यंत देह भगवती मध्ये शवागारात ठेवलेला, आधीच त्याचे पोस्टमार्ट्म झालेले आणि नंतर तो देह ठेवणे २ दिवस,,
कदाचीत मी बोलतोय हे या विषयाशी संबधीत नसेल पण राहावल नाही म्ह्नून मांडल
----------------------------------
तेज तम अंस पर
कन्ह जिमि कंस पर ।
त्यों म्लेंछ बंस पर
सेर सिवराज है ॥
॥ जय भवानी, जय भवानी ॥
॥ जय शिवाजी, जय शिवाजी ॥

इतर जातीतील विशेषतः मराठ्यातील बायका जाता स्मशानात. मीही जाते गेलेय. मला नाही वाटत त्यात काही न जाण्यासारखं. हल्ली तर मुली आईवडीलांचे अंतिम संस्कारही स्वतःच करतात मुलगा नसेल तर.

माझ्यामते अंतिम संस्कारासाठी हिंदू धर्मात सध्या वापरतात ती पद्धतच सर्वात योग्य आहे. काही घाण उरत नाही. ती राख पण वापरता येईलच की खत म्हणून.

ती खास तिरडी मग मला खुर्चीसारखी वाटली असेल कारण तीत प्रेतास खुर्चीत ठेवल्यासारखेच ठेवलेले असते ना? हो तू आणि लिम्ब्या म्हणत आहात ते बरोबर आहे. मांडी घालून बसवतात आणि पुरतात.

तन्या,
लाथ घालुन धकलत नाहीत तर खड्ड्यात बसवुन पुरल्यानन्तर स्वामी जिथे पुरले आहे त्यावर उभा राहुन मान मोडतो. (त्यावरुन तुम्हाला तसे वाटले असेल).

>>>>> हो तू आणि लिम्ब्या म्हणत आहात ते बरोबर आहे. मांडी घालून बसवतात आणि पुरतात.
नशिब माझ, लौकर कळ्ळ!
नाहीतर "खुर्ची" हा प्रकारच "इन्ग्रजी आमदानीपासूनचा" अन या प्रथा त्याच्या हजारो वर्षे आधीन्च्या असे मला बुप्राने "सिद्ध" करत बसावे लागले अस्ते! Proud जे मला खर तर कालत्रयीही शक्य होणे नाही! Happy
असो

विनयराव, अस्थानी नाहीये तो विषय! खर तर माझी पहिली पोस्टच याबाबतचे प्रश्न उपस्थित करत्ये! Happy

धन्यवाद लिंबू...
बॉडी नाही एवढी ३ तासात फुगत...
तस १२ ते १४ तास तर काहीच न करता बॉडी राहते, पण नंतर तीच्यात बदल आंतर्गत बदल घडायला सुरुवात होते.
----------------------------------
तेज तम अंस पर
कन्ह जिमि कंस पर ।
त्यों म्लेंछ बंस पर
सेर सिवराज है ॥
॥ जय भवानी, जय भवानी ॥
॥ जय शिवाजी, जय शिवाजी ॥

तन्या,
लाथ घालुन धकलत नाहीत तर खड्ड्यात बसवुन पुरल्यानन्तर स्वामी जिथे पुरले आहे त्यावर उभा राहुन मान मोडतो. (त्यावरुन तुम्हाला तसे वाटले असेल).

>>
लाथ घालतात म्हणजे मला पाय लावतात असे म्हणायचे होते. माझ्या माहितीप्रमाणे ह्या कृतीचा अर्थ 'त्या आत्म्याला मुक्ती मिळावी म्हणुन पुढच्या प्रवासास पाठवणे' असा काहितरी होतो, बरोबर?

ओह.. मी हे नेहेमी दुरुन बघितले असल्याने ते पुरल्यावर त्यावर उभे राहतात हे माहिती नव्हते.

बर, आता मूळ विषयाकडे वळा!

माझ्या मते हे प्रत्येक घरातल्यांवर अवलंबून आहे. माझ्या आजोळी किंवा आमच्या घरीसुद्धा लगेच घाटावर नेतात. दर्शन घेणे वगैरे बाबींना फारसे महत्व देत नसल्याने थांबत नाहीत. ज्यांना मृत देहाचे अंतिम दर्शन घेणे महत्वाचे वाटत असेल त्या लोकांनी थांबावे. फक्त १-१ दिवस थांबू नये इतकेच. शवागरात देह ठेवण्याइतके महत्वाची गोष्ट असते असे काही मला वाटत नाही.
काही केसेस मध्ये (कॅन्सरने गेलेला रोगी वगैरे) मृतदेह लगेच खराब व्हायला सुरुवात होते. तेव्हा ते देखील लगेच घेउन जाणे योग्य.

चायाला, शिर्षकावरुन मला वाटलं लिम्ब्याने "शांकर-भाष्य" टाईप काहीतरी लिहीलयं. Proud

**********
मी एक Parasite !

जिज्ञासा नाही वाटत मला स्मशानात जाणं ही.. अर्थात पहिल्या वेळी वाटणं स्वाभाविक आहे. मला तरी जी व्यक्ती गेली ती जवळची असेल तर..त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जावसं वाटतं..
दुसरं म्हणजे अगदीच जवळच्या कुणाचं जवळचं कुणी गेलं तर त्यांना आधार व्हावा म्हणून जावसं वाटतं.

>>>>> (अन्तिमदर्शनाकरता) ... शवागरात देह ठेवण्याइतके महत्वाची गोष्ट असते असे काही मला वाटत नाही.
नशिब थोर हे आमचे, कोल्हापुर्-सान्गली-इचलकरन्जी कडची जन्ता, माणसास मृत घोषित करेस्तोवर तरी वाट बघतात! Biggrin
मला एक कळत नाही की वाघ मागे लागल्यागत दोन्/तिन तासात प्रेत जाळून टाकायची घाई कशासाठी???
या घाईचा, अन उपस्थित खान्देकरी/बघ्या/चिकित्सक्/पहिलटकर वगैरे "जनसमुदायाच्या" वेळीअवेळीच्या वैयक्तिक कामान्चा सम्बन्ध किती असतो? Wink
कारण हो ना, बरोबरच हे ना, रात्री साडेआठला गेलेल्या बाईला पोचवायला नऊ-साडेनऊ वाजेस्तोवर तरी खान्देकरी जमले अस्तील. ते काय जेवून थोडेच आले असणार?
अन मग उशिर झालातर, स्मशानातल उरकणार केव्हा, अन मेलेल्याच्या नावान अन्गावर दोन बादल्या पाणी ओतून केव्हा घेणार अन रातच गिळणार कधि नि झोपायला किती उशिर होणार, हा विचार या "घाई" मागे नसेलच असे नाही! Happy हे आपले माझे "तत्कालिक" मत बरका!

बॉडी नाही एवढी ३ तासात फुगत...
तस १२ ते १४ तास तर काहीच न करता बॉडी राहते, पण नंतर तीच्यात बदल आंतर्गत बदल घडायला सुरुवात होते.
<<<
हे सरसकट खरे नाही. त्या व्यक्तीवर कोणत्या प्रकारचे उपचार करण्यात आले होते, त्यावरही अवलंबून असते.

गेलेल्या आपल्या माणसाच्या शक्य तितक्या शेवटपर्यंत आपण बरोबर असावं ह्याच ओढीपायीच मी माझ्या आईबरोबर गेले होते. कितीही माहीत असलं की आपलं माणूस आता नाही तरी समोर त्या व्यक्तीचं शरीर दिसत असेतो खात्री पटत नाही. एक किंचित मिणमिणती आशा असते की चमत्कार व्हावा आणि आपलं माणूस उठून बसावं. विद्युतदाहीनीमधे ढकललं / चितेवर जाळलं जाताना सगळ्या खोट्या आशा नष्ट होतात. हे माणूस कधीही परत येणार नाही हे आपल्याला पक्क कळतं. तो तुटण्याचा क्षण असतो. भयंकर असतो.

जिज्ञासा म्हणाल तर जिथे जिथे जायला बंदी असते तिथे तिथे जावेसे वाटणे हा मनुष्यस्वभाव आहे. मग पर्वतीवरच्या कार्तिकस्वामीच्या देवळात असो की स्मशानात असो.

असो श्रीयुत लिंबूटिंबू यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याइतका अनुभव नाही तरी ४ वर्षात घरातच दोन मृत्यू बघितल्याने एवढं माहीतीये की साधारण ७-८ तास तरी फुगणे सुरू होत नाही.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

आज काल जाळतात की पूरतात ( खड्यात गाडतात ) त्या त्या जातितला प्रश्न आहे आसे आपन मानतो पन या मागचे कारन वेगळच आहे .
ज्या जातितिल लोकांकडे पेसा व शेतातिल लाकडे आसतात ति लोक जाळतात , ज्यांच्याकडे या गोष्टि नसतात ति लोक पुरतात , आता हि फक्त उच्च् जातितिल लोक जाळतात बाकि जातितिल लोक पुरतात आथ तात गावाकडे , पण श हरात सग्ळ्या हिन्दु धर्मातिल जातितिल लोकनां जाळलेच जाते . कारन ?????

पण 'अंत्यदर्शना'ची इच्छा का असते? (हा खरंच जेन्युइन प्रश्न आहे. भावनिकदृष्ट्याही एखाद्याची जिवंत प्रतिमाच स्मरणांत राहिलेली बरी नाही का?) उलट एकदा मृत घोषित केल्यावर जितक्या लवकर पुढचे संस्कार करता येतील तितके करावेत या मताची मी आहे.

रैना, 'क्लोजर'बद्दल सहमत.

-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

>> कोल्हापुर्-सान्गली-इचलकरन्जी कडची जन्ता, माणसास मृत घोषित करेस्तोवर तरी वाट बघतात
>>
>>कोल्हापुर सान्गली साईडला ना, हे असेच करतात. मागल्या वेळेस भाऊ इचलकरन्जीसच वारला तर कोल्हापुरहून येणार्‍या लोकान्ना देखिल त्याचे अन्तिमदर्शन होऊ शकले नाही! तिकडे अशीच घाई करतात!"
>>

हे खरे नाहीये... कदाचीत तुम्हा लोकाना काहीतरी कारण द्यायचे म्हणून "इकडे अशीच पद्धत असते" अशी मोघम उत्तरे दिली असतील त्यांनी [बर्‍याच वेळा नी बर्‍याच ठिकाणी अशी उत्तरे दिली जातात ना :फिदी:]... पण यावरून असा सरसकट अर्थ काढू नये की त्या भागातील लोक थांबतच नाहीत....

[btw, शीर्षकावरून एकदम असे वाटले की काय अनुभव आलेत ते सांगायचे की काय्...जिवंतपणीच!!! Proud ]

>>नुसतं अचेतन शरीर पाहून ते येत नसावं. कुठल्याही धर्मातील मरणोत्तर विधी त्यासाठीच असतात ना?
अगदी.....

>>हिंदू धर्मात स्त्रियांना स्मशानात मज्जाव का आहे ?
असे नाहीये... अनेक जातीतील महिला जातात.... बर्‍याच जातीत असे असते की दहनाच्या दिवशी जात नाहीत पण राखेला [३-५-७ दिवसानी] जातात आणि त्यादिवशीचे विधी करतात......

स्वाती - अंत्यदर्शनाचे कारण तेच असं वाटतं. Closure. त्याच्याशी निगडीत म्हणून पुण्याबिण्याची कल्पना त्याला जोडली आहे. तुला काय वाटत ?
एकंदरीत समाजात (आपल्याच असं नाही, कुठल्याही समाजात) Rites of Passage ला (व्यासंगिक तलवारींनी लोकं इरिटेट होतात म्हणून टाकणार नव्हते, पण ख-याखु-या व्यासंगी लोकांनी आयुष्य वेचून संशोधन केलेय त्याचा मान ठेवलाच पाहीजे. Rites of Passage वरील अधिक माहिती साठी Joseph Campbell. त्यातही हिरो विथ अ थाऊसंड फेसेस.) उपस्थित राहण्याला विशीष्ट महत्व आहे. आपल्यापर्यंत पोचेपर्यंत रुढी राहिल्या, मूळ विचारांचे गांभिर्य लोप पावले.

मनकवडा- धन्यवाद.

Closure! रैना अगदी पटले आणि त्यामुळेच एखाद्या समाजमान्य व्यक्तिच्या मृत्यूनंतर मान्यवरांनी काढलेले उद्गार, स्मशानभूमीत केलेली भाषणे/चिंतने किंवा सरकारी इतमाम किंवा अत्रे लिहित तसे मृत्युलेख हे सगळेच त्या माणसाच्या स्मृती जपण्यासाठी आतून आलेली धडपड आणि Closure दर्शवते असं वाटतं.

>> आपल्यापर्यंत पोचेपर्यंत रुढी राहिल्या, मूळ विचारांचे गांभीर्य लोप पावले.

अगदी हेच म्हणत्ये मी रैना. जेव्हा या पद्धती बनल्या तेव्हा नाती आणि गोती सहसा एका गावात, फार तर पंचक्रोशीत असत असतील. हाळी घातली की धावत जाता येत असेल. तेव्हा सोयरसुतकात गोतावळा जमवणं हे समजू शकतं. आता एक काका अमेरिकेत आणि मावसदीर ऑस्ट्रेलियात असताना हे दोघे येईस्तोवर १२/२४ तास बॉडी प्रिझर्व करून ठेवायची - याला खरंतर काय अर्थ आहे? स्मशानात प्रत्यक्ष जाऊन आलं म्हणून सर्वांनी आंघोळी करणं समजू शकतं, पण फोनवर निधनाची बातमी कळली म्हणून परदेशात आंघोळ करण्यामागे विचार काय?

परंपरा आंधळेपणाने पाळल्याने त्यांचा मान राहतो का त्यांचा अर्थ समजावून घेऊन त्यानुसार तारतम्याने वागल्यामुळे?

बाकी पुस्तकाच्या माहितीसाठी धन्यवाद. नक्की वाचेन.

-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

>>>>>स्मशानात प्रत्यक्ष जाऊन आलं म्हणून सर्वांनी आंघोळी करणं समजू शकतं, पण फोनवर निधनाची बातमी कळली म्हणून परदेशात आंघोळ करण्यामागे विचार >>>>>
स्वातीजी, केवळ स्मशानात जाऊन आले, अस्वच्छ झाले, भुतखेतादीन्चे सन्सर्ग झाले या वा अशा कारणान्नीच आन्घोळ करावी असे नसावे
प्रत्यक्ष अनुभवातून सान्गतो, की, अन्तिमसन्स्काराच्या विधीस प्रत्यक्ष उपस्थित राहिल्यावर किन्वा केवळ बातमी जरी कळली, तरी, त्या सन्स्काराच्या अनुभव वा बातमीमुळे मनास आलेले मान्द्य/विमनस्कता घालविण्यास थन्ड पाण्याचे स्नान अत्यन्त उपयुक्त ठरते! असा माझा तरी अनुभव आहे (फार जवळची व्यक्ती असेल तर हे मान्द्य वा विमनस्कता नक्कीच येऊ शकते, जेव्हा पेपरमधे अमक्या ठिकाणि अमके मेले वगैरे वाचून तेवढे नक्कीच येणार नाही)
अर्थात बोली भाषेत अमक्याच्या नावाने आन्घोळ करुन मोकळा झालो असे म्हणतात, त्यातिल "मोकळा होणे" हे जो "अडकलेला" अस्तो, त्यासच समजू शकते!
काही शूरवीरास, म्लान झालेले मन, त्यावर आलेले मान्द्य, विमनस्कता इत्यादी बाबी होतच नसतील, तर स्नान वगैरे विधीन्चे महत्व आकलन होणे अशक्य! Happy

Pages