मरणोत्तर अन्तिमसन्स्कारान्चे अनुभव व त्यावरील भाष्य

Submitted by limbutimbu on 18 June, 2009 - 04:15

मरणोत्तर अन्तिमसन्स्कारान्चे अनुभव व त्यावरील भाष्य

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इच्छुकांसाठी गरुडपुराण.
यात तर इथे

Having considered this, which removes misery, and given up sorrow arising from ignorance, the son should perform the rites.

If there is no son the wife should perform them, and if no wife the brother; or a Brāhmiṇ's pupil or a proper kinsman should perform them.

The ten-days' ceremonies, for the man who has no son, should be performed by the sons or grandsons of his younger or his elder brother, O Bird;

असं म्हटलंय की. मग बायकांबाबतचा नियम कधी आला?

पुराणात आपण बरेच पुढारलेले होतोच ग.. हे सगळे नियम मधल्या काळात बायकांवर बाकी निर्बंध आले तेव्हाच आला असावा.

अरे तो लिंब्या चर्चा करुन ऐकणार्‍यातल्या आहे का? चर्चा कशा करता करावी? जर माणसं एक मेकांचे ऐकुन त्यातुन काही बोध घेऊन आपल्या विचारसरणीत बदल करत असतील तर चर्चा करावी. इथे यांची गाडी सतत वन वे ला असते. कशाला आपला टाइम खोटी करता इथे येऊन?

चर्चा कुणाला करायचीये? मला तर मुळीच नाही. बायकांना अधिकार आहे की नाही किंवा कुणी देतंय की नाही याच्याशी मला सोयरसुतक नाही. शेवटी ऐकावे जनाचे नी करावे मनाचे असं रामदास स्वामीच म्हणून गेलेत ना?

<तिनी (तिच्याशी कायद्याने सम्बन्धीत) कोणत्याही प्रेताला अग्निडाग द्यायला माझी तरी काहीही हरकत नाही हो!>

कायद्याने संबंधित असायची तरी काय गरज आहे? समजा प्रियकर असेल, तर कायद्याने संबंध नसला तरी भावना उत्कट असतील ना.

(दुपारी वामकुक्षी करत असता एक स्वप्न पडले. काही बायका हातात मशाल घेऊन स्मशानात इकडे तिकडे जिवंत पुरुषांना चितेवर लोटून, धडाधड आगी लावत सुटल्या आहेत. एकदम घाबरून उठलो. नि आधी संगणक बंद केला. मग जरा जीवात जीव आला. Happy Light 1 )

कुठलीहि गोष्ट केवळ माहितीसाठी इथे लिहून चालत नाही. लग्गेच अस्सेच का असे विचारून वाद सुरू होतो. मग, तुम्ही कोण सांगणारे? असा प्रश्न येतो. मग शेवटी आम्हाला काय वाट्टेल ते करू! आणि ज्यांना हे पटत नाही ते सगळे अडाणी, असे म्हणायचे.

काही दिवसांनी मग मी पण चर्चेत भाग घेतो, सगळेजण मला शिव्या देतात. आजकाल अ‍ॅडमिनपण तंबी देतात, नि एकदाची ती चर्चा संपते, नि पुनः दुसरा काहीतरी धागा उघडला जातो.

sic transit gloria mayaboli!

पुराणात आपण बरेच पुढारलेले होतोच ग.. हे सगळे नियम मधल्या काळात बायकांवर बाकी निर्बंध आले तेव्हाच आला असावा.<<
याज्ञवल्क्यस्मृतीपासून. ९ वे वा १० वे शतक.

मुटे,
मी तुमचं नाव घेऊन माझ्या प्रतिसादात कुठे काही बोलले आहे का?
स्त्रिया भावनाप्रधान असतात म्हणून स्मशानात त्यांनी जाऊ नये हे म्हणणारे या बीबीवर आधीही बरेच जण आहेत.
तुम्ही काय म्हणता आणि म्हणाला आहात यापेक्षा मुद्दा काय आहे ते बघा.
आणि कृपया इथे बिचारा शेतकरी आणू नका.

ब्राम्हण सोडुन इतर जातीत स्त्रिया स्मशानात येतात असे ऐकलेय. ते खरे आहे का ? आणि तसे असेल तर इतर जातीतल्या बायकांना स्मशानात यायला परवानगी आणि फक्त ब्राम्हण बायकाना नाही , यामागचे कारण काय असावे ? इतरही बहुतेक बाबतीत ब्राम्हण स्त्रियांवरची बंधने ही इतर जातीतिल स्त्रियांपेक्षा जास्त आहेत.

चान्गली "चर्चा" चालली आहे वैद्यबुवा Wink
स्वाती, चान्गला सन्दर्भ, तपासुन पाहिला पाहिजे Happy

>>>>>म्हणून मग कुणीही इथून तिथून गोळा करायचे.>>>>><<
सायो, निदान देशस्थात तरी "जावयाला" वा त्याच्या "बापाला" "कुणीही इथुन तिथुन गोळा केलेला" असा समजत नाहीत, खास करुन आत्ताच्या अधिक मासात तर नाहीच नाही! Wink व्याही वा सोयरे म्हणतात जावयाच्या बापाला!
अन आता हे कुठच्या पुराणात लिहून ठेवलय ते मला विचारू नका Proud

मृदुला, तुमचा मुद्दा बरोबर आहे, ब्राह्मणात स्त्रिया स्मशानात जात नाहीत, इतर जातीत जातात, सावडण्यास तर नक्कीच जातात, तरीही इतर जातीतही स्त्रिया अग्नि देतात असे ऐकण्यात वा पहाण्यात आलेले नाही! यास त्या त्या वेळच्या सामाजिक्-राजकिय तसेच परकियराजकिय राजवटीन्चा परिणाम कारणीभूत असेल.

जावयाच्या बापाला व्याही म्हणतात हे मलाही माहितेय पण सख्ख्या मुलींना अधिकार न देता दुसर्‍यांना(इथून तिथून गोळा केलेले- जावयाचे वडील, आणि जावई सुद्धा) देतात ह्यातच काय ते आलं.

प्रतिसाद limbutimbu | 18 June, 2009 - 07:13
>>>>> (अन्तिमदर्शनाकरता) ... शवागरात देह ठेवण्याइतके महत्वाची गोष्ट असते असे काही मला वाटत नाही.
नशिब थोर हे आमचे, कोल्हापुर्-सान्गली-इचलकरन्जी कडची जन्ता, माणसास मृत घोषित करेस्तोवर तरी वाट बघतात!
मला एक कळत नाही की वाघ मागे लागल्यागत दोन्/तिन तासात प्रेत जाळून टाकायची घाई कशासाठी???
या घाईचा, अन उपस्थित खान्देकरी/बघ्या/चिकित्सक्/पहिलटकर वगैरे "जनसमुदायाच्या" वेळीअवेळीच्या वैयक्तिक कामान्चा सम्बन्ध किती असतो?
कारण हो ना, बरोबरच हे ना, रात्री साडेआठला गेलेल्या बाईला पोचवायला नऊ-साडेनऊ वाजेस्तोवर तरी खान्देकरी जमले अस्तील. ते काय जेवून थोडेच आले असणार?
अन मग उशिर झालातर, स्मशानातल उरकणार केव्हा, अन मेलेल्याच्या नावान अन्गावर दोन बादल्या पाणी ओतून केव्हा घेणार अन रातच गिळणार कधि नि झोपायला किती उशिर होणार, हा विचार या "घाई" मागे नसेलच असे नाही! हे आपले माझे "तत्कालिक" मत बरका

लिंबुजी, मी एका पुस्तकात वाचलय की मृत्युनंतर चार तास आत्मा गाढ झोपेत असतो. त्याला आजुबाजुला काय चाललय समजत नाही. चार तासानंतर जर आत्म्याने स्वत:चा दहन विधी पाहीला तर त्याला अतिशय दुखः होते. याकरता या ठिकाणी घाई करतात ते योग्य असावे.

Having considered this, which removes misery, and given up sorrow arising from ignorance, the son should perform the rites.

If there is no son the wife should perform them, and if no wife the brother; or a Brāhmiṇ's pupil or a proper kinsman should perform them.

The ten-days' ceremonies, for the man who has no son, should be performed by the sons or grandsons of his younger or his elder brother, O Bird;

असं म्हटलंय की. मग बायकांबाबतचा नियम कधी आला?

पारतंत्र्यात स्त्रीयांना गावाबाहेरील स्मशानात जाण्यास सुरक्षीत वाटत नसावे. हिंदु धर्मात असे काही ७०० वर्षांच्या मोगलाईत आले असावे. माझ्या ओळखीच्या मुलीने वडीलांचा दाह संस्कार केलेला मी पाहिला आहे. माझ्या मते हे धाडस स्त्रीयांनी टाळावे. स्मशानातले वातावरण अत्यंत भेसुर असते. या वातावरणाचा परीणाम फार काळ रहातो. स्त्रीया मनाने फारच मृदु असतात. यास्तव हे टाळावे. जर जावयाचे आई - अथवा वडील जर हयात नसतील तर धर्म शात्राप्रमाणे जावई हा सुध्दा अधिकारी होऊ शकतो.

स्त्रीया मनाने फारच मृदु असतात. यास्तव हे टाळावे.<<
हेच तर अजिबात मान्य नाहीये.
अचानक परक्याच्या घरी खालमानेने रहायला जायला लागतं, वाट्टेल ते ऐकून घ्यायला लागतं... स्वाभिमान ही गोष्ट चैन किंवा दुर्वतनाची ठरते आणि अश्या परिस्थितीतही सगळ्या बाया तावून सुलाखून उभ्या रहातात. चिवटपणे.
खडतर परिस्थितीत आत्महत्या करणारा हा जनरली पुरूष असतो. त्याच्यामागे त्याची बायको सगळ्या निंदानालस्तीसकट झगडत उभी असते.
परिस्थितीला धीराने तोंड देणारी बाईच जास्तकरून असते. (पुरूष नसतो असे नाही. लगेच ओरडत येऊ नका अंगावर!)
बाईची मानसिक ताकद, सहनशीलता, दु:ख पचवण्याची क्षमता सर्वसाधारणतः पुरूषापेक्षा जास्त असते.

मागच्याच महिन्यात माझ्या नातेवाईकाचा मृत्यु झाला. या वेळेस खालील माहीती मिळाली

<<< यावेळेस श्री मोघे गुरुजी - वैकुंठ स्मशान पुणे यांनी सांगीतले की घरुन आता अग्नी आणण्याची आवश्य्कता नसते. पुर्वीच्या काळी अग्नी सहज उपलब्ध नसे यास्तव तिकोना व छोटे मडके यातुन अग्नी नेला जाई. <<

अग्निसंस्कारापुर्वी ती जागा स्वच्छ करुन त्या जागी प्रेत ठेवले जात असे. ही सोय आता स्मशानातले कर्मचारी करतात त्यामुळे भुमी शुध्दीकरण हे आता एक औपचारिक विधी राहीला आहे असे वाट्ते.

विद्युत दाहीनीतल्या अग्निसंस्कारापुर्वी यातले काही अनावश्यक विधी नक्की टाळता येतील.

अग्नीसंस्कार हा शरीरावर केला जाणारा अपरिहार्य विधी आहे. यापुढचे सर्व म्हणजे अस्थी विसर्जन सोडुन केलेले विधी हे आत्म्यावरचे संस्कार आहेत. जर आत्मा मानला तर ते जास्त महत्वाचे आहेत. हिंदु धर्म हा अत्यंत प्रयोगशील व पुरातन असल्यामुळे अनेक विधींना अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आत्म्यावर केला जाणारा श्राध्द हा विधी स्वतःला जिवंतपणी सुध्दा करता येतो. अर्थात हा विधी केल्यानंतर आपल्या शरीराला जिवंतपणी प्रेतात्मा ही संज्ञा प्राप्त होते. अनेकांच्या मते या नंतर अश्या व्यक्ती लग्नासारख्या धार्मिक विधीस उपस्थित रहाण्याचा अधिकार गमावतात.

ज्यांना मुलगा नाही व स्वत: आत्मा व त्याचे मृत्युनंतरचे जीवन मानतात त्यांनी हा उपाय जाणीव पुर्वक करवा.
ज्यांना अध्यात्म अधिकार प्राप्त झाला आहे अश्यांना पिंडदाना शिवाय गती प्राप्त होते. मग त्यांच्याही बाबतीत पिंडदान व श्राध्द हे औपचारिक विधी बनतात. नेमका कोणास अध्यात्म अधिकार प्राप्त झाला आहे हे समजण्याचा अधिकार सामान्याना नसतो त्यामुळे सर्वाचे पिंडदान - श्राध्द विधी अधिकारी पुरुषाने /स्त्रीने ( नाईलाजास्तव प्रसंगी करावेत ) ( श्रध्दा पुर्वक करावेत) अन्यथा करु नयेत.

अस्थी विसर्जनाबाबत नद्या प्रदुषित होतात असा आक्षेप घेतला जातो. मा. साखरेमहाराज ( वारकरी संप्रदाय ) यांचे भाषण मी दुरदर्शनवर अनेक वर्षांपुर्वी ऐकले होते. त्यांनी इंद्रायणीच्या पाण्यात अस्थी विरघळतात असे सांगीतले. अश्या अर्थाचा श्लोक अस्थी विसर्जनासाठी जो विशेष कुंड आळंदी येथे तेथील नगरपालिकेने बांधला आहे यावर लिहीला आहे तो जिज्ञासुंनी पहावा व शास्त्राच्या विद्यार्थ्यांनी हा प्रयोग करुन पहावा.

शास्त्राच्या विद्यार्थ्यांनी हा प्रयोग सर्वच तिर्थांच्या बाबतीत सध्या करुन पहावा व निष्कर्श कळवावेत. जेणे करुन चुकीच्या गोष्टी टाळता येतील. माझ्या मते अस्थी नैसर्गीक रित्या डीकाँपोझ होतील अश्या स्वच्छ जागी उदा. जमिनीवर / शेतजमिनीवर टाकल्या ( विसर्जन केल्या ) असता चालु शकेल.

>>>> आत्म्यावर केला जाणारा श्राध्द हा विधी स्वतःला जिवंतपणी सुध्दा करता येतो. >>>
गृहस्थाश्रमी माणसाने हा विधी करणे अपेक्षित नाही
मात्र ज्याने सन्यासाश्रम स्विकारला आहे, त्यास हा विधी करुनच सन्यास घेता येतो!

>> खडतर परिस्थितीत आत्महत्या करणारा हा जनरली पुरूष असतो.

बायका खडतर परिस्थितीत आत्महत्या करत नाहीत का?

>>परिस्थितीला धीराने तोंड देणारी बाईच जास्तकरून असते.
बाईची मानसिक ताकद, सहनशीलता, दु:ख पचवण्याची क्षमता सर्वसाधारणतः पुरूषापेक्षा जास्त असते.

याला काही शास्त्रीय आधार आहे का?
काही संशोधनात्मक पुरावा समोर आला असेल तर सांगशील का प्लिज.
मला तरी वाटतं 'उडदामाजि काळे गोरे' प्रमाणे सगळ्या स्वभावाची उदाहरणं स्त्री-पुरुष दोघांच्यातही सापडू शकतात. प्रत्येकाची आपापली वैशिष्ठ्ये आहेत.

फक्त वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे पुरुष भावना शक्यतो व्यक्त करत नाहीत (लहानपणापासून कंडीशनींग केल्यामुळे असेल--उदा. "मुलगी आहेस का रडतोस काय?") एवढच. बाकी त्याला काही ठोस शास्त्रीय पुरावा अथवा स्टॅस्टिस्टीक्स असल्यास समोर आणावे.

बादवे, स्त्रीया जास्त कणखर असतात अशा अर्थाची वरील तीन ("शुगर कोटेड") विधाने ही स्त्रियांना कशी ऐकवली जातात जेणेकरून त्यांची मने "पुरुषी अत्याचारासाठी कंडीशन" करायला सोपे जावे अशा अर्थाच्या पोष्टी त्या जाचवाल्या बीबीवर एका स्त्रीनेच टाकल्या होत्या मग ही विधाने अचानक स्त्रीची बलस्थाने कशी ठरतात?

असो, विषयांतर नको.
वर म्हटल्याप्रमाणे या विधानांना डॉ़युमेंटेड पुरावा असल्यास सांगावा.

स्त्री अर्भके ही पुरुष अर्भकांपेक्षा अधिक चिवट असतात. प्रतिकूल परिस्थितीत स्त्री-अर्भकांचे जगण्याचे प्रमाण हे पुरुष अर्भकांपेक्षा अधिक असते.. हीच गोष्ट कमी महिन्यात जन्मलेल्या अर्भकांमध्ये अधिक प्रकर्षाने जाणवते.. ह्याबाबत अनेक लिंक तुम्हास इंटरनेटवर मिळतील..

टण्या धन्यवाद Happy
पण अर्भकांचा विषय नाहीये रे, मोठेपणी (अ‍ॅडल्टहूड) मनाने कणखर असण्याचा आहे.

वरच्या पोष्टीत अस लिहीलयः
"परिस्थितीला धीराने तोंड देणारी बाईच जास्तकरून असते.
बाईची मानसिक ताकद, सहनशीलता, दु:ख पचवण्याची क्षमता सर्वसाधारणतः पुरूषापेक्षा जास्त असते."

म्हणून तसं म्हणालो मी.

सून म्हणून जे काही निर्बंध बाईला असावेत असं तुम्हाला वाटतं ते सगळे निर्बंध स्वतःवर घालून घेऊन १ महिना किमान आपल्या बायकोच्या माहेरी रहा.
सासरच्या लोकांचा भोचकपणा, प्रत्येक कृतीवर टिकाटिप्पणी, दिवाणखान्यात यायचं नाही, मान खालीच पाहिजे असं सगळं. यामधे हसतमुखाने हे आलंच.
हा एक महिना झाल्यानंतर आपण सहनशक्तीबद्दल तुलनात्मक बोलू..

बाईची मानसिक ताकद, सहनशीलता, दु:ख पचवण्याची क्षमता सर्वसाधारणतः पुरूषापेक्षा जास्त असते>>> याला वैज्ञानिक पुरावा नक्की आहे. आणि त्या पुराव्याच्या विरोधात देखील संशोधन झालेले आहे. नेटवर शोधल्यास माहिती मिळेल.

नीधप. स्त्रियानी स्मशानात जाऊ नये अशी प्रथा का पडली असावी याचे एक मला पटलेले कारण मला माझ्या मित्राच्या वडलांनी सांगितले होते.

जर स्त्री गर्भार अथवा बाळंत असेल तर स्मशानासारख्या भेसूर ठिकाणी तिला भिती वाटू शकते किंवा अस्वस्थ वाटू शकते. स्मशानातल्या विधीनी चार पाच तास लागत असल्याने अशा ठिकाणी लहान बाळाना नेता येत नाही मग बाळाना घरी कोण सांभाळणार?? तसेच, मेलेल्या व्यक्तीला जर एखादा संसर्गजन्य आजार झालेला असेल तर अशा स्त्रियाना त्या प्रेताजवळ नेणे आरोग्यदृष्टया अयोग्य. मग हळूहळू कूठल्याच स्त्रीने स्मशानात जाऊ नये, असा नियम आला असावा. Happy

अजून एक म्हणजे, जर मुलीचे सासर माहेराजवळ असेल तर ती प्रेताला योग्य वेळेत पोचू शकेल. (कृपया इथे हेही लक्षात घ्या, की पूर्वी दळणवळणाची आनि संपर्काची साधने मर्यादित होती. त्यामुळे माणूस इथून निघणार, मुलीच्या सासरी पोचणार, तिला निरोप देऊन माहेरी घेऊन येणार यामधे भरपूर वेळ जात असेल.)

आणि रात्री अपरात्री मृत्यू झालेला असताना स्त्रियानी घराबाहेर पडावे की नाही हा प्रश्न तत्कालिन राजवटीमधे होताच की!!! (बाटवणे वगैरे जेव्हा सर्रास् होते) आपल्या धर्मामधे जी काही बावळट आणि मूर्ख प्रथा चालू झाल्या (समुद्र उल्लंघन. बाल विवाह वगैरे) त्या याच दरम्यान.

अर्थात यापैकी कुठलेच कारण स्त्रियानी आज स्मशानात का जाऊ नये याचे पटणेबल कारण नाही होऊ शकत!!!

सायो, ज्याचे आईवडिल दोघंही जिवंत असतील असा माणूस स्मशानात जात नाही म्हणून जावयाचे वडिल जिव्,न्त असतील तर त्याने जाण्याऐवजी त्याचे वडिल जाणे योग्य असा नियम लोकानी काढला असावा. Happy

हे मी "प्रथा कशी सुरू झाली असावी?" याबद्दल मी लिहिलय. या प्रथेचं मी काहीही समर्थन करत नाही अथवा विरोधदेखील करत नाही. उगाच माझ्यावर तोफ नको!!! शेवटी आपल्याला जे पटते तेच आपण करावे. Happy

प्रथा कशी सुरू झाली असावी याची अजून एक गंमत. कोल्हापूर भागामधे तेराव्याची जेवणावळ घातल्यानंतर आहेराचं पाकिट द्यायची नविन पद्धत सुरू झाली आहे. अजून शंभर वर्षानी तुम्ही कितीचा आहेर दिला आणि आम्ही तुम्हाला किती परत दिला यावरून भांडणे होणार नक्की!!!

>> सून म्हणून जे काही निर्बंध बाईला असावेत असं तुम्हाला वाटतं ....

मला नाही वाटत गं तसं Happy मी तसं कुठे म्हणालो आहे? दुसर्‍या कोणाच्यातरी पोस्टशी कन्फ्युजन झालं आहे का?

>> ते सगळे निर्बंध स्वतःवर घालून घेऊन १ महिना किमान आपल्या बायकोच्या माहेरी रहा.

मी तीन महीने राहिलो आहे, पण तेव्हा सासरकडचे नव्ह्ते हो घरी; सो नो अनुभव

>> सासरच्या लोकांचा भोचकपणा, प्रत्येक कृतीवर टिकाटिप्पणी, दिवाणखान्यात यायचं नाही, मान खालीच पाहिजे असं सगळं. यामधे हसतमुखाने हे आलंच.

पुरुषांना मानसिक त्रास नसतातच का? असतात गं, आणि आता (हल्लीच्या काळात) तर दोघांनाही सारक्याच प्रमाणात असतात. फक्त स्वरूप वेगळं असतं.

पुरुषांना मानसिक त्रास नसतातच का? असतात गं, आणि आता (हल्लीच्या काळात) तर दोघांनाही सारक्याच प्रमाणात असतात. फक्त स्वरूप वेगळं असतं.>> प्रचंड अनुमोदन. मी परत माझ्या अनुभवाचे भांडवल करते असे नाही पण रवीची आई १९७१ मध्ये कँसरने गेली त्याच्या दु:खातून तो कधी सावरू शकला नाही. वडील १९८४ मध्ये गेले त्यानंतर तो खरेच एकटा पडला व ते दुख त्याने कधीच नीट शेअर केले नाही. अगदी मित्रासारखा जो धाकटा काका तो वारल्यावर तर रवी अगदीच एकटा झाला. या काकाशी त्याचे फारच गुळपीठ अगदी मैत्रीच होती. त्यानंतर एक दीड वर्शात त्याचा मानसिक प्रवास शेल मध्ये जाणे, एकट्याने कुढ्णे दु:खी होणे, स्वतः कडे जाणून बुजून दुर्लक्ष, कुटुंबात मिसळता न येणे असा झाला. पहिलाच व मॅसिव हार्ट अटॅक आला तेव्हाही त्याचे शेवट्चे शब्द काकाचे नावच होते. इतके त्याने काकाचे जाणे मनाला लावून घेतले होते.
बायका शेअर तरी करतात पण पुरुषांना ते फार अवघड जाते. साधी सांसरिक दु:खे पण पुरुषांना व्यक्त करता येत नाहीत मोकळेपणे व त्याचे त्यांच्या आरोग्यावर वाइट परिणाम होतात. काही यड्चाप लोक मला म्हणाले कि काकाने त्यास बोलावून घेतले. कधी कधी त्रिपाद/ पंचपाद लागतो व एकाच घरातील ३/४/५ माणसे थोड्याफार वेळाने मरतात. तसे तुमचे झाले किकॉय! पण माझा यावर विश्वास नाही. प्रत्येक जण मरणारच. त्यात योगायोगच असतात. मी हे अतिशय ऑब्जेक्टिव रीत्या लिहीले आहे मला तो गेल्या वर त्याच्या अगदी जवळच्या मित्रांनीही सांगितले कि तो कधीच आमच्याशी मन मोकळे करून बोलला नाही ग. मी या सर्वाची फक्त साक्षिदार आहे.

मंदार जोशी, शास्त्रीय आधार नितिन चिंचवडांनाही विचारा. त्यांनी हे लिहिलंय-
>>माझ्या मते हे धाडस स्त्रीयांनी टाळावे. स्मशानातले वातावरण अत्यंत भेसुर असते. या वातावरणाचा परीणाम फार काळ रहातो. स्त्रीया मनाने फारच मृदु असतात. यास्तव हे टाळावे.

लालू हेच मी सांगायचा प्रयत्न करत आहे. त्याचे फार रीचींग परिणाम होतात. त्या इमेजेस मनातून निघता निघत नाहीत. हा इतर बीबींसारखा निव्वळ चर्चेचा विषय नाही.

मामी, ते लालूचं नव्हे, नितिन चिंचवड यांचे वाक्य आहे.उलट लालू म्हणत आहे की शास्त्रीय आधार नितिन चिंचवडांनाही विचारा.
हा नुस्ता चर्चेचा विषय नाही म्हणजे? इतर बाफ वर पण (बहुतेक लोक) सिरियस डिस्कशन होते की, तसेच इथे.
आणि तुमचा मुद्दा : त्याचे फार रीचींग परिणाम होतात. त्या इमेजेस मनातून निघता निघत नाहीत
>>>बरोबर आहे , पण हे फक्त स्त्रियांना होतं का? पुरुषांना पण तो ट्रॉमा असतोच. मग उगीच बायकांना सहन होत नाही वगैरे जनरलायझेशन का?? हा खरा मुद्दा आहे.
नेहमीचेच आहे हे. "तू स्त्री आहेस म्हणून" या एकाच वाक्याने अनेक भेदभावाच्या अन अन्यायकारक वागणुकीचे अपमानास्पद रित्या समर्थन केलं जातं. "असं का? मलाच ही वागणूक का?" हा प्रश्न जगबुडी आल्यासारखा बघितला जातो. वर चालली आहे तशी निरनिराळ्या प्रकरे खिल्लीही उडवली जाते. जिथे तिथे वाद उकरून काढता, "भाषण देता" असले शब्द खुश्शाल वापर्ले जातात अन तसल्याच विचारसरणीचे लोक टाळ्या पिटतात.
चालू द्या. मला तर लिंबूचे सगळ्यात टॉप चे प्रस्तावनेतले पोस्ट फार बेस्ट वाटते आहे!! Proud

बरोबर आहे , पण हे फक्त स्त्रियांना होतं का? पुरुषांना पण तो ट्रॉमा असतोच. मग उगीच बायकांना सहन होत नाही वगैरे जनरलायझेशन का?? हा खरा मुद्दा आहे.<<
एक्झॅक्टली.

मंदार, पुरूषांना मानसिक त्रास नसतात असं मी कुठे म्हणलंही नाही आणि माझा दावाही नाही.
पण बेसिक गोष्टीही पिढ्यानपिढ्या नाकारल्या गेल्यावर acquired mutation च्या तत्वाने बाईची मानसिक ताकद भरपूर असते. तेव्हा मानसिकरित्या बाई कमजोर म्हणून स्मशानात जाऊ नये ह्या दाव्यामधे काही अर्थ नाही हे म्हणणं आहे.

Pages