नॅचरल्स आइस्क्रीम आता घरच्या घरी

Submitted by मुग्धटली on 18 September, 2013 - 02:20
natural icecream
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

साहित्यः
दुध - १ वाटी/कप,
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप,
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप,
आवडत्या फळाचा गर/पल्प - १ वाटी/कप,
साखर - चवीनुसार,

क्रमवार पाककृती: 

वरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेउन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते.

वैशिष्ट्य : पूर्ण कृतीमध्ये पाण्याचा वापर अजिबात नसल्याने आइस्क्रीममध्ये बर्फाचे खडे होत नाहित व चव अगदी नॅचरल्सचे आइस्क्रीम्स खाल्ल्यासारखी लागते.

अधिक टिपा: 

टिप : फळाच्या गरामध्ये पाण्याचा अंश असलेली फळे (संत्र, मोसंब, कलिंगड इ.) घेउ नयेत. घट्ट गराची फळे (आंबा, सीताफळ, चिकु, स्ट्रॉबेरी, पपई) घ्यावीत.

माहितीचा स्रोत: 
नणंदबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयस्क्रीम करण्यासाठी उकळत ठेवलेल दुध खाली जळाल त्याला जळका वास लागला आहे काय करु?>> मला वाटत नका वापरु .आयस्क्रीमचि टेस्ट बदलेल...

मग त्या दुधाच काय करु जेणे करुन त्याचा वासा जईल? >> माझ काय चुकल या धाग्यावर लिहि ..काहि तरि मदत होइल..

तेजस्विनी, आहारशास्त्र आणि पाककृती या गृपवर जाउन शोधाव लागेल. खूप धागे निघाले आहेत त्यामुळे सापडायला वेळ लागेल.

बरेच दिवसांनी आज मुहूर्त लागला ice cream करायला . mango आइसक्रीम केले . मस्त झाले .
मुग्धा , Thank you so much !
त्यात मी साय किंवा क्रीम काहीच घातले नाही पण तरीही छान झाले .
image_8.jpg

पल्प वापरला का फ्रेश आंबा? पल्प कोणी वापरला असेल तर प्रमाण द्या प्लिज . पूर्ण धागा वाचला कोणीच प्रमाण नाही दिलेलं पल्पचं.

अरे वा!! अन्विताजी मस्तच.
मलाही आंबा आइसक्रीम बनवायचं आहे.
किती आंबे ह्या रेसिपीच्या प्रमाणात घातले?

धागामालकीण ह्यांनी एक वाटी रस पुरे अशी सुचना मला दिली आहेच.
तुमचा कालचा नुअभव विचारण्यासाठी ही पोस्ट.

देवकी , झकासराव
२ आब्यांचा रस घेतला साधारण सव्वा वाटी असावा
१ वाटी मिल्क पावडर , चवीप्रमाणे साखर आणि १ वाटी चितळे गाईचे दूध . ( दूध पण सव्वा ते दीड वाटी चालू शकेल असे वाटते ) बाकी साय / क्रीम अजिबात घातले नाही .

मी पण केले आंबा आईसक्रीम! मस्त झाले होते.
मी एका मोठ्या आंब्याचा पल्प करून घेतला मिक्सीमध्ये. तेवढा पुरेसा झाला. बाकी प्रमाण सेम!

परवा फणसाचे आइस्क्रीम केले होते. एकदम यम्मी लागत होते आणि चव खरंच एकदम नॅचरल्स सारखी.
काल आंबे आणून ठेवले आहेत आता नेक्स्ट नंबर त्यांचा.
मुग्धा, धन्स गं.

अगं, गावावरून बरका फणस आला होता त्याचे गरे काढून आठळ्या वेगळ्या करून मिक्सरला पल्प केला आणि काही गऱ्यांचे तुकडे करून घातले.

आंब्याचा पल्प प्रमाणापेक्षा जास्त घेतला मी.. एक वाटी एक आंब्याचा पल्प घेतल्यावर आंब्याची चव नाही आली म्हणून २ आंबे घेतले पण ते जास्तच झालं, मग त्याला नॅचरल्स ची चव नाही आली, फक्त आंब्याची चव आली! घरच्यांना आवडलं खूप , पण मला तितकं नाही आवडलं Uhoh घरचे म्हणाले चांगलं झालंय की, काहीतरी काढत बसू नकोस
Sad

गायु, घरचे म्हणाले ना चांगल... गंगेत घोड न्हायल बघ... आपण हे सगळ करतो तरी कश्यासाठी त्यांच्या चांगल्या शब्दांसाठी.. रेडिमेड पल्पला नसतेच अग रसाची चव.. परवा आम्ही साबांच्या वादीनिमित्त आंबे महाग होते म्हणून रसाच्या जागी पल्प आणुन खाल्ला.. मला तर फ्रुटी वाटीत घेउन खाल्ल्यासारख वाटल. साबा म्हणाल्या त्यात दुध घातल तर लागेल रसासारखी चव... आता परत करशील तेव्हा दुध जरा जास्त घाल आणि साखरही थोडी वाढव त्यात...

धन्यवाद अन्विताजी.
एका आंब्याचा रस घालेन आणि अर्ध्या आंब्याचे तुकडे घालेन.
Happy

उरलेला अर्धा आंबा आइसक्रीम केल्याचं श्रमपरिहार म्हणुन पोटात जाइल्च. Proud

उरलेला अर्धा आंबा आइसक्रीम केल्याचं श्रमपरिहार म्हणुन पोटात जाइल्च>>>> तुम्ही करणार आक्री झकोबा?? हायला....

धन्यवाद अन्विता. योगायोगाने फ्रेश आंबे आहेत आज तर पल्प ची गरज नाही पडणार. शनिवारी करीन.
सख्यांनो, मुळ रेसिपीच्या प्रमाणाने किती आईस्क्रीम बनले? मि ३ पट सगळं घ्यावं म्हण्तीय. आणि मला वाटते कि, hand blender ne अजुन easy होइल.:)

साधारण अर्धा किलोचा family pack मिळतो न त्यापेक्षा जरा जास्तच बनते हे आईस्क्रीम. आणि मी सुद्धा hand mixer ने केले त्यामुळे झटपट झाले काम.

मुग्धटली, पल्प म्हणजे घरगुती पल्प..आमरस पण केला होता त्यातला मी वापरला Proud पण हे मात्र खरंय. घरी आवडलं कि हुश्श आणि खुश्श Biggrin

Pages