मरणोत्तर अन्तिमसन्स्कारान्चे अनुभव व त्यावरील भाष्य

Submitted by limbutimbu on 18 June, 2009 - 04:15

मरणोत्तर अन्तिमसन्स्कारान्चे अनुभव व त्यावरील भाष्य

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिंदू धर्मात स्त्रियांना स्मशानात मज्जाव का आहे
स्त्रियांना स्मशानात काय घराच्या बाहेर सुधा जायला ह्या धर्मशाश्त्र लिहिणाऱ्या पुरुषांनी मज्जाव केलं होता .... असो
आमच्याकडे स्त्रिया सर्रास स्मशानात जातात. काही होत नाही ...
स्त्रिया मानाने हळव्या असल्यामुळे त्या माणसाला जळताना बघण त्यांना सहन होणार नाही म्हणून कदाचित हिंदू धर्मात स्त्रियांना स्मशानात मज्जाव केलं असावा. बाकी त्याला काही धार्मिक कारण नाहीये

स्त्रियांनी मासिक धर्म सुरु असताना अंतिमसंस्कारात सामिल व्हावे का?

माझे वडील गेले तेव्हा माझी मासिक पाळी चालु होती. सकाळी भावाचा निरोप आल्यावर मी व नवरा लगेचच रुग्णालयात पोहोचले तेव्हा दु़खाच्या भावनेत मला ते लक्षातही नव्हते. काही वेळाने जेव्हा आम्ही वडीलांना घेऊन घरी आलो तेव्हा मी आमच्या शेजारी राहणार्या काकुंना ते' सांगितले त्यावर त्यांनी मला आत बेडरुममध्ये बसण्यास सांगितले. मला स्वतःला जरी हे पटत नसले तरी आमच्याकडे सगळेजण या गोष्टी पाळतात?(असचं बोलतात) मु़ख्यतः माझी आई तर खुपच या सगळ्याला मानते त्यामुळे मी आत गेले.
जेव्हा घरी मला आत बसविले तेव्हा मला खुप वाईट वाटत होते की सतत बाबांसोबत असलेले मी त्यांच्या शेवटच्या वेळी त्यांना बघुही शकत नाही. आतल्या खोलीत मला भेटायला येणारी प्रत्येकजण माझ्या परिस्थितीवर हळहळत होती पण त्यातल्या फक्त माझ्या मैत्रिणी व माझी बहिण मला बाबांजवळ येऊन बस म्हणुन सांगत होत्या व बाकीच्या त्यांना विरोध करीत होत्या.
नंतर माझ्या मैत्रिणीची आई आली व मला धरुन बाहेर घेऊन गेली. त्यांनी सगळ्यांना सांगितले की ही वेळ परत येणार नाही, ती तिच्या बाबांची लाडकी असुन तिला इथेच राहु दे. वादविवादाची वेळ नसल्यामुळे जमलेल्या बायका तेव्हा काही नाही बोलल्या पण नंतर मात्र मला सुनावले बरेच काही. मी आधीही लिहलेले होते त्याप्रमाणे मी बाबांच्या खुप जवळ होते त्यांच्या संपुर्ण आजारपणात मी व माझा नवरा त्यांच्यासोबत असायचो. बाबा गेले तेव्हा रुग्णालयात मी खुप रडले पण या सगळ्या नंतर मला रडु येतच नव्हते. सर्व विधी करत असताना मला मी खुप मोठा अपराध करतेय अशीच भावना होती. यातुन मला बाहेर काढण्याचे काम माझ्या बहिणेने व नवर्याने केले.
काही दिवसांनी जेव्हा मी आईला हे सर्व सांगितले तेव्हा आधी आई मला बाहेर आणले म्हणुन त्या मैत्रिणीच्या आईवर रागवली .पण लगेचच ती म्हणाली की जाऊ दे अशीपण तु बाबांची लाडकी होतीस त्यामुळे बाबा तुझ्यावर रागावणार नाहीत. तिच्या म्हणण्याप्रमाणे पाळी आली असताना आपण अशुद्ध असतो आणि आपण मृत व्यक्तीला हात लावुन त्यालाही अशुद्ध करतो. त्यामुळे त्या मृत व्यक्तीच्या आत्माला देव स्वर्गात जागा देत नाही तर अधांतरी भटकवत ठेवतो. मला माहीत आहे की ती जे म्हणाली आहे तसं काही नसतं पण मग का स्त्रियांना मासिक धर्मात अंतिमसंस्कारात सामिल होऊन देत नाहीत?

निल्सन, या कर्माला काय बोलावे? नको तिथे शौच-अशौचाच्या गप्पान्नीच हिंदू धर्म निव्वळ लयाला जात नाहीये, तर अति झाल्याने विरुद्ध प्रतिक्रियांमुळे एकदम कर्मकांडाविरोधी टोक गाठतोय.
वैयक्तिकदृष्ट्या माझा वरील बाबीवर विश्वास नाही. तार्किकदृष्ट्या असली शीवाशीव पाळणे सुयोग्य व शक्यही नाही. तुमच्यावर ओढवलेला प्रसंग दुर्दैवी होता.
अंतिम दर्शन वा त्यावेळच्या विधींकरता ते चार दिवस पाळणे याला मला तरी शास्त्राधार सापडत नाही. कारण ते नियम "देवांच्या" उपासनेबाब्त असतात. व शास्त्रच म्हणते की सुतकात मृतात्मा सोडून बाकी कोणीही वंदनीय नाही, तेच तुमचे वंदनीय, माणसाला/देवालाही नमस्कार करु नये. मग ज्या आईबापांच्या हाताखान्द्यावर खेळलो/हगलो मुतलो, त्यांन्ना मरणोत्तर कसला विटाळ होणारे? बाष्कळ कल्पना, वा कोणतरी कुणा तरी स्त्रीला कोपच्यात घेण्याचे दृष्टीने राबविलेली बाब नंतर प्रथा म्हणून मान्यताप्राप्त, बाकी काही नाही.

एक आहे, की दहाव्याचा/तेराव्याचा स्वैंपाक करताना/वाढताना त्यात सहभागी होऊ नये असे माझे मत, आग्रह नाही.

(मी सहसा, माझ्या मुलिंना मात्र असाही सल्ला देतो की शक्यतो त्या दिवसात आडजागी/ तिन्हीसांजेचे/ रात्रीचे भटकू नका, तसेच गाडी चालविणे/तोल सावरणे/वजन उचलणे असले काही करू नका. होऽऽऽ, अन शक्यतो देवघरात जाऊ नका, बाकी कसलीही बंधने नाहीत, स्वच्छतेच्या सर्व सवयी पाळा इतकेच सांगणे होते)

लहानपणापासुनचे संस्कार किंवा देवावर असलेला विश्वास यामुळे मीही त्या' दिवसात बर्याच गोष्टी पाळते. जसे देवघरात व धार्मिक कार्यात, समारंभात न जाणेपरंतु ती वेळच अशी होती (आणि मुख्य म्हणजे घरात पहिल्यांदच जवळचा मृत्यु) की त्यावेळी काही समजत नव्हते. तुम्ही म्हंटल्याप्रमाणे ज्या आईबापांच्या हाताखान्द्यावर खेळलो/हगलो मुतलो, त्यांन्ना शेवटच्या क्षणी बघण्याची ओढ ही रितीरिवांजांपेक्षा जास्त महत्वाची वाटत होती.

आणि ज्या नातेवाईकांनी (यात फक्त स्त्रिया आहेत) मी कसे चुकीचे वागले हे नंतर मला सुनवले ते बाराव्यापर्यंत आमच्याकडेच राहत होते त्यांच्या जेवणाखाण्यासाठी दोन्ही - तिन्ही वेळ मीच उभी होते. माझं दु:ख बाजुला सारुन मी यांना स्वयंपाक करुन देत होते त्यावेळी माझ्या हातचं चाललं त्यांना. मी खायला घातलेले काढत नाहीये पण त्यावेळी त्यातली एकही का नाही बोलली की 'राहु दे तेव्हा जे झाले ते झाले पण आता तु स्वयंपाक करु' कारण रोज बाबांसाठी नैवद्य ? काढत होतो.

माझी मामी गेली तेव्हा माझी मासिक पाळी चालू होती . माझ्या आईला आणि मावशीला सांगितलं होता . त्या दोघीही मला काही बोलल्या नाहीत आणि मलाही स्मशानात जायची curiosity असल्यामुळे मी अगदी जळत्या चितेच्या शेजारी पण उभी होते . ते हि अगदी केस बीस मोकळे सोडून . मी केस नेहमी बांधत नाही मला काहीही झालं नाही .
ह्या काळात स्त्रियांना कष्ट पडू नये म्हणून धर्मशास्त्राने बाजूला गप बसायची सक्ती केली असणार . कारण स्त्रियांना स्वताच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून कुटुंबासाठी झटायची फार हौस असते

उद्या मुसलमानांचा मोठा सण आहे. शबे बारात.

मुसलमान लोक स्वछ पांढरे कपडे घालुन भरपुर चमचमीत अन्नपदार्थ घेऊन दफनभूमीत जातत. दफनभूमीला अगदी स्वर्गासारखे सजवले जाते. रात्रभर प्रार्थना होते. त्यात स्त्री पुरुष सर्व अगदी लहान मुलेही सामील होतात.

खाद्यपदार्थात मुख्य आकर्षण असते जर्दा. म्हणजे पिवळा रंग घालुन केलेला केलेला साखरभात. जर्द म्हणजे पिवळा.

लिंब्या ,हिंद धर्मात का रे आपण जन्माला आलो ? तो पाम्ढरा आंबूस दहीभात खायला ?

आपणही पिंड पक्षाला जर्दा करुया का ?

या रात्री प्रार्थना केल्यास अल्ला पुढील वर्षात भरभराट करतो. जुन्या वर्षातेल चुकांची माफी करतो. शिवाय या रात्री पूर्वजांचे स्मरण होते.

>>>> तो पाम्ढरा आंबूस दहीभात खायला ? <<<<
काऊड्या, उगाच टायपायचे म्हणून टाईपत जाऊ नकोस अर्धवट माहितीवर.
तो आंबुस? "दहीभात" पितरांकरता असतो, तो बाकीच्या जीवंत माणसांना प्रसाद म्हणून खाउ घालत नाहीत, वा नाही पिंडाचे तुकडे खाऊ घालत.
श्राद्धाचा स्वयंपाक चांगला सुग्रास, आळुचे फदफदे अन आमसुलाच्या चटणी तसेच वडे इत्यादीसहीत असतो.
हां, आता तू घेतलेल्या "काऊ" या आयडीला अनुसरून तुला केवळ अन केवळ "काळे तीळ वाहिलेला पिंडच" टोचत बसायचा असेल, तर बस बापड्या... मला काय त्याचे? Proud

लिंब्या मी मेलेल्या बद्दलच लिहिल्र आहे.

हिंदु धर्मात मेलेल्याला दहीभात घालतात.

मुसलमानांच्यात साखरभात पितर व जिवंत अशा सर्वांसाठी असतो.

मासिक पाळीवरील स्त्रियांवर असलेली धार्मिक बन्धने ही केवळ गैरसमजुतीवर आधारित आहेत.
स्त्रियाना त्या दिवसात अवघड कामे करावी लागू नयेत, आराम मिळावा, घरकामातून सवलत मिळावी ह्या उद्देशाने 'कावळा शिवणे' ह्या प्रकाराची निर्मिती झाली असावी. जेणे करुन तिला कोणीही वडीलधार्‍यांनी कामे सान्गू नयेत. ह्याचा अर्थ असा नव्हे की तिला हवे असल्यास तिने त्या गोष्टी करु नयेत.

मात्र ह्याचा भलताच विपरीत अर्थ काढून अश्या स्त्रिला निषिद्ध वगैरे ठरवून 'विटाळ' वगैरे नावे ठेवुन काहीही करण्यास प्रतिबन्ध करण्यात आला जो अतिशय चूकीचा आणि संतापजनक आहे.

वास्तविक मासिक धर्म हे इतर कोणत्याही, जसे की मल मूत्र विसर्जन क्रियेइतकेच नैसर्गिक आहे, त्यामुळे त्याने स्त्रिया दूषित कशा मानल्या जाउ शकतात? सध्या उपलब्ध असणार्‍या साधनांमुळे स्वच्छतेचाही (hygine) प्रश्न उरत नाही. कुठल्याही नैसर्गिक बाबींबद्दल कोणत्याही देवाला हरकत असायचे कारणच नाही.

मात्र अश्या चुकिच्या पद्धती लहानपनापासून मनावर कोरल्या गेल्याने मुलींच्या मनात एकप्रकारची अपरधीपणाची भावना घर करून बसते आणि त्यामुळे मनात इच्छा असूनही केवळ मोठे काय म्हणतील ह्या भावनेने कोणतेही कार्य मोकळेपणाने करता येत नाही.

वास्तविक अनेक मोठी माणसे देखील केवळ शास्त्र सांगते म्हणून ह्या गोष्टी करण्याचा पायंडा पुढे चालू ठेवतात. मात्र कुठले शास्त्र असे सान्गते वा त्यामगचे तर्कशास्त्र काय असेल ह्याचा सारासार विचार करीत नाहीत.

निल्सन तुमच्या मैत्रिणीच्या आईने अगदी योग्यच केले ह्यबद्दल त्यांचे कौतुकच करायला हवे.

वास्तविक मासिक धर्म हे इतर कोणत्याही, जसे की मल मूत्र विसर्जन क्रियेइतकेच नैसर्गिक आहे, त्यामुळे त्याने स्त्रिया दूषित कशा मानल्या जाउ शकतात? सध्या उपलब्ध असणार्‍या साधनांमुळे स्वच्छतेचाही (hygine) प्रश्न उरत नाही. कुठल्याही नैसर्गिक बाबींबद्दल कोणत्याही देवाला हरकत असायचे कारणच नाही.>>>>> +१

मरणोत्तर अन्तिमसन्स्कारान्चे अनुभव व त्यावरील भाष्य >>?

गोंधळात टाकणारे शिर्षक आहे.
कुठल्याही धर्मात अंत्यसंस्कार जिवंतपणी करत नसतील ना ? मरणोत्तर अन्तिमसन्स्कार हे लेडीज बायकांसारखं झालंय की खरोखरच अमानवीय अनुभवांची अपेक्षा आहे इथे ?

मला अंतिमसंस्कार आवडतात!

थोड़े विचित्र टाइटल वाटेल हे पण मला मर्तिकाचे संस्कार आवडतात, कारण दहनभुमी मधे जितकी शांतता फील होते तितकी कुठेच होत नाही आमच्यामते, आजवर पणजी, ३ आज्या, तीन आजे , एक आतोबा, एक काका इतक्या मंडळीला पोचवले आहे, आजकाल नाही फील होत जास्त रडु वगैरे नाही येत, स्मशानातली शांतता खुपच आकर्षक वाटते, may be something is wrong with me or I have come to terms with the fact that SOMETIMES DEATH JUST SEEMS TO BE AN OLD FRIEND who has always walked with us every moment and presents himself before us only on that opportune moment when we feel we're all alone.

>>> कुठल्याही धर्मात अंत्यसंस्कार जिवंतपणी करत नसतील ना ? <<<
हिंदू धर्मात सर्वसंगपरित्याग करुन सन्यास घ्यावयाचा असल्यास सर्वसंगपरित्यागाचे प्रतिक म्हणून व्यक्तिला स्वतःचे अंत्यसंस्कार (अर्थातच शरीर अग्नित जाळणे सोडून बाकी म्हणजे स्वतःचेच श्राद्ध/तर्पण इत्यादी) स्वतःच करावे लागतात. याचा तपशील याक्षणी माझ्याकडे उपलब्ध नाही.

अगदी वेगळ्या अर्थाने, पण बहुधा जैनांचे संथारा व्रत हे देखिल अंत्यसंस्कारांचाच भाग असावे. त्याचाही तपशील उपलब्ध नाही.

☺☺☺☺

>>कारण दहनभुमी मधे जितकी शांतता फील होते तितकी कुठेच होत नाही
हो म्हणुन तर "स्मशान शांतता" असा शब्दप्रयोग आला असावा.

चांगली चर्चा !
काही प्रश्न -
१. अस्थि विसर्जन किती दिवसात करावे असा नियम आहे (नियम असल्यास)? जर काही कारणाने काही महीने उशीर झाला तर चालते का? (वैयक्तिक मतानुसार नाही, पण शास्त्र किंवा अनुभव काय आहे)?
२. अस्थि विसर्जन समुद्रात करणे योग्य, का नाशिक इत्यादि ठिकाणी ? (पुन्हा - शास्त्र काय आहे)?

मला पटलेले स्पष्टीकरण सांगतो:

अस्थि नेहमी वाहत्या पाण्यात विसर्जित कराव्यात. कुंडात शक्यतो करू नये.
जिवाला (आत्म्याला नव्हे) सगळ्यात प्रिय असते ते त्याचे शरीर. त्यामुळे तो अस्थींभोवती घुटमळत असतो. जेंव्हा अस्थी विसर्जीत होतात तेंव्हा जीवही त्यांच्यासोबत जातो. म्हणून अस्थिंना गती असेल तर जीवालाही गती मिळते आणि तो पुढच्या प्रवासाला लाग्तो. नदी जिथे पश्चिमवाहिनी होते अशा ठिकाणी अस्थि विसर्जन केल्यास उत्तम सम्जले जाते कारण पश्चिम ही मुक्तीची दिशा समजली जाते.

अर्थात ह्या सगळ्यामागे 'जीवाच्या गतीत त्याचे वंशज / नातेवाईक मदत करतात' हे तत्व मान्य पाहिजे.

पश्चिमवाहिनी की दक्षिणवाहिनी?
पंचवटीला गोदावरी नदी दक्षिणवाहिनी होते, म्हणून तिथे अस्थिविसर्जन करतात.

पश्चिमवाहिनी की दक्षिणवाहिनी?>>>

दक्षिण-पूर्व वाहिनी म्हणूयात!

गंगा पण...>>> हो

मी फक्त महाराष्ट्रातल्या नद्यांचा उल्लेख केला!

तापी, नर्मदा वैगेरे पश्चिम वाहिन्या आहेत वर कोकणातील सर्व नद्या..

नदी जिथे पश्चिमवाहिनी होते
अशा ठिकाणी अस्थि विसर्जन केल्यास उत्तम सम्जले जाते
कारण पश्चिम ही मुक्तीची दिशा समजली जाते.>>>>>>>>>.बरोबर," काळ देहासी आला खाऊ" या अभंगात संत नामदेव महाराज म्हणतात" टाळ मृदुंग दक्षिणेकडे ,माझे गाणे पश्चिमेकडे ", कारण पश्चिम ही मुक्तीची दिशा आहे,पण पश्चिम वाहीनी नद्या फक्त कोकणात आहेत ,महाराष्ट्रातल्या बहुतेक नद्या पुर्व वाहीनी आहेत

Pages