पगारे तुम्ही पापं केलीत आणि तुमची इथून, (म्हणजे संकेतस्थळावरून) गच्छंती झाली की बघुया तुम्हाला कायमची मुक्ती मिळते की वासंसी जीर्णानी करता. आमचे भोग संपले नसतील कदाचित, म्हणून आम्हाला ते भोगावायाला पुनर्जन्म घ्याला. कोणी सांगावं?
बाकी प्रेताच्या विल्हेवाटीचेच अनुभव लिहायलाच हा धागा आहे. आम्ही त्याला अंतिमसंस्कार म्हणतो. तुम्ही जे करता त्याचे लिहा अनुभव.
नदी जिथे पश्चिमेला वाहू लागते तिथे अस्थी सोडल्या आणि मुक्ती मिळायच्या आत नदी प्पुन्हा वळली म्हणजे?
आता मिरजेत समजा एखादा मेला, त्याच्या अस्थी म्हैसाळला जाऊन सोडल्या आणि नरसोबाच्या वाडीशी जाईपर्यंत जर मुक्ती नाही मिळाली तर पुन्हा जिवंत काय?
तरीच नरसोबाच्या वाडीला देवस्थान आहे, असले आत्मे कॅच करायला. लोकांना त्रास नको हा उदात्त हेतू असणार.
ते जामोप्या (किंवा आत्ता जो काही आयडी आहे तो), असल्याच कुठल्यातरी मुक्ती न मिळालेल्या आत्म्याचे अवतार असतील. त्यांच्या गावाला नदी पश्चिम दिशा सोडून पुन्हा दक्षिण-पुर्वेला वळते.
<<माणुस मेला तर त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावाविच लागते.मग जाळा नाहितर पुरा.कसले संस्कार घेउन बसलात. भाकडकथा आहेत मुक्ती नि आत्मा ह्या.>>
----- सचिन पगारे यान्च्याशी सहमत... मनुष्य मेल्यावर सर्व तिथेच सम्पते. पुढचे कार्य हे केवळ मागे राहिलेल्या लोकान्च्या(आरोग्या)साठीच.
१०, १३ वा दिवस, १४ वा दिवस मग पुढे वर्षश्राद्ध... या दिवसान्ना शास्त्रात काहीच आधार नाही आहे.
मी मृतदेहाच्या वाकून पाया पडतो.माझ्या दृष्टीने मी ती श्रद्धांजली वाहतो. आता काही असे म्हणतील जिवंत पणी पाया पडला नाही आता पडून काय उपयोग? हे माझ्या लक्शात येते. पण ठीक आहे चालायचच!
Submitted by प्रकाश घाटपांडे on 10 September, 2016 - 07:43
पश्चिमवाहिनी की दक्षिणवाहिनी? पंचवटीला गोदावरी नदी दक्षिणवाहिनी होते, म्हणून तिथे अस्थिविसर्जन करतात. >>> हो बरोबर आहे. पण दुसर्या मतप्रवाहानुसार पश्चिमवाहिनी आहे ते मला जास्त पटले. दक्षिण ही यमाची / मृत्यूची दिशा आहे. जे आधीच मृत आहे त्याला त्या दिशेला पाठवून कायसा फरक पडणार ? म्हणून मला पश्चिमेचे कारण अधिक पटले.
नदी जिथे पश्चिमेला वाहू लागते तिथे अस्थी सोडल्या आणि मुक्ती मिळायच्या आत नदी प्पुन्हा वळली म्हणजे? >>> टण्या, हाच प्रश्ण मी पण विचारला होता.
मृत्यूनंतरचे हे सगळे विधी मागे उरलेल्यांसाठीच असतात. जे माणूस गेलय ते नाहीये हे मानायला मन तयार नसते. मग ते माणूस कुठेतरी आहे आणि जिथे आहे तिथे सुखात असूदे अशी अपेक्षा करू लागते मन. त्या मनाच्या समाधानाकरताच हे सगळे विधी आहेत. त्याच्याच पुढे रुढी बनल्या. काही लोक मृत्यू सहज स्विकारू शकतात पण म्हणून ज्यांना मृत्यू स्विकारण्याकरता अशा विधींची गरज पडते त्यांची टिंगल का करावी?
मृत्यु नंतर दहावे बारावे हे विधी का करतात. ते काय विधी असतात. आजकाल ते एकत्र करतात ते का. त्यावेळी नातेवाईकांना आप्तस्वकियांना जेवायला बोलावतात ते का. अशा वेळी रक्ताचे नाते नसेल पण खूप जवळ्चे प्रेमाचे नाते असेल तर जेवायला जावे की नाही ह्याबद्दल शास्त्रे काय सांगतात. हे सगळे मी स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी विचारते आहे कारण मी खूप कन्फ्युज्ड आहे.
मा़झा स्वतःचा ह्या गोष्टींवर विश्वास नाही. पण ज्यांच्या घरी बोलावले आहे त्यांना हे सगळे करणे पटते. मी एवढ्या वर्षात अशा कोण्त्याही ठिकाणी गेले नाही. जावे तर पटत नाही न जावे तर प्रेमाच्या माणसांना खूप प्रेमाने ये म्हणून आग्रह धरला आहे...
मृत्यूनंतरचे हे सगळे विधी मागे उरलेल्यांसाठीच असतात. जे माणूस गेलय ते नाहीये हे मानायला मन तयार नसते. मग ते माणूस कुठेतरी आहे आणि जिथे आहे तिथे सुखात असूदे अशी अपेक्षा करू लागते मन. त्या मनाच्या समाधानाकरताच हे सगळे विधी आहेत. त्याच्याच पुढे रुढी बनल्या. काही लोक मृत्यू सहज स्विकारू शकतात पण म्हणून ज्यांना मृत्यू स्विकारण्याकरता अशा विधींची गरज पडते त्यांची टिंगल का करावी? >>> हे खुप छान लिहिलत. पण आताच्या काळात सुशिक्शित लोकांना ह्याची गरज पडू नये असे मनापासुन वाटते.
अशा वेळी रक्ताचे नाते नसेल पण खूप जवळ्चे प्रेमाचे नाते असेल तर जेवायला जावे की नाही ह्याबद्दल शास्त्रे काय सांगतात. हे सगळे मी स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी विचारते आहे कारण मी खूप कन्फ्युज्ड आहे. >> its a obligation to go per what I have read. You should not say no to Shraddha Prasad.
नदी जिथे पश्चिमेला वाहू लागते तिथे अस्थी सोडल्या आणि मुक्ती मिळायच्या आत नदी प्पुन्हा वळली म्हणजे? >>> म्हणजे पुनर्जन्म....... मुक्ती म्हणजे जन्मा मरणाच्या चक्रातून सुटका
आपल्या आइवडिलानी आपल्यासाठी काय केलय याची परतफेड ते जिवन्त असताना करण जास्त योग्य , मेलेला माणूस काही बघायला येत नाही आपल्यासाठी आपल्या आप्तानी गावजेवण घातल की सोन्याचा घास खावु घातला अस माझ मत काही जवळच्या अनुभवातुन झालेल आहे.
Submitted by प्राजक्ता on 22 September, 2016 - 17:57
>>> आपल्या आइवडिलानी आपल्यासाठी काय केलय याची परतफेड ते जिवन्त असताना करण जास्त योग्य <<< तुमच्या या मुद्यामधे गैर काहीच नाही, जिवंत असतानाच करणे योग्यच.
पण, वाडवडिलांमध्ये केवळ "आईवडिल" इतकेच धरीत नाहीत, तर मागिल सात पिढ्यांची आठवण, त्यांचेप्रति कृतज्ञता असे भाव अपेक्षित आहेत. व या सात पिढ्यांना "जिवंत" बघणे शक्य होईल असे वाटत नाही, फार फार तर आजीआजोबा, पणजोबा इथवरच शक्य आहे.
यामागिल भावना अशी की, मला या या वंशात या या आईवडीलांचे पोटी जन्म मिळाला, मला हा देह मिळाला, व या काळी मी इथे पृथ्वीतलावर जिवंत असुन माझ्या अस्तित्वा मागे, माझ्या मागिल अनेकानेक पिढ्यांचे त्यांचे त्यांचे काळातील कष्टप्रद जीवन जगताना केलेली वंशवृद्धी कारणीभूत आहे. इथे केवळ जनावरांनी संभोग केला म्हणून वंशवृद्धी होत गेली इतका "बुद्धिप्रामाण्यवाद" अपेक्षित नसुन, मानव म्हणून मागिल पिढ्यांबाबत आभारप्रदर्शन अपेक्षित आहे.
याव्यतिरिक्त, अन्य कारणे आहेत, पण अन्निस नामक बागुलबुवामुळे मी ती इथे लिखित स्वरुपात मांडत बसणार नाही. शास्त्रामध्ये त्याचे सविस्तर वर्णन आहे, त्याबाबत पुस्तकेही उपलब्ध आहेत.
त्यात सांगितलेले सगळे जसेच्या तसेच वा किरकोळ स्वरुपात वा अजिबात करावे वा नाही याचे स्वातंत्र्यही ज्याचे त्यास आहेच्च.
Submitted by limbutimbu on 22 September, 2016 - 23:56
आपल्या आइवडिलानी आपल्यासाठी काय केलय याची परतफेड ते जिवन्त असताना करण जास्त योग्य >>> १००% सहमत.
तर मागिल सात पिढ्यांची आठवण, त्यांचेप्रति कृतज्ञता असे भाव अपेक्षित आहेत. >>> अगदी पैशाच्या कर्जाचे उदाहरण घेतले तर कर्ज देणारा मरून गेला तरी त्याच्या वारसाकडे त्या कर्जाची देय रक्कम दिली तरी ते कर्ज फिटते. म्हणजेच प्रत्येक ऋण हे त्या ऋण देणार्यालाच फेडणे शक्य नसते. अनेक ऋणं ही pay forward या प्रकारची असतात. तेंव्हा 'सात पिढ्यांची आठवण' हीच भावना असेल तर ते ऋण आपल्या पुढच्या पिढीला स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभे करून फेडता येईलच. कारण ती पुढची पिढीही त्या सात पिढ्यांपूर्वीच्यांचे वंशज आहेतच.
नानबा, मर्तिकाला जाणे टाळू नये असा संकेत आहे. नंतरच्या क्रियांबद्दल असे संकेत नाहीत.
पण ज्यांच्या घरी बोलावले आहे त्यांना हे सगळे करणे पटते. मी एवढ्या वर्षात अशा कोण्त्याही ठिकाणी गेले नाही. जावे तर पटत नाही न जावे तर प्रेमाच्या माणसांना खूप प्रेमाने ये म्हणून आग्रह धरला आहे >>> खरं तर असा आग्रह वगैरे नाही करत. साधे 'या' असेही म्हणत नाहीत, केवळ अमुक दिवशी अमुक वाजता अमुक कार्य आहे एवढाच निरोप देतात. असो. गेलेल्या माणसाबद्दल तुम्हाला मनापासून प्रेम असेल तर नक्की जा. अखेरचा निरोप दिल्याचे समाधान नक्कीच पदरात घेऊन याल. खूप मोलाचे असते ते. अमंगळ वगैरे काही नसते त्यात. मृत्यू आपण समजतो तेवढा वाईट नक्कीच नसतो. 'त्या'च्यावर विश्वास असेल तर पटकन समजेल. 'त्या'ने सांगितले आहे की मृत्यू म्हणजे वस्त्राप्रमाणे शरीर बदलणे. कपडे बदलणे अमंगळ असते का?
>>> खरं तर असा आग्रह वगैरे नाही करत. साधे 'या' असेही म्हणत नाहीत, केवळ अमुक दिवशी अमुक वाजता अमुक कार्य आहे एवढाच निरोप देतात. <<< अगदी बरोबर.
शिवाय, खांदेकर्यांच्या मदतीची परतफेड हा देखिल एक भाग असतो. सगळेच येतातच असे नाही.
वर्षश्राद्ध किती "इव्हेण्टपूर्ण" करावे हा ज्याच्या त्याच्या क्षमतेचा व "आवडीचा" भाग आहे. मात्र त्या दिवशी किमान तर्पण तरी व्हावे.
शास्त्र तर इतकेही सांगते की जर एखाद्याची आर्थिक स्थिती अजिबातच नसेल, तर चक्क नदीच्या/तळ्याच्या काठी जावे व त्यातिल पाण्याने तर्पण करावे. नदी तळे नसेल, काहीच नसेल, तर केवळ आकाशाकडे पाहून पूर्वजाम्चे स्मरण करुन मानसपुजेने तर्पण करावे, पण करणे आवश्यक.
एक लक्षात घ्या, हिंदू धर्म, जन्मपुनर्जन्म मानतो, जन्मोजन्मांतरीचे आत्म्याचे अस्तित्व मानतो, जिवंतपणी माणूस वेळेस सख्खे नातेवाईक सगेसोयर्यांकडेही बघत नसतो, परक्यांचेकडे बघणे दूरचे, अशा स्थितीत, तुमचे मृत पूर्वजांकडे /करता दुसरे कुणी तर्पण करतील ही शक्यता धूसर असते. तेव्हा त्यांचे करता त्यांचे नावाने पाणी सोडणे हे जिवंत वंशजांचे कर्तव्य मानले गेले आहे.
कराय्चे वा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न.
विशिष्ट जेवण्/पदार्थ/वाढायच्या रिती या "शिस्तीच्या" भाग आहेत. आज यावरही "केटरिंगवाले" पोट भरताहेत. तेव्हा अमक्यातमक्याला कितीक जेवायला घातले म्हणजे संपत्तीचा नास केला अशासारखे मत असलेल्यांनी हे करुच नये असे वाटते.
त्याचबरोबर, ही सक्ति आहे असे मानुनही करु नये.
माझ्याकडे दरवर्षाच्या श्राद्धदिनी (प्रथमवर्षवगळता) आधार केंद्र वगैरे सारख्या ठिकाणी लिंबी जाते व जे काय क्षमतेत असेल त्याप्रमाणे अन तेथिल गरजा विचारुन घेऊन शिधा/कपडे/रोख पैसा या स्वरुपात तर्पण देऊन येते.
त्या त्या दिनी आवर्जुन आठवण करणे महत्वाचे.
अधिकच शिस्त पाळायची असे आजच्या एकविसाव्या शतकात कुणाच्या मनास आलेच ( असे म्हणण्याचे कारण आपण साधी झेब्रा क्रॉसिंगचि शिस्तही सामाजिक जीवनात पाळीत नाही तर निधर्मीवाद्यांच्या/अन्निसवाल्यांच्या राज्यात धार्मिक शिस्त कोण पाळू पहाणार? नै का? न पाळण्याच्या नाना सबबी/कारणे मात्र सांगतील) तर रोजच्या रोज काकबली ठेवणे हे उत्तम.
Submitted by limbutimbu on 23 September, 2016 - 01:14
अस्थी विसर्जनाबद्दल बोलायचे झाल्यास आमच्याकडे गंगा यमुना गोदावरी पेक्षा जास्त प्रस्थ आहे ते नर्मदा मैय्याचे, विलक्षण जास्त पगडा आहे लोकांवर ह्या नदीचा. नुसते नर्मदा कोणीच म्हणत नाही तिला, रौद्र आहे भयानक ती.
Submitted by सोन्याबापू on 23 September, 2016 - 01:37
>>>>रोजच्या रोज काक'बली' म्हणजे काय ?<<<<
रोजचे जेवण तयार झाले, सहसा दुपारी माध्यान्ह काली (१२ ते २ दरम्यान) तयार होते असे गृहित धरुन, जेवण तयार झाल्यावर पहिला नैवेद्य घरचे देवांना, दुसरा कुलस्वामी/कुलस्वामिनी, तिसरा वास्तुदेवतेस, चौथा गोग्रास, अन पाचवा काकबली असे काढले जाते (जात असे) .
यातिल देवाचा व कुलस्वामिनीचा नैवेद्य पुर्ण ताटभर सर्व पदार्थांचा, जो यजमानांपैकी कुणी जेवायला घ्यायचा.
बाकी तिन्ही नैवेद्य छोट्या पानावर ठिपका ठिपका वाढुन दाखवायचे.
पैकी वास्तुचा व गाईचा नैवेद्य गाईला खायला द्यायचा.
काकबली घराचे बाहेर उंचावर (छपरावर वगैरे) पाण्यासहित ठेवुन द्यायचा.
जर गाय नसेल, तर ते तिनही नैवेद्य बाहेर नेऊन ठेवतात.
काकबलीमध्ये सर्व जेवण वाढणे अपेक्षित नसते तर किमान दहिभात व पाणी किंवा जोकाय भाकरतुकडा केला असेल तो ठेवणे अपेक्षित असते.
गोग्रासात, गाय जे खाऊ शकेल, ते वाढणे अपेक्षित असते
वास्तुचा नैवेद्य सर्व जेवणातील सर्व पदार्थांचा दाखवितात.
अवांतरः
वॉट्सअॅप /मिडियामधे बाटलीमधे भरुन ठेवलेले धान्य/बाटलीला भोक पाडलेले असे पक्षांच्या सोईकरता येते त्याची आपण वाहव्वा करतोच. पण आपल्याच चालिरितींमध्ये रोजचे रोज पक्षी /अन्य कीडामुंगी जीव यांचेकरता (स्वतः खाण्याचे आधी) अन्न काढून ठेवण्याच्या प्रथेची "अंधश्रद्धा" म्हणून थट्टाही उडवु शकतो, हा आमच्या अर्धवट एकतर्फी बुद्धिप्रामाण्यवादातील विरोधाभास आहे. असो.
माझ्यामते, हिंदू धर्मातिल बहुतांश चालिरीतींमध्ये /रुढीपरंपरांमध्ये "त्याग" शिकवला जातो. जो शिकवणे गरजेचे असते. कारण माणूस जन्माला येतो तेच मुळी "मला (अर्थात या देहाला) काय हवे" हा हव्यास घेऊन , व पुढे आयुष्यभर तोच तो हव्यास तो जपुन ठेवत जगत रहातो, ज्यामध्ये उपजत जिव्हाळा/प्रेम (माता-अपत्य नात्यातिल) वगळता, बाकी कुठल्याही नात्यात/संबंधात/व्यवहारात दुसर्याकरता काही (फुकट) करणे या बाबत नन्नाचा पाढाच असतो. यास मी देखिल अपवाद नाही.
माणुस अक्षरषः आयुष्यभर सदैव काहि घेतच असतो, त्याचे हातुन देणे कधीच होत नाही.
व्यवहारात अमकेतमके काम केले म्हणून मोबदला घेतो, पण कुणाचे काम फुकट करेल असे क्वचित
अधिक विचार करता लक्षात येते की माणूस आयुष्यभर फुकटचा श्वास घेतो, व उच्छ्वास सोडतो, अन्न घेतो तर त्याबदल्यात विष्ठा/मलमूत्र परत करतो.... या व्यतिरिक्त माणुस आख्ख्या आयुष्यात स्वतःहून कुणाला काहीही देत नाही, फक्त घेतच रहातो.
एकीकडे "जीवो जीवस्य जीवनम" अशी निसर्ग शृंखला आहे, अन मानवाचे एकतर्फी घेओबा वागणे निसर्गाच्या विपरीत जाते, तसे कायमच असू नये म्हणून निरनिराळ्या प्रथांमध्ये याची काळजी घेतली जाते. अगदी शेतातील पिके कापुन घेतल्यावर जे धान्य सांडते ते अस्सल शेतकरि कधीही वेचुन घेत नाही, तसेच निसर्गात सोडून देतो.
म्हणूनच एक फार सुंदर काव्यपंक्ति आहे, ती देतो.... हिचा अर्थ समजायला मला बरीच वर्षे लागली, शाळेत असताना अभ्यासात होते हे काव्य..
देणार्याने देत जावे,
घेण्याराने घेत जावे, घेता घेता घेणार्याने ,
देणार्याचे हातच घ्यावे
Submitted by limbutimbu on 23 September, 2016 - 02:11
मात्र त्या दिवशी किमान तर्पण तरी व्हावे.
शास्त्र तर इतकेही सांगते की जर एखाद्याची आर्थिक स्थिती अजिबातच नसेल, तर चक्क नदीच्या/तळ्याच्या काठी जावे व त्यातिल पाण्याने तर्पण करावे. नदी तळे नसेल, काहीच नसेल, तर केवळ आकाशाकडे पाहून पूर्वजाम्चे स्मरण करुन मानसपुजेने तर्पण करावे, पण करणे आवश्यक.
>> लिंबुकाका, तर्पण कसे करावे?याबद्दल थोडे विस्ताराने लिहाल का?
एखादी व्यक्ती आपल्या कुळातली नसेल पण आपण पित्यासमान किंवा मित्रासमान मानत असू तर त्या व्यक्तीशी असलेल्या ऋणानुबंधाना स्मरून आपण श्राद्ध किंवा तर्पण करु शकतो का?
>>>> लिंबुकाका, तर्पण कसे करावे?याबद्दल थोडे विस्ताराने लिहाल का? <<<<
रोज संध्या करताना सूर्याला देतो ते अर्घ्य, त्याच प्रकारे, अन सरळ हातावरुनच पितरांचे नावे "पाणी सोडणे" म्हणजे सरळ शुद्ध तर्पण. त्याचवेळेस, एखादे दान द्यायचे असल्यासही पितरांचे नावे दान देत असल्याबद्दल (ची खातरजमा) म्हणून पाणी सोडले जाते.
इतकेच काय, एरवीही सणासुदीच्या जेवणाच्या पंक्तिमध्ये, जेवायला बसलेल्यांसमोर काहि एक नाणी दक्षिणा म्हणून ठेवली जातात, ती देखिल ओली करुन तुळशीच्या पानाबरोबर ठेवतात. तर पाणी सोडणे हा महत्वाचा भाग. यावरुनच अमक्या तमक्यावर "पाणी सोडले" म्हणजे "त्यागले" अशा अर्थाचा वाक्प्रचार निर्माण झालेला आहे.
>>>>> एखादी व्यक्ती आपल्या कुळातली नसेल पण आपण पित्यासमान किंवा मित्रासमान मानत असू तर त्या व्यक्तीशी असलेल्या ऋणानुबंधाना स्मरून आपण श्राद्ध किंवा तर्पण करु शकतो का? <<< होय. नक्कीच.
रक्तसंबंधी/गोत्रज यांचे बरोबरच, आजोळ, सासरचे नातलग, मित्र, गुरुजन, अगदी कसलेच नाते नसले तरीही कुणाकरताही तर्पण करता येते. हेच जास्त विधिवत शिस्तीत करायचे झाल्यास पितृपंधरवड्यात "महालय" घालतात. थोडा खर्चिक प्रकार असतो, पण यात जितक्या नावांचे तर्पण असते, तितके पिंड बनवतात व त्यावर तर्पण होते.
एरवी वैयक्तिकरित्या काही ही करायचे असल्यास, निव्वळ पाणी व रुपयादोनरुपयाची दक्षिणा सोडावी.
आपल्याकडे अजुन एक पद्धत आहे, कुणाकडेही "रिकाम्या हाती" जात नाहीत. अगदी देवळात देवाकडेही जाताना काही ना काहि घेऊन जातात. तसेच पितरांचे वेळेसही रिकाम्या हाती काहि करु नये. अगदी काहीच नसेल, तर पाणी, अन दुर्दैववशात, ते देखिल उपलब्ध झाले नाही, तर मानसपुजा.
Submitted by limbutimbu on 23 September, 2016 - 03:32
आपापल्या पूर्व़जांचे यानिमित्ताने स्मरण ठेऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता बाळगली जाते,हा विचार आवडतो.बाकी पटत नाही.
माझ्या घनिष्ठ नातलगांचे याबाबत अनुभव.
५१ वर्षांचा एकुलता एक मुलगा अचानक मृत्यू पावल्यावर ७८ वर्षांच्या त्याच्या आईने वर्षश्राद्ध न कारता एका आश्रमात १२५ मुलांना जेवण दिले.सुनेने मात्र वर्षश्राद्ध केले.त्याच्या तिथीला अथवा वाढदिवस किंवा इतरवेळी या बाई त्या आश्रमाला,दुसर्या ठिकाणी देणगी देतात.
दुसरे एक आहेत्,त्यांनी आईची हेळसांड केली.पण बाराव्याचा मोठा थाट उडवून दिला.
खूप अवांतर झाल
>>> अजून एक शंका, पिंडांवर पाणी सोडताना अंगठ्यावरून म्हणजे उलटा थंब्स अप करुन पाणी सोडतात ना? त्यामागचे कारण काय? <<<
याबाबत नेमकी माहिती अभ्यासुन मग तपशीलात लिहीन. याबाबत छान विवेचन वाचल्याचे स्मरते, पण आत्ता आठवत नाहीये.
तोवर, जिथवर मला माहित आहे, भाताचा पिंड करुन जेव्हा तर्पण करतात, त्यावेळेसच अंगठ्यावरुन गोष्टी वाहतात. दैनंदिन रोजचे तर्पण सरळ हातावरुनच केले जाते. हे असे अंगठ्यावरुन कुणी वहायचे याचेही नियम आहेत. ज्याचे वडील जिवंत असतील, त्यांनी कुणालाही अंगठ्यावरुन काहीही वहायचे नाही असा एक नियम आहे.
हे अंगठ्यावरुन वहाणे, तसेच श्राद्धाचे जेवण वाढायची उलटी पद्धत, वा नैवेद्य दाखविताना ताटाखाली गोल वर्तुळ काढणे यास विशिष्ट अर्थ आहेत, व शिस्तीचा भाग म्हणुनही ते पाळले जातात.
माझ्या अभ्यास झाला की यावर लिहीन. तोवर वरील मजकुर आधारभूत न धरता केवळ विचारार्ह म्हणुन स्विकारावा.
Submitted by limbutimbu on 24 September, 2016 - 00:13
माणुस मेला तर त्याच्या
माणुस मेला तर त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावाविच लागते.मग जाळा नाहितर पुरा.कसले संस्कार घेउन बसलात. भाकडकथा आहेत मुक्ती नि आत्मा ह्या.
पगारे तुम्ही पापं केलीत आणि
पगारे तुम्ही पापं केलीत आणि तुमची इथून, (म्हणजे संकेतस्थळावरून) गच्छंती झाली की बघुया तुम्हाला कायमची मुक्ती मिळते की वासंसी जीर्णानी करता. आमचे भोग संपले नसतील कदाचित, म्हणून आम्हाला ते भोगावायाला पुनर्जन्म घ्याला. कोणी सांगावं?
बाकी प्रेताच्या विल्हेवाटीचेच अनुभव लिहायलाच हा धागा आहे. आम्ही त्याला अंतिमसंस्कार म्हणतो. तुम्ही जे करता त्याचे लिहा अनुभव.
वासंसी जिर्णामी म्हणजे?
वासंसी जिर्णामी म्हणजे?
अनुभव लिहा इथे. याचा अर्थ
अनुभव लिहा इथे. याचा अर्थ गुगल करा. नाहीच समजला तर धागा काढा. इथली चर्चा भरकटवण्याची इच्छा नाही.
अमितव, 'वासांसि जीर्णानि' असं
अमितव, 'वासांसि जीर्णानि' असं कराल का?
नदी जिथे पश्चिमेला वाहू लागते
नदी जिथे पश्चिमेला वाहू लागते तिथे अस्थी सोडल्या आणि मुक्ती मिळायच्या आत नदी प्पुन्हा वळली म्हणजे?
आता मिरजेत समजा एखादा मेला, त्याच्या अस्थी म्हैसाळला जाऊन सोडल्या आणि नरसोबाच्या वाडीशी जाईपर्यंत जर मुक्ती नाही मिळाली तर पुन्हा जिवंत काय?
तरीच नरसोबाच्या वाडीला देवस्थान आहे, असले आत्मे कॅच करायला. लोकांना त्रास नको हा उदात्त हेतू असणार.
ते जामोप्या (किंवा आत्ता जो काही आयडी आहे तो), असल्याच कुठल्यातरी मुक्ती न मिळालेल्या आत्म्याचे अवतार असतील. त्यांच्या गावाला नदी पश्चिम दिशा सोडून पुन्हा दक्षिण-पुर्वेला वळते.
(No subject)
<<माणुस मेला तर त्याच्या
<<माणुस मेला तर त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावाविच लागते.मग जाळा नाहितर पुरा.कसले संस्कार घेउन बसलात. भाकडकथा आहेत मुक्ती नि आत्मा ह्या.>>
----- सचिन पगारे यान्च्याशी सहमत... मनुष्य मेल्यावर सर्व तिथेच सम्पते. पुढचे कार्य हे केवळ मागे राहिलेल्या लोकान्च्या(आरोग्या)साठीच.
१०, १३ वा दिवस, १४ वा दिवस मग पुढे वर्षश्राद्ध... या दिवसान्ना शास्त्रात काहीच आधार नाही आहे.
मी मृतदेहाच्या वाकून पाया
मी मृतदेहाच्या वाकून पाया पडतो.माझ्या दृष्टीने मी ती श्रद्धांजली वाहतो. आता काही असे म्हणतील जिवंत पणी पाया पडला नाही आता पडून काय उपयोग? हे माझ्या लक्शात येते. पण ठीक आहे चालायचच!
पश्चिमवाहिनी की दक्षिणवाहिनी?
पश्चिमवाहिनी की दक्षिणवाहिनी? पंचवटीला गोदावरी नदी दक्षिणवाहिनी होते, म्हणून तिथे अस्थिविसर्जन करतात. >>> हो बरोबर आहे. पण दुसर्या मतप्रवाहानुसार पश्चिमवाहिनी आहे ते मला जास्त पटले. दक्षिण ही यमाची / मृत्यूची दिशा आहे. जे आधीच मृत आहे त्याला त्या दिशेला पाठवून कायसा फरक पडणार ? म्हणून मला पश्चिमेचे कारण अधिक पटले.
नदी जिथे पश्चिमेला वाहू लागते तिथे अस्थी सोडल्या आणि मुक्ती मिळायच्या आत नदी प्पुन्हा वळली म्हणजे? >>> टण्या, हाच प्रश्ण मी पण विचारला होता.
मृत्यूनंतरचे हे सगळे विधी मागे उरलेल्यांसाठीच असतात. जे माणूस गेलय ते नाहीये हे मानायला मन तयार नसते. मग ते माणूस कुठेतरी आहे आणि जिथे आहे तिथे सुखात असूदे अशी अपेक्षा करू लागते मन. त्या मनाच्या समाधानाकरताच हे सगळे विधी आहेत. त्याच्याच पुढे रुढी बनल्या. काही लोक मृत्यू सहज स्विकारू शकतात पण म्हणून ज्यांना मृत्यू स्विकारण्याकरता अशा विधींची गरज पडते त्यांची टिंगल का करावी?
मृत्यु नंतर दहावे बारावे हे
मृत्यु नंतर दहावे बारावे हे विधी का करतात. ते काय विधी असतात. आजकाल ते एकत्र करतात ते का. त्यावेळी नातेवाईकांना आप्तस्वकियांना जेवायला बोलावतात ते का. अशा वेळी रक्ताचे नाते नसेल पण खूप जवळ्चे प्रेमाचे नाते असेल तर जेवायला जावे की नाही ह्याबद्दल शास्त्रे काय सांगतात. हे सगळे मी स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी विचारते आहे कारण मी खूप कन्फ्युज्ड आहे.
मा़झा स्वतःचा ह्या गोष्टींवर विश्वास नाही. पण ज्यांच्या घरी बोलावले आहे त्यांना हे सगळे करणे पटते. मी एवढ्या वर्षात अशा कोण्त्याही ठिकाणी गेले नाही. जावे तर पटत नाही न जावे तर प्रेमाच्या माणसांना खूप प्रेमाने ये म्हणून आग्रह धरला आहे...
मृत्यूनंतरचे हे सगळे विधी
मृत्यूनंतरचे हे सगळे विधी मागे उरलेल्यांसाठीच असतात. जे माणूस गेलय ते नाहीये हे मानायला मन तयार नसते. मग ते माणूस कुठेतरी आहे आणि जिथे आहे तिथे सुखात असूदे अशी अपेक्षा करू लागते मन. त्या मनाच्या समाधानाकरताच हे सगळे विधी आहेत. त्याच्याच पुढे रुढी बनल्या. काही लोक मृत्यू सहज स्विकारू शकतात पण म्हणून ज्यांना मृत्यू स्विकारण्याकरता अशा विधींची गरज पडते त्यांची टिंगल का करावी? >>> हे खुप छान लिहिलत. पण आताच्या काळात सुशिक्शित लोकांना ह्याची गरज पडू नये असे मनापासुन वाटते.
अशा वेळी रक्ताचे नाते नसेल पण
अशा वेळी रक्ताचे नाते नसेल पण खूप जवळ्चे प्रेमाचे नाते असेल तर जेवायला जावे की नाही ह्याबद्दल शास्त्रे काय सांगतात. हे सगळे मी स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी विचारते आहे कारण मी खूप कन्फ्युज्ड आहे. >> its a obligation to go per what I have read. You should not say no to Shraddha Prasad.
नदी जिथे पश्चिमेला वाहू लागते
नदी जिथे पश्चिमेला वाहू लागते तिथे अस्थी सोडल्या आणि मुक्ती मिळायच्या आत नदी प्पुन्हा वळली म्हणजे? >>> म्हणजे पुनर्जन्म....... मुक्ती म्हणजे जन्मा मरणाच्या चक्रातून सुटका
व्हाट्सप आले
व्हाट्सप आले
आपल्या आइवडिलानी आपल्यासाठी
आपल्या आइवडिलानी आपल्यासाठी काय केलय याची परतफेड ते जिवन्त असताना करण जास्त योग्य , मेलेला माणूस काही बघायला येत नाही आपल्यासाठी आपल्या आप्तानी गावजेवण घातल की सोन्याचा घास खावु घातला अस माझ मत काही जवळच्या अनुभवातुन झालेल आहे.
>>> आपल्या आइवडिलानी
>>> आपल्या आइवडिलानी आपल्यासाठी काय केलय याची परतफेड ते जिवन्त असताना करण जास्त योग्य <<< तुमच्या या मुद्यामधे गैर काहीच नाही, जिवंत असतानाच करणे योग्यच.
पण, वाडवडिलांमध्ये केवळ "आईवडिल" इतकेच धरीत नाहीत, तर मागिल सात पिढ्यांची आठवण, त्यांचेप्रति कृतज्ञता असे भाव अपेक्षित आहेत. व या सात पिढ्यांना "जिवंत" बघणे शक्य होईल असे वाटत नाही, फार फार तर आजीआजोबा, पणजोबा इथवरच शक्य आहे.
यामागिल भावना अशी की, मला या या वंशात या या आईवडीलांचे पोटी जन्म मिळाला, मला हा देह मिळाला, व या काळी मी इथे पृथ्वीतलावर जिवंत असुन माझ्या अस्तित्वा मागे, माझ्या मागिल अनेकानेक पिढ्यांचे त्यांचे त्यांचे काळातील कष्टप्रद जीवन जगताना केलेली वंशवृद्धी कारणीभूत आहे. इथे केवळ जनावरांनी संभोग केला म्हणून वंशवृद्धी होत गेली इतका "बुद्धिप्रामाण्यवाद" अपेक्षित नसुन, मानव म्हणून मागिल पिढ्यांबाबत आभारप्रदर्शन अपेक्षित आहे.
याव्यतिरिक्त, अन्य कारणे आहेत, पण अन्निस नामक बागुलबुवामुळे मी ती इथे लिखित स्वरुपात मांडत बसणार नाही. शास्त्रामध्ये त्याचे सविस्तर वर्णन आहे, त्याबाबत पुस्तकेही उपलब्ध आहेत.
त्यात सांगितलेले सगळे जसेच्या तसेच वा किरकोळ स्वरुपात वा अजिबात करावे वा नाही याचे स्वातंत्र्यही ज्याचे त्यास आहेच्च.
आपल्या आइवडिलानी आपल्यासाठी
आपल्या आइवडिलानी आपल्यासाठी काय केलय याची परतफेड ते जिवन्त असताना करण जास्त योग्य >>> १००% सहमत.
तर मागिल सात पिढ्यांची आठवण, त्यांचेप्रति कृतज्ञता असे भाव अपेक्षित आहेत. >>> अगदी पैशाच्या कर्जाचे उदाहरण घेतले तर कर्ज देणारा मरून गेला तरी त्याच्या वारसाकडे त्या कर्जाची देय रक्कम दिली तरी ते कर्ज फिटते. म्हणजेच प्रत्येक ऋण हे त्या ऋण देणार्यालाच फेडणे शक्य नसते. अनेक ऋणं ही pay forward या प्रकारची असतात. तेंव्हा 'सात पिढ्यांची आठवण' हीच भावना असेल तर ते ऋण आपल्या पुढच्या पिढीला स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभे करून फेडता येईलच. कारण ती पुढची पिढीही त्या सात पिढ्यांपूर्वीच्यांचे वंशज आहेतच.
नानबा, मर्तिकाला जाणे टाळू नये असा संकेत आहे. नंतरच्या क्रियांबद्दल असे संकेत नाहीत.
पण ज्यांच्या घरी बोलावले आहे त्यांना हे सगळे करणे पटते. मी एवढ्या वर्षात अशा कोण्त्याही ठिकाणी गेले नाही. जावे तर पटत नाही न जावे तर प्रेमाच्या माणसांना खूप प्रेमाने ये म्हणून आग्रह धरला आहे >>> खरं तर असा आग्रह वगैरे नाही करत. साधे 'या' असेही म्हणत नाहीत, केवळ अमुक दिवशी अमुक वाजता अमुक कार्य आहे एवढाच निरोप देतात. असो. गेलेल्या माणसाबद्दल तुम्हाला मनापासून प्रेम असेल तर नक्की जा. अखेरचा निरोप दिल्याचे समाधान नक्कीच पदरात घेऊन याल. खूप मोलाचे असते ते. अमंगळ वगैरे काही नसते त्यात. मृत्यू आपण समजतो तेवढा वाईट नक्कीच नसतो. 'त्या'च्यावर विश्वास असेल तर पटकन समजेल. 'त्या'ने सांगितले आहे की मृत्यू म्हणजे वस्त्राप्रमाणे शरीर बदलणे. कपडे बदलणे अमंगळ असते का?
>>> खरं तर असा आग्रह वगैरे
>>> खरं तर असा आग्रह वगैरे नाही करत. साधे 'या' असेही म्हणत नाहीत, केवळ अमुक दिवशी अमुक वाजता अमुक कार्य आहे एवढाच निरोप देतात. <<< अगदी बरोबर.
शिवाय, खांदेकर्यांच्या मदतीची परतफेड हा देखिल एक भाग असतो. सगळेच येतातच असे नाही.
वर्षश्राद्ध किती "इव्हेण्टपूर्ण" करावे हा ज्याच्या त्याच्या क्षमतेचा व "आवडीचा" भाग आहे. मात्र त्या दिवशी किमान तर्पण तरी व्हावे.
शास्त्र तर इतकेही सांगते की जर एखाद्याची आर्थिक स्थिती अजिबातच नसेल, तर चक्क नदीच्या/तळ्याच्या काठी जावे व त्यातिल पाण्याने तर्पण करावे. नदी तळे नसेल, काहीच नसेल, तर केवळ आकाशाकडे पाहून पूर्वजाम्चे स्मरण करुन मानसपुजेने तर्पण करावे, पण करणे आवश्यक.
एक लक्षात घ्या, हिंदू धर्म, जन्मपुनर्जन्म मानतो, जन्मोजन्मांतरीचे आत्म्याचे अस्तित्व मानतो, जिवंतपणी माणूस वेळेस सख्खे नातेवाईक सगेसोयर्यांकडेही बघत नसतो, परक्यांचेकडे बघणे दूरचे, अशा स्थितीत, तुमचे मृत पूर्वजांकडे /करता दुसरे कुणी तर्पण करतील ही शक्यता धूसर असते. तेव्हा त्यांचे करता त्यांचे नावाने पाणी सोडणे हे जिवंत वंशजांचे कर्तव्य मानले गेले आहे.
कराय्चे वा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न.
विशिष्ट जेवण्/पदार्थ/वाढायच्या रिती या "शिस्तीच्या" भाग आहेत. आज यावरही "केटरिंगवाले" पोट भरताहेत. तेव्हा अमक्यातमक्याला कितीक जेवायला घातले म्हणजे संपत्तीचा नास केला अशासारखे मत असलेल्यांनी हे करुच नये असे वाटते.
त्याचबरोबर, ही सक्ति आहे असे मानुनही करु नये.
माझ्याकडे दरवर्षाच्या श्राद्धदिनी (प्रथमवर्षवगळता) आधार केंद्र वगैरे सारख्या ठिकाणी लिंबी जाते व जे काय क्षमतेत असेल त्याप्रमाणे अन तेथिल गरजा विचारुन घेऊन शिधा/कपडे/रोख पैसा या स्वरुपात तर्पण देऊन येते.
त्या त्या दिनी आवर्जुन आठवण करणे महत्वाचे.
अधिकच शिस्त पाळायची असे आजच्या एकविसाव्या शतकात कुणाच्या मनास आलेच ( असे म्हणण्याचे कारण आपण साधी झेब्रा क्रॉसिंगचि शिस्तही सामाजिक जीवनात पाळीत नाही तर निधर्मीवाद्यांच्या/अन्निसवाल्यांच्या राज्यात धार्मिक शिस्त कोण पाळू पहाणार? नै का? न पाळण्याच्या नाना सबबी/कारणे मात्र सांगतील) तर रोजच्या रोज काकबली ठेवणे हे उत्तम.
रोजच्या रोज काक'बली' म्हणजे
रोजच्या रोज काक'बली' म्हणजे काय ?
रोजचे जेवण पानावर वाढून बाहेर कावळयाकरता ठेवणे का?
अस्थी विसर्जनाबद्दल बोलायचे
अस्थी विसर्जनाबद्दल बोलायचे झाल्यास आमच्याकडे गंगा यमुना गोदावरी पेक्षा जास्त प्रस्थ आहे ते नर्मदा मैय्याचे, विलक्षण जास्त पगडा आहे लोकांवर ह्या नदीचा. नुसते नर्मदा कोणीच म्हणत नाही तिला, रौद्र आहे भयानक ती.
>>>>रोजच्या रोज काक'बली'
>>>>रोजच्या रोज काक'बली' म्हणजे काय ?<<<<
रोजचे जेवण तयार झाले, सहसा दुपारी माध्यान्ह काली (१२ ते २ दरम्यान) तयार होते असे गृहित धरुन, जेवण तयार झाल्यावर पहिला नैवेद्य घरचे देवांना, दुसरा कुलस्वामी/कुलस्वामिनी, तिसरा वास्तुदेवतेस, चौथा गोग्रास, अन पाचवा काकबली असे काढले जाते (जात असे) .
यातिल देवाचा व कुलस्वामिनीचा नैवेद्य पुर्ण ताटभर सर्व पदार्थांचा, जो यजमानांपैकी कुणी जेवायला घ्यायचा.
बाकी तिन्ही नैवेद्य छोट्या पानावर ठिपका ठिपका वाढुन दाखवायचे.
पैकी वास्तुचा व गाईचा नैवेद्य गाईला खायला द्यायचा.
काकबली घराचे बाहेर उंचावर (छपरावर वगैरे) पाण्यासहित ठेवुन द्यायचा.
जर गाय नसेल, तर ते तिनही नैवेद्य बाहेर नेऊन ठेवतात.
काकबलीमध्ये सर्व जेवण वाढणे अपेक्षित नसते तर किमान दहिभात व पाणी किंवा जोकाय भाकरतुकडा केला असेल तो ठेवणे अपेक्षित असते.
गोग्रासात, गाय जे खाऊ शकेल, ते वाढणे अपेक्षित असते
वास्तुचा नैवेद्य सर्व जेवणातील सर्व पदार्थांचा दाखवितात.
अवांतरः
वॉट्सअॅप /मिडियामधे बाटलीमधे भरुन ठेवलेले धान्य/बाटलीला भोक पाडलेले असे पक्षांच्या सोईकरता येते त्याची आपण वाहव्वा करतोच. पण आपल्याच चालिरितींमध्ये रोजचे रोज पक्षी /अन्य कीडामुंगी जीव यांचेकरता (स्वतः खाण्याचे आधी) अन्न काढून ठेवण्याच्या प्रथेची "अंधश्रद्धा" म्हणून थट्टाही उडवु शकतो, हा आमच्या अर्धवट एकतर्फी बुद्धिप्रामाण्यवादातील विरोधाभास आहे. असो.
माझ्यामते, हिंदू धर्मातिल बहुतांश चालिरीतींमध्ये /रुढीपरंपरांमध्ये "त्याग" शिकवला जातो. जो शिकवणे गरजेचे असते. कारण माणूस जन्माला येतो तेच मुळी "मला (अर्थात या देहाला) काय हवे" हा हव्यास घेऊन , व पुढे आयुष्यभर तोच तो हव्यास तो जपुन ठेवत जगत रहातो, ज्यामध्ये उपजत जिव्हाळा/प्रेम (माता-अपत्य नात्यातिल) वगळता, बाकी कुठल्याही नात्यात/संबंधात/व्यवहारात दुसर्याकरता काही (फुकट) करणे या बाबत नन्नाचा पाढाच असतो. यास मी देखिल अपवाद नाही.
माणुस अक्षरषः आयुष्यभर सदैव काहि घेतच असतो, त्याचे हातुन देणे कधीच होत नाही.
व्यवहारात अमकेतमके काम केले म्हणून मोबदला घेतो, पण कुणाचे काम फुकट करेल असे क्वचित
अधिक विचार करता लक्षात येते की माणूस आयुष्यभर फुकटचा श्वास घेतो, व उच्छ्वास सोडतो, अन्न घेतो तर त्याबदल्यात विष्ठा/मलमूत्र परत करतो.... या व्यतिरिक्त माणुस आख्ख्या आयुष्यात स्वतःहून कुणाला काहीही देत नाही, फक्त घेतच रहातो.
एकीकडे "जीवो जीवस्य जीवनम" अशी निसर्ग शृंखला आहे, अन मानवाचे एकतर्फी घेओबा वागणे निसर्गाच्या विपरीत जाते, तसे कायमच असू नये म्हणून निरनिराळ्या प्रथांमध्ये याची काळजी घेतली जाते. अगदी शेतातील पिके कापुन घेतल्यावर जे धान्य सांडते ते अस्सल शेतकरि कधीही वेचुन घेत नाही, तसेच निसर्गात सोडून देतो.
म्हणूनच एक फार सुंदर काव्यपंक्ति आहे, ती देतो.... हिचा अर्थ समजायला मला बरीच वर्षे लागली, शाळेत असताना अभ्यासात होते हे काव्य..
देणार्याने देत जावे,
घेण्याराने घेत जावे,
घेता घेता घेणार्याने ,
देणार्याचे हातच घ्यावे
चाणक्याच्या एका कादंबरीत
चाणक्याच्या एका कादंबरीत वाचले .... काकबळी हा विषप्रयोगाची शंका दूर करायला देत असत.... कावळा मेला तर ते अन्न खाऊ नये म्हणे
परत एक व्हाट्सप
परत एक व्हाट्सप
मात्र त्या दिवशी किमान तर्पण
मात्र त्या दिवशी किमान तर्पण तरी व्हावे.
शास्त्र तर इतकेही सांगते की जर एखाद्याची आर्थिक स्थिती अजिबातच नसेल, तर चक्क नदीच्या/तळ्याच्या काठी जावे व त्यातिल पाण्याने तर्पण करावे. नदी तळे नसेल, काहीच नसेल, तर केवळ आकाशाकडे पाहून पूर्वजाम्चे स्मरण करुन मानसपुजेने तर्पण करावे, पण करणे आवश्यक.
>> लिंबुकाका, तर्पण कसे करावे?याबद्दल थोडे विस्ताराने लिहाल का?
एखादी व्यक्ती आपल्या कुळातली नसेल पण आपण पित्यासमान किंवा मित्रासमान मानत असू तर त्या व्यक्तीशी असलेल्या ऋणानुबंधाना स्मरून आपण श्राद्ध किंवा तर्पण करु शकतो का?
>>>> लिंबुकाका, तर्पण कसे
>>>> लिंबुकाका, तर्पण कसे करावे?याबद्दल थोडे विस्ताराने लिहाल का? <<<<
रोज संध्या करताना सूर्याला देतो ते अर्घ्य, त्याच प्रकारे, अन सरळ हातावरुनच पितरांचे नावे "पाणी सोडणे" म्हणजे सरळ शुद्ध तर्पण. त्याचवेळेस, एखादे दान द्यायचे असल्यासही पितरांचे नावे दान देत असल्याबद्दल (ची खातरजमा) म्हणून पाणी सोडले जाते.
इतकेच काय, एरवीही सणासुदीच्या जेवणाच्या पंक्तिमध्ये, जेवायला बसलेल्यांसमोर काहि एक नाणी दक्षिणा म्हणून ठेवली जातात, ती देखिल ओली करुन तुळशीच्या पानाबरोबर ठेवतात. तर पाणी सोडणे हा महत्वाचा भाग. यावरुनच अमक्या तमक्यावर "पाणी सोडले" म्हणजे "त्यागले" अशा अर्थाचा वाक्प्रचार निर्माण झालेला आहे.
>>>>> एखादी व्यक्ती आपल्या कुळातली नसेल पण आपण पित्यासमान किंवा मित्रासमान मानत असू तर त्या व्यक्तीशी असलेल्या ऋणानुबंधाना स्मरून आपण श्राद्ध किंवा तर्पण करु शकतो का? <<< होय. नक्कीच.
रक्तसंबंधी/गोत्रज यांचे बरोबरच, आजोळ, सासरचे नातलग, मित्र, गुरुजन, अगदी कसलेच नाते नसले तरीही कुणाकरताही तर्पण करता येते. हेच जास्त विधिवत शिस्तीत करायचे झाल्यास पितृपंधरवड्यात "महालय" घालतात. थोडा खर्चिक प्रकार असतो, पण यात जितक्या नावांचे तर्पण असते, तितके पिंड बनवतात व त्यावर तर्पण होते.
एरवी वैयक्तिकरित्या काही ही करायचे असल्यास, निव्वळ पाणी व रुपयादोनरुपयाची दक्षिणा सोडावी.
आपल्याकडे अजुन एक पद्धत आहे, कुणाकडेही "रिकाम्या हाती" जात नाहीत. अगदी देवळात देवाकडेही जाताना काही ना काहि घेऊन जातात. तसेच पितरांचे वेळेसही रिकाम्या हाती काहि करु नये. अगदी काहीच नसेल, तर पाणी, अन दुर्दैववशात, ते देखिल उपलब्ध झाले नाही, तर मानसपुजा.
तर्पनात पितरांना मोबाईल फोन
तर्पनात पितरांना मोबाईल फोन पाठवता येतो का?
लिंबूकाका, छान माहिती
लिंबूकाका,
छान माहिती दिलीत.
रोज संध्या करताना सूर्याला देतो ते अर्घ्य, त्याच प्रकारे, अन सरळ हातावरुनच पितरांचे नावे "पाणी सोडणे" म्हणजे सरळ शुद्ध तर्पण.
>>
इतका सोपा विधी असेल असे वाटलेही नव्हते.
अजून एक शंका, पिंडांवर पाणी सोडताना अंगठ्यावरून म्हणजे उलटा थंब्स अप करुन पाणी सोडतात ना? त्यामागचे कारण काय?
आपापल्या पूर्व़जांचे
आपापल्या पूर्व़जांचे यानिमित्ताने स्मरण ठेऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता बाळगली जाते,हा विचार आवडतो.बाकी पटत नाही.
माझ्या घनिष्ठ नातलगांचे याबाबत अनुभव.
५१ वर्षांचा एकुलता एक मुलगा अचानक मृत्यू पावल्यावर ७८ वर्षांच्या त्याच्या आईने वर्षश्राद्ध न कारता एका आश्रमात १२५ मुलांना जेवण दिले.सुनेने मात्र वर्षश्राद्ध केले.त्याच्या तिथीला अथवा वाढदिवस किंवा इतरवेळी या बाई त्या आश्रमाला,दुसर्या ठिकाणी देणगी देतात.
दुसरे एक आहेत्,त्यांनी आईची हेळसांड केली.पण बाराव्याचा मोठा थाट उडवून दिला.
खूप अवांतर झाल
limbutimbu, तुम्ही खरंच खूप छान लिहिता.
>>> अजून एक शंका, पिंडांवर

Pages