मरणोत्तर अन्तिमसन्स्कारान्चे अनुभव व त्यावरील भाष्य

Submitted by limbutimbu on 18 June, 2009 - 04:15

मरणोत्तर अन्तिमसन्स्कारान्चे अनुभव व त्यावरील भाष्य

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> वर्ष श्राद्ध ज्ञान प्रबोधिनी कडून करणे कितपत योग्य? <<<<

याचे उत्तर "हो" व "नाही" असे दोनही आहे.

१) हो उत्तर, तर तसे का हवे?
सध्या अंतिम श्राद्धादिक क्रियाकर्मे करणारे भटजी, शहरातून अवाच्च्या सवा दक्षिणा घेतात. त्यामुळे नको ते श्राद्ध/नको तो धर्म अशी कित्येकांची अवस्था होते. भीक नको, पण हा धर्म आवरा म्हणायची वेळ येते. मी स्वतः या अनुभवातुन गेलो आहे. माझे आईचे क्रियाकर्माचे वेळेसच, चालु "दरानुसार" दक्षिणा देणे मला अशक्यप्राय होते, तेव्हा स्वतः पुस्तकावरुन करावे, किंवा ज्ञानप्रबोधिनीवाल्यांना बोलवावे हा विचार केला होता. सरतेशेवटी पैशांची व्यवस्था झाली, अन सर्व अंतिमकर्म धार्मिक पद्धतीने केले.
पण मग, पैशाचे/वेळेचे/तत्सम अडचणींमुळे, काहीच नको करायला, याचे ऐवजी, करतोय, तर निदान ज्ञानप्रबोधिनी पद्धतीने केले जात असेल, तर कुणाला हरकत नसावी.

२) नाही उत्तर, तर तसे का नको?
मी व्यक्तिशः , परंपरागत मंत्रोच्चार सोडून अन्य "भावात्मक" शब्द/वाक्ये/गीतेतील वगैरे श्लोक उच्चारुन/लेक्चर्स देत" अशी कृत्ये करण्याच्या विरोधी आहे. दुसरे असे की प्रचलित मंत्र हजारो वर्षांपासुन लाखो ऋषिमुनिभटजी यांचे तोंडुन त्यांचे पुरश्चरण झाल्याने त्या मंत्रास एक प्रकारची ताकद प्राप्त झालेली आहे अशी श्रद्धा आहे.
तेव्हा एक तर अचूक धर्मशास्त्राप्रमाणे करा, अन्यथा, तडजोडच करायची तर ती देखिल संपुर्णतः काहीही न करता करा.
ज्ञानप्रबोधिनीने रचलेले "धार्मिक विधी" धर्मशास्त्राच्या कसोटीवर किती उतरतील याबाबत मी स्वतः साशंक असल्याने माझे हे मत बनलेले आहे. तरीही, कुणास त्या पद्धतीने जायचे असल्यास, त्यास विरोध करण्याचेही कारण दिसत नाही, कारण हिंदू धर्मात कोणत्याही पुरोहित/अर्पणद्रव्ये वगैरेच्या अभावात, केवळ नदीकाठी जाऊन पाण्याचे तर्पण पूर्ण श्रद्धेने केल्यास ते देखिल तितकेच परिणामकारक असते असे मानले गेले आहे. किंबहुना, जर व्यवस्था झाली नसती, तर माझ्या आईचे क्रियाकर्मही मला स्वतःला "पुस्तक समोर" ठेवुन करावे लागले असते, व मी तसे केलेच असते, तयारी केली होती. (मात्र ज्ञानप्रबोधिनी पद्धतीने नक्कीच करणार नव्हतो)
इतकेच काय, तर आद्य श्रीशंकराचार्यांची त्यांचे आईच्या अंतिमविधीबाबतची कथाही प्रसिद्ध आहे, जिथे आद्य श्री शंकराचार्य तसे करु शकले/धजले, तिथे आपल्यासारख्या पामरांची काय कथा?

तेव्हा, प्राप्त परिस्थितीप्रमाणे, जे शक्य असेल, ते करावे, इतकेच.

धन्यवाद लिंबूटींबू काका... माझ्या एका ओळखीतल्यांनी सांगितले पण ते कितपत योग्य आहे काहिच कळत नव्हते. तसेच तुम्ही म्हणता तसा आर्थीक आणि मनुष्यबळ कमी असे दोन्ही आहे. त्यामुळे काय करावे कळत नाहिय.

वर्षश्राद्धासंबंधी एक प्रश्न विचारला गेला आहे, त्यावरून हा धागा आठवला. योगायोगाने तिथे जो प्रश्न आहे त्यासंबंधीचेच विवेचन वरच्या मोठ्या प्रतिसादात आहे.
तिथे आलेल्या एका प्रतिसादावरून लहानपणी किशोर मासिकात वाचलेली एक गोष्ट आठवली.
एका माणसाच्या आईच्या श्राद्धाच्या वेळी भटजी तिची काही इच्छा अपुरी राहिली होती का असे विचारतात. तिला मोसम नसल्याने आंबे खाता आले नव्हते. तेव्हा सोन्याचे आंबे करून ब्राह्मणांना दान करा असा मार्ग दाखवला जातो. ही गोष्ट अर्थातच राजा किंवा तत्सम माणसाच्या कानी पोचते. तो आपल्या आईच्या श्राद्धासाठी त्याच भटजींना बोलावतो. त्याच्या आईला पाठदुखी कंबरदुखीचा भयंकर त्रास होता आणि लोखंडी सळ्या तापवून तिथे डाग द्यावेत म्हणजे तरी ती वे दना कमी होईल अशी म्हणे तिची इच्छा होती. पण आईला कसं डागायचं म्हणून ती अपुरी राहिली होती. पुढचं सांगत नाही.

का हो, मरणार्‍या माणसाला काही पूर्व सूचना मिळते का? जसे माझ्या स्वप्नात माझे २० वर्षांपूर्वी दिवंगत झालेले आई वडील येतात, मी म्हणतो त्यांना मी येतो, ते काही काही कारणे काढतात. मग मी जागा होतो.

Pages