नॅचरल्स आइस्क्रीम आता घरच्या घरी

Submitted by मुग्धटली on 18 September, 2013 - 02:20
natural icecream
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

साहित्यः
दुध - १ वाटी/कप,
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप,
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप,
आवडत्या फळाचा गर/पल्प - १ वाटी/कप,
साखर - चवीनुसार,

क्रमवार पाककृती: 

वरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेउन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते.

वैशिष्ट्य : पूर्ण कृतीमध्ये पाण्याचा वापर अजिबात नसल्याने आइस्क्रीममध्ये बर्फाचे खडे होत नाहित व चव अगदी नॅचरल्सचे आइस्क्रीम्स खाल्ल्यासारखी लागते.

अधिक टिपा: 

टिप : फळाच्या गरामध्ये पाण्याचा अंश असलेली फळे (संत्र, मोसंब, कलिंगड इ.) घेउ नयेत. घट्ट गराची फळे (आंबा, सीताफळ, चिकु, स्ट्रॉबेरी, पपई) घ्यावीत.

माहितीचा स्रोत: 
नणंदबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिताफालाचा गर बियांसकट चमच्याने काढून घेऊन अगदी स्लाईट मिक्सरमधून काढून घे बिया आणि गर वेगळे होतात. >>>>>>>>>>> मुग्धा, तू सांगितलेली सीताफळाचा गर काढायची आयडिया अफलातून आहे. खूप खूप धन्यवाद.

सांझु, मी केले नाही. पण मी पल्प सोडून सगळे सामान वरील प्रमाणात घेतले. त्यात वेलची पावडर + बदाम -पिस्ते काप (थोडे) टाकून सेट केले. मस्त कुल्फीसारखी चव लागली.
तुम्ही जास्त प्रमाणात ड्रायफ्रुटस टाकुन सेट करा. वरुन रोस्टेड बदाम+पिस्ते बारीक तुकडे करुन घाला. रोस्टेड बदाम्/पिस्ते मीठ नसलेले आहेत याची खात्री करुन घ्या! हवे असल्यास केसर घाला.

मी सिताफळाचे आईसक्रीम केले होते. एकदम मस्त झाले. सर्वांना आवडले.

१ वाटी दूध(गरम करुन मग थंड केलेले), १ वाटी सिताफळाचा गर, १०० ग्रॅ. नेस्टले मिल्क पावडर, २०० ग्रॅ. अमुल मिल्क क्रीम आणि चिमूटभर साखर असे प्रमाण घेतले.

क्रीम जरा जास्तच झाली पण उरलेल्या क्रीमचे काय करायचे म्हणून सगळी २०० ग्रॅम पूर्ण वापरली.

क्रिस्टल अगदी किंचित लागत होते, पण चव मात्र अगदी अप्रतिम होती.

काल कोजागिरीसाठी हेच आईसक्रीम केलं सीताफळ घालून. तिप्पट प्रमाणात केलं. दिड वाटी पिठीसाखर घातली.

मुग्धा, धन्यवाद Happy

काल हे आयस्क्रीम प्रत्येक घटक १ मेजरींग कप या प्रमाणात केले. साखर पाव कपापेक्षा थोडी जास्त लागली
मिश्रणाचे दोन भाग केले आणि २ वेगवेगळे फ्लेवर्स वापरले. फणस आणि गुलकंद. आयस्क्रीम एकदम सुपरहीट. नक्कीच परत परत केले जाईल.
मला स्वत:ला चव कुल्फीसारखी जास्त वाटली. पुढच्यावेळी सेट होत आले की मिक्सरमधून काढेन म्हणजे जास्त स्मूथ होईल.
पुढच्यावेळी करतांना लिची, बनाना आणि कोकोनट हे ३ फ्लेवर्स करणार आहे. तसेच दूध व साखर न घालता कन्डेन्ड मिल्क घालावे असा विचार आहे.
धन्यवाद मुग्धा.

धन्यवाद मुग्धा रानडे
मी माय्बोलिवर नवीनच आहे .
मी तुमच्या क्रुतिने आईस्क्रिम केले . ते फरच छान झाले सग्ल्यन अवडले.

धन्यवाद वरील दोन्ही पोस्टींना.....
रच्याकने. उद्या अंगारकी चतुर्थी आहे, माबोवर मी दिलेली उपसाच्या आप्प्यांची रेसिपी नक्की करुन बघा हं.. आणि इथे लिहायला विसरु नका कशी वाटली ते.... Happy

काहि काहि रेसीपी करूनच पहाव्या लागतात जर सोप्या असतील तर...
रोज हा धागा बघते व इतराम्चे फोटो पाहून विचार करते.. की उद्याला करेनच हि आईसक्रीम... पण काहीना काही विसरते आणायला. खूप फेमस झालाय धागा.

जेव्हापासुन हा धागा आलाय त्या दिवसापासून घसा धरलाय आणि खुप म्हणजे खुप कफ झालाय..
आईसक्रीमसाठी आणलेली सिताफळेसुद्धा वाया गेली Sad

आता कधी मला बरे वाटेल आणि कधी आईसक्रीम करता येईल कोणास ठाऊक.
दिवाळीत तरी नक्की करणारच आहे मी हे आईसक्रीम !!! Yummmmm...gif

आई ग पियु. तुला लवकरात लवकर बरे वाटो आणि ह्या कृतीने केलेले आईस्क्रिम तुझ्या मुखात पडो अशी मी देवाजवळ प्रार्थना करते....

साय/फ्रेश क्रिम इथे मिळत नाही. whipping cream वापरावे का? अजून काही alternative? इतकी सोपी कृती आहे, करायचेच आहे.

सीताफळ होते तर मिल्क पावडर नव्हती.आता क्रीमपण नाही.काय करावे बरे? आळस झटकून सर्व आणावे हे खरे...........

लवकर लव्कर अन्विता... आणि सीताफळ, शहाळ सोडुन दुसर काहितरी घाल त्याच्यात आणि फोटो टाक इथे.

मी काल सीताफळाचं केलय, मस्त झालय आणी क्रिस्टल्स जवळपास नाहीत Happy जरा साखर घालायला हवी होती, पण छान स्मूथ झालय.

@रुनी पॉटर : आत्ता 'गुलकंद' घालून प्रयत्न करावं असा विचार आहे. गुलकंद एक कप/वाटी घेतलं तर साखर अजिबातच लागणार नाही ना?

रंगासेठ
मी सगळे पदार्थ मिसळून मग शेवटी लागेल तेवढी साखर असे केले होते. तेव्हा गुलकंद घालून नीट घुसळून चव घेवून अगदी छोटे चहाचे २ चमचे एवढीच साखर घातली होती. फणस घातला त्याला मात्र जास्त साखर लागली. मी कॅन्ड फणस वापरला होता

हे आइस्क्रीम खूपच टेम्टींग आहे. पण रेसेपी यायच्या एक आठवडा आधीच लेकाला टॉन्सिल्सचा त्रास पहिल्यांदाच झाला होता. सिझनही बदलतोय. पुढच्या सिझनपर्यंत ही रेसेपी करुन बघता येणार नाही. Sad

Pages