मरणोत्तर अन्तिमसन्स्कारान्चे अनुभव व त्यावरील भाष्य

Submitted by limbutimbu on 18 June, 2009 - 04:15

मरणोत्तर अन्तिमसन्स्कारान्चे अनुभव व त्यावरील भाष्य

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> हे नाही कळलं.
ब्रह्मचारी व्यक्तिचा दहन सन्स्कार करत नाहीत, पुरतात, असा याचा अर्थ!

>>>> मुलीने अग्नी देणं का नाहि चालत?
शास्त्रात चालत नाही येवढ सान्गितलय, ते माहिते!
त्यान्नी कुठे कारणे लिहून ठेवली अस्तील तर बघुन यायला हवे! कसे?
नैपेक्षा, ज्या मुलिन्ना स्मशानातील विधी करायचे अस्तील त्यान्ना "कायद्याने" कसलीही बन्दी नाहीये, जरुर ठरवुन करावेत! Happy

शास्त्रात चालत नाही येवढ सान्गितलय, ते माहिते!
त्यान्नी कुठे कारणे लिहून ठेवली अस्तील तर बघुन यायला हवे! कसे?>>>>>>>>>> बघुन आल्यावर ईथे लिहिलत तर बर होंईल्,,कसे?
बाकि ,खरच कोणाला माहित का?

मुलीने अग्नी देणं का नाहि चालत?
शास्त्रात चालत नाही येवढ सान्गितलय, >> जे "ऑब्व्हियस" वाटतेय तेच कारण असणार, अजून काय Proud

ब्रह्मचारी व्यक्ति असेल तर तिलाही अग्निडाग दिला जात नाही>> हे असचं करतात अजून? कारण माझ्या माहितीत २-३ जणांना अग्नि दिलाय.

शास्त्रात चालत नाही येवढ सान्गितलय, ते माहिते!
त्यान्नी कुठे कारणे लिहून ठेवली अस्तील तर बघुन यायला हवे! कसे?
नैपेक्षा, ज्या मुलिन्ना स्मशानातील विधी करायचे अस्तील त्यान्ना "कायद्याने" कसलीही बन्दी नाहीये, जरुर ठरवुन करावेत! >>>>>>>>>>>>>>>> कारणे शोधायलाच पाहिजे का? एक माणुस म्हणुन तुम्हाला काय वाटतय? लोकशाही असलेल्या नविन जगाचा "कायदा" हेच शास्त्र असणार आहे.

वाटलच होत मला, या अशा प्रतिक्रिया येतील म्हणून Wink
बाकी तुमची ती लोकशाहीतील कायदा अन "ऑब्व्हियस" कारणे वगैरे बाजुला ठेवूनही, एखादी स्त्री जर झुरळाला घाबरून किन्चाळून पळत न सुटण्यायेवढी धीट असेल तर तिनी (तिच्याशी कायद्याने सम्बन्धीत) कोणत्याही प्रेताला अग्निडाग द्यायला माझी तरी काहीही हरकत नाही हो! Proud
माझीच काय? कुणाचीच असणार नाही! Biggrin

एखादी स्त्री जर झुरळाला घाबरून किन्चाळून पळत न सुटण्यायेवढी धीट असेल तर तिनी (तिच्याशी कायद्याने सम्बन्धीत) कोणत्याही प्रेताला अग्निडाग द्यायला माझी तरी काहीही हरकत नाही हो!

Proud

limbutimbu
पण माझ्या वडीलांना दुसर्‍याच व्यक्तीने अग्नि दिला आहे आणि तोहि केवळ काही हेतुने. ही गोष्ट माझ्या आईला फार अस्वस्थ करते. तसे पाहिले तर माझ्या वडिलांना डझन भर चुलते, २ डझन पुतणे, १/२ ड्झन नातु आणि यापैकी काही लोक हजर असून ही अग्नी देऊ शकले नाहित.

स्नेहा, यातिल कौटुम्बिक "राजकारणा" वर मि काय बोलणार बापडा?
शास्त्र असे की अन्गि वा अन्तिम सन्स्कार कोणीही केले तरी दहावा/तेरावा कुणी केला याला तत्कालिक महत्व, त्याहुन जास्त महत्व वर्षश्राद्ध कोण घालते!
अन त्याहुनही जास्त महत्व गयेस जाऊन तर्पण कोण करते!
अग्नि देण्याव्यतिरिक्त जे राहिले आहे ते तुम्हास करता येते का ते पहावे! Happy

साध पुण्याहवाचनास बसले अस्ताही, विशिष्ट पुजाविधिमध्ये नान्दीश्राद्ध हा विधी असतो, यामध्ये बसलेल्या जोडप्याच्या (दोन्घान्कडीलही) पैत्रुक तसेच मातुल घराण्यातील तीन पिढ्यान्पर्यन्तची नावे घेऊन पाणी सोडले जाते, जिवन्त व्यक्तिन्ना नमस्कार केला जातो! हे सगळे अन्य कुणीही करु शकत असताना, केवळ अग्नि कुणा "तिसर्‍यानेच" (म्हणजे नेमका कुणी?) दिला म्हणून खन्तावायची गरज नाही असे मला तरी वाटते! Happy

मला वतते आपन बर्याचदा एखाद्या प्रक्रियेच्या मागे उगिचच लगतो, कहिहि फरक पदनार नसतो दुसर्य कोनिहि अग्निदाग दिला तर, अर्थात मुलान्चि ति जबाब्दारिच आहे, पन ती म्रुत व्यक्तिच्य जिवन्तपनिच निभावली जाने महत्वाचे. आपल्य भावना आनि आपला त्य व्यक्तिबद्दलचा आदर कधिच अनि कशामुलेच कमी होनर नसतो.

मला सुटणे आणि अडकणे काय नक्की हे कळलं नाहीये.
स्वतःच्या वडिलांना स्वतःच्या नवर्‍याने अग्नी देणं यात मुलीलाच आपला नवरा अडकला असं वाटतंय हे वाचून खूप खूप विचित्र वाटले.

बाकी बायकांबद्दलच्या बिन्डोक पोस्टस वाचून अनुल्लेख करण्याच्या लायकीच्या.

स्वतःच्या वडिलांना स्वतःच्या नवर्‍याने अग्नी देणं यात मुलीलाच आपला नवरा अडकला असं वाटतंय हे वाचून खूप खूप विचित्र वाटले. >>>> नीधप, sneharups त्यांच्या आधीच्या पोस्ट बद्दल बोलत आहेत वाटत ----->
३/४ महीन्यांपुर्वी माझे वडिल वारले. मला भाऊ नसल्याने माझ्या वडिलांना अग्नि कोणी द्यावा हा प्रश्न होता. काही कारणाने माझ्या चुलत भावांना जमले नाही आणि काही अपरिहार्य कारणाने माझ्या यजमानांनाही जमले नाही. या सगळ्यांत माझे चुलत भाऊ तर सुटले पण सगळे खापर मात्र माझ्या यजमानांवर फुटले. ही गोष्ट त्यांनी मनाला खूपच लावून घेतली आहे. त्यांची समजूत कशी घालावी हेच कळत नाही.

limbutimbu
तुम्ही चांगली माहिती दिलीत. पण गोष्ट अशी आहे की या मूळ चालीरिती कुणाला माहिती नसतात अगदि ब्राह्मणांनासुद्धा (कदाचीत फक्त आमच्या माहितीतील) जसे की जो पाणी देईल तोच बाकिचे सारे करेल...
यातील कौटुंबिक राजकारण खरोखरच सोडले तरिही माझ्या आईची ईच्छा असूनही त्यांना अग्नी द्यायला जमले नाही ही गोष्ट त्यांनी मनाला लावून घेतली आहे.

limbutimbu
तुम्ही दिलेली अग्नी देण्यासंबंधी व श्राद्ध घालण्याविषयीची माहिती कोणत्या पुस्तकात किंवा पुराणात आहे हे सांगू शकाल का?

स्नेहा, कालच (घटना जुनीच पण) मला नव्याने कळलेली माहिती....
"जर पुत्र नसेल तर जावयाने अग्नि द्यावा, मात्र जावयाचे वडील जिवन्त असतील तर मात्र जावया ऐवजी त्याचे वडिलान्नी अग्नि द्यावा!" तुमच्या केस मधे हे कसे लागू होते ते बघुन घ्या Happy

अन्तिमसन्स्कारान्बद्दल पात्र व्यक्तीन्च्या सम्बधीत माहितीबाबतच्या पुस्तकान्ची माहिती मला विचारुन घ्यावी लागेल, जेव्हा कळेल तेव्हा इथे सान्गिन Happy

<< मुलीने अग्नी देणं का नाहि चालत? >>
- स्त्रिया जिव्हाळायुक्त भावनाप्रधान असतात.
- आईवडील मरण पावल्यास त्यांचा भावनाविष्कार परमोच्च बिंदुस पोचला असतो.
- अशा अवस्थेत स्त्रियांना अग्नी द्यायला लावणे, हे जोखमीचे ठरत असावे.

>> मला सुटणे आणि अडकणे काय नक्की हे कळलं नाहीये.
स्वतःच्या वडिलांना स्वतःच्या नवर्‍याने अग्नी देणं यात मुलीलाच आपला नवरा अडकला असं वाटतंय हे वाचून खूप खूप विचित्र वाटले.

कळलं नाही तर विचार की पोरी....आणि तू आधी तुझे पोष्टींचे वाचन वाढव की गो....उगा हे कळलं नाही-ते कळलं नाही म्हणावयाचे....इथे जुने-जाणते आहेत मार्गदर्शन करावयास....त्यांस विचार.

>> बाकी बायकांबद्दलच्या बिन्डोक पोस्टस वाचून अनुल्लेख करण्याच्या लायकीच्या.

याचाही उल्लेख केलास की गो पोरी Biggrin

limbutimbu
मला त्या पुस्तकांची माहिती लवकर द्या म्हणजे मी ती कुठे मिळतात ते पाहून वर्ष श्राद्धाच्या वेळी त्याचा काही उपयोग होतो का ते पाहीन.
अग्नी तर आता दिलेलाच आहे त्यामुळे त्याबाबतीत आता काहिच होऊ शकत नाही आणि तेराव्याच्या बाबतीतही. पण आईला काही समजावून वर्ष श्राद्धाच्या वेळी काही होते का ते पहावे लागेल.
कमीत कमी प्रयत्न तरि करून पाहू.

बायकांनी स्मशानात न जाण्यामागची किंवा अग्नि न देण्यामागची जी कारणे जनरली दिली जातात ती मला पटत नाहीत.
कारण
१. बाईला पाळी येते म्हणजे ती अस्वच्छ असते. = या समजुतीइतका कमाल मूर्खपणा दुसरा नाही. बाईला येणारी पाळी ही तिची नवीन जीव जन्माला घालण्याची क्षमता असते. सृजनाची क्षमता खरंतर वरदान. जे बाप्यांना नाही.

२. बायका या कमजोर आणि भावनाप्रधान असतात. = परत एक मिथ. मानसिक धक्क्यातून, मानसिक त्रासातून, छळातून तावून सुलाखून उरते ती बाईच. चिवटपणे परिस्थितीशी झगडते ती बाईच. शेतकरी आत्महत्या करतो, सुटून जातो. पण आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याची बायको असा डाग घेऊन पोरांच्या पोटात अन्नाचा कण जावा यासाठी चिवटपणे जगत रहाते ती त्याची बायको.

३. बायकांची शारीरीक ताकद कमी असते. = वस्तू उचलणे, ढकलणे इत्यादी बाबतीत असेल कदाचित. पण शारिरीक सहनशीलता बाईची नक्कीच जास्त असते. का ते मी सांगायला नकोच.

तर थोडक्यात या कारणांच्या पलिकडे बायांनी स्मशानात जाऊ नये, अग्नि देऊ नये यासाठी काही कारणे आहेत का? शास्त्रीय आणि पटण्यासारखी?

मी वडिलांना दहन केले आहे विद्युत दाहिनीत. काही धार्मिक फार केले नाही शेवटी पण मनापासून नमस्कार केला आहे. ते गेले त्यावेळी नवरा मुंबैत होता व येऊ शकला नाही. त्यांचे नातेवैक पुण्यात. पुतण्या पुण्यात. व आजारात गेल्यामुळे त्याच दिवशी दहन करणे आवश्यक होते. आमचे जुने जाणते मित्र होते त्यांच्या व शेजारील अंकल च्या साहायाने सर्व केले. आई आली होती तिथे. अँब्युलन्स मधून नेले. आपली इच्छा प्युअर असेल तर त्या जात्या आत्म्याला आपण नीट निरोप देऊ शकतो. त्यात स्त्री पुरुष भानगड् नाहीच. अस्थी विसर्जन चुलत भाउ व नवर्‍याने केले होते. पण ह्या सर्व अनुभवांनी मनावर इर्रेवर्सिबल परिणाम होतात. ते इतके लाइट घेण्यासारखे नाहीत. संवेदनाक्षम व्यक्तीस ते सर्व असह्य होते - स्त्री वा पुरुष. पुरुष ही भावना प्रधान असतातच. व्यक्त करीत नसतील तरी.

मी वडिलांना दहन केले आहे विद्युत दाहिनीत. << मी आईला. ज्याबद्दलचा अनुभव याच बीबीवर आहे सुरूवातीला कुठेतरी. असो..

माझ्या एका बन्गाली मित्राच्या एकुलत्या एक मुलीने त्याचे निधन झाल्यावर स्मशानात सर्व अन्तिम संस्कार व मुखाग्नी हे सर्व स्वतः केले.
त्यात त्यांच्या समाजाची व ब्राह्मणाची संमती होती.

निधपाजी,

- स्त्रिया जिव्हाळायुक्त भावनाप्रधान असतात.
- आईवडील मरण पावल्यास त्यांचा भावनाविष्कार परमोच्च बिंदुस पोचला असतो.
- अशा अवस्थेत स्त्रियांना अग्नी द्यायला लावणे, हे जोखमीचे ठरत असावे.

यातून

बायका या कमजोर, बायकांची शारीरीक ताकद कमी असते. असा अर्थ अजिबात निघत नाहीये.
ओढून ताढून असा अर्थ का काढताय?

"जर पुत्र नसेल तर जावयाने अग्नि द्यावा, मात्र जावयाचे वडील जिवन्त असतील तर मात्र जावया ऐवजी त्याचे वडिलान्नी अग्नि द्यावा!" तुमच्या केस मधे हे कसे लागू होते ते बघुन घ्या>>>> काय वेडेपणा आहे. सख्ख्या मुलींनी दिलेला चालत नाही किंवा त्यांना अधिकार दिलेला नाही म्हणून मग कुणीही इथून तिथून गोळा करायचे. Angry

Pages