मरणोत्तर अन्तिमसन्स्कारान्चे अनुभव व त्यावरील भाष्य

Submitted by limbutimbu on 18 June, 2009 - 04:15

मरणोत्तर अन्तिमसन्स्कारान्चे अनुभव व त्यावरील भाष्य

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

. त्या व्यक्तीवर कोणत्या प्रकारचे उपचार करण्यात आले होते, त्यावरही अवलंबून असते.
मान्य गजानन भाउ..
----------------------------------
तेज तम अंस पर
कन्ह जिमि कंस पर ।
त्यों म्लेंछ बंस पर
सेर सिवराज है ॥
॥ जय भवानी, जय भवानी ॥
॥ जय शिवाजी, जय शिवाजी ॥

काल मी याच विषयावर लिम्बीच्या बाबान्शी चर्चा केली
त्यान्या मते, जमलेल्या लोकान्ची परतायची घाई, बॉडी तशिच घरी ठेवल्यास जेवणाखाणाचे काय वगैरे अनेक अडचणी लौकर उरकण्यास भाग पाडू शकतातच
पण... बॉडी फुगुन जर फुटली, तर अनवस्था प्रसन्ग ओढवतो, वेळेस ते निस्तरायला माणुस मिळत नाही, व अन्तर्गत स्त्रावान्ची दुर्गन्धी असह्य असते, अन हे टाळण्यास देखिल जमलेले लोक घाई करत असावेत
वर मान्डलेला औशधान्चा मुद्दा देखिल त्यान्नी विचारार्थ ठेवलाच!
त्यान्च्या मते, झाले ते झाले, त्यावर चिकित्सा करण्यात काही अर्थ नाही! त्या त्यावेळेस, तिथे उपस्थित असलेल्या व निर्णयक्षमता असलेल्या माणसाने घेतलेले निर्णय इतरान्नी मान्य करायचे असतात
बर्‍याचदा, दु:खात असल्याने/धक्का बसल्याने, जवळचे नातेवाईक कर्ते कोणताच निर्णय घेण्याच्या मनःस्थितीत नसतात, अशा वेळेस जमलेले परिचित्/शेजारी योग्य वाटेल तो निर्णय घेतात
काही बाबतीत मात्र, जवळच्या व्यक्ती तशा धक्यातही सावध असतात व निर्णयावर ठाम असतात, अशावेळेस अन्य जमलेले लोक त्यानुरुप वागतात असा अनुभव आहे
अन्य वेळेस "माझे तेच खरे" अशाप्रकारचा अभिनिवेश, सहसा येथे जराही आढळत नाही
तरीही, उपस्थितान्पैकी, जन्मजात लीडरच इथे नेत्रुत्व करताना आढळतो, अन इथली कामे उरकण्यासाठी, त्यास कोणत्या सर्टिफिकीटाची गरज नसते, हवा असतो तो केवळ अनुभव! Happy

>>बॉडी फुगुन जर फुटली, तर अनवस्था प्रसन्ग ओढवतो << मी वरचं सगळं वाचलं, मला एक कळलं नाही की बॉडी फुगते म्हणजे नक्कि काय होतं लिंब्या? Uhoh बुडुन मृत्यू झाला असेल तर बॉडी फुगणं समजू शकतं पण साधारण मृत्यू झालेला देह कसा काय फुगेल?

दक्षीणा, औषधे तसेच रोगकारक अन्य जीवजन्तुन्मुळे वा केमिकल रिअ‍ॅक्शन्समुळे ग्यासेस तयार होऊन बॉडी फुगते असे ऐकिवात आहे

रैना, स्वाती, लिंबू तुमचे मुद्दे विचार करायला लावणारे आहेत.
'एक प्रवास संपला' ही भावना येणे खूपच महत्त्वाचे. मला वाटते, ही भावना निर्माण होऊन तिला सामोरे जाणे यासाठी लोकांनी विविध उपाय योजले आहेत. त्यातील एक हमखास रामबाण उपाय म्हणजे 'विधी'. विधी-उपचार यांमुळे 'घटना घडणे' हे मनावर ठसवले जाण्यास नक्की मदत होत असावी. केवळ तेवढेच नव्हे, तर ती घटना स्वीकारून त्यास सामोरे जाण्याची मानसिक तयारी होत असेल... निदान त्यादृष्टीने मदत होत असेल. या काही शक्यता आहेत.
विनोबांनी एका माणसाची गोष्ट सांगितली आहे. त्या माणसाने गृहस्थाश्रम सोडून वानप्रस्थाश्रम स्वीकारला, तेव्हा काही विधी-उपचार केले. विनोबांनी त्याला विचारले, 'का हो, हे विधी का केले ?' तेव्हा तो माणूस उत्तरला, 'अनेकांच्या साक्षीने विधिवत मी गृहस्थाश्रम स्वीकारला. त्या विधींचा संस्कार माझ्या मनावर झाला होता. तो नष्ट व्हावा म्हणून मी गृहस्थाश्रम सोडणे हेसुद्धा विधिवत केले. आता मी वानप्रस्थाश्रम स्वीकारण्यास तयार झालो.' हे तयार होणे म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी नव्हे, तर स्वतःचीच एक मानसिक तयारी.
लिंबूने उपस्थित केलेला 'आंघोळीचा' मुद्दा मला पटला. स्नान करणे हे 'काहीही झाले तरी परंपरा पाळायची' या भूमिकेतून नव्हे, स्नान करणे हे 'याची उपयुक्तता आहे म्हणून करू या' याही भूमिकेतून नव्हे, तर 'मोकळे होणे' ही भावना यावी म्हणून. अंत्यदर्शनाकडेही असे बघता येईल... अंत्यदर्शनाने 'पूर्णविराम देणे' हे घडत असेल. म्हणूनही अनेकांना ते महत्त्वाचे वाटत असेल.
तो विधी सुरू करून हळूहळू तो एका क्लायमॅक्सला नेला जातो आणि परत हळूहळू खाली आणला जातो. म्हणजे मृत्यूनंतर लगेच करायचे विधी इथे तीव्रता सुरू होते, त्यानंतर दहन/दफन इथे तो क्लायमॅक्स. त्यानंतर अस्थिविसर्जनापासून परत तीव्रता खाली येण्यास सुरूवात होते. अस्थिविसर्जनाच्या वेळी माणूस प्रत्यक्ष त्या देहाचे काय झाले आहे ते बघतो, हाताळतो... सुतकादी विधी, १०वा, १२वा दिवस इ. हे सगळे बघता असे दिसते, की आत्यंतिक दु:खापासून पळून अथवा ते दु:ख लपवून नव्हे, तर माणसाला ते दु:ख अगदी आमनेसामने भिडवून मग त्याच्या नेहमीच्या मानसिक अवस्थेत आणण्यासाठीचे हे प्रयत्न असावेत. दु:खाला तर भिडायचे, कारण ते वास्तव आहे, त्याची तीव्रता भोगली नाही तर माणसाच्या भावनांचे विरेचन होणार नाही... आणि मग हळूहळू त्याला परत आणायचे. यासाठी विधी, उपचार, सगेसोयर्‍यांची उपस्थिती यांची मदत घेतली जावी असा विचार असण्याची शक्यता.

पण समजा, हा पूर्णविराम देण्यासाठी या कशाचीही गरज भासत नसेल तर ? तर ते करण्याची आवश्यकता नाही. माझी आजी गेली तेव्हा एकही विधी न करता दहन केले. परंतु, विधी न करण्यात 'हा काय फालतूपणा ?' असा भाव नव्हता. वालिदसाहेब नेहमी म्हणतात की माणूस असेपर्यंत त्याचे सर्व काही करेन, पण तो गेला की काही करणार नाही. ही भूमिका पटल्यामुळे कदाचित आम्ही सर्वांनी तो पूर्णविराम आधीच दिला होता. स्वीकारण्यास, सामोरे जाण्यास आम्ही तयार होतो.

    ***
    A falling leaf
    looks at the tree...
    perhaps, minus me

    सुतकात १० दिवस महिला मंडळी टिकली लावत नाहीत, तसेच पुरुष मंडळी केस कापन नाहीत किंबहुना दाढी पण नाही करत...

    लिंबुदादा या मागचे शास्त्र काय आहे समजु शकेल का????

    ०------------------------------------------०
    आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका!!!

    १९९५/९६ ची गोष्ट असेल
    माझा एक मित्र, जो माझ्याकडेच रहात होता, त्याचे एक नातेवाईक वृद्धापकाळामुळे मृत्यु पावले
    निरोप मिळाल्यानन्तर आम्हि दोघे समाचारास गेलो
    यमुनानगर भागात त्यान्चे घर, तर जवळची स्मशानभूमी रुपीनगरात, निगडी जकातनाक्यापासून दिसायची
    यथावकाश, पालिकेचे सर्टिफिकेट्/परवाना, तिरडी हार फुले वगैरे बाबी जमवल्यावर अन्त्ययात्रा निघाली
    म्हणजे काय तर तिरडी उचलून अ‍ॅम्ब्युलन्स मधे ठेवायची!
    हल्ली कोणाला इतका वेळ अन ताकद आहे म्हणा खान्द्यावरुन वाहून न्यायची? अन गरज तरी काय?
    येवढ्या सुधारणा आत्मसात करतोच करतो हो आम्ही!
    शिवाय बर्‍याचदा आयुष्यात कधी चारचाकीचे भाग्य नशिबात नसलेल्यास अन्तिम प्रवास तरी अ‍ॅम्ब्युलन्सच्या चार चाकावरुन व्हावा!
    तर मण्डळी स्मशानात पोचली, यथावकाश बॉडी खाली उतरवुन दक्षीणेकडे डोके करुन वगैरे ठेवुन झाली
    इतक्या ऐनवेळेस, पिम्परी चिन्चवडात अन्तिमसन्काराकरता भटजी मिळणे अशक्यच होते! तेव्हा भडाग्निच द्यायचा ठरला! तरी कोणी धावपळ करुन, एक भटजी पकडून आणलाच, मग मन्त्र म्हणत, मडके फोडुन त्याच्या पाण्याची धार तिन वेळेस प्रेताभोवती फिरवुन मडके आपटून फोडून वगैरे सर्व विधी यथासान्ग झाले
    दरम्यान काही लोक लाकडे रचत होती चितेची! इथे मात्र अवघड परिस्थिती होती! कुणाचे फारसे एकमत होत नव्हते, अन त्यातल्यात्यात एक्स्पर्ट अस्लयाचा आव आणणार्‍या प्राण्याने चिता अशी काही रचली की बस्स! जवळपास सर्वच मोठी जाडी लाकडे खाली सारुन दिलन! अन त्यावर बारकी लाकडे, वर प्रेत, अन प्रेतावर पुन्हा बारकी लाकडे रचलेली!
    मला तो प्रकार बघणे असह्य झाले होते, मित्राला म्हणले देखिल की तळात गेलेली मोठी लाकडे पेटणार नाहीत, वरची बारकी लौकर जळून खाक होतील अन कायतरी लफड होणार रे भो!
    अग्नि देऊन माणसे निघाली, तेव्हा मी मित्रास म्हणालो की आपण थाम्बू थोडावेळ. एकतर इथे कुम्पण वगैरे काही नाही, अन अर्धवट जळकी प्रेते कुत्र्यान्नी ओढून खाण्यासाठी बाहेर काढल्याच्या घडलेल्या गोष्टी माहित होत्या
    खूप पुर्वी "नारळ (म्हणजेच कवटी) फुटल्याचा" आवाज येईस्तोवर माणसे थाम्बुन असत! हल्ली ची तर्‍हाच न्यारी
    तर आम्ही दोघेच थाम्बलो! बाकी सगळे निघुन गेल्यावर आख्ख्या निर्जन स्मशानात एकीकडे प्रेत जळतय अन आम्ही कशाला तरी टेकुन उभे! गप्पा तरी काय मारणार अशा वेळेस अशा स्थळी?
    अन थोड्याच वेळात, माझ्या शन्केप्रमाणेच घडले, वरची बारकी बारकी लाकडे केव्हाच जळून खाक झाली, मात्र खालील मोठ्या ओन्डक्यान्नी अजुन धड पेटच घेतला नव्हता!
    मी धावत जाऊन खडे मीठ घेऊन आलो! आजही लक्षात आहे, खिशात असलेल्या अत्यन्त मोजक्या पैशातुन जेवढे आले तेवढे मीठ जवळच्याच झोपडपट्टीतील दुकानातून आणले, त्याचा मारा खालच्या ओन्डक्यान्वर केल्यावर तडतडून ते धगधगू तरी लागले
    पण तोवर प्रेत वरील बाजुने उघडे पडू लागले होते
    येवढेच नव्हे तर एक हात खान्द्यापासून चितेच्या बाहेर येऊन लोम्बकळू लागला
    आता काय करावे? मी आणि मित्र, चिता रचणारर्‍याचा यथेच्छ उद्धार करतो होतो सर्ववेळ!
    सगळीच लाकडे चितेत वापरल्यावर तो हात वर उचलुन पुन्हा चितेत ढकलायला लाम्ब लाकुड वगैरे काहीच तिथे नव्हते!
    मग जरा परिसर हिन्डलो, परिसर म्हणजे झुडपान्चे रान ज्याच्यात सापान्चे वास्तव्य!
    थोडे दूर, कुणाच्या तरी तिरडीचे बाम्बू कम कामट्या दिसल्या
    त्यातुन एक बर्‍यापैकी शाबुत असलेली आणली, तरि तिची लाम्बी दोन अडीच फुटाहून जास्त नव्हति तर त्या तेवढ्याश्या लाम्ब कामटीने धगधगुन पेटलेल्या चितेच्या जवळ जाऊन तो हात आत ढकलायचा प्रयत्न करु लागलो! Sad
    शिन्चा वारा देखिल तेव्हा नेमका आमच्या तोन्डावर पडला होता, म्हणजे ज्याबाजुचा हात आम्ही ढकलत होतो तिकडेच ज्वाळा सरसरुन येत होत्या!
    शेवटी बर्‍याच प्रयत्नानन्तर तो अर्धवट जळका हात आत ढकलण्यात यशस्वी झालो. आता मित्राने मीठ आणले कारण माझ्याकडचे पैसे सम्पले होते
    मीठ मारले अन नन्तर घामेजल्या अवस्थेतले आम्हि आमच्या घरी परतलो!
    परतताना आमच्यात एकच चर्चा होती की, बघा, काय नशिब असते ना? त्या माणसाच्या नशिबात, मृत्युपश्चात आपल्याकडून अशी "सेवा" करुन घेण्याचे होते! तसे नस्ते तर कदाचित आम्ही तिथे गेलोही नसतो, गेल्यावर शन्का येऊन थाम्बायची बुद्धीही झाली नसती, तर हे योगच असतात! सगळ्यान्च्याच बाबतित असे योग येतिलच किन्वा यावेच असे नाही!
    चिता रचण्याचे खरेच एक शास्त्र आहे! ते माहित असायला पाहिजे
    शहरातील् स्मशानात एकतर खड्डा असतो किन्वा लोखण्डी कठ्ठडे असतात, त्यात चिता रचतात, तिथे एखादवेळेस चूक झाली लाकडे रचण्यात तरी खपुन जाते, पण खेडेगावात जिथे अशी सोय नसते, तिथे सरण पूर्णपणे मोकळ्या जमिनीवर रचले जाते! अन ते रचताना कसबच लागते! नुस्ते एकावर एक लाकूड रचले असे न होता, कोणती लाकडे आधी पेट घेऊन इतर लाकडास पेटवतील, कोणती लौकर खाक होऊन इतरान्चा आधार नाहिसा करतील, कोणती खूपवेळपर्यन्त जळत रहातील, हवेची दिशा कोणती आहे हे सर्व बघुन तपासुन त्यानुसार लहानमोठी लाकडे उभी आडवी रचली जातात! Happy
    असो, असे अनेक अनुभव आम्ही दोघान्नीच मिळून अनेकवेळा घेतले! कधी आम्ही एकत्र जायचो, तर कधी माझा मी आलेलो असायचो, तर तो ही आलेला दिसायचा! मग जोडी जमली की काम सुरू! Happy

    पिल्लू छोटा, नेमकी माहिती विचारुन घेऊन मग सान्गेन Happy

    स्लार्ट्या, चान्गले विवेचन Happy
    मी असे म्हणणार नाही की विधी मागच्या धर्मश्रद्धा या केवळ याच हेतूने निर्माण केल्यात, तो वेगळाच विषय, पण तू म्हणतोस तसे, त्या प्रसन्गास सामोरे जाण्यास व त्यातुन सहिसलामत बाहेर पडण्यास या सलग विधिन्चा/नितीनियमान्चा खूपच मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो! Happy

    वडील गेले ९० मधे, अस्थिविसर्जनास आळन्दीस एकाच्या कारमधून गेलो, तिथे अस्थिविसर्जन केल्यावर तिथल्या गढूळ, शेवाळयुक्त साचक्या पाण्यात तशीच बुडी मारली, अन काय सान्गू महाराजा? तोवर मनात तयार झालेले असन्ख्य किल्मिषान्चे ढग, अन्गातील कणकण, चिन्तेचे ओझे वगैरे सर्व अक्षरषः अन्गावरील निथळत्या पाण्याप्रमाणे गळून जात असल्याचा भास झाला, मन निर्विकल्प होत असल्याचे जाणवले नि नव्याने अन्गात उत्साह्/उमेद सन्चारत्ये असेही जाणवले! Happy
    त्याचा दहाव्वा करायला ओन्कारेश्वरास गेलेलो, आदल्या दिवसापासून उपास घडलेला, त्यादिवशी तर पहाटेच घरुन निघुन पुण्यात पोचलेलो, तर प्रत्यक्ष साडेनऊ दहा वाजेस्तोवर विधी सुरू झाले! या विधीत भाताच्या मुदी वगैरे करतात, लहानसा होम वगैरे करुन त्यात भात तीळ सातू इत्यादी आहुती देतात असे पुसटसे आठवते
    पण हे स्पष्ट आठवते की साधारण बारा साडेबाराच्या सुमारास, होमातील जळक्या लाकडान्वर तुपाच्या आहुतीसह पडणारी अन खरपुस भाजली जाणारी भाताची शिते पाहून भूक प्रचण्ड चाळवली होती, व अन्नावरची गेलेली वासना पुन्हा निर्माण होऊन, तत्क्षणीच ती भाताची भाजली गेलेली तुपात भिजलेली डिखळे उचलुन तोन्डात टाकायचा मोह आवरता आवरत नव्हता!
    असे विचार येणे हे योग्य की अयोग्य माहित नाही! पण त्यावेळेस, केवळ दु:खाच्या नव्हे, तर आता पुढे काय, या गहन प्रश्नाच्या तावडीतून तेवढा वेळ तरी सुटका झाली हे निश्चित!

    या बाबी, स्लार्‍ट्या, तू म्हणतोस, त्या गोष्टीला दुजोराच देतात Happy
    एरवी भटजीचे पुटपुटणे (?) नकोसे वाटत असले तरी ते ते विधी करताना, त्याच्या पुटपुटण्याची वा खणखणीत आवाजात उच्चारलेल्या मन्त्रान्ची गुणगुण मेन्दूला पोखरुन आत जात होती! समजत नसले तरी त्या गुणगुणीत मन एकाग्र होत होते नि बाह्य बाबी विसरायला लावायचे सामर्थ्य त्या भटजीच्या, कदाचित एकसूरीही असेल, आवाजात होते!
    आता हल्ली कुणास याकरता "भटजी ऐवजी" "आयपॉड वापरुन" कानात कोणते तरी आवडीचे सन्गित ओतायचे असेल तर त्यास हरकत कसली???? Proud
    असो

    स्लार्ट्याचं म्हणणं पटलं.

    ----------------------
    हलके घ्या, जड घ्या
    दिवे घ्या, अंधार घ्या
    घ्या, घेऊ नका
    तुमचा प्रश्न आहे!

    लिंबू- अंघोळीबद्दलच्या आपल्या पोस्टशी आणि निर्णयप्रक्रियेबद्दल सहमत.
    स्लार्टी- अगदी सहमत.
    हा पूर्णविराम देण्यासाठी या कशाचीही गरज भासत नसेल तर ? तर ते करण्याची आवश्यकता नाही>>>खरंय. खरंय.
    फक्त एकच वाटतं की जाणा-याची मनोभुमिका महत्वाची. म्हणजे त्या व्यक्तिचा विश्वास असेल तर सर्व विधीवत करावे असं वाटतं. आजीचा या गोष्टीवर फार विश्वास म्हणून सर्व विधीवत केले आईबाबांनी. पण आईने सांगीतलेय की तिचा विश्वास नाही म्हणून तिच्या पश्चात काही करायचे नाही. हा तिचा विश्वास होता तो तसाच राहील की नाही कोण जाणे.

    स्वाती- अगदी. अगदी. संस्कृतीची(रुढींची) नाळ फार विचित्र बांधलेली असते. परदेशस्थांच्या सगळ्याच गोष्टींच असं होतं. म्हणजे सणांची सुद्धा. उदा. लक्ष्मीपूजनाचा समय भारतातला धरावा की आपण ज्या देशात राहतो तिथला ? वगैरे.
    परदेशात अंघोळीबद्दलही फारसा विचार नसतो, एक रिफ्लेक्स अ‍ॅक्शन. काहीतरी करायचं म्हणून, काय करावं सुचत नाही या प्रकारातलं ते वागणं. नेमसेक मधल्या गोगोलचा तो पूर्ण प्रवास इथे फार प्रकर्षानी आठवतो.

    स्लार्टीची पोस्ट चांगली आहे.
    लिम्बू ती मित्राच्या नातेवाईकांची गोष्ट वाचून वाईट वाटलं Sad

    असो भडाग्नी म्हणजे काय? विधीशिवाय दिलेला अग्नी म्हणजे भडाग्नी का? की मुलगा किंवा जवळच्या नात्यातले सोडून इतरांनी दिलेला अग्नी तो भडाग्नी?

    >>>> विधीशिवाय दिलेला अग्नी म्हणजे भडाग्नी का?
    होय, मन्त्राग्नि न देता केवळ अग्नि पेटवुन केलेला अन्तिमविधी तो भडाग्नि Happy

    माझी आज्जी ७ मे १९९५ ला सकाळी १० वाजता वारली... तिचे प्रेत आम्ही गावाकडुन सगळे नातेवाईक येइस्तोवर ठेवले..त्यावेळेस ९ तास लागायचे.. धुळे- पुणे! आणि एक आत्या तर सुरतवरुन आली मध्यरात्री..मग आज्जीला रात्री नेण्याऐवजी दुस-या दिवशी सकाळी १० वाजता म्हंजे कंम्प्लीट २४ तासांनी नेले..तोपर्यंत मी आजीच्या हातापायाला तुप..मीठ चोळत बसले होते!
    फार काय... ह्या अक्षय्य तृतीयेला वडील वारले सकाळी ६ वा. , तेव्हा आयसीयु मधे २-३ तास ठेवले होते.. हॉस्पिटलच्या सर्व फॉर्मॅलिटीज पार करुन दुपारी ४ वा. आणले त्यांना...! संध्याकाळी ६.३० ला आंघोळ घातली तेव्हाही त्यांचे हात पाय व्यवस्थीत वाकत होते काहीही केमिकल्स न लावता..उन्हाळ्याच्या दिवसातही!
    बाबांना खांदा आम्ही दोघी बहिणींनी सुद्धा दिला ( २ भाऊ आहेत मला). स्मशानात स्त्रियांना जाण्याची परवानगी पेक्षा त्यांच्या जात्याच हळवेपणामुळे नसेल! कारण आजही कवटी फुटल्याशिवाय लोक स्मशानाबाहेर जात नाहीत! माझ्या माहितीप्रंमाणे आग्याला( अग्निडाग देणारा) सुद्धा एकदा अग्निडाग दिल्यानंतर पाठ फिरवुन बसवतात आणि नंतरही १० दिवस त्याला घराबाहेर जाउ देत नाहीत!

    माझ्या एका मैत्रीणीचे वडील वारले..१९९१ मधे., त्यांचा एकही सेपरेट फोटो नव्हता ,आणि १२व्या ला फोटो लागतो म्हणुन त्यांनी चक्क तिच्या वडिलांच्या मृतदेहाला खुर्चीवर बसवुन फोटो काढला! भयानकच! आणि तोच फोटो किती तरी दिवस तिच्या हॉलमधे लावलेला! असच एका मैत्रीणिची लहान बहीण ( अक्षरशः २-३ वर्षाची) वारली तेव्हा त्यांनी तिची आठवण म्हणुन तिच्याही प्रेताचा फोटो काढला अन दिवाणखान्यात लावला होता! सगळ हॉरीबल! ( मरतांना त्या बाळाचे डोळे उघडे होते) मैत्रीणीकडे गेले की कितीही ठरवले तरीही हटकुन त्या फोटोकडे लक्ष जायचे!

    <<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
    ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...

    http://www.maayboli.com/node/7762#comment-249911

    >>>>> त्यांनी चक्क तिच्या वडिलांच्या मृतदेहाला खुर्चीवर बसवुन फोटो काढला! भयानकच!
    अरे बापरे! अवघडच आहे! हे सुचविणारा अन प्रत्यक्षात उतरविणारे, सगळ्यान्चे पाय धरायला हवेत!
    पुढेमागे त्यान्ना सिनेमा इन्डस्ट्रीमधे बराच स्कोप आहे असे वाटते
    (मला वाटत की हीच लोक खरी, बुप्राच्या तन्गड्यात तन्गडि न अडकवता बुद्धिप्रामाण्यवादास समान्तर चालणारी! Proud )

    माझ्या एका मैत्रिणिच्या वडीलांनी आत्महत्या केली होती. विविध प्रकारच्या ८० गोळ्या खाल्ल्या होत्या त्यांनी. आणि त्यांच्यात प्रेताला वाजत गाजत घेऊन जातात, आणि घरातून निघाल्यापासून ते अंत्यविधीपर्यंत फोटो काढतात. यांनी ही तो अल्बम बनवला होता, पाहीला तेव्हापासून ३/४ दिवस मला झोपच लागली नव्हती... Sad

    लिंबुभौ! किती भयंकर गोष्टी आहेत ह्या! अंत्यविधीच्या फोटोचा अल्बम????
    मृतदेहाला अंत्यसंस्कारासाठी नेण्याआधी मृतदेहाची आंघोळ हा ही असाच एक प्रकार आहे. मला मनापासुन अजिबात पटला नाही! आणि नंतर स्त्री असेल तर तिला पूर्ण सवाष्णीचा साज चढवणे...बापरे!

    प्रेताचे कान टोचलेले ऐकलय कोणी?
    माझ्या चुलतबहिणीची आज्जेसासु वारली...तिचे कान टोचलेले नव्हते..आणि कान टोचलेले नसतील तर स्वर्गात जागा नाही असे हिंदु धर्मात मानतात! शेवटी माझ्या चुलतबहिणीने प्रेताचे कान टोचुन दिले! अगदी न घाबरता!

    <<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
    ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...

    http://www.maayboli.com/node/7762#comment-249911

    मला विद्युत दाहिनी हा प्रकार बरा(?) वाटतो. आई बाबा आणी नवरा यांच्यासाठी तोच मार्ग वापरला होता. ज्यांच्याबरोबर आपले आयुष्य गेले ती माणसे अशी काळा धूर होउन जाताना बघणे हा अतिशय वाईट अनुभव आहे. वडीलांचे क्रियाकर्म मीच केले. कोणी इथे नव्ह्तेच. आई गेली तेन्वा मुलगी लहान होती. व तिला घरी कोणाकडे ठेवणार म्हणून बरोबर नेले होते तिथे. बाहेर थाम्बलो. नवर्याने डोळे दान केले ते सर्व मी विडीओ घेतली होती व नन्तर फोटो पण घेतले. सर्व नंतर डीलीट केले. मला जवळ-जवळ सहा आठ महीने झोप येत नसे. घाबरून केवळ. चित्रविचित्र स्वप्ने पडत. एकदा असे स्वप्न पड्ले की तो मातीतून उठून आला आहे. आमचे कुत्रे छोटे आहे. एकदा ते जोरात दार उघडून आले. कुत्रे दिसलेच नाही. आम्ही बेड्वर बसलो होतो. तेन्वा मी व मुलगी खूप घाबरलो होतो.

    त्याला नेले ती वेळ दुपारची चार वाजता. मग घरी मुले छोटी. म्हणून नेहमी प्रमाणे french fries तळायला घेतले. एक दम भयानक विचार आला. तो पण आता जळत असेल. अशक्य वाईट अनुभव. किती अश्रू गाळले त्याला सीमाच नाही. असेच अनुभव आपल्याला विचार करायला शिकवितात. त्यातूनच आपण मोठे होतो. घरी नन्तर एकदम बेकार वातावरण असे पहिले काही दिवस. कधी न येणारे नातेवाइक व लोक येत. आम्ही दोघी कंटाळलो. व दोघीच बाहेर जावुन आलो. Mall मध्ये. आमचा loss त्या कोणालाही कळणे शक्य नव्ह्ते. मी पण तिस्र्या दिवशी पासून कामाला जायला लागले. आमची गाडी ( जी तोच चालवित असे) त्याची खोली व pc वापरताना. विचित्र वाटे. आता आपण पांढरे कपडे घातले पाहिजेत म्हणून ते विकत घेतले. on credit card! त्याला भरपूर फोन येत. प्रत्येक वेळी त्या callerला सांगायचे याचा फार ताण यायचा. खूप पत्रे आली त्या सर्वाना नीट उत्तरे दिली. एकुणच हा विषय फार lightly घेण्यासारखा नाही. भारतीय सैन्यात एक युनिट आहे त्यान्चे काम केवळ dead body receive करणे व funerals organize करणे हे आहे. किती अवघड नाही का?
    I am just sharing my experience. no issues.

    जामनगरला कामानिमित्त गेले असता स्थानिक लोकांना 'बघण्यासारखं काय' हा प्रश्ण विचारला आणि 'स्मशान' असं उत्तर मिळताच आश्चर्य वाटलं. आता नाव आठवत नाही पण बघायला गेलो. आत शिरताना रस्त्याच्या दोन्ही बाजुंना भिंतींवर रामायण, महाभारत आणि पौराणिक कथांची देखणी म्युरल्स होती. आत सुंदर मोठी बाग, बसायला बाक आणि चक्क पिकनिक टेबल्स. लोक लहान मुलांना घेऊन खेळत आणि खात होते. बाजुला एक सुंदर इमारत होती. आत विद्युत दाहीनी (उपयोगात नसल्यास), इतर सोयी सगळं दाखवतात किंवा स्वतः जाऊन बघु देतात. मागच्या भागाला अंत्यसंस्काराला ओटे आणि शिवाचं देऊळ आहे. एकूण परिसर सुट्टीच्या दिवशी माणसांनी-लहान मुलांनी भरलेला होता.

    आश्विनीमामी, तुम्हाला प्रचंड सहानुभूति!
    गेल्या दहा वर्षात वडील, आई, साडू, सासरे, माझा धाकटा मावसभाऊ, त्याची मोठी बहिण, आतेबहिण, मोठा मावसभाऊ, जवळचे मामा, दोन जवळचे मित्र नि इतरहि तीन चार नातेवाईक गेले!

    हे असेच चालायचे!!! बहुतेक सर्वांची वये झाली होती. पण वाईट तर वाटणारच ना!

    नि वडील नि आई यांचे अंत्यसंस्कार कर्रून आल्यावर कशाचेच काही वाटेनासे झाले! थोडावेळ वाईट वाटते! पण काय करणार? गीता वाचावी! एकदा, दोनदा!

    आनंदी गोष्टीत मन रमवावे!

    धन्यवाद झक्स, मी इथे लिहू की नको असा खूप दिवस विचार केला. शेवटी लिहिले. closure असे एका अंघोळीने किन्वा १० दिवसात होत नाही. मनातून हळूहळू ते माणूस फेड आउट होते. नव्या प्रश्नांचा रोज सामना करावा लागतो. त्यातून आपण सावरू लागतो. गीता नक्की मदत करते. मी surviving widowhood अशी एक India centric website बनविली आहे. इतर लोकांना मदत व्हावी या हेतूने. Host च्या शोधात आहे. upload केली की सान्गेन. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण मला याहूवरील dear Abby चा खूपच आधार वाटला. अमेरिकन समाजात एकमेकांना जी space देतात व व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करतात त्या द्रुष्टीकोनाचा मला खूप उपयोग झाला. भारतीय नातेवाइक चक्क सोडून गेले.
    मी, मुलगी, कुत्रा नेट व आमचा दोघांनी मिळून उभारलेला धंदा हेच हातात होते. त्यामुळे प्रत्येक अवघड क्षणी जो गेला त्याचे स्म्ररण करून योग्य तो निर्णय घ्यायचा असे केले. जवळच्याचा म्रुत्यु हा उरलेल्याला अनेक पातळ्यांवर अनुभवावा लागतो. स्मशान- दहन- अस्थी विसर्जन हे सर्व उरकल्यावर खरे दुक्ख आपल्याला भिडते. पण त्यामुळेच जीवनातला आनन्द घ्यायला आपण शिकतो. Rock on ची गाणी, नवा विमानतळ, कुत्र्याच्या खोड्या, माबो. हे नवे छान अनुभव आपल्यासाठी आहेत हे कळते.

    अश्विनिमामी,
    तुमची वरची पोस्ट फार छान आहे, खूप पॉझिटिव्ह वाटलं वाचून. Happy

    अश्विनीमामी, झक्की, खरच अवघड अस्त हो!
    जाणारा जातो, सुटतो बिचारा, मागे राहिलेल्यान्चे खरच अवघड अस्त!
    कित्येकवेळेस तर मला असेही वाटते की शिल्लक राहून मी असे काय दिवे लावतोय? कशासाठी शिल्लक राहिलोय? आहे कुणाला माझी गरज? माझा उपयोग? कधी कधी तर माझ मला धड होत नाही, लोकान्ना काय उपयोग होणार? अन मग कशासाठी शिल्लक?/?
    पण मग झक्की म्हणतात तस, सम्पुर्ण गीता वाचता आली नाही, वाचून समजली नाही तरी गीतेतील तथ्याचा विचार करावा! तो अनेकान्नी सोप्या भाषेत सान्गितला आहे! Happy

    मृण्मयी, भन्नाटच दिसताहेत हे जामनगरवासिय!
    तुमच्या वर्णनात आल्याप्रमाणे, वेगवेगळ्या ठिकाणच्या बर्‍यावाईट स्मशानभूमिन्चे वर्णन देखिल लिहायला हवे इथे! Happy

    झक्कांना झक्स म्हणताय होय ! Lol
    मला वाटलं झकास आला की काय इकडे Proud

    << कशासाठी शिल्लक राहिलोय? आहे कुणाला माझी गरज? माझा उपयोग? कधी कधी तर माझ मला धड होत नाही, लोकान्ना काय उपयोग होणार? अन मग कशासाठी शिल्लक?/?>>

    हे सर्व माझ्याबाबतीत तंतोतंत खरे आहे.

    पण कधीकधी मा.बो. करांची ए.वे.ए.ठि. आठवतात! मा. बो., क्रिकेट, गाणी इ. फक्त स्वतःपुरत्या मर्यादित असलेल्या गोष्टींमधून आनंद मिळतो. नि त्यात समाधान मानून, आला दिवस, गेला दिवस करत रहायचे!!

    बापरे, काही काही गोष्टी वाचून मन सुन्न झालं. विशेषतः लिंबूंच्या मित्राच्या नातेवाईकांची कथा आणि नयना आणि राजकुमारीच्या पोस्ट्स!
    अश्विनीमामी, तुम्हाला खूप सहानुभुती. पण तुम्ही लिहिलेल्या आणि झक्कींच्या काही गोष्टी वाचून दक्षिणा म्हणते त्याप्रमाणे पॉझिटिव्हही वाटलं.
    नातेवाईकांच्या मॄत्यूबद्दल ऐकून वाईट तर वाटतंच पण आजकाल भितीही वाटते की ह्या सगळ्या दु:खातून मलाही जावे लागणार आहे. सगळी जवळची मोठी माणसं आता वॄद्ध व्हायला लागली आहेत.
    वाटतं परत लहान व्हावं जेंव्हा ह्या गोष्टींची काही कल्पनाही नव्हती.
    पण ह्या सत्याचा कधीतरी सामना करावा लागणारच.
    विषयांतराबद्द्ल क्षमस्व.

    आन्घोळ हाही एक closure चा प्रकार आहे अस वाट्त
    म्हणुन परदेशात असूनही आन्घोळ करत असावेत

    अश्विनीमामी, विद्युत दाहिनी बाबत सहमत.
    मला वाटते पूर्णविरामाची गरज गेलेल्या नाहीतर राहिलेल्या व्यक्तींसाठी असते. आंघोळ, बारावं, तेरावं वगैरे सगळे काही झाले तरीही जवळच्या माणसांना पुन्हा पुन्हा काही rituals ची गरज भासू शकते. माझा अनुभव लवकरच लिहीन.

    एक सांगा, मायकेल जॅकसन ची बॉडी इतके दिवस ठेवणे बरोबर आहे का? जरी फ्रीजर मधे असली तरी? तो आधिच एक पस्तावलेला दु:खी आत्मा. त्याला शेवटी लवकर मुक्ति मिळायला हवी. त्याचे मेमोरियल संगीत सभा वाढदिवसाच्या दिवशी ठेवायची होती. व इतर सोपस्कार लवकर करायचे होते. अर्थात ती क्रिमिनल केस
    आहे त्यामुळे सरकारी नियम वेगळे असतील

    त्याला शेवटी लवकर मुक्ति मिळायला हवी >> Uhoh
    बॉडीचा आणि मुक्तीचा काय संबंध ? एकदा जीव गेला कि शरीराशी संबंध संपला.

    Pages