नॅचरल्स आइस्क्रीम आता घरच्या घरी

Submitted by मुग्धटली on 18 September, 2013 - 02:20
natural icecream
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

साहित्यः
दुध - १ वाटी/कप,
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप,
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप,
आवडत्या फळाचा गर/पल्प - १ वाटी/कप,
साखर - चवीनुसार,

क्रमवार पाककृती: 

वरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेउन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते.

वैशिष्ट्य : पूर्ण कृतीमध्ये पाण्याचा वापर अजिबात नसल्याने आइस्क्रीममध्ये बर्फाचे खडे होत नाहित व चव अगदी नॅचरल्सचे आइस्क्रीम्स खाल्ल्यासारखी लागते.

अधिक टिपा: 

टिप : फळाच्या गरामध्ये पाण्याचा अंश असलेली फळे (संत्र, मोसंब, कलिंगड इ.) घेउ नयेत. घट्ट गराची फळे (आंबा, सीताफळ, चिकु, स्ट्रॉबेरी, पपई) घ्यावीत.

माहितीचा स्रोत: 
नणंदबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

mugdha...gharachi say vaparunahi titakich changali chav yete ka g ? gharat cream sodun baki sagle ahe ani gharachi sathavaleli say vaprayachi bhiti vatatiye...

अग सुमेधा घरच्या सायीने पण तेव्हढीच मस्त चव येते. मी कायम घरची सायच वापरते..... क्रिम कंदी कंदि न्हाय... आणि आता आईस्क्रिम कर आणि तुच फोटो डकव इकडे, कसं????? Proud

जागू तै,
सिताफळाचा गर कसा काढला? काही टीप्स आहेत का?
सध्या ढीगाने सिताफळे दिसतात मार्केट मध्ये. पण हे गर काढायचे काम खुप किचकट दिसतेय.

आज शहाळ्याचे आइसक्रीम लावले आहे. खूप छान होईल असे दिसते आहे एकंदरीत. मुग्धा तुझे डोंगराएवढे उपकार झाले बघ्....फार पुण्य लाभणार आहे तुला. Happy

अग सुमेधा ते शहाळ्याचे तुकडे आहेत न ते अगदी हलकेच फिरवायचे मिक्सरमधुन. त्याबरोबर हे पण खर आहे की खोबर जर जाड असेल न तर ते हलकेच मिक्सरमधुन फिरवुन तुकड्यांची टेस्ट मिळते.
Blush उपकार कसले त्यात सुमेधा? मला तर वाटलच नव्हत की या रेसिपीला इतका चांगला प्रतिसाद मिळेल म्हणुन कारण याआधी मी चायनीज पदार्थांच्या ३ रेसिप्या टाकल्या होत्या पण एव्हढा चांगला प्रतिसाद नव्हता मिळाला. त्यामुळे समस्त माबोकरांना मनापासुन धन्स. आणि हो आता तु फोटो टाक इकडे काय????

जागू तै,
सिताफळाचा गर कसा काढला? काही टीप्स आहेत का?
सध्या ढीगाने सिताफळे दिसतात मार्केट मध्ये. पण हे गर काढायचे काम खुप किचकट दिसतेय.
>>>>>>>> गमभन ही घे टिप. सिताफालाचा गर बियांसकट चमच्याने काढून घेऊन अगदी स्लाईट मिक्सरमधून काढून घे बिया आणि गर वेगळे होतात.

अवले मला पाहीजे ते मॅन्गो आईस्क्रिम आत्ताच्या आत्ता. तोपासु ना.

तुला आत्ता आंबे कुठे मिळाले? पल्प आणलास का?

गमभन मी फार कष्ट घेतले हो सिताफळाच्या बिया काढण्यासाठी. अगदी एक एक करुन बी काढळी दोन सिताफळांची तेंव्हा एक वाटी गर जमला Lol नंतर इथे फोटो डकवल्यावर मुग्धा ने सांगितले की तिने इथे टिप दिली होती ती खालील प्रमाणे :

सिताफळाचा गर बियांसकट चमच्याने काढून घेऊन अगदी स्लाईट मिक्सरमधून काढून घे बिया आणि गर वेगळे होतात.

जागु, आता परत करुन बघ तस आणि इथे सांग कारण मी स्वत: कधी काढला नाहिये गर पण नणंदेला विचारल तेव्हा तिने अस करायला सांगितल.
आता नवरात्रीच्या उपासाला पण करता आणि खाता येईल आईस्क्रिम. बाहेरच आईस्क्रिम नाही खाता येत कस्टर्ड पावडर असल्याने.

मुग्धा तुला खुप पुण्य लाभणार आणि तोंपासु फोटो टाकणार्‍यांना खुप पाप लागणार..
नजर हटत नाहिये मँगो आईसक्रीम वरुन माझी.. Yummmmm...gif

एकदा सेट झालेलं आइस्क्रीम न वितळवता पुन्हा एकदा मिक्सरमधून काढायचं, आणि सेट करायचं. मऊतलममुलायम होतं.

हि रेसिपी आधि कुनि दिलि होति का ? कारन मि मे मध्ये आंबे वापरुन असे आईस्क्रिम केले होते एकदम मस्त झाले होते ...पन मला आता आठवत नाहि मि रेसिपिचि PRINT कोनति नेलि होति..

मी पपई / पपईचे तुकडे घालून आइस्क्रीम केले होते. छान झाले.
मुग्धा.रानडे धन्यवाद.सोपी रेसिपी आहे.प्रमाणही लक्षात ठेवायला सोपे आहे.
हे फोटो -
p1.JPGp2.JPG

भरत हा हा हा... डिट्टो Happy
माशा मस्तंच फोटो... सगळ्यांनी मस्तच वेरिएशन्स दाखवलेत आईस्क्रीम्स मध्ये... सगळेच प्रचि छान.
माशा खूप आईस्क्रिस्टल्स झालेले का?
आरती मस्त तोंपासू प्रचि. खूप सॉफ्ट झालेलं आईसक्रीम की वितळलंय Happy आणि आंबे कुठे लिळाले? फ्रोजन वापरले आहेत का?

Pages