नॅचरल्स आइस्क्रीम आता घरच्या घरी

Submitted by मुग्धटली on 18 September, 2013 - 02:20
natural icecream
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

साहित्यः
दुध - १ वाटी/कप,
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप,
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप,
आवडत्या फळाचा गर/पल्प - १ वाटी/कप,
साखर - चवीनुसार,

क्रमवार पाककृती: 

वरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेउन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते.

वैशिष्ट्य : पूर्ण कृतीमध्ये पाण्याचा वापर अजिबात नसल्याने आइस्क्रीममध्ये बर्फाचे खडे होत नाहित व चव अगदी नॅचरल्सचे आइस्क्रीम्स खाल्ल्यासारखी लागते.

अधिक टिपा: 

टिप : फळाच्या गरामध्ये पाण्याचा अंश असलेली फळे (संत्र, मोसंब, कलिंगड इ.) घेउ नयेत. घट्ट गराची फळे (आंबा, सीताफळ, चिकु, स्ट्रॉबेरी, पपई) घ्यावीत.

माहितीचा स्रोत: 
नणंदबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

sumedha photo tak na tu.... sagalyana sangat hotis photo taka photo taka mhanun tu tak na aata.
me udya chikucha ice cream karaycha plan karat aahe, ya veles photo uplode karaycha prayatna karen. Happy

ag...te purn set vhayachyaa aat...dudh coldrink asalyapasun amchya gharachya public ne khayala suruvat keli....ani ekach scoop bhar icecream tayar hoilparyant urale hote evadhya motthya bhandyat Happy

सुमेधाव्ही, Biggrin

आरती, तू आंब्याचे आईस्क्रीम करताना कॅन्ड आंबा/पल्प वापरला होता की ताजा?

मी पण चिक्कू वापरुन केलं, चव मस्त आली आहे, पण जरास बर्फाचा थर (हलकासा) आलाय. कदाचित सेट झाल्यावर एकद फिरवून पुन्हा लावाय्ला हवं होतं. पाणी नाही वापरलं, आणि हो लगेच विरघळतं पण. तरीही चव उत्तम आणि सोप्पी पाकृ असल्याने आत्ता पपई/सिताफळ चे पण प्रयोग करून पाहतो Happy

तसे थोडे बर्फाचे फ्लेक्स मधे मधे आहेत म्हणायला....पण तरीपण चव खूप चांगली आहे. आणि तसेही एरवीच्या फ्रीजमधल्या आइस्क्रीम्पेक्षा ह्यातले बर्फाचे प्रमाण कमीच वाटते आहे. आम्च्य घरी हे आइस्क्रीम हिट झाले. आता दसर्‍याच्या दिवशी सिताफळाचा प्रयोग.

सुमेधाव्ही, छान छान..... बर्फाच्या खड्यांबद्दल बोलायच तर सध्या दुधातच पाणी असत ना त्यामुळे बहुतेक थोडेसे खडे होत असतील अस मला वाटत.....

रच्याकने, इथे कोणाला उपासाच्या कचोरीची रेसिपी येते का? इथे टाकली असेल तर लिंक देईल का मला कोणी???

काल ह्या रेसीपीने सिताफळ आईस्क्रीम करुन बघितले. मस्त झाले.
पुढच्या वेळेस चिक्कू करुन बघेन..
20131006_222850.jpg

धन्यवाद अशी सोप्पी रेसिपी दिल्याबद्दल !!!!!

मुग्धा तुस्सी ग्रेट हो.... शनिवारी चिकू आईस्क्रीम केले आणि घरी सांगितले की नॅचरल्स मधून आणले.....नंतर जेव्हा सांगीतले की घरी केले तेव्हा सगळ्यांना आच्छर्य वाटले. Credit goes to u only...मला उगाच भाव खायला मिळाला Happy
मनापासून आभार.

अरे वा सामी Happy क्रेडिट द्यायच असेल तर माझ्या नणंदेला द्याव लागेल कारण तिने मला शिकवलेली रेसिपी मी इथे शेअर केली, यात माझ काहिच नाहिये.... तरी पण मनापासुन थँक्यु Happy

सगळ्या माबोकरणींना सुचना आईस्क्रिम खायला देताना आधी सामीने सांगितल तस नॅचरल्समधुन आणलय असच सांगा आणि मग भरपुर भाव खाउन घ्या......

अवल, देते मी जागुला एक स्कुप्, पण ती तुला जे काही देणार ते मला पण पाहिजे Happy

ड्रिमगर्ल आणि वत्सला, मला ताजा आंबा मिळाला. म्हणजे घरात आंबा होता म्ह्णुनच आंब्याचे केले.
मी फोडी चिरुन बाकी सगळ्या बरोबर मिक्सरमधे फिरवल्या. मस्त सॉफ्ट झाले होते, पण मला ते नॅचरल्स पेक्षा पॉट आईस्क्रिम सारखे लागले चविला. मजा आली खायला.

धन्यवाद मुग्धा ... Happy

तायांनो, आज मी पण केलंय आईसक्रीम ....सिताफळ घालून

पण मिल्क पावडर जास्त पडलेली दिसतेय !!!

Sad Sad Sad

आज कॅन्ड आंबा वापरुन करुन पाहिलं. आंब्याची चव खास अशी मुळातच नसल्याने मँगो आईस्क्रीम झाले नाही. पण तरी छान झाले आहे. लवकरच इथे आंबे मिळू लागतील मग परत ट्राय करते...
सोप्पी रेसिपी आहे एकदम!

हुश्श! आले एकदाची सीताफळ आईस्क्रिम सेट करायला ठेउन.

हा घ्या आईस्क्रिम सेट होण्याच्या आधीचा फोटु...... स्कुपचा फोटु रात्री किंवा उद्या टाकेन.......
Photo0081.jpg

मुग्धा, काल सीताफळ आईस्क्रीम केलं होतं.
अफाट झालेलं.
नवर्याने 'निवडक दहात' टाकलं. मुलांना अतिशय आवडलं.
धन्यवाद.

मी थोडा पल्प मिक्सरमधून न काढता नंतर त्या मिश्रणात मिसळले.
सीताफळाचे फ्लेक्स आईस्क्रीम खाताना मध्येमध्ये लागत होते ते फार छान वाटत होतं.

अज्जिबात बर्फ नव्हता.
एक कप दूध, २०० मिलीची अमूल फ्रेश क्रीम, त्याच कपाने एवरीडेची कपभर पावडर, तीन सिताफळांचा गर मिक्सरमधून
काढला. सिताफळे गोड असल्याने साखर घातली नाही. हा ज्यूसच माझी मुलगी अर्धा वाटी प्यायली. Wink
अर्ध्या सीताफळाचे फ्लेक्स घातले.
रात्रीपर्यंत सही आईस्क्रीम तयार झाले होते. स्कूप करता येत होते.
तुला अनेकानेक धन्यवाद.

अरे वा जागु म्हणजे उद्या सगळ्यांना तुझ चिकुच आणि माझ सिताफळाच आईस्क्रिम व्हर्चुअली खायला मिळणार तर Happy

वरती सेट करायला फ्रिजमध्ये ठेवायच्या आधीचा फोटु डकवला आहे बघ.

अवांतर : सीताफळाच्या बिया विषारी असतात असे ऐकले आहे मग सिताफळाचा गर मिक्सरमध्ये फिरवताना बियांचा भुगा होऊन त्या गरात मिक्स नाही होत का?

आशिता बियांचा भुगा होत नाही आणि गर अगदी हलकेच फिरवायचा आहे मिक्सरमधुन जेणेकरुन बिया गरापासुन वेगळ्या करायला सोप जात

कालच आईस्क्रिम फोटो काढण्याचा विचार मनात येई पर्यंत अर्ध संपल होत. नंतर वितळेल म्हणून फोटो काढण्याचा विचार वितळवून टाकला. Lol

Pages