नॅचरल्स आइस्क्रीम आता घरच्या घरी

Submitted by मुग्धटली on 18 September, 2013 - 02:20
natural icecream
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

साहित्यः
दुध - १ वाटी/कप,
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप,
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप,
आवडत्या फळाचा गर/पल्प - १ वाटी/कप,
साखर - चवीनुसार,

क्रमवार पाककृती: 

वरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेउन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते.

वैशिष्ट्य : पूर्ण कृतीमध्ये पाण्याचा वापर अजिबात नसल्याने आइस्क्रीममध्ये बर्फाचे खडे होत नाहित व चव अगदी नॅचरल्सचे आइस्क्रीम्स खाल्ल्यासारखी लागते.

अधिक टिपा: 

टिप : फळाच्या गरामध्ये पाण्याचा अंश असलेली फळे (संत्र, मोसंब, कलिंगड इ.) घेउ नयेत. घट्ट गराची फळे (आंबा, सीताफळ, चिकु, स्ट्रॉबेरी, पपई) घ्यावीत.

माहितीचा स्रोत: 
नणंदबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुग्धा, तू संपादकांना विचार पण आधी इथेच दिलेली पाकृ देण्यापेक्षा तुझ्या पोतडीत असेल की अजून काही असच करायला सोप्पं आणि लागायला टेस्टी असलेलं काहीतरी, ते दे पाठवून हे अर्थात माझं मत (अप्रकाशीत साहित्य जनरली देतात दिवाळी अंकासाठी त्यातून तू संपादकांना विचार)

परवा कॅनमधला आंबा वापरुन केलेले आईस्क्रीम अगोड झाले होते आणि आंब्याचा खास असा स्वाद त्यात नव्हता म्हणून ते बाहेर काढुन पातळ झाल्यावर त्यात साखर, वेलची पूड घालून मिक्सरमध्ये एकदा फिरवले आणि पिस्ते घालून परत सेट केले! अप्रतिम कुल्फी तयार!

ही नाही चालणार मुग्धा दिवाळीअंकासाठी. दिवाळीअंकात फक्त अप्रकाशित साहित्य घेतलं जातं.

.

आज मी स्ट्रॉबेरीचे करून पाहते. कालच ताज्या स्ट्रॉबेरी आणल्यात.

हा सेट व्हायच्या आधीचा फोटो

icecream_0.JPG

नंतर खाण्यात इतके मग्न झालो की फोटो काढायचा राहून गेले. अप्रतिम चव आली होती. धन्यवाद !
आता मँगो करून पाहणार नेक्स्ट टाईम.

काल सिताफळ घालून आईस्क्रिम केले होते. चव अप्रतिम आली होती, पण थोडे आईस्क्रिस्टल्स झाले होते. धन्यवाद मुग्धा.....

@ कांचन, आत्ता पाहिले मी तु बनविलेले आइस क्रीम. मस्त दिसते आहे. लेकीला आणि नवरोबाला आवडले का?
बाकी सगळ्यांची प्रचि एकदम तोंपासु.
मी साहित्य सगळे आणलेले आहे. मुहुर्त कधी लागतो ते पहायचे.

mazi Diwali ankant pakru denyachi tarikh me misali Sad
jaudya aata ithe taken tumchya sathi upasachi navin recipe..... naav aani photo sahit...... keep waiting Happy

११ होती बहुतेक. मला कोणी सांगेल का नक्की काय तारीख आहे ते, पाकृ फोटोसहित तयार आहे... १६ तारीख असेल तर आजच पाठवीन दिवाळी अंकात माझी पाकृ Happy

हो बघितल मी पण आता नवीन अडचण आली आहे त्यांना पाकृ करतानाच व्हिडीओ शुटींग हव आहे. प्रचि चालेल का विचारल आहे मी पण प्रचिपण ३नच आहेत एक तयार बॅटरच, एक गॅसवरच आणि एक सर्व्ह केलेल्या डिशच

हो आत्ताच संपादकांचा रिप्लाय आला की यंदाच्या दिवाळी अंकात पाकृंचा समावेश करणार नाहियेत.... त्यामुळे आता माझी नेक्स्ट रेसिपी आहारशास्त्र आणि पाककृतीच्या बाफवर टाकते. जरा हापिसातली काम संपवते आणि प्रचिसहित पाकृ टाकते. Happy

स्ट्रॉबेरी आईसक्रिम मस्त दिसतंय. सेट झाल्यावरही रंग असाच फिका गुलाबी होता का?>>> हो आणि ताज्या फळाची चव मस्तच लागते.

हा धागा निवडक दहात नकोच्..खरं तर पोत्यात घालून कुठं तरी लांब सोडून यायला हवा हा धागाच्.. नुसते नाव वाचून आइक्स्रीमची तहान लागते आहे...

मी चिकूचं केलं. कशाचं आहे ते न विचारता चॉकलेट फ्लेवर म्हणून तोंडात घातलेल्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते... म्हणजे चांगल्या अर्थाने.
मस्तं चव आली होती. थोडे क्रिस्टल झाले होते पण ते, चिकूच्या पल्पमधे असलेल्या पाण्याने (खरतर पाणी असायला नको. पण... ) असणार. मला असं वाटतं की, पल्प थॉ झाला असेल अन परत फ्रीझ केला असेल (मी नाही... चिकू ते पल्प ते मी विकत घेऊन घरी ह्या मधे कधीतरी) तर वाफेचे क्रिस्टल्स होत असावेत. फ्रोझन भाज्यांच्या पिशव्यात सुद्धा सापडतात लेकाचे.
सिताफळं इथे चांगली नाहीत सध्या. मिळालं की नक्की करणार.
फोटो लेकाने काढला पण इथे देण्यासारखा नाही... त्यात आईस्क्रीम सोडल्यास, त्याचे मित्रं, पसारा असं बरच सटरफटर काय काय आलय.

'सिता'फळाच्या खेपेला मित्रं-बित्र काय्येक जमवायच्या आधी मीच फोटो काढायचा असा 'राम'बाण उपाय योजण्याचे मनात आहे.

मी दसर्‍याला शहाळ्याचं आयस्क्रीम केलं. यम्मी झालं. फोटू सिताफळ आयस्क्रीम आणी शहाळं वाला (दोन्ही पांढरेच तेव्हा तसे सेम दिसतात. चवीतच फरक काय तो Wink ) मोबाईल मधे अडकलेत. डेटा केबल मिळाली की इथेही अपलोड करेन. व्हॉ अ‍ॅप वर इथल्या काहींनी बघितलेत फोटो आणि लाळही गाळलेय Proud

Pages