मंत्र वगैरे काय म्हणतात, ते माहित नाही. पण आपल्या मधे (हिंदू ) बर्याच प्रथा पाळल्या जातात.
नाकात कानात कापूस घालतात. (कधी कधी मेंदू विरघळायला लागल्यामूळे, नाकातून कानातून पाणी येऊ शकते. ) पायाचे दोन्ही अंगठे घट्ट बांधतात. (जर देह कडक व्हायला लागला तर पाय ताठ होऊन तिरडीवर देह ठेवणे कठीण जाते. ) तूप गरम करुन, त्यात हळ्द घालून ती टाळूला व तळव्याना चोळतात.
घरात बर्याच उदबत्त्या लावतात.
तिरडी हि आयत्यावेळीच बांधतात. दोन बांबूना आडव्या कामट्या घट्ट बांधतात. मग त्यावर ताटी टाकून त्यावर मांजरपाट बांधतात. देहाला पूर्ण आधार मिळावा, अश्या रितीनेच हि तिरडी बांधलेली असते.
एका मडक्यात कोळसे पेटवून, ते बांबूच्या तिकोन्यावर सूतळीने बांधतात. हि हातात धरून, तिरडीसमोर शक्यतो, मुलगा चालत असतो.
तिरडिचे, वजन जरा जास्तच असते, आणि ती खांद्यावर पेलणे कठीण असते. (म्हणून शक्यतो हल्ली अॅम्ब्यूलन्समधून नेतात. )
तिरडीवर ठेवण्यापूर्वी, देहाला एकदा कडकडीत गरम व थंडगार पाण्याने अंघोळ घालतात. माणूस जिवंत असेल, तर यावेळी त्याला जाग यावी (शुद्ध यावी ) अशी अपेक्षा असते.
एका नारळाचा, एक डोळा फोडून त्यातले पाणी, जवळच्या सर्वानी मृतदेहाच्या तोंडात घालायची देखील प्रथा आहे.
देह बाहेर नेल्याबरोबर घरातला कचरा काढला जातो (एरवी कुठलाहि माणूस घराबाहेर पडल्यावर, असे करत नाहीत. ) जिथे देह ठेवला होता, तिथे थोडे पिठ पसरुन त्यावर दिवा लावतात.
स्मशानात जाताना, मुद्दाम एका दगडाला ठेच मारतात, व तो दगड जपून आणतात.
गेटवर मेडीकल सर्टिफिकेट दाखवल्याशिवाय, देह जाळायची परवानगी मिळत नाही.
चिता रचण्याचे काम तिथले कर्मचारीच करतात. देह बघून किती मण लाकूड लागेल, हे त्याना कळते. काही ठिकाणी हे सरण विनामोबदला मिळते.
चितेवर देह, तिरडीवरुन उचलून ठेवतात.
आणलेल्या मडक्यात पाणी भरुन, त्याला तीन भोके पाडतात व ते मडके खांद्यावर ठेवून चितेला प्रदक्षिणा घालतात. त्या पुर्ण झाल्या, की मागे न बघता, ते मडके खांद्यावरून खाली टाकतात. मग त्याचे तूकडे करतात. सोबत शिजवलेला भात आणलेला असतो, त्यात माती कालवतात, व तो फेकून देतात.
देहाच्या तोंडात गूजभर तरी सोने घालतात व तूळशीचे पान ठेवतात.
चिता पोकळ रचलेली असल्याने व्यवस्थित पेटते. मग त्यावरून दोनतीनदा तिरडी फिरवतात. ती खिळखिळी करुन मोडतात, आणि चितेतच टाकतात.
चिता जळताना, प्रचंड दुर्गंधी पसरते. आणि काहि वेळाने कवटी फुटते. त्यावा आवाज येतो. निदान एक दोघानी तरी, तोपर्यंत थांबायचे असते. घरी आल्यावर दाराबाहेरच डोक्यावर व पायावर पाणी टाकतात.
त्यादिवशी घरात अन्न शिजवत नाहीत. पण शेजार्यानी पिठले भात शिजवून आणून द्यायचा असतो. त्याना उपाशी ठेवत नाहीत. आलेले नातेवाईक, त्या रात्री थांबत नाहीत. थांबले तर पुढे दहा दिवस रहावे लागते.
अस्थि गोळा करायला मात्र दुसर्या दिवशी जावे लागते. तोपर्यंत स्मशानातील लोक, राख जपून ठेवतात.
मी हे मुद्दाम सविस्तर लिहिलेय, कारण माझ्यावर असे प्रसंग ज्यावेळी आले, त्यावेळी मला या सगळ्याची कल्पना नव्हती. या सगळ्यामागे काय समजूती आहेत, ते मला माहीत नाही. पण एकदंर हा अनुभव, काहि चांगला असतो असे मला वाटत नाही.
मृत्यू म्हणजे भौतिक शेवट. त्यानंतर उरणे ते केवळ आप्तांच्या आठवणीत. तेच खरे. आत्मा वगैरे मी मानत नाही. एकदा मृत्यू झाला, कि त्या देहाशी काही मानसिक बांधीलकी ठेवावी असे मला वाटत नाही, त्या व्यक्तिच्या, जिवंतपणीच्या आठवणी जपणे, हे मला जास्त महत्वाचे वाटते.
देह मृत पावला, तर डोळे आणि त्वचा दान करता येते. हि काढल्याने मृतदेहाला कुठलीही विदृपता येत नाही. अपघाती मृत्यू आल्यास, इतरही अवयव दान करता येतात. देहदान तर आहेच.
याबाबतीत आपल्याकडे अजूनही जाण नाही. जिवंतपणी फॉर्म जरी भरला असला, तरी जवळच्या नातेवाईकांनी त्याचे भान ठेवून, योग्य त्या ठिकाणी त्वरीत संपर्क साधणे गरजेचे असते. वारंवार हि इच्छा घरात बोलून दाखवणे गरजेचे आहे.
त्यात अशूभ असे काहिच नाही. मृत्यू हे अटळ सत्य आहे. ते स्वीकारणे गरजेचे आहे. (न स्विकारल्याने ते बदलत नाही.)
आपला धर्म तेच संगतो ना ? कि मृत्यू म्हणजे आत्म्याचे कपडे बदलणे वगैरे. मग वापरलेल्या कपड्याबाबत ओढ का, जितक्या सहजतेने आपण नको असलेले कपडे इतराना (गरजूना ) देतो, तसे इथे का करु नये ?
मृत्यू म्हणजे भौतिक शेवट. त्यानंतर उरणे ते केवळ आप्तांच्या आठवणीत. तेच खरे. आत्मा वगैरे मी मानत नाही. एकदा मृत्यू झाला, कि त्या देहाशी काही मानसिक बांधीलकी ठेवावी असे मला वाटत नाही, त्या व्यक्तिच्या, जिवंतपणीच्या आठवणी जपणे, हे मला जास्त महत्वाचे वाटते. ---- वा दिनेशदा... शेवटच्या परिच्छेदातील विचार मला आवडले, पटले.
१५ वा अध्याय आणि भडाग्नी यांचा काय संबंध हे माहीत नाही... पण ही पद्धत आहे. १५ वा अध्याय तसा बर्याच लोकाना अर्थासह माहीत असतो, म्हणून प्रथा पडली असेल.. ( महाभारतच्या पूर्वी १५ वा अध्याय नव्हता, तेंव्हा लोक काय म्हणत होते, आता हा प्रश्न पडू नये.. )
Submitted by जागोमोहनप्यारे on 9 May, 2010 - 07:50
दिनेशदा माहितीपूर्ण पोस्ट. अतिशय संयत शब्दात लिहीले आहे. पट्ले सुद्धा. ह्या फॉरमॅलिटीज पूर्ण करून मग घरच्यांनी वैयक्तिक लेवल वर आपले दु:ख प्रोसेस करावे असे मला वाट्ते. ती तीव्रता बाहेरच्यांना समजतेच असे नाही. शिवाय भेटायला येणार्यांनी जेवायच्या वेळेस वगैरे जावू नये.
डेड बॉडीस दक्षिण दिशेस पाय करून ठेवतात. त्या मागे पण काही शास्त्र आहे.
मामी दक्षिण दिशा यमाची, म्हणून तसे ठेवायचे. एरवी (जिवंतपणी) तसे झोपायचे नसते.
आपल्याकडे असा एखादा दिवस ठरवत नाहीत, ज्याला जशी सवड मिळेल तसे येत राहतो, आणि परत परत तेच ते उगाळले जाते. घरच्याना सावरायचा अवधीच मिळत नाही. काहि समाजात कसे, एखादा दिवस ठरवून, त्याच दिवशी सगळे भेटायला जातात.
एक लिहायचे राहिलेच, एकदा निधन झाल्याबरोबर त्या देहाला आपण त्रयस्थपणे, बॉडी, मयत, वगैरे म्हणू लागतो. मग हि मानसिकता, बाकिच्या बाबीत का उतरत नाहि ?
झक्की, पन्धराव्या अध्यायाच्या अर्थाशी याचा सम्बन्ध आहे! (या क्षणी अध्याय अन अर्थ, दोन्हीही आठवत नाही, सबब सविस्तर पोस्टत नाही)
पण हा अध्याय, केवळ किरवन्त (?) - ब्राह्मण उपलब्ध नाही किन्वा केवळ भडाग्निच्या वेळेसच म्हणला जातो असे नाही! एरवी देखिल उपस्थित जन, व "अधान्तरी तरन्गत असलेले प्रेतात्मे" यान्चे श्रवणासाठी तो म्हणला जातो
दिनेशदा
घरात अन्न शिजवत नाहीत याचे कारण असे आहे की त्यादिवशी घरातले कोणीही जेवण बनवण्याच्या किंवा ते खाण्याच्या मनःस्थितीत नसते. म्हणून शेजारी किंवा जे नातेवाईक जवळ राहात असतील त्यांनी पिठलं भात देण्याची प्रथा आहे. त्यात सुद्धा पिठलं भात करायला सोपा असतो म्हणून हा पदार्थ.
आणि तेरा दिवस सूतक पाळ्तात त्याचं कारण साधारण १२ -१३ दिवसात माणूस धक्क्यातून सावरतो व आपली कामे पूर्ववत सुरु करु शकतो अशी १ धारणा आहे. अर्थातच हा वेळ व्यक्ती सापेक्ष आहे पण १२-१३ दिवस हे प्रमाण मानले आहे. बाकीच्या विधींबद्द्ल फारशी माहिती नाही.
Submitted by धनश्री गानु on 7 September, 2011 - 08:28
दहनविधि किंवा अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार स्त्रीयांना नाही वगैरे आजच्या काळात निव्वळ थोतांड वाटतं. पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांचं आणि पुरोहीत वर्गाचं वर्चस्व सातत्यानं प्रस्थापित करण्यासाठी अशा चालीरिती हेतुतः रूढ केल्या गेल्या असाव्यात. ज्यांचे विचार आणि आचार असल्या कूपमंडूक आणि बुरसट वृत्तींपासून मुक्त झाले आहेत त्यांनी 'पुरुषी आणि पुरोहीत प्रस्रृत शास्त्रार्था'कडे साफ दुर्लक्ष करावं, हे बरं.
म. ज्योतिबा फुले वारले तेंव्हा यशवंतला - त्यांच्या दत्तक मुलाला [तो जातीबाहेरचा, त्यातून कुमारी मातेला झालेला म्हणून ] त्यांच्या तिरडीला हात सुद्धा लावू द्यायला नातेवाईकांनी कसून विरोध केला. हा वाद खूप रंगला आणि स्थिती हाताबाहेर जाऊ लागली. शेवटी सावित्रीबाईंनी आपलं दु:ख बाजूला सारलं, आपल्या हातात अग्नी घेतला आणि संस्थेतल्या चार कार्यकर्त्यांना तिरडी उचलायला सांगीतली. त्या स्वतः तिरडीपुढे चालत निघाल्या आणि नंतरचा अग्नि-संस्कारही त्यांनीच केला अशी इतिहासाची साक्ष आहे! हे धाडस त्या काळात सावित्रीबाईंनी दाखवलं पण त्यातून आमच्या समाजानं कोणता बोध घेतला? आजही आम्ही त्याच गोष्टींची चर्चा करून शिळ्या कढीला उत आणत बसणार आहोत का? शास्त्र-वचनांचं उल्लंघन करून ज्योतिबा फुल्यांचा अग्नि-संस्कार झाला म्हणून त्या मृतात्म्याचं काय बरं-वाईट झालं? उलट आजही आम्ही त्यांना 'महात्मा' मानतो.
कुणाला परंपरा आणि रूढी जपायच्याच असतील तर आधुनिक आणि पुरोगामी विचारांचा स्वीकार करणारा पुरोहीत बघावा, आणि ज्याची किंवा जिची अंत्यसंस्कार करण्याची इच्छा असेल त्या व्यक्तिनं प्राप्त काल- परीस्थितीनुसार अग्नी-संस्कार करावा. पुराणकालीन एखाद्या शास्त्र-नियमाचा किंवा वचनाचा भंग तर होत नाही ना आणि तसं झालं तर मग काय प्रायश्चित्त घ्यावं लागणार असल्या चिंता करू नयेत. हिंदु धर्म अतिशय उदार आणि सर्वसमावेशक आहे, कालमान-परीस्थितीनुसार बदलण्याची लवचिकता त्यात आहे. आपल्या भावना, विचार आणि हेतु विशुद्ध असतील तर कशालाच हिंदु धर्माची आडकाठी येत नाही.
ज्यांचा अंत्य-संस्कार या प्रकारावर मुळातच विश्वास नाही त्यांनी कोणतेही 'संस्कार' न करता शक्यतेनुसार विद्युत-चितेवर प्रेत-दहन करावं. कारण, गेलेली व्यक्ति विकार आणि वासना यातून आधीच मुक्त झालेली असते. तुम्ही कुणाच्याही हाताने दहन करा; किंवा दफन करा; मंत्र म्हणा अगर म्हणू नका; गंगेत अस्थि-विसर्जन करा किंवा करू नका; सुतक पाळा अथवा पाळू नका; श्राद्ध घाला अगर घालू नका; अवयवांचं दान करा किंवा करू नका - त्या मयत व्यक्तीला त्याचं काहीच सोयर-सुतक उरलेलं नसतं. हे सगळे प्रश्न मागे राहिलेल्या आप्तेष्टांचे असतात.
जहाजाने प्रवास करताना अपघात झाला तर अनेकांना जलसमाधी मिळते. त्यांची प्रेतंही हाती लागत नाहीत. किंवा युद्धात हजारो सैनिक म्रुत्युमुखी पडतात. त्या सर्वांवर कुठे विधिवत अंत्यसंस्कार होतात? काही वेळा बेवारशी प्रेतांची विल्हेवाट लावण्याची वेळ म्युनिसिपालिटीवर येते. तेंव्हा कसले विधी होतात आणि कोणते आप्त ते करतात? म्हणून काही त्या मृतात्म्यांना गती किंवा मुक्ती मिळायची थांबते का?
माझ्या मते, मानवी जीवनावरचा अंतिम संस्कार म्हणजे मृत्यु. त्यापुढे सगळा आप्तेष्टांच्या भावना आणि श्रद्धेचा भाग. भावनांची अभिव्यक्ति किंवा श्रद्धा यांना कोणत्याही शास्त्र, नियम, रूढी यांच्या चौकटीत बंदिस्त करण्याची गरज नसावी. परंपरेने काही चाली-रीती चालत आल्या आहेत. आपल्या मानसिक समाधानाखातर, आपल्या इच्छेनुसार आणि सोयीनुसार, त्यांचं पालन हवं तर अवश्य करावं पण त्या चौकटींचा कोणी उगाच बाऊ करू नये किंवा अट्टाहास धरू नये. शेवटी, चौकटी आपल्यासाठी आहेत, आपण त्यांच्यासाठी नाही आणि त्या चौकटी आपल्यासारख्या माणसांनीच बनवलेल्या आहेत; आपण त्या गरजेनुसार वाकवू किंवा मोडू शकतो.
- प्रभाकर [बापू] करंदीकर.
Submitted by pkarandikar50 on 10 December, 2012 - 03:03
<<.>>>>> लिंबुचाचा शीर्षकाबाबत शंका : अंतिमसंस्कार मरणोत्तरच असतात ना ?<<<
सामान्य माणसाचे बाबतीत अंतिमसंस्कार मरणोत्तरच असतात,
मात्र कोणा सामान्य माणसास जर विधीवत "सन्यास" घ्यायचा असेल, तर स्वतःचेच "अंतिमसंस्कार" संस्कार त्याचे स्वतःचे 'जिवन्तपणीच' करावे लागतात. म्हणूनच शीर्षकामधे "मरणोत्तर" हा शब्द घातला असे.
Submitted by limbutimbu on 10 December, 2012 - 04:32
संन्यास घेण्याच्या विधीमधे स्वतःच स्वतःचे श्राद्ध करावयाचे असते.
अशा व्यक्तीच्या मृत्युनंतर नातेवाईकांना सुतक नसते तसेच कोणतेही दिवस इ. करण्याची गरज नसते.
तसेच या प्रकारात दहन न करता दफन करतात,
कारण जी व्यक्ती ज्ञानाने आधीच दग्ध झालेली आहे त्याला प्रत्यक्ष दहन करण्याची गरज नाही.
खरेतर पुर्वी संन्यासी लोक समाधी घेत असत त्यातुन ही प्रथा आली असावी.

>त्याचबरोबर ती व्यक्ती हयात असतील त्या सर्व जवळच्या नातेवाईकांचे श्राद्ध घालते. उदा. आई वडील बायको मुलं.
मध्यंतरी आमच्या नात्यातल्या एका व्यक्तीने संन्यास घेतला तेव्हा या विधीची निमंत्रण पत्रिका इत्यादि आले होते. फार मोठा समारंभ होता. आई गेली होती.
तीन वर्षांपुर्वी माझी आई गेली. तिने देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिच्याजवळ देहदान हे पुस्तक सही केलेले होते. त्यामुळे मला ते दाखवून इतर नातेवाईकांना पटवता आले व देहदान केले.तसेच नेत्रदानही केले. तशी ती पारंपारिक,धार्मिक व श्रद्धाळू होती. मी कुठलेही धार्मिक अंत्य संस्कार केले नाहीत पण त्या निमित्ताने सिप्ला फाउंडेशनला देणगी दिली.. जर तिने देहदानाची इच्छा व्यक्त केली नसती तर काय करायचे हा प्रश्न माझ्यासमोर होताच. पण या निमित्ताने नातेवाइकांना एक प्रकारचे हे धाडस वाटले. मला या ठिकाणी देहदान हाच मरणोत्तर अंतिम संस्कार मी मानला आहे. मी ही कधीतरी मरणारच आहे. मी मरणोत्तर अवयवदान केले आहे. माझ्यासाठी तोच अंतिम संस्कार असावा असे वाटते.
Submitted by प्रकाश घाटपांडे on 23 January, 2014 - 10:24
प्रकाश घाटपांडे - मीदेखील हे करू इच्छिते. पण घरचे लोक त्यावेळी कसे वागतील माहित नाही.
दिनेशदांनी खूप चांगली माहिती दिली आहे. मी स्वतः हा अनुभव घेतलाय. दिनेशदांनी लिहिलेले वाचता वाचता, तो सगळा प्रसंग डोळ्यासमोरून गेला.
माझ्या वडिलांनी बर्याच लहानपणापासून सांगितले होते, माझ्या नंतर माझे संस्कार तुम्ही दोघींनीच करायचे. आम्हाला तिथल्या गुरुजींनी अडवलं नाही पण नातेवाईकांनी अडवलं. पण आम्ही ऐकलं नाही. आम्हाला वडिलांची इच्छा जास्त महत्वाची होती.
आणि स्मशानात जाऊन वडिलांचे अंत्यसंस्कार केल्याने माझ्या मनावर कोणतेही परिणाम झाले नाहीत. मला एकही रात्र कोणतेही दु:स्वप्न पडले नाही.
स्मशानात जाण्यानंतर होणारे भास, पडणारी स्वप्ने, वाटणारी भीती प्रत्येकाच्या त्या वेळच्या मानसिक स्थितीवरदेखील अवलंबुन आहे.
प्रकाश घाटपांडे - लेख वाचला. लोक अशक्य वागतात आणि त्याचे अशक्य अर्थ लावतात.
माझे वडिल गेले तेव्हा हे विधी करायला माझी तयारी नव्हतीच. माझे म्हणणे असे होते की योग्य रितीने चिता रचून कोणतेही विधी न करता अग्नी द्यावा. त्यावेळी विद्युतदाहिनी जवळपास नव्हती. असल्यास मला तरी माहित नव्हती. शिवाय मी फक्त २० वर्षांची होते. आणि स्मशानातली तयारी करायला नात्यातले मित्र मंडळीतले वयाने मोठा पुरुष वर्ग गेला होता. त्यांनी जे काही केले विधींची तयारी वगैरे ते मला पटले नसले तरी वेळेला माझा भार त्यांनी हलका केला ह्याबद्दल मला त्यांच्याबद्दल आदरच आहे. शिवाय ती वेळ वाद घालण्याची आणि माझे म्हणणे कोणालाही पटवत बसण्याची नव्हती आणि हे सगळे थांबवा असे म्हणून सगळ्यांना कसे पटवायचे हे त्याक्षणी मला सुचलेच नाही. वडिलांचा मृत्यु वेगळ्या शहरात झाला असल्याने तिथे पीएम झाले असल्याने देहाला आंघोळ घालायचा विधी सुदैवाने टाळला.
पण त्यानंतर दुसरे दिवशी अस्थि विसर्जन करताना तिथे कोणतेही भटजी आणू नका आणि काही विधी करू नका हे स्पष्ट सांगितले मी. शिवाय दहावे बारावे काहीच केले नाही. आईची श्रद्धा म्हणून आई कावळ्याला पान ठेवत असे. शिवाय एका ओळखीच्यांनी आईला सांगितलं म्हणून एका महिन्या नंतर एक हवन विधी केला त्यात गायीला पान कावळ्याला पान काढले होते. त्यानंतर वर्षश्राद्ध नाही केले कधीच.
मुळात हे सगळे पटत नसून करण्याचे कारण एकच होते, आईसोबत वाद न घालणे आईला न दुखवणे.
आजही हे सगळे विधी मला अत्यंत इललॉजिकल वाटतात. (तसे मला देवाला दिवा लावणे सुद्धा इललॉजिकल वाटते. - सावरकरांच्या धड्याचा परिणाम.)
तरीसुद्धा आज असे वाटते, स्मशानातले ते विधी करत असताना (वडिलांचा देह पाहिल्यापासूनच त्य देहाबद्दल वाटणार्या भावना, अटॅचमेण्ट कमी झाली होती.) मी अधिकाधिक अलिप्त झाले. एका क्षणाला हमसून हमसून रडावे वाटत असणारी मी पुढच्या काही क्षणात निर्विकार झाले. सर्व विधी होऊन चितेला अग्नी दिल्यानंतर मला बराच वेळ स्मशानात थांबायचे होते, पण सोबतच्या सगळ्यांनी आम्हाला - मला व बहिणीला घरी परत पाठवले.
तीन वर्षापूर्वी माझी आजी - आईची आई गेली तेव्हा ती आमच्या सोबतच राहात होती. रात्री १२.३० वाजता तिचे निधन झाले. त्यावेळी फारसे कोणाला न कळवता, कोणाची वाट पाहात न बसता, डॉ चे सर्टिफिकेट घेऊन पहाटे सादेतीन वाजता विद्युतदाहिनीत अग्निसंस्कार केले. तिथे कोणतेही विधी मंत्र असे काहीही केले नाही. सकाळी अकरा वाजता जाऊन अस्थिविसर्जन केले आणि रोजचे रूटिन सुरू केले.
माझ्या मृत्युनंतरही मला देह्दान करू द्यावे आणि जर ते अशक्य अस्सेल तर माझ्या देहाचेही कोणतेही विधी न करता, विद्युतदाहिनीत अग्निसंस्कार करा असे माझ्या घरच्यांना पटवण्यास मला यश येऊ दे.
माझे वडील गेले त्यावेळी मी,त्यांना हॉस्पिटलमधूनच परस्पर स्मशानात न्यायला सांगितले(अर्थात आईच्या संमतीने) . कारण एकच होते की आईच्या बाबतीत नको ती कृती होऊ नये.तसेच ती भेसूर रडारड कीत्यात दु:ख कमी ,देखावा जास्त आणि हार्टपेशंट असलेल्या आईला अजून काही होऊ नये.हॉस्पिटलमधेच एका नातलग स्त्रीने मंगळसूत्र तोडून एक मणी मृताच्या तोंडात ठेवायला सांगायला सुरुवात केली होती.
पण मी असा निर्णय घेतला तो काहींना आवडला नव्हता.मला वळवायचा प्रयत्नही केला.पण खरच सांगू का त्यावेळी मनात होतं की जाणारा जीव गेला,पण जो राहिला त्याला त्रास होऊ नये! त्यावेळी प्रकर्षाने लक्षात आले की एखादी बाई असा निर्णय घेत असेल तर बरेचजणांना खटकते.
माझ्या एका नातलगामुळे हे सारे करणे सोपे गेले.तसेच वडिलांचे नेत्रदानही त्याच नातलगाच्या मदतीने इतर
कोणालाही न कळू देता करण्यात आले.
वडिलांच्या वर्षश्राध्दाला अनाथालयात जेवण दिले. त्यांचा वाढदिवस, काही सण्,इ.वेळी तिथे पैसे देतो.
देवकी तुम्ही काय निर्णय घेतला असेल अंदाज आला. खूप चाम्गले. आम्ही रिती फॉलो करतो हे दाखवणार्या लोकांना ज्या कुटुंबांवर हा प्रसंग गुजरला आहे त्यांचे काय मत आहे ह्याला किंमत न देण्याची प्रथा आहे. अशांना चपराक मिळणे च योग्य.
माझे सासरे जेल्या नंतरही असाच प्रसंग झाला होता. पण प्रथम आडमुठेपणा करून आणि मग बरेच समजावून सांगितल्यावर टळला.
प्रकाश घाटपांडे - आपल्या आईंचे असे वाटणे हे प्रशंसनीय आहे.
सर्वांनी असेच करावे. मी माझ्या मृत्युपत्रात तसे च लिहीले आहे. सौ. व मुले व सर्व जवळच्या नातलगांना सांगून त्यांची संमति मिळवली आहे. जरी हृदय बंद पडले तरी शरीरातले इतर काही अवयव पुनः वापरण्याजोगे असू शकतात. माझ्या डॉक्टरंशी नि वकीलाशी सल्ला मसलत करूनच हा निर्णय घेतला आहे.
मेल्यावर आत्मा जर देह सोडून जात असेल, नि मग उरते ते निष्प्राण, आत्मा नसलेले शरीर असेल, तर त्यावर कसले कसले संस्कार करण्यात काय अर्थ आहे? मरणोत्तर आत्म्याला गति मिळावी म्हणून जे संस्कार करायचे त्याला त्या निष्प्राण, आत्मा नसलेल्या शरीराची काय गरज?
असे म्हणतात की मृत शरीरातून आत्मा लगेच निघून जात नाही, तो घोटाळत असतो, त्याला गति मिळावी म्हणून मंत्रोपचार विधी असतात. पण ते मृत्यूनंतर काही दिवसांनी करतात, तेंव्हा शरीर तर गेलेलेच असते. मग त्याचा कुणाला उपयोग होणार असेल तर काय वाईट?
श्रद्धा असेल तर ते विधी करावे!
ज्यांना आत्मा इ संकल्पना कळत नाहीत नि शरीरच फक्त कळते ते लोक हसतात असल्या विधीला. पण तसे ते स्वतः काय करतात - दारू पिणे, निरर्थक गोष्टीत वेळ घालवणे यात तरी काय चांगले आहे?
तुम्ही उगाच विचारत आहात काय
तुम्ही उगाच विचारत आहात काय झक्की?? किरवंत म्हणजे स्मशानात देहदहनाचे काम करणारा ब्राह्मण..
<<तुम्ही उगाच विचारत आहात काय
<<तुम्ही उगाच विचारत आहात काय झक्की?? >>
नाही. हा शब्द मला कधीच माहित नव्हता. इतर माहित असलेले शब्द, चालीरीति यांचा सुद्धा विसर पडला आहे. पूर्वी त्याबद्दल वाईट वाटत असे.
आजकाल भारतातले मायबोलीकर जे काय लिहीतात, त्यावरून, भारताबद्दल इथे प्रश्न विचारू नयेत हे कळले.
अजूनहि माझ्या प्रश्नातला एक भाग अनुत्तरित आहे, पण जर कुणि भारतातले लोक उत्तर देणार असतील, तर त्यांनी तसदी घेऊ नये, ही विनंति.
याच विषयावर श्रीराम लागू
याच विषयावर श्रीराम लागू अभिनित नाटकही आले होते.
याच म्हणजे 'किरवंत' या
याच म्हणजे 'किरवंत' या विषयावर -लेखक प्रेमानंद गज्वी.
मंत्र वगैरे काय म्हणतात, ते
मंत्र वगैरे काय म्हणतात, ते माहित नाही. पण आपल्या मधे (हिंदू ) बर्याच प्रथा पाळल्या जातात.
नाकात कानात कापूस घालतात. (कधी कधी मेंदू विरघळायला लागल्यामूळे, नाकातून कानातून पाणी येऊ शकते. ) पायाचे दोन्ही अंगठे घट्ट बांधतात. (जर देह कडक व्हायला लागला तर पाय ताठ होऊन तिरडीवर देह ठेवणे कठीण जाते. ) तूप गरम करुन, त्यात हळ्द घालून ती टाळूला व तळव्याना चोळतात.
घरात बर्याच उदबत्त्या लावतात.
तिरडी हि आयत्यावेळीच बांधतात. दोन बांबूना आडव्या कामट्या घट्ट बांधतात. मग त्यावर ताटी टाकून त्यावर मांजरपाट बांधतात. देहाला पूर्ण आधार मिळावा, अश्या रितीनेच हि तिरडी बांधलेली असते.
एका मडक्यात कोळसे पेटवून, ते बांबूच्या तिकोन्यावर सूतळीने बांधतात. हि हातात धरून, तिरडीसमोर शक्यतो, मुलगा चालत असतो.
तिरडिचे, वजन जरा जास्तच असते, आणि ती खांद्यावर पेलणे कठीण असते. (म्हणून शक्यतो हल्ली अॅम्ब्यूलन्समधून नेतात. )
तिरडीवर ठेवण्यापूर्वी, देहाला एकदा कडकडीत गरम व थंडगार पाण्याने अंघोळ घालतात. माणूस जिवंत असेल, तर यावेळी त्याला जाग यावी (शुद्ध यावी ) अशी अपेक्षा असते.
एका नारळाचा, एक डोळा फोडून त्यातले पाणी, जवळच्या सर्वानी मृतदेहाच्या तोंडात घालायची देखील प्रथा आहे.
देह बाहेर नेल्याबरोबर घरातला कचरा काढला जातो (एरवी कुठलाहि माणूस घराबाहेर पडल्यावर, असे करत नाहीत. ) जिथे देह ठेवला होता, तिथे थोडे पिठ पसरुन त्यावर दिवा लावतात.
स्मशानात जाताना, मुद्दाम एका दगडाला ठेच मारतात, व तो दगड जपून आणतात.
गेटवर मेडीकल सर्टिफिकेट दाखवल्याशिवाय, देह जाळायची परवानगी मिळत नाही.
चिता रचण्याचे काम तिथले कर्मचारीच करतात. देह बघून किती मण लाकूड लागेल, हे त्याना कळते. काही ठिकाणी हे सरण विनामोबदला मिळते.
चितेवर देह, तिरडीवरुन उचलून ठेवतात.
आणलेल्या मडक्यात पाणी भरुन, त्याला तीन भोके पाडतात व ते मडके खांद्यावर ठेवून चितेला प्रदक्षिणा घालतात. त्या पुर्ण झाल्या, की मागे न बघता, ते मडके खांद्यावरून खाली टाकतात. मग त्याचे तूकडे करतात. सोबत शिजवलेला भात आणलेला असतो, त्यात माती कालवतात, व तो फेकून देतात.
देहाच्या तोंडात गूजभर तरी सोने घालतात व तूळशीचे पान ठेवतात.
चिता पोकळ रचलेली असल्याने व्यवस्थित पेटते. मग त्यावरून दोनतीनदा तिरडी फिरवतात. ती खिळखिळी करुन मोडतात, आणि चितेतच टाकतात.
चिता जळताना, प्रचंड दुर्गंधी पसरते. आणि काहि वेळाने कवटी फुटते. त्यावा आवाज येतो. निदान एक दोघानी तरी, तोपर्यंत थांबायचे असते. घरी आल्यावर दाराबाहेरच डोक्यावर व पायावर पाणी टाकतात.
त्यादिवशी घरात अन्न शिजवत नाहीत. पण शेजार्यानी पिठले भात शिजवून आणून द्यायचा असतो. त्याना उपाशी ठेवत नाहीत. आलेले नातेवाईक, त्या रात्री थांबत नाहीत. थांबले तर पुढे दहा दिवस रहावे लागते.
अस्थि गोळा करायला मात्र दुसर्या दिवशी जावे लागते. तोपर्यंत स्मशानातील लोक, राख जपून ठेवतात.
मी हे मुद्दाम सविस्तर लिहिलेय, कारण माझ्यावर असे प्रसंग ज्यावेळी आले, त्यावेळी मला या सगळ्याची कल्पना नव्हती. या सगळ्यामागे काय समजूती आहेत, ते मला माहीत नाही. पण एकदंर हा अनुभव, काहि चांगला असतो असे मला वाटत नाही.
मृत्यू म्हणजे भौतिक शेवट. त्यानंतर उरणे ते केवळ आप्तांच्या आठवणीत. तेच खरे. आत्मा वगैरे मी मानत नाही. एकदा मृत्यू झाला, कि त्या देहाशी काही मानसिक बांधीलकी ठेवावी असे मला वाटत नाही, त्या व्यक्तिच्या, जिवंतपणीच्या आठवणी जपणे, हे मला जास्त महत्वाचे वाटते.
देह मृत पावला, तर डोळे आणि त्वचा दान करता येते. हि काढल्याने मृतदेहाला कुठलीही विदृपता येत नाही. अपघाती मृत्यू आल्यास, इतरही अवयव दान करता येतात. देहदान तर आहेच.
याबाबतीत आपल्याकडे अजूनही जाण नाही. जिवंतपणी फॉर्म जरी भरला असला, तरी जवळच्या नातेवाईकांनी त्याचे भान ठेवून, योग्य त्या ठिकाणी त्वरीत संपर्क साधणे गरजेचे असते. वारंवार हि इच्छा घरात बोलून दाखवणे गरजेचे आहे.
त्यात अशूभ असे काहिच नाही. मृत्यू हे अटळ सत्य आहे. ते स्वीकारणे गरजेचे आहे. (न स्विकारल्याने ते बदलत नाही.)
आपला धर्म तेच संगतो ना ? कि मृत्यू म्हणजे आत्म्याचे कपडे बदलणे वगैरे. मग वापरलेल्या कपड्याबाबत ओढ का, जितक्या सहजतेने आपण नको असलेले कपडे इतराना (गरजूना ) देतो, तसे इथे का करु नये ?
मृत्यू म्हणजे भौतिक शेवट.
मृत्यू म्हणजे भौतिक शेवट. त्यानंतर उरणे ते केवळ आप्तांच्या आठवणीत. तेच खरे. आत्मा वगैरे मी मानत नाही. एकदा मृत्यू झाला, कि त्या देहाशी काही मानसिक बांधीलकी ठेवावी असे मला वाटत नाही, त्या व्यक्तिच्या, जिवंतपणीच्या आठवणी जपणे, हे मला जास्त महत्वाचे वाटते.
---- वा दिनेशदा... शेवटच्या परिच्छेदातील विचार मला आवडले, पटले.
१५ वा अध्याय आणि भडाग्नी
१५ वा अध्याय आणि भडाग्नी यांचा काय संबंध हे माहीत नाही... पण ही पद्धत आहे. १५ वा अध्याय तसा बर्याच लोकाना अर्थासह माहीत असतो, म्हणून प्रथा पडली असेल.. ( महाभारतच्या पूर्वी १५ वा अध्याय नव्हता, तेंव्हा लोक काय म्हणत होते, आता हा प्रश्न पडू नये..
)
दिनेशदा माहितीपूर्ण पोस्ट.
दिनेशदा माहितीपूर्ण पोस्ट. अतिशय संयत शब्दात लिहीले आहे. पट्ले सुद्धा. ह्या फॉरमॅलिटीज पूर्ण करून मग घरच्यांनी वैयक्तिक लेवल वर आपले दु:ख प्रोसेस करावे असे मला वाट्ते. ती तीव्रता बाहेरच्यांना समजतेच असे नाही. शिवाय भेटायला येणार्यांनी जेवायच्या वेळेस वगैरे जावू नये.
डेड बॉडीस दक्षिण दिशेस पाय करून ठेवतात. त्या मागे पण काही शास्त्र आहे.
मामी दक्षिण दिशा यमाची,
मामी दक्षिण दिशा यमाची, म्हणून तसे ठेवायचे. एरवी (जिवंतपणी) तसे झोपायचे नसते.
आपल्याकडे असा एखादा दिवस ठरवत नाहीत, ज्याला जशी सवड मिळेल तसे येत राहतो, आणि परत परत तेच ते उगाळले जाते. घरच्याना सावरायचा अवधीच मिळत नाही. काहि समाजात कसे, एखादा दिवस ठरवून, त्याच दिवशी सगळे भेटायला जातात.
एक लिहायचे राहिलेच, एकदा निधन झाल्याबरोबर त्या देहाला आपण त्रयस्थपणे, बॉडी, मयत, वगैरे म्हणू लागतो. मग हि मानसिकता, बाकिच्या बाबीत का उतरत नाहि ?
झक्की, पन्धराव्या अध्यायाच्या
झक्की, पन्धराव्या अध्यायाच्या अर्थाशी याचा सम्बन्ध आहे! (या क्षणी अध्याय अन अर्थ, दोन्हीही आठवत नाही, सबब सविस्तर पोस्टत नाही)
पण हा अध्याय, केवळ किरवन्त (?) - ब्राह्मण उपलब्ध नाही किन्वा केवळ भडाग्निच्या वेळेसच म्हणला जातो असे नाही! एरवी देखिल उपस्थित जन, व "अधान्तरी तरन्गत असलेले प्रेतात्मे" यान्चे श्रवणासाठी तो म्हणला जातो
महाभारतापूर्वी १५ वा अध्याय
महाभारतापूर्वी १५ वा अध्याय नव्हता.. मग त्याकाळात प्रेतात्मे तरंगत नसायचे का?
दिनेशदा घरात अन्न शिजवत नाहीत
दिनेशदा
घरात अन्न शिजवत नाहीत याचे कारण असे आहे की त्यादिवशी घरातले कोणीही जेवण बनवण्याच्या किंवा ते खाण्याच्या मनःस्थितीत नसते. म्हणून शेजारी किंवा जे नातेवाईक जवळ राहात असतील त्यांनी पिठलं भात देण्याची प्रथा आहे. त्यात सुद्धा पिठलं भात करायला सोपा असतो म्हणून हा पदार्थ.
आणि तेरा दिवस सूतक पाळ्तात त्याचं कारण साधारण १२ -१३ दिवसात माणूस धक्क्यातून सावरतो व आपली कामे पूर्ववत सुरु करु शकतो अशी १ धारणा आहे. अर्थातच हा वेळ व्यक्ती सापेक्ष आहे पण १२-१३ दिवस हे प्रमाण मानले आहे. बाकीच्या विधींबद्द्ल फारशी माहिती नाही.
येथील बऱ्याच प्रश्नांची
येथील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे "शास्त्र असे सांगते" या पुस्तकात आहेत. (मुख्यत्वे जाळावे का ? या प्रश्नाचे)
दहनविधि किंवा अंत्यसंस्कार
दहनविधि किंवा अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार स्त्रीयांना नाही वगैरे आजच्या काळात निव्वळ थोतांड वाटतं. पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांचं आणि पुरोहीत वर्गाचं वर्चस्व सातत्यानं प्रस्थापित करण्यासाठी अशा चालीरिती हेतुतः रूढ केल्या गेल्या असाव्यात. ज्यांचे विचार आणि आचार असल्या कूपमंडूक आणि बुरसट वृत्तींपासून मुक्त झाले आहेत त्यांनी 'पुरुषी आणि पुरोहीत प्रस्रृत शास्त्रार्था'कडे साफ दुर्लक्ष करावं, हे बरं.
म. ज्योतिबा फुले वारले तेंव्हा यशवंतला - त्यांच्या दत्तक मुलाला [तो जातीबाहेरचा, त्यातून कुमारी मातेला झालेला म्हणून ] त्यांच्या तिरडीला हात सुद्धा लावू द्यायला नातेवाईकांनी कसून विरोध केला. हा वाद खूप रंगला आणि स्थिती हाताबाहेर जाऊ लागली. शेवटी सावित्रीबाईंनी आपलं दु:ख बाजूला सारलं, आपल्या हातात अग्नी घेतला आणि संस्थेतल्या चार कार्यकर्त्यांना तिरडी उचलायला सांगीतली. त्या स्वतः तिरडीपुढे चालत निघाल्या आणि नंतरचा अग्नि-संस्कारही त्यांनीच केला अशी इतिहासाची साक्ष आहे! हे धाडस त्या काळात सावित्रीबाईंनी दाखवलं पण त्यातून आमच्या समाजानं कोणता बोध घेतला? आजही आम्ही त्याच गोष्टींची चर्चा करून शिळ्या कढीला उत आणत बसणार आहोत का? शास्त्र-वचनांचं उल्लंघन करून ज्योतिबा फुल्यांचा अग्नि-संस्कार झाला म्हणून त्या मृतात्म्याचं काय बरं-वाईट झालं? उलट आजही आम्ही त्यांना 'महात्मा' मानतो.
कुणाला परंपरा आणि रूढी जपायच्याच असतील तर आधुनिक आणि पुरोगामी विचारांचा स्वीकार करणारा पुरोहीत बघावा, आणि ज्याची किंवा जिची अंत्यसंस्कार करण्याची इच्छा असेल त्या व्यक्तिनं प्राप्त काल- परीस्थितीनुसार अग्नी-संस्कार करावा. पुराणकालीन एखाद्या शास्त्र-नियमाचा किंवा वचनाचा भंग तर होत नाही ना आणि तसं झालं तर मग काय प्रायश्चित्त घ्यावं लागणार असल्या चिंता करू नयेत. हिंदु धर्म अतिशय उदार आणि सर्वसमावेशक आहे, कालमान-परीस्थितीनुसार बदलण्याची लवचिकता त्यात आहे. आपल्या भावना, विचार आणि हेतु विशुद्ध असतील तर कशालाच हिंदु धर्माची आडकाठी येत नाही.
ज्यांचा अंत्य-संस्कार या प्रकारावर मुळातच विश्वास नाही त्यांनी कोणतेही 'संस्कार' न करता शक्यतेनुसार विद्युत-चितेवर प्रेत-दहन करावं. कारण, गेलेली व्यक्ति विकार आणि वासना यातून आधीच मुक्त झालेली असते. तुम्ही कुणाच्याही हाताने दहन करा; किंवा दफन करा; मंत्र म्हणा अगर म्हणू नका; गंगेत अस्थि-विसर्जन करा किंवा करू नका; सुतक पाळा अथवा पाळू नका; श्राद्ध घाला अगर घालू नका; अवयवांचं दान करा किंवा करू नका - त्या मयत व्यक्तीला त्याचं काहीच सोयर-सुतक उरलेलं नसतं. हे सगळे प्रश्न मागे राहिलेल्या आप्तेष्टांचे असतात.
जहाजाने प्रवास करताना अपघात झाला तर अनेकांना जलसमाधी मिळते. त्यांची प्रेतंही हाती लागत नाहीत. किंवा युद्धात हजारो सैनिक म्रुत्युमुखी पडतात. त्या सर्वांवर कुठे विधिवत अंत्यसंस्कार होतात? काही वेळा बेवारशी प्रेतांची विल्हेवाट लावण्याची वेळ म्युनिसिपालिटीवर येते. तेंव्हा कसले विधी होतात आणि कोणते आप्त ते करतात? म्हणून काही त्या मृतात्म्यांना गती किंवा मुक्ती मिळायची थांबते का?
माझ्या मते, मानवी जीवनावरचा अंतिम संस्कार म्हणजे मृत्यु. त्यापुढे सगळा आप्तेष्टांच्या भावना आणि श्रद्धेचा भाग. भावनांची अभिव्यक्ति किंवा श्रद्धा यांना कोणत्याही शास्त्र, नियम, रूढी यांच्या चौकटीत बंदिस्त करण्याची गरज नसावी. परंपरेने काही चाली-रीती चालत आल्या आहेत. आपल्या मानसिक समाधानाखातर, आपल्या इच्छेनुसार आणि सोयीनुसार, त्यांचं पालन हवं तर अवश्य करावं पण त्या चौकटींचा कोणी उगाच बाऊ करू नये किंवा अट्टाहास धरू नये. शेवटी, चौकटी आपल्यासाठी आहेत, आपण त्यांच्यासाठी नाही आणि त्या चौकटी आपल्यासारख्या माणसांनीच बनवलेल्या आहेत; आपण त्या गरजेनुसार वाकवू किंवा मोडू शकतो.
- प्रभाकर [बापू] करंदीकर.
लिंबुचाचा शीर्षकाबाबत शंका :
लिंबुचाचा शीर्षकाबाबत शंका : अंतिमसंस्कार मरणोत्तरच असतात ना ?
http://www.vicharatar.com/dha
http://www.vicharatar.com/dharmik.html#
<<.>>>>> लिंबुचाचा
<<.>>>>> लिंबुचाचा शीर्षकाबाबत शंका : अंतिमसंस्कार मरणोत्तरच असतात ना ?<<<
सामान्य माणसाचे बाबतीत अंतिमसंस्कार मरणोत्तरच असतात,
मात्र कोणा सामान्य माणसास जर विधीवत "सन्यास" घ्यायचा असेल, तर स्वतःचेच "अंतिमसंस्कार" संस्कार त्याचे स्वतःचे 'जिवन्तपणीच' करावे लागतात. म्हणूनच शीर्षकामधे "मरणोत्तर" हा शब्द घातला असे.
अरेच्चा ! असेही (अ)साधारण
अरेच्चा ! असेही (अ)साधारण मानव असतात तर !!!
धन्यवाद लिंबूचाचा
आहेत, आहेत! अजून लिंबाजीराव
आहेत, आहेत! अजून लिंबाजीराव आहेत. धाग्यांवर उत्तरे ही देतात असे दिसते.
संन्यास घेण्याच्या विधीमधे
संन्यास घेण्याच्या विधीमधे स्वतःच स्वतःचे श्राद्ध करावयाचे असते.
अशा व्यक्तीच्या मृत्युनंतर नातेवाईकांना सुतक नसते तसेच कोणतेही दिवस इ. करण्याची गरज नसते.
तसेच या प्रकारात दहन न करता दफन करतात,
कारण जी व्यक्ती ज्ञानाने आधीच दग्ध झालेली आहे त्याला प्रत्यक्ष दहन करण्याची गरज नाही.
खरेतर पुर्वी संन्यासी लोक समाधी घेत असत त्यातुन ही प्रथा आली असावी.
संन्यास घेण्याच्या विधीमधे
संन्यास घेण्याच्या विधीमधे स्वतःच स्वतःचे श्राद्ध करावयाचे असते.
>त्याचबरोबर ती व्यक्ती हयात असतील त्या सर्व जवळच्या नातेवाईकांचे श्राद्ध घालते. उदा. आई वडील बायको मुलं.
मध्यंतरी आमच्या नात्यातल्या एका व्यक्तीने संन्यास घेतला तेव्हा या विधीची निमंत्रण पत्रिका इत्यादि आले होते. फार मोठा समारंभ होता. आई गेली होती.
तीन वर्षांपुर्वी माझी आई
तीन वर्षांपुर्वी माझी आई गेली. तिने देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिच्याजवळ देहदान हे पुस्तक सही केलेले होते. त्यामुळे मला ते दाखवून इतर नातेवाईकांना पटवता आले व देहदान केले.तसेच नेत्रदानही केले. तशी ती पारंपारिक,धार्मिक व श्रद्धाळू होती. मी कुठलेही धार्मिक अंत्य संस्कार केले नाहीत पण त्या निमित्ताने सिप्ला फाउंडेशनला देणगी दिली.. जर तिने देहदानाची इच्छा व्यक्त केली नसती तर काय करायचे हा प्रश्न माझ्यासमोर होताच. पण या निमित्ताने नातेवाइकांना एक प्रकारचे हे धाडस वाटले. मला या ठिकाणी देहदान हाच मरणोत्तर अंतिम संस्कार मी मानला आहे. मी ही कधीतरी मरणारच आहे. मी मरणोत्तर अवयवदान केले आहे. माझ्यासाठी तोच अंतिम संस्कार असावा असे वाटते.
प्रकाश घाटपांडे - मीदेखील हे
प्रकाश घाटपांडे - मीदेखील हे करू इच्छिते. पण घरचे लोक त्यावेळी कसे वागतील माहित नाही.
दिनेशदांनी खूप चांगली माहिती दिली आहे. मी स्वतः हा अनुभव घेतलाय. दिनेशदांनी लिहिलेले वाचता वाचता, तो सगळा प्रसंग डोळ्यासमोरून गेला.
माझ्या वडिलांनी बर्याच लहानपणापासून सांगितले होते, माझ्या नंतर माझे संस्कार तुम्ही दोघींनीच करायचे. आम्हाला तिथल्या गुरुजींनी अडवलं नाही पण नातेवाईकांनी अडवलं. पण आम्ही ऐकलं नाही. आम्हाला वडिलांची इच्छा जास्त महत्वाची होती.
आणि स्मशानात जाऊन वडिलांचे अंत्यसंस्कार केल्याने माझ्या मनावर कोणतेही परिणाम झाले नाहीत. मला एकही रात्र कोणतेही दु:स्वप्न पडले नाही.
स्मशानात जाण्यानंतर होणारे भास, पडणारी स्वप्ने, वाटणारी भीती प्रत्येकाच्या त्या वेळच्या मानसिक स्थितीवरदेखील अवलंबुन आहे.
मला या निमित्ताने शिव शिव रे
मला या निमित्ताने शिव शिव रे काऊ। हा पिंडाचा घेई खाऊ। या यनावाला यांच्या उपक्रमावरील लेखाची आठवण झाली. जिज्ञासूंना नक्की वाचण्यासारखी चर्चा आहे.
प्रकाश घाटपांडे - लेख वाचला.
प्रकाश घाटपांडे - लेख वाचला. लोक अशक्य वागतात आणि त्याचे अशक्य अर्थ लावतात.
माझे वडिल गेले तेव्हा हे विधी करायला माझी तयारी नव्हतीच. माझे म्हणणे असे होते की योग्य रितीने चिता रचून कोणतेही विधी न करता अग्नी द्यावा. त्यावेळी विद्युतदाहिनी जवळपास नव्हती. असल्यास मला तरी माहित नव्हती. शिवाय मी फक्त २० वर्षांची होते. आणि स्मशानातली तयारी करायला नात्यातले मित्र मंडळीतले वयाने मोठा पुरुष वर्ग गेला होता. त्यांनी जे काही केले विधींची तयारी वगैरे ते मला पटले नसले तरी वेळेला माझा भार त्यांनी हलका केला ह्याबद्दल मला त्यांच्याबद्दल आदरच आहे. शिवाय ती वेळ वाद घालण्याची आणि माझे म्हणणे कोणालाही पटवत बसण्याची नव्हती आणि हे सगळे थांबवा असे म्हणून सगळ्यांना कसे पटवायचे हे त्याक्षणी मला सुचलेच नाही. वडिलांचा मृत्यु वेगळ्या शहरात झाला असल्याने तिथे पीएम झाले असल्याने देहाला आंघोळ घालायचा विधी सुदैवाने टाळला.
पण त्यानंतर दुसरे दिवशी अस्थि विसर्जन करताना तिथे कोणतेही भटजी आणू नका आणि काही विधी करू नका हे स्पष्ट सांगितले मी. शिवाय दहावे बारावे काहीच केले नाही. आईची श्रद्धा म्हणून आई कावळ्याला पान ठेवत असे. शिवाय एका ओळखीच्यांनी आईला सांगितलं म्हणून एका महिन्या नंतर एक हवन विधी केला त्यात गायीला पान कावळ्याला पान काढले होते. त्यानंतर वर्षश्राद्ध नाही केले कधीच.
मुळात हे सगळे पटत नसून करण्याचे कारण एकच होते, आईसोबत वाद न घालणे आईला न दुखवणे.
आजही हे सगळे विधी मला अत्यंत इललॉजिकल वाटतात. (तसे मला देवाला दिवा लावणे सुद्धा इललॉजिकल वाटते. - सावरकरांच्या धड्याचा परिणाम.)
तरीसुद्धा आज असे वाटते, स्मशानातले ते विधी करत असताना (वडिलांचा देह पाहिल्यापासूनच त्य देहाबद्दल वाटणार्या भावना, अटॅचमेण्ट कमी झाली होती.) मी अधिकाधिक अलिप्त झाले. एका क्षणाला हमसून हमसून रडावे वाटत असणारी मी पुढच्या काही क्षणात निर्विकार झाले. सर्व विधी होऊन चितेला अग्नी दिल्यानंतर मला बराच वेळ स्मशानात थांबायचे होते, पण सोबतच्या सगळ्यांनी आम्हाला - मला व बहिणीला घरी परत पाठवले.
तीन वर्षापूर्वी माझी आजी - आईची आई गेली तेव्हा ती आमच्या सोबतच राहात होती. रात्री १२.३० वाजता तिचे निधन झाले. त्यावेळी फारसे कोणाला न कळवता, कोणाची वाट पाहात न बसता, डॉ चे सर्टिफिकेट घेऊन पहाटे सादेतीन वाजता विद्युतदाहिनीत अग्निसंस्कार केले. तिथे कोणतेही विधी मंत्र असे काहीही केले नाही. सकाळी अकरा वाजता जाऊन अस्थिविसर्जन केले आणि रोजचे रूटिन सुरू केले.
माझ्या मृत्युनंतरही मला देह्दान करू द्यावे आणि जर ते अशक्य अस्सेल तर माझ्या देहाचेही कोणतेही विधी न करता, विद्युतदाहिनीत अग्निसंस्कार करा असे माझ्या घरच्यांना पटवण्यास मला यश येऊ दे.
माझे वडील गेले त्यावेळी
माझे वडील गेले त्यावेळी मी,त्यांना हॉस्पिटलमधूनच परस्पर स्मशानात न्यायला सांगितले(अर्थात आईच्या संमतीने) . कारण एकच होते की आईच्या बाबतीत नको ती कृती होऊ नये.तसेच ती भेसूर रडारड कीत्यात दु:ख कमी ,देखावा जास्त आणि हार्टपेशंट असलेल्या आईला अजून काही होऊ नये.हॉस्पिटलमधेच एका नातलग स्त्रीने मंगळसूत्र तोडून एक मणी मृताच्या तोंडात ठेवायला सांगायला सुरुवात केली होती.
पण मी असा निर्णय घेतला तो काहींना आवडला नव्हता.मला वळवायचा प्रयत्नही केला.पण खरच सांगू का त्यावेळी मनात होतं की जाणारा जीव गेला,पण जो राहिला त्याला त्रास होऊ नये! त्यावेळी प्रकर्षाने लक्षात आले की एखादी बाई असा निर्णय घेत असेल तर बरेचजणांना खटकते.
माझ्या एका नातलगामुळे हे सारे करणे सोपे गेले.तसेच वडिलांचे नेत्रदानही त्याच नातलगाच्या मदतीने इतर
कोणालाही न कळू देता करण्यात आले.
वडिलांच्या वर्षश्राध्दाला अनाथालयात जेवण दिले. त्यांचा वाढदिवस, काही सण्,इ.वेळी तिथे पैसे देतो.
देवकी तुम्ही काय निर्णय घेतला
देवकी तुम्ही काय निर्णय घेतला असेल अंदाज आला. खूप चाम्गले. आम्ही रिती फॉलो करतो हे दाखवणार्या लोकांना ज्या कुटुंबांवर हा प्रसंग गुजरला आहे त्यांचे काय मत आहे ह्याला किंमत न देण्याची प्रथा आहे. अशांना चपराक मिळणे च योग्य.
माझे सासरे जेल्या नंतरही असाच प्रसंग झाला होता. पण प्रथम आडमुठेपणा करून आणि मग बरेच समजावून सांगितल्यावर टळला.
माझ्या देहाचेही कोणतेही विधी
माझ्या देहाचेही कोणतेही विधी न करता, विद्युतदाहिनीत अग्निसंस्कार करा असे माझ्या घरच्यांना सांगून ठेवले आहे.
मलापण देहदान करण्याची इच्छा
मलापण देहदान करण्याची इच्छा आहे. मीपण माझे कोणतेही विधी करायचे नाहीत असे माझ्या नवऱ्याला आणि जवळच्या नातेवाईकांना सांगितले आहे.
प्रकाश घाटपांडे - आपल्या

Pages