मरणोत्तर अन्तिमसन्स्कारान्चे अनुभव व त्यावरील भाष्य

Submitted by limbutimbu on 18 June, 2009 - 04:15

मरणोत्तर अन्तिमसन्स्कारान्चे अनुभव व त्यावरील भाष्य

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्त्रीयांनी और्ध्वदेहिक कार्य करु नये हे कुठून काढलं कळत नाहीये.

भार्ययापिसमंत्रकमेवौर्ध्वदेहिकादिकंकार्यं
पत्नीनेच भर्त्याचे दहन इत्यादी और्ध्वदेहिक कार्य करावे

यद्यप्यविभक्तस्यसंसृष्टस्यवा भ्रातुरेव धनग्रहाधिकारस्तथापिक्रियाधिकार: पत्न्या
"अविभक्त (ज्याने वेगळी चूल मांडलेली नाही)" अशा भावास पिंडदान अधिकार आहे पण क्रिया करण्याचा प्रथम अधिकार पत्नीसच आहे.

पत्न्यभावेविभक्तासंसृष्टस्यकन्यापिंडदा धनहारिणीच
स्त्री नसेल आणि तो मृत (त्याच्या भावापासून) विभक्त असेल तर कन्या अधिकारी आहे

ऊढायास्तत्पुत्रा भावेसपत्नीपुत्र: तदभावेपौत्रप्रपौत्रा: तदभावेपति: तदभावेदुहिता तदभावेदौहित्र:
लग्न झालेल्या स्त्रीच्या अंत्यकर्माचे अधिकारी पती, पुत्र, नसेल तर मुलगी.

आणखीही बरेच आहेत.
धर्म हा प्रत्येक युगासमवेत बदलणारा असतो हे लक्षात ठेवून व्यवहार करावा. काळाशी सुसंगत नसलेले धर्मनियम बदलण्यास धर्माचीही अनुज्ञा आहे. बरं, आपण अशा शास्त्रांत सांगितलेले बाकीचे नियम किती पाळतो का हा एक मोठ्ठा प्रश्नच आहे.

>>> धर्म हा प्रत्येक युगासमवेत बदलणारा असतो हे लक्षात ठेवून व्यवहार करावा. काळाशी सुसंगत नसलेले धर्मनियम बदलण्यास धर्माचीही अनुज्ञा आहे. बरं, आपण अशा शास्त्रांत सांगितलेले बाकीचे नियम किती पाळतो का हा एक मोठ्ठा प्रश्नच आहे.

आता या नोटवर ही चर्चा सुफळ संपूर्ण ठरण्यास हरकत नसावी. Happy

पुष्कळ वेळ चर्चा चालली आहे. पण अंत्यसंस्कार एवढे जर महत्वाचे असतील तर जे लोक मेडिकल कॉलेजेसना वगैरे देहदान करतात त्यांच काय? एकदा का आत्मा/जीव निघून गेला तर त्या शरिराला काहीच महत्व राहत नाही.

दुपारी वामकुक्षी करत असता एक स्वप्न पडले. काही बायका हातात मशाल घेऊन स्मशानात इकडे तिकडे जिवंत पुरुषांना चितेवर लोटून, धडाधड आगी लावत सुटल्या आहेत. एकदम घाबरून उठलो. नि आधी संगणक बंद केला. मग जरा जीवात जीव आला
>> झक्की, मलाही काल रात्री असलच काहीतरी स्वप्न पडलं हो.. कोण कुणाला जाळत होतं माहित नाही.. पण घाबरून, दचकून उठले.. (आणि ह्यात अतिशयोक्ती नाही!)
हा बाफ वाचणं बंद करायला पाहिजे, एवढच कळलं... Happy

सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस, आय रियलाईज इट टू लेटर
<<<<लिंब्याची ही इंट्रो पोस्ट जबरी..
आय होप हि हॅज रिअलाइज्ड धिस फायनली.. मागे पण एकदा रिअलाइझ होउन पुन्हा लिहिण्याची चूक केली होती, अता ही चूक न होवो Proud

"माझ्या मते हे धाडस स्त्रीयांनी टाळावे. स्मशानातले वातावरण अत्यंत भेसुर असते. या वातावरणाचा परीणाम फार काळ रहातो. स्त्रीया मनाने फारच मृदु असतात. यास्तव हे टाळावे."
स्त्रीया मनाने फारच मृदु असतात, हे निरीक्षण, समज की अपेक्षा?
काही काही समाजात स्त्रिया जातात की स्मशानात.
हे विधान इतिहासाशी संबंधित असेल तर सती जाणार्‍या स्त्रीला उदार पणे स्मशानात जाऊ दिले जायचे का? की पतीनिधनानंतर तिच्या वाट्याला येणारे जीवन आणखीच भेसूर असेल म्हणून हा शॉर्ट कट?

मैत्रेयी, दिपान्जलि...... Lol
असो.
>>>>> जर स्त्री गर्भार अथवा बाळंत असेल तर स्मशानासारख्या भेसूर ठिकाणी तिला भिती वाटू शकते <<<<
नन्दिनी, याविषयाशी सम्बन्धीत एक दीडवीत उन्चीची पोस्ट मी लिहूनही पोस्ट केली नाही! कारण पुन्हा त्यास शास्त्रीय आधार कुठून आणू???? त्यात मला गर्भारपण वगैरेचा अनुभव्/अनुभूती अजुनतरी नाही! Proud अन जरी आद्य शन्कराचार्यान्च्या तिथी-नक्षत्र-चरणावर माझा जन्म झालेला असला तरी माझ्यात त्यान्च्यासारखी कुवत नाही! तेव्हा मी या विषयाला स्पर्ष करणे टाळले.
मात्र,
अतिव दु:ख वा भेसूर दृष्यामुळे, तसेच शोक व्यक्त करुन दाखविण्याच्या अलिखित सक्तीमुळेही कदाचित, गर्भपात अथवा भविष्यात अपत्य न होण्याची अन्धुक शक्यता यामुळेही स्त्रीयान्नी स्मशानात जावु नये असा पायण्डा पडला असेल. (यावर माझे त्या न पोस्टलेल्या मजकुरात एक वाक्य होते की "स्मशानात जाऊन त्या प्रसन्गास तोन्ड देताना, गमावण्यासारखे पुरुषाकडे काहीच नस्ते" - मी पोस्टायचे धाडस केले नाही)
तसेच हा पायण्डा जास्त करुन उच्च जातीतच आढळून येतो हे विशेष, अर्थातच, स्मशानात व्यक्त होऊ शकणार्‍या शोकामुळे समाजमनातील रुजलेल्या "व्यक्तिविशेष्-व्यक्तिमत्वा" वर विपरित परिणाम होऊ नये म्हणूनही ही काळजी घेतली जात असेल.
बाकी तू व्यक्त केलेली अन्य आरोग्य विषयक कारणे आहेतच, इतकेच काय, स्मशानातच नाही, तर नुकतीच बाळन्त झालेल्या स्त्रीच्या खोलित देखिल हातपाय धुतल्याखेरीज जाऊ दिले जात नाही (काही घरात अजुनतरी - रोगजन्तु चा सन्सर्ग बाळबालन्तिणीस होऊ नये याचबरोबर, बाह्य वाईट "शक्ती"न्चा उपद्रव पोचू नये हे देखिल कारण असते - माना किन्वा नका मानू! )

मूळात हा बीबी मी, वीसेक वर्षान्पूर्वी मला आलेल्या अनुभवावरुन उघडला, कारण असे की, जाण्याचे आगोदर सहा एक महिने, वडीलान्नी जेवताना गप्पा मारताना, स्मशानातील वस्तुस्थितीची - कार्यप्रणालीची, तसेच माणूस मेल्यावर शवागारातील प्रेत ठेवण्याच्या सोई वगैरेची इत्थंभूत माहिती (आज म्हणू शकतो की सहेतुकपणे) दिली होती, तेव्हान्च्या त्या ताज्या माहितीमुळेच ते वारल्यावर त्यान्चे अन्तिमकर्म करताना मला कसलीही अडचण आली नाही.
कधिनाकधी कुणालाही या प्रसन्गाला सामोरे जावेच लागते, त्यावेळेस या विषयाबाब्त, जो कोणत्याही शाळाकॉलेजात शिकवला जात नाही, कोणी अनभिज्ञ असू नये म्हणून हा धागा उघडला!
मात्र येथिल बहुतान्शी "स्त्रीमुक्तिवादी" पोस्टस चा धुरळा बघता, बर का मैत्रेयी अन दिपान्जली, माझ ते वरील सर्वात पहिल्या पोस्ट मधिल मागाहुन घुसडलेलेच वाक्य जास्त बरोबर आहे असेच मलाही भासू लागले आहे! Proud

स्त्रीयांनो खुशाल जा. अनुभव घ्या. मी माझ मत सांगीतल. फतवा नाही काढला. हिंदुधर्म अतिशय प्रयोगशील आहे.

इथे स्त्रीमुक्तीचा मुद्दा नाहीये लिंबू.
आपल्या प्रिय आईवडिलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेला केवळ आपण स्त्री आहोत यासाठी चुलत वा अजून कुठले लोक वा जावई वा त्याचे वडील असे गोळा करायला लागण्यातले दु:ख आहे. परकं वाटवणं आहे. त्याबद्दल इथे बोलणं चाललंय.
हायजिन पासून भयानकतेपर्यंत सगळेच मुद्दे स्त्री-पुरूषांना समान पद्धतीने लागू होतायत (कदाचित नाजूक स्थितीतील गर्भार बायका वगळूया!) तर स्वतःच्या जन्मदात्या/ दातीला निरोप देताना हे असं परकं व्हावं लागणं हे कुठल्याही मुलीसाठी स्मशानातल्या भयाण बियाण वातावरणापेक्षा क्लेशदायक आहे.

>>स्त्रीयांनो खुशाल जा. <<
तुमच्या परवानगीबद्दल आभार हं!

>>स्त्रीयांनो खुशाल जा. <<
तुमच्या परवानगीबद्दल आभार हं!

कमाल आहे. मी आपली मत लिहीतोय आणि त्याचा विपर्यास का करताय ?
मी लिहील होत धाडस करु नये. उद्देश हा होता की इतरांना समजाव की याचा त्रास होऊ शकतो.

मी अस लिहील आहे का की धर्मशात्र याला अनुमती देत नाही ? परवानगीचा प्रश्न येतोच कुठे ?

नितीन तुम्ही 'पालथे घडे' या क्याट्यागरीत मोडता . त्यामुळे तुम्ही मीठ दिले तरी आम्ही ते अलणीच म्हणणार आहोत कळ्ळं?

वाराणसीत एक महिला डोंब आहे जी अग्नि देण्याचे काम नित्यनेमाने करते. तिच्या धारीष्टयाचे कौतिक आहे कि नाही. कमी तिथे आम्ही!

>>>> लिम्ब्या ह्या बीबीवर हसणारे आपणच दिवटे <<<<
बीबीवर? मला तर भर स्मशानात देखिल हसू येतं! मनुष्यस्वभावाचे एकेक नमुने बघून! Sad
असो

>>>>अति शहाणा तो रिकामा tonaga<<<<<
हे मी अस फिरवुन वापरल तर तुझी हरकत नाही ना tonagyaa?

अति शहाण्या, त्यान्चे tonage रिकामे Lol Proud Biggrin Rofl Light 1

बायकांचा जमाव जमला होता. हातात फावडे, कुर्‍हाडी, कुदळी, पाट्या.... बरंच सामान होतं... .. जमलेल्या बायका आजूबाजूच्या पुरुषांशी भांडत होत्या.. नवर्‍याच्या मढ्याची ममी तयार करणे आणि त्यावर पिरॅमिड बांधणे, हे काम फक्त पुरुषानीच का करायचे? स्त्रीयादेखील कणखर, ताकदवान असतात.
समोर एक मढं पडलेलं होतं...

मी झोपेतून दचकून जागा झालो ..! परधर्मः भयावहः असे जाणकारानी का म्हटलेले आहे, याचा शोध लागला... Happy

जागोमोहनप्यारे | 8 May, 2010 - 00:45 नवीन
बायकांचा जमाव जमला होता. हातात फावडे, कुर्‍हाडी, कुदळी, पाट्या.... बरंच सामान होतं... .. जमलेल्या बायका आजूबाजूच्या पुरुषांशी भांडत होत्या.. नवर्‍याच्या मढ्याची ममी तयार करणे आणि त्यावर पिरॅमिड बांधणे, हे काम फक्त पुरुषानीच का करायचे? स्त्रीयादेखील कणखर, ताकदवान असतात.
समोर एक मढं पडलेलं होतं...

मी झोपेतून दचकून जागा झालो ..! परधर्मः भयावहः असे जाणकारानी का म्हटलेले आहे, याचा शोध लागला...

आज मला आनंद झाला कारण जामोप्याला नितीनच मढ पडल होत आणि बायका ममी करायला सरसावल्या होत्या अस दिसल नाही.

मृत्यूनंतर शवाची अंतिम क्रिया चालू असता, श्रीमद्भगवद्गीतेतील १५ वा अध्याय म्हणताना मी ऐकले आहे. ही काय पद्धत आहे? त्याचा नि अंत्यसंस्काराचा काही संबंध?

किरवंत म्हणजे मरणोत्तर क्रियाकर्म करण्यात पिढ्यान पिढ्या स्पेशलायझेशन (!) असलेले ब्राह्मण. त्यांना इतर शुभ कार्याला बोलावत नाहीत म्हणे.

Pages